ज्येष्ठ क्रीडा मानसशास्त्रज्ञ भीष्मराज बाम यांचे निधन
अनेक पदक विजेत्या नेमबाजांना मार्गदर्शन केलेले ज्येष्ठ क्रीडा मानसशास्त्रज्ञ भीष्मराज बाम यांचे १२ मे रोजी नाशिक येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
भीष्मराज बाम यांनी ३४ वर्ष पोलीस अधिक्षक म्हणून काम केले आहे. तसेच पोलीस महासंचालक म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला आहे.
पोलीस खात्यातील सेवेनंतर त्यांनी क्रीडा क्षेत्रातून मानसोपचाराचा अभ्यास करून देशातील अनेक खेळाडूंना घडवण्यात मोलाचे योगदान दिले आहे.
सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, कविता राउत, अभिनव बिंद्रा, अंजली भागवत, गगन नारंग यांसारख्या दिग्गज खेळाडूंना त्यांनी मार्गदर्शन केले आहे.
त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाची दखल घेत राज्य शासनाने त्यांना २०११-१२ मध्ये ते शिवछत्रपती पुरस्कार, तर २०१४मध्ये जीवनगौरव पुरस्काराने गौरविले होते.
पोलिस महासंचालकपदी असताना त्यांना राष्ट्रपतिपदकानेही गौरविण्यात आले होते. पोलिस दलातर्फे प्रकाशित होणाऱ्या दक्षता मासिकाचे ते दोन वर्षे संपादक होते.
त्यांनी क्रीडा मानसोपचार या विषयावर अनेक पुस्तके लिहिली. मना सज्जना, मार्ग यशाचा आणि विजयाचे मानसशास्त्र ही त्यांची पुस्तके लोकप्रिय ठरली.
त्यांचे ‘विनिंग हॅबिट’ हे पुस्तक हिंदी मराठी, तामिळ, पंजाबी भाषांमध्ये अनुवादित झाली आहेत. सध्या ते नॅशनल रायफल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
नॅशनल हेराल्ड प्रकरणी आयकर विभागाला तपास करण्याचे आदेश
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी संबंधित नॅशनल हेराल्ड प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने आयकर विभागाला तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
नॅशनल हेराल्डमध्ये यंग इंडिया, राहुल आणि सोनिया गांधी यांची भागीदारी आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यंग इंडिया प्रायव्हेट कंपनीमध्ये संचालक आहेत.
या यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या तपासणीचे आदेश दिल्ली उच्चालयाने आयकर विभागाला दिले आहेत.
यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने अयोग्य पद्धतीने असोसिएट जर्नल्सचे मालकी हक्क मिळवल्याचा आरोप सोनिया आणि राहुल गांधी यांच्यावर आहे.
त्यामुळे पटियाला हाऊन कोर्टाने राहुल आणि सोनिया गांधी यांना फसवणुकीचे षडयंत्र रचल्याप्रकरणी दोषी ठरवले होते.
यानंतर २०१६मध्ये दिल्ली हायकोर्टाने पटियाला हाऊस कोर्टाचा निकाल रद्द केल्याने सोनिया आणि राहुल गांधींना मोठा दिलासा मिळाला होता.
अमेरिकेकडून दहशतवादी संघटनांवर निर्बंध
दहशतवादी संघटनांना मिळणारा पैसा बंद व्हावा यासाठी अमेरिकेने पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांवर निर्बंध आणले आहेत.
यामध्ये हाफीज सईदची लष्कर-ए-तोएबा आणि जमात उद दावा तसेच इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया, आयएसआयएस खोरसाना या संघटनांचाही निर्बंधांमध्ये समावेश आहे.
या संघटनांना भरती आणि आत्मघातकी हल्ल्यांसाठी जी रसद मिळते ती तोडण्याच्या उद्देशाने अमेरिकेने हे निर्बंध आणले आहेत.
अमेरिकेच्या दबावामुळे पाकिस्तानने हाफीज सईदवर काही प्रमाणात नियंत्रण आणले आहे. अमेरिकेने हाफिजचा मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीतही समावेश केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा