चालू घडामोडी : २८ व २९ मे
भारताचे मॉरिशसला ५० कोटी डॉलर्सचे सहाय्य
- हिंदी महासागरातील सागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर परस्परांना सहकार्य करण्यावर भारत आणि मॉरिशस यांच्यामध्ये करार करण्यात आला आहे.
- या अनुषंगाने भारत सरकार मॉरिशसला ५० कोटी अमेरिकी डॉलर्सचे आर्थिक सहाय्य करणार आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांच्यामध्ये दोन्ही देशांमधील नागरिकांची सुरक्षा आणि आर्थिक संधींची उपलब्धता या विषयांवर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली.
- दोन्ही देशांमधील सागरी सुरक्षेसंदर्भातील करारामुळे सहकार्य आणि क्षमतांचा विकास होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या युरोप दौऱ्याला सुरुवात
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २९ मेपासून युरोप दौऱ्याला सुरुवात केली असून ते या दौऱ्यामध्ये मोदी जर्मनी, स्पेन, रशिया आणि फ्रान्स या ४ देशांना भेट देणार आहेत.
- या दौऱ्यामध्ये ते अर्थिक, सुरक्षा, विज्ञान, उद्योगधंदे आणि आण्विक क्षेत्राबाबत संबंधित देशांतील वरिष्ठांशी चर्चा कऱणार आहेत.
- याबरोबरच युरोपीय देश आणि भारत यांच्यात मुक्त व्यापाराचा करार, दहशतवादविरोधी लढाई हे विषयही चर्चेचा मुख्य अजेंडा असतील.
- या दौऱ्यादरम्यान रशियामध्ये होणाऱ्या वार्षिक व्दिपक्षीय शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर फ्रान्सला जाऊन तेथील नवनिर्वाचित राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांची भेट घेतील.
- शिवाय, जर्मनी येथे होत असलेल्या भारत-जर्मनी आंतर-सरकारी सल्लामसलत (आयजीसी) या परिषदेमध्येही ते सहभागी होणार आहेत.
- तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यानंतर स्पेनचा दौरा करणारे मोदी हे दुसरे पंतप्रधान असणार आहेत. सन १९८८मध्ये राजीव गांधी यांनी स्पेनचा दौरा केला होता.
ब्रिटिश हवाई दलाकडून आयसिसच्या तळांवर बॉम्बफेक
- मँचेस्टर अरेनामधील आत्मघातकी हल्ल्याचा बदला म्हणून ब्रिटिश हवाई दलाच्या विमानांनी आयसिसच्या तळांवर बॉम्बफेक सुरु केली आहे.
- ‘लव फ्रॉम मँचेस्टर’ असा संदेश लिहिलेले बॉम्ब ब्रिटिश सरकारच्या रॉयल एअर फोर्सकडून टाकण्यात आयसिसवर टाकण्यात आले आहेत.
- आत्मघातकी हल्लेखोर सलमान अबेदीने मँचेस्टरमधील अरियाना ग्रँडेच्या कॉन्सर्टदरम्यान घातपाती हल्ला केला होता.
- मागील आठवड्यात करण्यात आलेल्या या हल्ल्यात २२ लोकांचा मृत्यू झाला होता, तर ११९ लोक जखमी झाले होते.
- दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेकडून जपानवर टाकण्यात आलेल्या बॉम्बवरदेखील अशाच प्रकारे संदेश लिहिण्यात आला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा