चालू घडामोडी : ३० जून

आयईएच्या अध्यक्षपदी कौशिक बसू यांची नियुक्ती

  • देशाचे माजी प्रमुख आर्थिक सल्लागार कौशिक बसू यांची आंतरराष्ट्रीय आर्थिक महासंघाच्या (आयईए) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावरील त्यांचा कार्यकाळ ३ वर्षांचा असेल.
  • ९ जानेवारी १९५२ रोजी कोलकाता येथे जन्मलेले बसू यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्र हा मुख्य विषय घेऊन पदवीधर झाले आहेत.
  • पुढील शिक्षण त्यांनी विख्यात लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पूर्ण करत, अर्थशास्त्रातच पुढे संशोधन करण्याच्या उद्देशाने ते लंडनमध्येच राहिले.
  • लंडन येथे शिक्षण घेत असताना प्रा. अमर्त्य सेन यांच्या विचारांनी त्यांना भुरळ घातली. प्रा. सेन हेच त्यांचे पीएचडीचे मार्गदर्शक होते.
  • १९७६मध्ये डॉक्टरेट ते भारतात परतले. १९९२मध्ये त्यांनी ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट  इकॉनॉमिक्स’ या संस्थेची स्थापना केली.
  • याच काळात अर्थमंत्री असलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी त्यांचा परिचय झाला. पुढे मनमोहन सिंग हे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी बसू यांना सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार नेमले.
  • कौशिक बसू हे २००९ ते २०१२ या काळात भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत होते.
  • सरकारी पदावरून २०१२मध्ये निवृत्त झाल्यानंतर २०१६पर्यंत त्यांनी जागतिक बँकेचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून कार्यभार सांभाळला.
  • तेथील मुदत संपल्यानंतर ते कार्नेल विद्यापीठात इंटरनॅशनल स्टडीज विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
  • मोदी यांनी हट्टाने राबवलेला नोटाबंदीचा निर्णयही देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करता पूर्णत: चुकीचा असल्याची टीकाही त्यांनी केली होती.
  • भारतातील पाच विद्यापीठांनी मानद डॉक्टरेट देऊन त्यांचा सन्मान केला असून अर्थशास्त्रातील विविध घटकांवर त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.
  • आर्थिक क्षेत्रातील त्यांच्या आजपर्यंतच्या कामगिरीचा गौरव म्हणून मग आता त्यांच्यावर ‘आयईए’चे नेतृत्व करण्याची जबाबदारी टाकण्यात आली.
  • जगभरातील व्यावसायिक अर्थतज्ज्ञांचे नेतृत्व करणारा हा महासंघ, जागतिक स्तरावर आर्थिक धोरणाला वळण देण्याचे तसेच संशोधनाचे काम करीत असतो.
  • याआधी केनेथ अ‍ॅरो, रॉबर्ट सोलोव, अमर्त्य सेन आणि जोसेफ स्टिग्लिट्झ यांच्यासारख्या नोबेल विजेत्या अर्थतज्ज्ञांनी आयईएचे प्रमुखपद भूषवले आहे.

युवा भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची पुनर्नियुक्ती

  • भारताच्या ‘अ’ आणि १९ वर्षाखालील संघाच्या आणि प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडची निवड करण्यात आलेली आहे.
  • पुढील दोन वर्षांपर्यंत द्रविड भारत ‘अ’ आणि १९ वर्षांखालील भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी कार्यरत राहिल.
  • यानंतर द्रविडने भारतीय क्रिकेटला महत्त्व देताना आयपीएलचा संघ असलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला.
  • याआधी २०१५मध्ये द्रविडला या दोन्ही संघांच्या प्रशिक्षकपदी निवडण्यात आले होते. त्याच्या मार्गदर्शनाखाली युवा खेळाडूंनी मायदेशात व विदेशामध्ये चमकदार कामगिरी केली होती.
  • द्रविडच्या मार्गदर्शनाखाली १९ वर्षांखालील संघाने चमक दाखवताना २०१६मध्ये बांगलादेशमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले होते.

ब्रिटनच्या पंतप्रधान मे यांचा विश्वासदर्शक ठरावात विजय

  • ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांना विश्वासदर्शक ठरावात विजय मिळाल्याने त्यांच्या पंतप्रधानपदाच्या मार्गातील महत्त्वाचा अडथळा दूर झाला आहे.
  • ६५० सदस्यांच्या ब्रिटिश संसदेत थेरेसा मे यांच्या पारड्यात ३२३ मते पडली. तर ३०९ मते त्यांच्याविरोधात पडली. 
  • संसदेचा तीन वर्षांचा कार्यकाळ बाकी असताना एप्रिल महिन्यात थेरेसा मे यांनी अचानक मुदतपूर्व निवडणुका जाहीर केल्या होत्या.
  • ब्रेग्झिटचा निर्णय पुढे रेटण्यासाठी आवश्यक बहुमत हुजूर पक्षाला या निवडणुकांत मिळेल, असा मे यांचा अंदाज होता. पण हा अंदाज मतदारांनी फोल ठरवला. 
  • या निवडणुकीत थेरेसा मे यांच्या हुजूर पक्षाचे ३१८ खासदार निवडून आले होते. तर मजूर पक्षाने अनपेक्षित यश मिळवत २६१ जागांवर विजय मिळवला.
  • बहुमताचा ३२६ हा आकडा गाठण्यासाठी मे यांना शेवटी डेमॉक्रॅटिक युनियनिस्ट पक्षाची मदत घ्यावी लागली.
  • ब्रिटिश संसदेत हुजूर पक्ष आणि मजूर पक्षानंतर स्कॉटिश नॅशनल पक्षाचे सर्वाधिक ३५ खासदार निवडून आले होते.

हाफिज सईदच्या तेहरीक ए आझादीवर पाकमध्ये बंदी

  • पाकिस्तानचा दहशतवादी हाफिज सईद याच्या ‘तेहरीक ए आझादी जम्मू अँड काश्मीर’ या दहशतवादी संघटनेवर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे.
  • पाकिस्तानच्या नॅशनल काऊंटर टेरिरिझम अथॉरिटी अर्थात एनसीटीएने तेहरीक ए आझादीवर बंदी घातली आहे.
  • एनसीटीएच्या बंदी घातलेल्या संघटनांच्या यादीत जैश ए मोहम्मद, अल कायदा, बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि तेहरीक ए तालिबानसह ६४ संघटनांचा समावेश आहे.
  • भारताने या संघटनेच्या दहशतवादी कारवायांकडे ग्लोबल फायनान्शिअल टेरर बॉडी अॅक्शन टास्क फोर्सचे लक्ष वेधत या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली होती.
  • तसेच अमेरिकेने अलीकडेच पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांची पाळेमुळे उद्ध्वस्त करण्याचे, आर्थिक मदत रोखण्याचे तसेच बिगर नाटो मित्र राष्ट्राचा दर्जा रद्द करण्याचेही संकेत पाकिस्तानला दिले होते.
  • त्यामुळे धास्तावलेल्या पाकिस्तानला अखेर हाफीज सईदच्या या संघटनेवर बंदी घालणे भाग पडले.
  • हाफिज सईद हा मुंबईतल्या २६/११ च्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आहे. जानेवारी महिन्यापासून त्याच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी त्याला नजरकैदेत ठेवण्यात आले.
  • तेव्हापासून त्याने जमात उद दावा या आपल्या संघटनेचे नाव बदलून तेहरीक ए आझादी जम्मू अँड काश्मीर असे ठेवले.
ग्लोबल फायनान्शिअल टेरर बॉडी अॅक्शन टास्क फोर्स
  • मनी लाँड्रिंग, दहशतवाद्यांचे आर्थिक पाठबळ आणि अन्य संभाव्य धोक्यांना पायबंद करण्यासाठी कायदेशीर, नियंत्रण आणि कार्यवाहीत्मक उपायांच्या अंमलबजावणीसाठी या अ‍ॅक्शन टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.

चालू घडामोडी : २९ जून

इस्त्रोच्या जीसॅट १७चे यशस्वी प्रक्षेपण

  • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) २९ जून रोजी अत्याधुनिक दूरसंचार उपग्रह ‘जीसॅट १७’चे फ्रेंच गयाना येथून यशस्वी प्रक्षेपण केले.
  • फ्रेंच प्रक्षेपक एरियन ५ च्या माध्यमातून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. एरियनच्या सहाय्याने प्रक्षेपित करण्यात आलेला हा २१वा भारतीय उपग्रह आहे.
  • जीसॅट १७ या उपग्रहाचे वजन ३,४७७ किलो असून या उपग्रहामध्ये दूरसंचार सेवेसाठी नॉर्मल सी बँड, एक्स्टेंडेड सी बँड आणि सी बँड आहे. या उपग्रहाची आयुर्मर्यादा १५ वर्षांची आहे.
  • हवामानाविषयीची माहिती, शोधमोहीम आणि मदतकार्य करण्यासाठी या उपग्रहाचा वापर करता येणार आहे. यासाठी उपग्रहामध्ये उपकरणेही लावण्यात आली आहे.
  • जून महिन्याच्या सुरुवातीलाच इस्रोने जीएसएलव्ही मार्क ३च्या साह्याने जीसॅट १९ हा उपग्रह अंतराळात पाठवला होता.
  • या यशस्वी प्रक्षेपणानंतर गेल्या आठवड्यात इस्रोने ३१ नॅनो उपग्रह अंतराळात पाठवले होते. यामध्ये इतर १४ देशांच्या २९ उपग्रहंचाही समावेश होता.
  • इस्रोने गेल्या काही वर्षांत केलेल्या असामान्य प्रगतीमुळे अवकाश संशोधन व उपग्रह सेवा क्षेत्रात भारताचा दबदबा निर्माण झाला आहे.
  • भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टिकोनामधून इस्रोचे हे यश अत्यंत उल्लेखनीय मानले जात आहे.

एअर इंडियाच्या खासगीकरणला तत्त्वत: मान्यता

  • कर्जाच्या गर्तेत बुडालेल्या एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीला (खासगीकरण) केंद्र सरकारने तत्त्वत: मान्यता दिली आहे.
  • त्यानुसार एअर इंडियाच्या निर्गुंतवणूक प्रक्रियेसाठी गट स्थापन करण्यात येईल. या गटाकडून हिस्सेदारीच्या विक्रीसंदर्भातील रूपरेषा आणि तपशील ठरवण्यात येतील.
  • एअर इंडियावर सुमारे ५० हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. याशिवाय ४ हजार कोटींचा व्याजाचा बोजादेखील आहे.
  • गेल्या १० वर्षांपासून तोट्यात असलेल्या एअर इंडियाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे भाव घसरल्यामुळे आणि प्रवासी संख्येत वाढ झाल्याने फक्त २०१५-१६ मध्येच १०५ कोटींचा नफा झाला होता.
  • गेल्या १० वर्षांत भारताच्या एअरलाईन क्षेत्रात एअर इंडियाचा वाटा ३५ टक्क्यांवरुन १४ टक्क्यांपर्यंत घसरला आहे.
  • केंद्र सरकारकडून एअर इंडियासाठी आत्तापर्यंत ३० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.
  • यातील २४ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत देऊनही एअर इंडियाची घसरण सुरुच आहे.

आयपीएस महेश मुरलीधर भागवत यांचा अमेरिकेकडून सन्मान

  • तेलंगणामधील मराठमोळे आयपीएस अधिकारी महेश मुरलीधर भागवत यांचा अमेरिकेने ‘ट्रॅफिकिंग इन पर्सन रिपोर्ट हिरो अॅवार्ड’ देऊन गौरव केला आहे.
  • महेश भागवत आता हैदराबादमधील राचकोंडाचे पोलीस आयुक्त म्हणून आपले कर्तव्य बजावत आहेत.
  • महेश भागवत हे गेल्या १३ वर्षांपासून मानवी तस्करीविरोधात लढत आहेत. या १३ वर्षांमध्ये आंध्रप्रदेश आणि तेलंगणात त्यांनी त्यांच्या पथकासोबत शेकडो बालमजुरांची सुटका केली. शिवाय तेथील देहविक्री व्यवसायदेखील बंद केले.
  • यावेळी तेलंगणामधील मानवी तस्करीसोबत संबंध आलेल्या पुणे, बंगळुरू, दिल्ली तसेच सिंगापूर येथील केंद्रावरही त्यांनी कारवाई केली आहे.
  • ही कारवाई करताना भागवत अडथळ्यांना, विरोधकांना, जीवघेण्या धमक्यांना न घाबरता आपले कार्य करत राहिले.
  • त्यांनी आतापर्यंत शेकडो पीडितांची अन्य सरकारी विभाग आणि नागरी संस्थांच्या मदतीने सुखरुप सुटका केली आहे. तसेच त्यांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन होईल याची काळजीही घेतली आहे.
  • या विषयावर त्यांनी लिहिलेली पुस्तकेही भारत सरकारचे गृह मंत्रालय आणि संयुक्त राष्ट्रातर्फे प्रसिद्ध झाली आहेत.

रॅम सायकल रॅलीत भारतीयांचा विक्रम

  • जगातील सर्वाधिक खडतर सायकल स्पर्धा असलेली रेस अक्रॉस अमेरिका (रॅम) ही रॅली पूर्ण करत नाशिकचे रहिवासी श्रीनिवास गोकुळनाथ यांनी देशाचे नाव उज्ज्वल केले आहे.
  • नाशिकचेच डॉ. राजेंद्र नेहेते, डॉ. रमाकांत पाटील आणि डॉ. संदीप शेवाळे व मुंबईच्या पंकज मार्लेशा यांच्या सह्याद्री ग्रुपने सांघिक गट स्पर्धेत यश मिळवले.
  • यामध्ये सांघिक गटात सह्याद्री ग्रुपने नववे, तर वैयक्तिक गटात लेफ्टनंट कर्नल डॉ. श्रीनिवास गोकुलनाथ यांनी ७वे स्थान मिळवले. अशी कामगिरी करणारे गोकुलनाथ पहिले भारतीय ठरले आहेत. 
  • अत्यंत खडतर समजली जाणारी ही स्पर्धा अमेरीका खंडातील पश्चिम टोकापासून सुरू होवून पूर्वेच्या टोकाला संपते.
  • हे ४ हजार ८०० किलोमीटर अंतर पार करताना १२ राज्यातून प्रवास होतो. यात तीन पर्वतरांगा, दोन वाळवंट व चार नद्या येतात.
  • १ लाख ७० हजार फूट उंच इतकी चढाई करावी लागत असल्याने ही स्पर्धा पूर्ण करणेही आव्हानात्मक आहे.
  • यापूर्वी २०१५मध्ये नाशिकच्या डॉ. हितेंद्र आणि महिंद्र महाजन या बंधूंनी ही स्पर्धा पूर्ण करण्याची किमया साधली होती.  

व्हिजन-२०२० इंडियाच्या अध्यक्षपदी डॉ. ताराप्रसाद दास

  • नेत्ररोग व नेत्रदानाबाबत जनजागृती करणाऱ्या व्हिजन-२०२० इंडिया या संस्थेच्या अध्यक्षपदी ख्यातनाम नेत्रतज्ज्ञ डॉ. ताराप्रसाद दास यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • जगात २८.५ कोटी लोकांना दृष्टिरोग आहेत. त्यात ३.९ कोटी लोक अंध असून भारतात त्यांची संख्या १.५ कोटी आहे.
  • यातील अंधत्वाच्या बऱ्याच घटना या टाळता येण्यासारख्या असतानाही अंधत्वाचे प्रमाण वाढते आहे.
  • त्यामुळे दृष्टिदोष किंवा नेत्ररोगांचे भारतातील प्रमाण कमी करण्यासाठी सरकारने व्हिजन-२०२० या मोहिमेची आखणी केली आहे.
  • हा कार्यक्रम जागतिक आरोग्य संघटनेच्या नेत्ररोग प्रतिबंधक धोरणांचा एक भाग आहे. सध्या ही संस्था देशभरात राज्य सरकारे, रुग्णालये, नेत्र उपचार केंद्रे यांच्या माध्यमातून काम करीत आहे.
  • या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झालेले डॉ. दास हे निष्णात नेत्ररोगतज्ज्ञ असून, त्यांना या रोगांच्या प्रतिबंधासाठीच्या धोरणात्मक बाबींचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनुभव आहे.
  • ते आग्नेय आशियाच्या अंधत्व प्रतिबंध संस्थेचे अध्यक्ष व एल व्ही प्रसाद नेत्र संस्थेचे उपाध्यक्ष आहेत.
  • दास यांनी नेत्ररोगतज्ज्ञ म्हणून नैपुण्य साध्य केले असून दृष्टिपटलाशी (रेटिना) संबंधित रोगांचे ते तज्ज्ञ आहेत.
  • सध्या ते चीनमधील ग्वांगझूच्या सनयत सेन वैद्यक विद्यापीठात नेत्ररोगशास्त्राचे प्राध्यापक आहेत.
  • त्यांनी संबळपूर विद्यापीठातून एमबीबीएस पदवी, कानपूर विद्यापीठातून डीओएमएस म्हणजे नेत्रवैद्यकातील पदविका घेतली. त्यानंतर मदुराईच्या कामराज विद्यापीठातून ते नेत्ररोगशास्त्रात एमएस झाले.
  • ग्लासगो येथील रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सचे ते फेलो आहेत. नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसचेही ते फेलो आहेत.
  • त्यांना रावेनशॉ विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी दिली आहे. भारत सरकारने त्यांना २०१३मध्ये ‘पद्मश्री’ देऊन गौरवले होते.

अमेरिकेचे नवीन व्हिसा धोरण जाहीर

  • अमेरिकेने सहा मुस्लिमबहूल राष्ट्रांमधील निर्वासितांसाठी आता नवीन व्हिसा धोरण जाहीर केले आहे.
  • अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ६ मुस्लिम राष्ट्रांवर घातलेली बंदी अंशत: लागू करण्याची परवानगी दिल्यानंतर प्रशासनाने हे नवीन धोरण जाहीर केले आहे.
  • त्यानुसार सहा मुस्लिमबहूल देशांतील नागरिकांना आता अमेरिकेशी जवळचे कौटुंबिक आणि व्यापारी संबंध असल्यावरच व्हिसा मिळणार आहे. 
  • या सहा प्रतिबंधित देशांमधील नागरिकांना व्हिसासाठी अर्ज करताना अमेरिकेत राहणारे पालक, पती, मुलगा, मोठी मुलगी किंवा मुलगा, जावई, सून किंवा भाऊ-बहिणींसोबतचे नाते सिद्ध करावे लागणार आहे.
  • आजी- आजोबा, नातू, काकू, काका, पुतणी, भाचा, होणारी पत्नी हे जवळच्या नातेवाईकांमध्ये येणार नाही असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
  • कौटुंबिक नात्यासोबतच अमेरिकेसोबत व्यापारी संबंध असलेल्यांना व्हिसा मिळू शकणार आहे.
पार्श्वभूमी
  • काही महिन्यांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरिया, लिबिया, इराण, सोमालिया, सुदान आणि येमेन या ६ देशांची नावे प्रतिबंध यादीत समाविष्ट केली होती.
  • या देशांमधील निर्वासितांना अमेरिकेचा व्हिसा नाकारण्यात आला होता. अमेरिकेतील विविध न्यायालयांनी या आदेशाविरोधात निकाल दिला होता.
  • शेवटी हे प्रकरण अमेरिकेतील सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टाने या आदेशाची अंशत: अंमलबजावणी करण्यास परवानगी दिली.

बंडखोर विचारवंत लिऊ क्षियाओबो यांची कैदेतून सुटका

  • चीनमधील साम्यवादी विचारांविरोधात लढणारे नोबेल पारितोषिक विजेते प्राध्यापक, लेखक, विचारवंत लिऊ क्षियाओबो यांची कैदेतून सुटका झाली आहे.
  • सरकारविरोधात युद्ध पुकारल्याच्या आरोपावरून त्यांना १५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली गेली.
  • यकृताच्या कर्करोगाने त्यांना विळखा घातल्याचे उघड झाल्यानंतर पुढील वैद्यकीय उपचारांसाठी त्यांना तुरुंगातून सोडण्यात आले.
  • बीजिंग विद्यापीठात प्राध्यापक असलेले क्षियाओबो हे विद्यार्थ्यांबरोबरच युवा पिढीतही कमालीचे लोकप्रिय आहेत.
  • १९८९मध्ये त्यांनी बीजिंगसह विविध शहरांमध्ये चिनी सरकारच्या दडपशाही विरोधात उठाव केला.
  • या उठावातील सहभागाबद्दल त्यांच्यावर खटला भरून त्यांना २१ महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
  • सुटका झाल्यानंतर त्यांनी चीनमध्ये राजकीय खुलेपणा यावा या उद्देशाने त्यांनी ‘चार्टर एट’ या नावाने आपल्या मागण्यांची एक याचिका तयार केली. त्यावर देशातील अनेक विद्वान, विचारवंतांबरोबरच शेकडो कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या मिळवल्या.
  • त्यांच्या या मोहिमेला यश येण्याऐवजी सरकारविरोधात युद्ध पुकारल्याचा ठपका ठेवून थेट १५ वर्षे तुरुंगात त्यांची रवानगी झाली.
  • २०१०साली चीनमधील मूलभूत मानवी हक्कांसाठी अहिंसक मार्गाने प्रदीर्घ लढा दिल्याबद्दल क्षियाओबो यांना प्रतिष्ठेचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला.
  • मध्यंतरीच्या काळात त्यांची काही पुस्तकेही प्रकाशित झाली. चीनमधील राजवटीची टीकात्मक चिकित्सा करणारे ‘अ नेशन दॅट लाइज टू कन्सायन्स’ हे तैवानमध्ये प्रसिद्ध झालेले पुस्तक खूप गाजले.
  • चार महिन्यांपूर्वी क्षियाओबो यांना कर्करोगाने ग्रासल्याचे उघड झाल्यानंतर त्यांची तुरुंगातून तात्काळ सुटका करण्यासाठी दबाव वाढत गेला.
  • डॉक्टरांनीही त्यांना केमोथेरपीची गरज असल्याचे सांगितल्यानंतर त्यांची अखेर सुटका करण्यात आली.

जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताला दुसरा क्रमांक

  • भारतीय संघाच्या नेमबाजी पथकाने जर्मनीमध्ये सुरु असलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी करत दुसरा क्रमांक पटकावलेला आहे.
  • ३ सुवर्ण, २ रौप्य आणि ३ कांस्य पदकांसह भारताने पदतालिकेत दुसरा तर ८ सुवर्णपदकांसह १९ पदके जिंकून चीनने पहिला क्रमांक मिळवला आहे.
  • तरुणांच्या २५ मिटर पिस्तुल प्रकारात भारतीय संघाने सांघिक आणि वैयक्तिक सुवर्ण आणि रौप्य पदकाची कमाई केली.
  • भारताच्या पथकात अनिश भानवालाने अखेरच्या दिवसात केलेली कामगिरी भारताला दुसरे स्थान मिळवण्यात फायदेशीर ठरली.
  • अनिशने या स्पर्धेत प्रत्येकी १ सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक जिंकले. तसेच अनिशने सांघिक प्रकारातही भारताला सुवर्णपदकाची कमाई करुन दिली.

चालू घडामोडी : २८ जून

अमेरिका भारताला गार्डियन ड्रोन देणार

  • अमेरिकेने भारताशी संरक्षण व सुरक्षा सहकार्य वाढवण्याचे ठरवले असून, टेहळणीसाठी भारताला गार्डियन ड्रोन देण्यास मंजुरी दिली आहे.
  • गार्डियन ड्रोन विमाने मानवरहित असून, ती २७ तास आकाशात राहू शकतात व ५०,००० फूट उंचीवरून उडू शकतात.
  • भारताच्या सागरी सुरक्षेला मजबुती देण्यासाठी गार्डियन ड्रोन उपयोगी पडणार आहेत. भारतीय नौदलाची गुप्तचर, टेहळणी क्षमता यामुळे वाढणार आहे.
  • हा करार दोन ते तीन अब्ज डॉलर्सचा असून, त्यानुसार २२ गार्डियन ड्रोन अमेरिका भारताला देणार आहे.
  • याशिवाय अमेरिकेने एफ १६ व एफए १८ विमाने भारताला विकण्याची तयारी दर्शवली आहे.
  • तसेच अमेरिका व भारत वज्र प्रहार, रेड फ्लॅग युद्ध अभ्यास या कवायतीत एकत्र सहभागी होणार आहेत.

राजधानी आणि शताब्दी गाड्यांसाठी प्रोजेक्ट सुवर्ण

  • राजधानी आणि शताब्दी या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवेमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.
  • येत्या ऑक्टोबर महिन्यापासून ‘प्रोजेक्ट सुवर्ण’अंतर्गत अशा प्रकारच्या १५ राजधानी आणि १५ शताब्दी गाड्यांमध्ये या सुधारणांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
  • प्रवाशांना भोजन पुरविण्यासाठी ट्रॉली, गणवेशधारी नम्र कर्मचारी आणि करमणुकीची साधने, असे बदल तीन महिन्यांसाठी केले जाणार आहेत.
  • या वेगवान गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, हा ‘प्रोजेक्ट सुवर्ण’चा उद्देश आहे. यासाठी रेल्वेला २५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
  • यारोबरच डब्यांमधील स्वच्छतेवरही मोठा भर दिला जाणार आहे. तसेच प्रवाश्यांच्या तक्रारींचे निवारण करण्याकडे काटेकोरपणे लक्ष दिले जाणार आहे.
  • याशिवाय रेल्वेमधील सुरक्षा व्यवस्थाही वाढविली जाणार असून, त्यासाठी रेल्वे पोलिस दलाला सज्ज राहण्याच्या सूचना रेल्वे मंत्रालयाने केल्या आहेत.

नव्या शैक्षणिक धोरणाच्या आखणीसाठी कस्तुरीरंगन समिती

  • नव्या शैक्षणिक धोरणाची आखणी करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ज्येष्ठ शास्त्रज्ञ व इस्रोचे माजी संचालक के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नेमणूक केली आहे.
  • शिक्षणातील विविध क्षेत्रांतील नऊ तज्ज्ञांचा या समितीमध्ये समावेश केला आहे. हे तज्ज्ञ विविध राज्यांमधील असल्याने विविधताही जपली गेली आहे.
  • शिवाय, या तज्ज्ञांचा वयोगटही वेगवेगळा असल्याने अनुभव आणि धडाडी यांचा संगम या समितीमध्ये झाला आहे.
  • या विविधतेमुळेच शैक्षणिक धोरण आखताना विविध दृष्टिकोनांवर चर्चा होऊन शिक्षण क्षेत्रामध्ये सुधारणा होण्यास मदत होणार आहे.
  • या समितीतील इतर सदस्य
  1. माजी सनदी अधिकारी के के अल्फोन्स कानमथानम
  2. मध्य प्रदेशमधील बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरू रामशंकर कुरील
  3. कर्नाटक राज्य शोध परिषदेचे माजी सचिव डॉ. एम के श्रीधर
  4. भाषा कौशल्य क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. टी व्ही कट्टीमनी
  5. गुवाहाटी विद्यापीठात पर्शियन भाषेचे प्राध्यापक असलेले डॉ. मझहर असीफ
  6. उत्तर प्रदेश शिक्षण मंडळाचे माजी संचालक कृष्णमोहन त्रिपाठी
  7. प्रिन्स्टन विद्यापीठातील गणितज्ञ मंजुळ भार्गव
  8. मुंबईतील एसएनडीटी विद्यापीठाच्या माजी कुलगुरू वसुधा कामत

एमपीएससीकडूनही आधार क्रमांक बंधनकारक

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) आयोगाच्या परीक्षा देण्यासाठी ऑनलाइन प्रोफाईलमध्ये आधार क्रमांक भरणे अनिवार्य केले आहे.
  • त्यामुळे परीक्षेसाठी उमेदवारांना  प्रोफाईल तयार करताना आधार क्रमांकाचा आधार घ्यावा लागेल.
  • ज्या उमेदवारांची प्रोफाईल तयार आहे, त्यांना आयोगाच्या नियमानुसार त्वरित त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांकरिता उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातात.
  • प्रोफाईलच्या माध्यमातून अतिरिक्त महत्त्वाची माहिती उमेदवारांकडून प्राप्त करण्याचा आयोगाचा विचार आहे.
  • निवड प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर उमेदवारांची ओळख पटण्यासाठी उमेदवारांच्या ऑनलाइन प्रोफाईलमध्ये त्यांनी त्यांचा आधार क्रमांक नमूद करणे बंधनकारक करण्याच्या निर्णय आयोगाने घेतला.
  • त्यामुळे ज्या उमेदवारांकडे आधार कार्ड नाही. त्यांनी त्वरित आधार कार्ड काढावे असे आवाहनही आयोगाकडून करण्यात आले.
  • आधार कार्ड क्रमांक नसल्यास उमेदवारांना आयोगाच्या कार्यालयासमोर आपली ओळख निश्चित करून देणे बंधनकारक राहणार आहे.

‘पेट्या’ रॅन्समवेअरचा भारतासह अनेक देशांवर हल्ला

  • गेल्या महिन्यातील सायबर हल्यानंतर २७ जून रोजी ‘पेट्या’ नावाच्या रॅन्समवेअर व्हायरसने युरोपसह जगभरातील देशांना लक्ष्य केले.
  • रशिया, फ्रान्स. स्पेन आणि युरोपमधील अन्य देशांमधील ग्राहक, मालवाहतूक, हवाई वाहतूक सेवा, ऑईल आणि गॅस कंपन्या या सायबर हल्ल्यांमधील प्रमुख लक्ष्य ठरल्या.
  • युक्रेनला या सायबर हल्ल्याचा सर्वाधिक फटका बसला असून, तेथे सरकारी विभाग, वीज कंपन्या, विमानतळ आणि बँकांमधील कॉम्प्यूटर बंद पडले.
  • भारतालाही या हल्ल्याची झळ बसली असून, यामुळे जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) येथील ऑनलाईन कामकाज ठप्प पडले.
  • गेल्या महिन्यात जगातील सुमारे १५० देशांना वान्नाक्राय या रॅन्समवेअर व्हायरसचा फटका बसला होता. पिटरॅप (पेट्या) हे वान्नाक्राय या व्हायरसचे नवीन व्हर्जन असल्याचा अंदाज आहे.
  • रॅन्समवेअर हा मालवेअरचा एक प्रकार असून यामुळे कॉम्युटरमधील डेटा रिमोटच्या मदतीने लॉक करता येतो.
  • रॅन्समवेअरच्या मदतीने हॅक केलेला कॉम्प्युटर अनलॉक करण्यासाठी हॅकर्स पैशांची मागणी करतात.

लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यासाठी समिती स्थापन

  • न्यायाधीश आर एम लोढा समितीने लागू केलेल्या शिफारशी लागू करण्यासाठी आयपीएलचे प्रमुख राजीव शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली ७ सदस्यीय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • माजी कर्णधार सौरभ गांगुली, अमिताभ चौधरी (समन्वयक सचिव), टी सी मॅथ्यू, ए भट्टाचार्य, जय शाह आणि अनिरुद्ध चौधरी (बीसीसीआय कोषाध्यक्ष) या सदस्यांचा समितीत समावेश आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या शिफारशींची योग्य आणि त्वरित अंमलबजावणी कशी करता येईल, याचा अभ्यास ही समिती करणार आहे.
  • यासाठी या समितीला १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर ही समिती आपला अहवाल बीसीसीआयकडे सदर करेल.

कौशिक बसू आंतरराष्ट्रीय आर्थिक महासंघाच्या अध्यक्षपदी

  • भारताचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार कौशिक बसू यांची २३ जून २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय आर्थिक महासंघाच्या (आयईए) अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. या पदावरील त्यांचा कार्यकाळ ३ वर्षांचा असेल.
  • कॉर्नेल विद्यापीठाच्या इंटरनॅशनल स्टडीज विभागात व्याख्याते म्हणून ते सध्या कार्यरत आहेत.
  • आयईए जगभरातील व्यावसायिक अर्थतज्ज्ञांचे नेतृत्व करणारा आघाडीचा महासंघ असून, जागतिक स्तरावर आर्थिक धोरणाला वळण देण्याचे व संशोधनाचे काम हा महासंघ करीत असतो.
  • आयईएच्या माजी अध्यक्षांमध्ये नोबेलविजेते केनेथ अ‍ॅरो, रॉबर्ट सोलोव, अमर्त्य सेन आणि जोसेफ स्टिग्लिट्झ यांचा समावेश आहे.
  • कौशिक बसू हे २००९ ते २०१२ या काळात भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत होते.
  • तसेच २०१२ ते २०१६ या दरम्यान त्यांनी जागतिक बँकेचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून कार्यभार सांभाळला.

चीनची टाईप ०५५ युद्धनौका नौदलात दाखल

  • चीनने टाईप ०५५ ही सर्वाधिक शक्तीशाली नवी युद्धनौका आपल्या नौदलाच्या ताफ्यात दाखल केली आहे.
  • सुमारे १२ हजार टन वजन असलेल्या टाईप ०५५ युद्धनौकेची क्षमता भारताच्या १५ बी ‘आयएनएस विशाखापट्टणम’ या युद्धनौकेपेक्षा जास्त आहे.
  • विशाखापट्टणम युद्धनौका अद्याप भारतीय नौदलात सहभागी झालेली नाही. मात्र आयएनएस विशाखापट्टणमची क्षमता टाईप ०५५ पेक्षा खूप कमी आहे.
  • पूर्णपणे शस्त्रसज्ज करण्यात आल्यावर आयएनएस विशाखापट्टणमचे वजन ८,२०० टनांपर्यंत जाऊ शकते.
  • जमिनीवरून हवेत मारा करु शकणारी, युद्धनौकाविरोधी आणि जमिनीवर मारा करणारी अशी एकूण ५० क्षेपणास्त्रे आयएनएस विशाखापट्टणमवर तैनात केली जाऊ शकतात.
  • चीनच्या टाईप ०५५ या महाकाय युद्धनौकेवर जवळपास १२० क्षेपणास्त्रे तैनात करता येऊ शकतात.
  • त्यामुळेच टाईप ०५५ चा समावेश जगातील सर्वाधिक धोकादायक असणाऱ्या युद्धनौकांमध्ये होणार आहे. चीनकडून अशा प्रकारच्या चार युद्धनौकांची उभारणी करण्यात येत आहे.
  • टाईप ०५५ युद्धनौकेवर ऐरे रडार आहे. यामुळे समुद्र, जमीन आणि हवेतील लक्ष्य भेदण्यात महत्त्वाची मदत होणार आहे.
  • टाईप ०५५ ही चीनची आतापर्यंतची सर्वात अत्याधुनिक युद्धनौका आहे. यामधील युद्ध व्यवस्थापन यंत्रणा अतिशय उच्च दर्जाची आहे.
  • मार्च २०१४ पासून चीनने पाच टाईप ५२ डी युद्धनौका नौदलात सामील केल्या आहेत. या सर्व नौका शस्त्रसज्जतेत भारताच्या विशाखापट्टणम युद्धनौकेची बरोबरी करतात.
  • भारत आयएनएस विशाखापट्टणमसारख्या अजून ७ युद्धनौकांची उभारणी करणार आहे. तर आयएनएस विशाखापट्टणम इतकी क्षमता असणाऱ्या १८ युद्धनौकांची निर्मिती चीनकडून केली जाणार आहे.

श्रीलंकेच्या लसिथ मलिंगावर एक वर्षांची बंदी

  • श्रीलंका क्रिकेट मंडळाची परवानगी न घेता माध्यमांशी बोलल्याबद्दल श्रीलंकेचा गोलंदाज लसिथ मलिंगावर एक वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
  • चॅंपियन्स करंडक स्पर्धेनंतर मायदेशी परतल्यावर श्रीलंकेच्या क्रीडामंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या लसिथ मलिंगाला चौकशीलाही सामोरे जावे लागले.
  • श्रीलंका क्रिकेट मंडळाने त्याच्या चौकशीसाठी तीनसदस्यीय समितीची नियुक्ती केली होती. मलिंगावर आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
  • मलिंगावर एक वर्षांची बंदी घालताना त्याच्या सामन्याच्या मानधनातून ५० टक्के दंडही वसूल करण्याचे आदेश मंडळाकडून देण्यात आले आहे.

चालू घडामोडी : २७ जून

ल्युपिनचे संस्थापक देशबंधू गुप्ता यांचे निधन

  • औषध उद्योग क्षेत्रातील नामांकित कंपनी ल्युपिन लिमिटेडचे संस्थापक व अध्यक्ष देशबंधू गुप्ता यांचे २६ जून रोजी वाताच्या ७९व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
  • १९६८मध्ये देशबंधू गुप्ता यांनी ल्युपिनची स्थापना केली. यानंतर अल्पावधीतच तिचे अस्तित्व १०० हून अधिक देशांमध्ये निर्माण झाले.
  • प्रकृती बरी नसल्याने त्यांनी पाच वर्षांपूर्वीच ल्युपिनची सूत्रे कन्या विनिता गुप्ता व पुत्र नीलेश गुप्ता यांच्याकडे सोपवली होती.
  • क्षयरोगावरील औषधांसाठी ल्युपिन कंपनी प्रसिद्ध आहे. ५ वर्षांपूर्वी कंपनीने या औषधांची निर्मिती सुरू केली होती. आज जगातील क्षयरोगावरील औषध विक्रीत ल्युपिनचा वाटा ३ टक्के आहे.
  • ल्युपिनने गेल्या दशकात किमान १२ कंपन्या अधिग्रहित केल्या, त्यातील सहा कंपन्यांचे अधिग्रहण गेल्या दोन वर्षांत पूर्ण झाले.
  • ‘गॅव्हिस’ या  ८८ कोटी डॉलर्सच्या अमेरिकी जेनरिक औषध कंपनीचे अधिग्रहण ल्युपिनने केले; ते कुठल्याही भारतीय औषध कंपनीने केलेले सर्वात मोठे अधिग्रहण आहे.
  • भारतीय औषधनिर्माण क्षेत्रातील आघाडीची कंपनी बनण्यासह ल्युपिन ही बाजार भांडवलांमध्ये जगातील चौथी मोठी कंपनी ठरली आहे.
  • जागतिक महसुलाचा विचार करता ती भारतातील दुसऱ्या क्रमांकाची औषध कंपनी आहे. जपान व दक्षिण आफ्रिका या देशात ल्युपिन अनुक्रमे सहाव्या व चौथ्या क्रमांकावर आहे.
  • ८ फेब्रुवारी १९३८ रोजी राजस्थानमधील राजगढ येथे देशबंधू गुप्ता यांचा जन्म झाला. ते ‘डीबी’ या नावाने सर्वाना परिचयाचे होते.
  • त्यांनी रसायनशास्त्र विषयातून एम. एस्सी. केले होते. २००३पर्यंत ते ल्युपिनचे कार्यकारी अध्यक्ष होते.
  • कमी किंमतीत अधिक गुणवत्ता असलेली औषधनिर्मितीवर गुप्ता यांचा भर असे. २०१५मध्ये फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत त्यांचा २५४वा क्रमांक होता. 
  • गुप्ता यांनी १९८८ मध्ये ग्रामीण भागातील दारिद्रय़ दूर करण्यासाठी ल्युपिन ह्य़ूमन वेल्फेअर अ‍ॅण्ड रीसर्च फाउंडेशन ही संस्था स्थापन केली.
  • गरजूंना किफायतशीर किमतीत औषधे उपलब्ध करून देत मानवसेवेचे व्रत घेतलेले गुप्ता हे उद्योजकाइतकेच संवेदनशील माणूसही होते.

विवोला आयपीएलचे मुख्य प्रायोजकत्व

  • चायनीज स्मार्टफोन कंपनी ‘विवो’ने पुढील ५ वर्षांसाठी ‘इंडियन प्रीमिअर लीग’चे (आयपीएल) मुख्य प्रायोजकत्व मिळविले आहे.
  • आयपीएलच्या २०१८ ते २०२२ पर्यंतच्या प्रायोजकत्वासाठी विवो कंपनीने सुमारे २१९९ कोटी रुपये बोली लावली होती.
  • प्रतिस्पर्धी ओप्पो कंपनीच्या १४३० कोटी रुपयांच्या बोलीला मागे टाकत विवोने हे प्रायोजकत्व मिळविले आहे.
  • यापूर्वी २०१६ आणि २०१७ या दोन वर्षांसाठी ‘विवो’ने २०० कोटी रुपयांची बोली लावत प्रायोजकत्व मिळविले होते.
  • २०१४-१५ पासून विवो आयपीएलचे मुख्य प्रायोजक होते. आयपीएलच्या पहिल्या पाच वर्षांसाठी पेप्सी हे मुख्य प्रायोजक होते.
  • २०१८ हे आयपीएलचे ११वे वर्ष असेल. २००८मध्ये पहिल्या पर्वाआधी सर्व खेळाडूंचा लिलाव झाला होता.
  • ‘स्पॉट फिक्सिंग’मुळे दोन वर्षांची बंदी लादलेले चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे संघदेखील २०१८मध्ये पुनरागमन करणार आहेत.

युरोपियन युनियनकडून गुगलला दंड

  • सर्च इंजिनमध्ये आघाडीवर असलेल्या गुगलला युरोपियन युनियनने २४२ कोटी युरोंचा (२.७ अब्ज डॉलर) दंड ठोठावला आहे.
  • युरोपियन युनियनने इंटरनेटवर प्रतिस्पर्धी उत्पादने आणि सेवांच्या उपलब्ध होणाऱ्या माहितीत छेडछाड केल्याचा ठपका गुगलवर ठेवला आहे.
  • सर्च इंजिनचा दुरुपयोग करत एका शॉपिंग सर्व्हिसला फायदा पोहोचवल्याचा आरोप गुगलवर करण्यात आला आहे.
  • गुगलने येत्या तीन महिन्यांत सर्च इंजिनमध्ये फेरफार करणे थांबवावे, असा इशाराही युरोपियन युनियनने दिला आहे.
  • अन्यथा गुगलची पँरेंट कंपनी असलेल्या अल्फाबेट कंपनीला दिवसाकाठी मिळणाऱ्या जागतिक उत्त्पन्नाच्या ५ टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागेल.
  • गुगलचा युरोपात इंटरनेट सर्चमध्ये ९० टक्के शेअर आहे. त्यामुळे गुगल युझर्सला सर्च इंजिनच्या सहाय्याने कोणत्याही वेबसाइटवर पाठवू शकतो.
  • परंतु गुगलकडून स्वत:ची उत्पादने आणि सेवांना प्राधान्य देण्यासाठी सर्च इंजिनमध्ये काही फेरफार केले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
  • गुगलकडून सुरू असणारा हा प्रकार युरोपियन युनियनच्या नियमांचे उल्लंघन करणारा असून, त्यामुळे इतर कंपन्यांच्या उत्पादनांमध्ये गुणवत्ता आणि नावीन्यपूर्णता असूनही सर्च इंजिनवर ती डावलण्यात येतात.
  • अमेरिकेच्या येल्प, ट्रिप अॅडव्हाईझर, इंग्लंडच्या फाऊंडेम आणि फेअर सर्च या कंपन्यांनी गुगलविरोधात तक्रार दाखल केली होती.
  • त्यानंतर २०१० साली या प्रकरणाची चौकशी सुरु झाली. गेल्या सात वर्षांपासून या संदर्भातील तपास सुरू होता. 
  • यापूर्वी २००९मध्ये युरोपियन युनियनकडून इंटेल या अमेरिकन कंपनीला १६० कोटी युरोंचा दंड भरावा लागला होता.

ट्रम्प यांची ६ इस्लाम देशांवरील बंदी अंशत: लागू

  • अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ६ इस्लाम बहुल देशांवर घातलेली बंदी अंशत: लागू करण्याची परवानगी दिली आहे.
  • डोनाल्ड ट्रम्प यांचा आदेश रद्दबातल ठरवण्याच्या राज्यांच्या न्यायालयांनी दिलेले अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहेत.
  • ट्रम्प यांनी सुरूवातीला ७ देशांच्या मुस्लिमांना अमेरिकेत येण्यास बंदी घातली होती. पण न्यायालयाने ही बंदी फेटाळली होती.
  • त्यानंतर ट्रम्प यांनी सीरिया, लिबिया, इराण, सोमालिया, सुदान आणि येमेन या ६ देशांची नावे प्रतिबंध यादीत समाविष्ट केली होती. नव्या सूचीतून ट्रम्प यांनी इराकचे नाव वगळले होते.
  • न्यायालयाने बंदीच्या आदेशाला स्थगिती दिल्यानंतर, ट्रम्प यांनी यावर टीका करत हा एक अत्यंत वाईट निर्णय असून देशाच्या सुरक्षेसाठी योग्य नसल्याचे म्हटले होते.
  • न्यायालयाने ट्रम्प यांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्याने आता ६ मुस्लिमबहुल देशातील निर्वासितांवरील बंदी पुन्हा लागू होणार आहे.

एटीएमला पन्नास वर्षे पूर्ण

  • आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या ‘ऑटोमॅटिक टेलर मशिन’ला (एटीएम) २७ जून रोजी पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत.
  • बार्कलेज बँकेने उत्तर लंडनमधील एन्फिल्ड टाऊनमधील त्यांच्या शाखेत २७ जून १९६७ रोजी पहिले ‘एटीएम’ मशिन बसविले.
  • त्यावेळी डेबिट अथवा क्रेडीट कार्ड नव्हते. बँकेच्या कॅशियरने लिहून दिलेली चिठ्ठी वाचून हे मशिन पैसे देत असे.
  • ‘एटीएम’ यंत्रामागची संकल्पना कायम राहिली असली तरी त्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत गेले.
  • आज जगभरात उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत आणि लक्झरी क्रुझ बोटीपासून युद्धनौकेपर्यंत ३० लाखांहून अधिक एटीएम कार्यरत आहेत.

चालू घडामोडी : २६ जून

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल

  • तीन देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी पोर्तुगालचा दौरा संपवून २४ जून रोजी अमेरिकेत पोहोचले.
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणानुसार मोदी हे अमेरिकेला भेट देत असून, भारत व अमेरिका यांच्यातील संबंधात या दौऱ्यामुळे प्रगती होईल.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारल्यापासून ते पाचव्यांदा अमेरिकेत येत आहेत. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांचीही पहिलीच भेट आहे.
  • अमेरिकेत आगमनानंतर २५ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जगभरातल्या २१ दिग्गज कंपन्यांचे सीईओ यांच्यातली बैठक वॉशिंग्टनमध्ये पार पडली.
  • अॅपल कंपनीचे प्रमुख टीम कुक, वॉल मार्टचे प्रमुख डाऊग मॅकमिलन, गुगलचे प्रमुख सुंदर पिचई, मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला यांसह २१ दिग्गज कंपन्यांचे सीईओंचा या बैठकीत समावेश आहे.
  • जागतिक पातळीवरच्या गुंतवणूकदारांना भारताकडे वळवणे हा या बैठकीमागचा मुख्य उद्देश आहे.
  • या बैठकीत ‘मेक इन इंडिया’ मोहीम, ट्रम्प यांचे फर्स्ट अमेरिका धोरण आणि इतर मुद्द्यांवर प्रामुख्याने चर्चा झाली.
  • भारतात लागू होणाऱ्या जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराचाही उल्लेख मोदींनी या बैठकीत केला.
  • अमेरिका दौऱ्यानंतर मोदी नेदरलँड्सला जाणार असून तेथे ते पंतप्रधान मार्क रूट व राजे विल्हेम अॅलेक्झांडर तसेच राणी मॅक्सिमा यांची ते भेट घेतील.

जागतिक बँकेचे ‘स्किल इंडिया मिशन’ला २५ कोटी डॉलर्सचे कर्ज

  • जागतिक बँकेने भारतातील युवकांना कौशल्य प्रशिक्षणासाठीच्या सरकारच्या ‘स्किल इंडिया मिशन’ला २५ कोटी डॉलर्सचे कर्ज मंजूर केले आहे.
  • जागतिक बँकेच्या कार्यकारी मंडळाने २५० दशलक्ष डॉलरच्या ‘स्किल इंडिया मिशन ऑपरेशन’ला (सिमो) मंजुरी दिली आहे.
  • भारत सरकारने २०१७ ते २०२३ या सहा वर्षांसाठी जे राष्ट्रीय कौशल्यविकास व उद्योजकता धोरण आखले आहे, त्यास मदत करण्यासाठी जागतिक बँकेचा हा ‘सिमो’ कार्यक्रम असेल.
  • यामध्ये युवकांना कुशल बनवणे आणि यातून त्यांना रोजगार मिळवणे सुलभ होईल या दृष्टीने प्रयत्न केला जाणार आहे.
  • ‘स्किल इंडिया मिशन’द्वारे देशातील तरुण पिढीला नव्या कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगारक्षम बनवण्याच्या भारत सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी जागतिक बँकेने हे कर्ज दिले आहे.
  • यामुळे ३ ते १२ महिने किंवा ६०० तासांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या कौशल्यविकास कार्यक्रमांची रोजगारक्षमतेच्या दृष्टीने उपयुक्तता वाढण्यास मदत होईल.
  • परिणामी, भारताच्या विकास आणि समृद्धीत युवापिढी अधिक सक्रियतेने सहभागी होऊ शकेल.
  • या कार्यक्रमानुसार, १५ ते ५९ या वयोगटातील अर्ध वेळ काम करणाऱ्या किंवा बेरोजगार व्यक्तींना कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल.
  • याखेरीज दरवर्षी रोजगाराच्या बाजारात नव्याने येणाऱ्या १५ ते २९ या वयोगटातील १.२ कोटी युवक-युवतींचाही यात समावेश केला जाईल.
  • या कार्यक्रमातंर्गत महिलांना रोजगार आणि उद्यमशीलतेची संधी उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर त्यांनाही कौशल विकासाचा लाभ मिळवता येईल.
  • स्किल इंडिया ही भारत सरकारची एक मोठी योजना आहे. याअंतर्गत २०२२ पर्यंत ४० कोटी भारतीय व्यक्तींना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे.

ट्रम्प यांच्याकडून इफ्तार पार्टीची परंपरा मोडीत

  • मुस्लिमधर्मीयांचा पवित्र सण असलेल्या रमजाननिमित्त व्हाईट हाऊसमध्ये मेजवानी (इफ्तार) देण्याची परंपरा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोडीत काढली आहे.
  • रमजानच्या सणानिमित्त सूर्यास्तास ही मेजवानी देण्याची प्रथा आहे. व्हाईट हाऊसमधील या परंपरेस दोन शतकांपेक्षाही अधिक काळाचा संदर्भ आहे.
  • अमेरिकेच्या अध्यक्षांकडून दिल्या जाणाऱ्या इफ्तार मेजवानीमध्ये अमेरिकेतील प्रमुख मुस्लिम व्यक्ती तसेच अन्य मुस्लिम देशांमधील महत्त्वपूर्ण लोकदेखील सहभागी होतात.
  • अमेरिकेचे याआधीचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, जॉर्ज बुश व बिल क्लिंटन यांच्या कार्यकाळात दरवर्षी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र यावर्षी व्हाइट हाऊसने इफ्तारचे आयोजन केलेले नाही.
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांनी डिसेंबर १८०५मध्ये ट्युनिशियाचे राजदूत सिदी सोलिमान मेल्लिमेली यांच्या सन्मानार्थ व्हाईट हाऊसमध्ये अशा स्वरुपाची मेजवानी पहिल्यांदा आयोजित केल्याचे मानले जाते.
  • पण खऱ्या अर्थाने १९९६पासून राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि त्यांची पत्नी हिलरी क्लिंटन यांच्या काळात दरवर्षी इफ्तार पार्टी  देण्याची परंपरा व्हाइट हाऊसने सुरू केली होती.
  • ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसची इफ्तारची प्रथा मोडल्याबद्दल अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

हरियाणाची मनुषी चिल्लर ‘फेमिना मिस इंडिया’

  • हरियाणाची मनुषी चिल्लर हिने २०१७ या वर्षाचा ‘एफबीबी कलर्स फेमिना मिस इंडिया’ किताब पटकावला आहे.
  • २०१६ची मिस इंडिया प्रियदर्शनी चटर्जी हिने मनुषीच्या डोक्यावर ‘मिस इंडिया’चा मुकुट चढवला.
  • या स्पर्धेत जम्मू-काश्मीरची सना दुआ हिने दुसरा तर, बिहारची प्रियांका कुमारी हिने तिसरा क्रमांक पटकावला.
  • मनुषी चिल्लर ही मेडिकल शाखेत शिक्षण घेते असून, तिचे आई-वडील दोघेही डॉक्टर आहेत. याआधी तिने ‘मिस हरयाणा’चाही किताब पटकावला आहे.
  • मनुषीने मिस फोटोजेनिक अॅवॉर्डवरही नाव कोरले आहे. डिसेंबरमध्ये चीन येथे होणाऱ्या मिस वर्ल्ड २०१७ स्पर्धेत मनुषी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. 
  • यावर्षी पहिल्यांदाच फेमिना मिस इंडियाच्या अंतिम स्पर्धेत स्पर्धकांनी भारतीय कपडे परिधान केले होते. फॅशन डिझायनर मनिषा मल्होत्रा यांनी हे कपडे तयार केले होते.

चालू घडामोडी : २५ जून

भारत आणि पोर्तुगाल दरम्यान ११ करार

  • तीन देशांच्या दौऱ्यावर निघालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ जून रोजी पोर्तुगालमध्ये पोहोचले. यानंतर ते अमेरिका आणि नेदरलँडला भेट देणार आहेत.
  • पोर्तुगालमध्ये मोदी यांनी लिस्बन येथे भारतीय वंशाचे पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनिओ कोस्टा यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली.
  • यावेळी पोर्तुगाल आणि भारत या दोन्ही देशांदरम्यान ११ महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत 
  • तसेच वाढत्या दहशतवादाविरोधात पोर्तुगाल आणि भारत हे एकत्र आले असल्याची घोषणादेखील करण्यात आली.
  • नरेंद्र मोडी यांनी अँटोनिओ कोस्टा यांना ओव्हरसिज सिटीझन ऑफ इंडियाचे कार्डही यावेळी भेट दिले.
  • भारत आणि पोर्तुगाल यांच्या दरम्यान, विज्ञान, तंत्रज्ञानासाठी ४० लाख युरोंचा कोष स्थापण्यावर एकमत झाले आहे.
  • तसेच लिस्बनमध्ये मोदींनी भारत आणि पोर्तुगाल यांच्यातल्या आंतरराष्ट्रीय स्टार्ट-अप हबचे उद्घाटनही केले.
  • गेल्या १५ वर्षांत पोर्तुगालला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत.

किदाम्बी श्रीकांतला ऑस्ट्रेलियन सुपर सीरिजचे जेतेपद

  • भारताचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत याने आपल्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिजचे जेतेपद पटकावले.
  • अंतिम सामन्यात श्रीकांतने ऑलिम्पिक विजेता आणि दोनवेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या चेन लाँगवर २२-२०, २१-१६ अशी मात केली.
  • जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानी असलेल्या श्रीकांतने आपला फॉर्म कायम राखताना क्रमवारीमध्ये ६व्या स्थानी असलेल्या लाँगला सरळ दोन गेममध्ये नमविले.
  • गेल्या दोन आठवड्यांत श्रीकांतने पटकावलेले हे सलग दुसरे सुपर सीरिज विजेतेपद ठरले. १८ जून रोजी श्रीकांतने इंडोनेशिया ओपन सुपर सीरिजचे जेतेपद पटकावले होते.
  • या शानदार विजयासह श्रीकांत हा सर्वाधिक सुपरसीरिज विजेतेपदे पटकावणारा भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू ठरला आहे.
जगातील केवळ पाचवा खेळाडू
  • सलग तीन सुपर सीरिज अंतिम सामना खेळणारा श्रीकांत जगातील केवळ सहावा शटलर ठरला.
  • यावर्षी एप्रिलमध्ये सिंगापूर ओपनमध्ये उपविजेता ठरल्यानंतर श्रीकांतने इंडोनेशिया व ऑस्ट्रेलिया ओपनचे जेतेपद पटकाविले.
  • यापूर्वी इंडोनेशियाचा सोनी द्वि कुंकोरो, मलेशियाचा ली चाँग वेई, चीनचे चेन लाँग आणि लीन डॅन यांनी हा विक्रम केला होता.
चार सुपर सीरिज जिंकणारा पहिला भारतीय
  • चार सुपर सीरिज जिंकलेला श्रीकांत पहिला पुरुष भारतीय शटलर ठरला. त्याने २०१४मध्ये चायना ओपन, २०१५मध्ये इंडिया ओपन आणि जून २०१७मध्ये लागोपाठ इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेवर कब्जा केला.
पहिला भारतीय पुरुष खेळाडू
  • ऑस्ट्रेलिया ओपन सुपर सीरिजचे विजेतेपद पटकाविणारा श्रीकांत पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला. याआधी महिलांमध्ये सायना नेहवालने दोनवेळा ही स्पर्धा जिंकली आहे.

मितालीचा सलग ७ अर्धशतके झळकवण्याचा विक्रम

  • आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताने इंग्लंडचा ३५ धावांनी पराभव केला.
  • या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार मिताली राजने ७३ चेंडूंत ७१ धावांची खेळी करत, सलग सात सामन्यात अर्धशतक करण्याचा पराक्रम केला.
  • मितालीने गेल्या सहा वनडे डावांत नाबाद ६२, ५४, नाबाद ५१, नाबाद ७३, ६४ आणि नाबाद ७० धावा केल्या आहेत.
  • महिला आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारी मिताली पहिली क्रिकेटपट्टू ठरली आहे.
  • याआधी इंग्लंडची शार्लट एडवर्ड्स, लिंडसे रिलर आणि एलिस पेरी (दोघीही ऑस्ट्रेलियाच्या खेळाडू) यांनी सलग सहा अर्धशतके केली होती.
  • मितालीने सात अर्धशकांमध्ये ४ अर्धशतके दक्षिण आफ्रिकेविरोधात तर इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि बांगलादेश विरोधात प्रत्येकी १ अर्धशतकी खेळी केली आहे.
  • याबरोबरच मितालीने ४७वे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय अर्धशतक झळकावताना, इंग्लंडच्या शार्लट एडवर्ड्सचा सर्वाधिक ४६ अर्धशतकांचा विक्रम मोडीत काढला.
  • ३ डिसेंबर १९८२ रोजी राजस्थानमधील जोधपूरमध्ये जन्मलेली मिताली गेल्या १६ वर्षांपासून भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करते आहे.
  • मिताली राज आतापर्यंत १७८ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळली आहे. यामध्ये मिताली राजने ५२.२५ च्या सरासरीने ५,८५२ धावा केल्या आहेत.
  • सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक सामने यांचा विचार करता इंग्लंडची निवृत्त खेळाडू शार्लट एडवर्ड्स मितालीच्या पुढे आहे. एडवर्ड्सने १९१ सामन्यांमध्ये ५,९९२ धावा केल्या आहेत.

झिरो डिफेक्ट - झिरो इफेक्ट योजना



  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ ऑक्टोबर २०१६ रोजी पंजाबमधील लुधियाना येथे राष्ट्रीय अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती केंद्राची स्थापना केली.
  • यावेळी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठीच्या ‘झिरो डिफेक्ट - झिरो इफेक्ट’ (Zero Defect - Zero Effect) या योजनेचीही सुरुवात करण्यात आली.
  • दोषविरहित उत्पादनांची निर्मिती ‘झिरो डिफेक्ट' आणि पर्यावरणावर कमीत कमी नकारात्मक परिणाम 'झिरो इफेक्ट' ही दोन उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी या योजनेची सुरुवात केंद्रशासनाने केली आहे.
  • याशिवाय भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमधून जागतिक दर्जा असणारी उत्पादने निर्माण करण्याचे ध्येयही निश्चित करण्यात आले आहे. 
  • या योजनेअंतर्गत आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या उद्योगांना ‘झिरो डिफेक्ट - झिरो इफेक्ट’ दर्जा देण्यात येणार आहे.
  • अशा उद्योगांनी बनविलेल्या उत्पादनामुळे विश्वासार्ह वातावरण तयार होण्यास मदत होणार आहे. तसेच पर्यावरणपूरक उत्पादनांची निर्मिती करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे.

अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती केंद्र

  • अनुसूचित जाती-जमातीतील उद्योजकांना सहकार्य करण्यासाठी या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
  • या केंद्राद्वारे अनुसूचित जाती-जमातीतील मुलांनादेखील उद्योजकतेचे धडे आणि नव्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
  • या केंद्रासाठी ४९० कोटी रुपयांच्या निधींची तरतूद करण्यात आली असून बाजारप्रवेश सुलभीकरण, लघुउद्योगांची क्षमतावृद्धी आणि अशा उद्योगांना अर्थसहाय्य करण्यासाठी हा निधी उभारण्यात आला आहे.
  • याशिवाय सार्वजनिक खरेदी धोरण २०१२नुसार सर्व केंद्रीय मंत्रालये आणि विभागांमार्फत करण्यात येणाऱ्या सार्वजनिक खरेदीपैकी किमान ४ टक्के उत्पादने अनुसूचित जाती जमातीतील व्यक्तींच्या मालकीच्या उद्योगांकडून खरेदी करण्यात यावीत असे बंधन करण्यात आले आहे.

चालू घडामोडी : २४ जून

देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी मंजूर

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याचा निर्णय २४ जून रोजी जाहीर केला.
  • ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना’ असे या कर्जमाफीला नाव देण्यात आले आहे.
  • राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा निर्णय असून, त्यामुळे महाराष्ट्रातील ८९ लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
  • या निर्णयानुसार दीड लाखापर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्यात येणार असून, यामुळे ४० लाख (सुमारे ९० टक्के) शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे.
  • याशिवाय जे शेतकरी नियमित कर्ज भरत आहेत, त्यांना २५ हजार रुपयांच्या कमाल मर्यादेपर्यंत २५ टक्के प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे.
  • जे शेतकरी ३० जूनपर्यंत कर्ज भरतील त्यांच्या बॅंक खात्यावर तत्काळ प्रोत्साहनपर अनुदान जमा करण्यात येईल.
  • ज्या शेतकऱ्यांचे कर्ज मध्यम मुदतीचे आहे, पुनर्गठीत आहे किंवा थकीत आहे त्यांचे कर्जही माफ होणार आहे.
  • २०१२पासून शेतकरी दुष्काळी परिस्थितीमुळे कर्जात बुडाले होते. ते कर्ज भरू शकत नसल्याने कर्जमाफी करण्याबाबत मागणी होत होती.
  • कर्जमाफीसाठी महाराष्ट्रातले शेतकरी १ जूनपासून संपावरही गेले होते. त्यानंतर हे आंदोलन चिघळले होते. शिवसेनेनेही कर्जमाफीसाठी सरकारच्या विरोधात भूमिका घेतली होती.
  • या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीचा हा निर्णय जाहीर केला आहे.
  • यापूर्वी केंद्राने संपूर्ण देशात ५२ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती. त्यात महाराष्ट्रात ७ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी झाली होती.
छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना
  • १ एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ या कालावधीत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार.
  • दीड लाखाहून अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता योजना (One Time Settlement) राबविणार.
  • समझोता योजनेत थकबाकी रकमेच्या २५ टक्के किंवा दीड लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल त्या रकमेचा शेतकऱ्यांना लाभ.
  • मुदतीत कर्ज फेडलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून पीक कर्जाच्या २५ टक्के किंवा २५ हजार रुपये यांपैकी जी रक्कम कमी असेल ती दिली जाणार. 
  • शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी निधी उभा करण्यासाठी सर्व मंत्री आणि आमदार एक महिन्याचे वेतन जमा करणार आहेत.
  • यांना कर्जमाफीतून वगळण्यात आले
    • प्राप्तिकर भरणारे तसेच व्हॅटला पात्र असणारे व्यापारी
    • राज्यातील विद्यमान मंत्री, माजी मंत्री, राज्यमंत्री
    • विद्यमान खासदार, माजी संसद सदस्य, विद्यमान आमदार
    • माजी विधिमंडळ सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिका सदस्य
    • केंद्र व राज्य शासनाचे तसेच निमशासकीय संस्था आणि अनुदानित संस्थांचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी
    • चतुर्थ श्रेणी कर्मचारी
राज्य प्रतिकुटुंब कर्ज (रु.) कर्जमाफी (कोटी रु.)
महाराष्ट्र ५४,७०० ३४,०२२
केरळ २,१३,००० -
आंध्र प्रदेश १,२३,४०० २०,०००
पंजाब १,१९,५०० १०,०००
तमिळनाडू १,१५,९०० -
कर्नाटक ९७,२०० ८,१६५
तेलंगणा ९३,५०० १५,०००
हरियाना ७९,००० -
राजस्थान ७०,५०० -

राजीव गौबा नवे गृह सचिव

  • विद्यमान गृह सचिव राजीव महर्षी यांच्या निवृत्तीस दोन महिने असतानाच सरकारने नवे गृह सचिव म्हणून राजीव गौबा यांचे नाव जाहीर केले आहे.
  • गौबा सध्या नगरविकास खात्याचे सचिव आहेत. त्यातही स्मार्ट सिटी ही केंद्राची महत्त्वाकांक्षी योजना यशस्वी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
  • नव्या फेरबदलानंतर त्यांना तातडीने गृह मंत्रालयात पाठवण्यात आले आहे. त्यांनी विशेष अधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. येत्या १ सप्टेंबरपासून ते गृह सचिव पदाचा कार्यभार स्वीकारतील.
  • १९५९मध्ये जन्मलेल्या गौबा यांनी १९७९मध्ये भौतिकशास्त्रात पदवी आणि १९८१मध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
  • या दोन्ही परीक्षांत सुवर्णपदक मिळवल्यानंतर १९८२मध्ये ते नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी सुरुवातीला झारखंड राज्यात त्यांनी विविध पदे भूषवली.
  • पुढे केंद्रीय गृह मंत्रालयातील नक्षलवाद आणि जम्मू-काश्मीरविषयक असलेल्या स्वतंत्र विभागाची जबाबदारी गौबा यांच्यावर सोपवण्यात आली.
  • नक्षलवाद आटोक्यात आणण्यासाठी धोरणे आखणे व कृती कार्यक्रम ठरवण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.
  • पोलीस दलाचे आधुनिकीकरण आणि या दलात सुधारणा होण्यासाठी सरकारने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीचे ते सदस्य होते.
  • वने आणि पर्यावरण विभागात काम करताना गंगा नदी खोरे प्राधिकरण स्थापन करण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे होते.
  • राज्य तसेच केंद्रीय पातळीवरील ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव गौबा यांच्याकडे आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतही ३ वर्षे त्यांनी सेवा बजावली आहे. 

आरबीआयकडून बुडीत कर्जे देखरेख समितीचा विस्तार

  • बँकिंग व्यवस्थेतील बुडीत कर्जाच्या समस्येवर रिझर्व्ह बँकेला सल्ला देण्यासाठी स्थापित देखरेख समितीचा विस्तार करण्यात आला आहे.
  • या समितीवर एल अँड टी फायनान्स होल्डिंग्जचे अध्यक्ष वाय एम देवस्थळी, कॅनरा बँकेचे माजी अध्यक्ष एमबीएन राव आणि ‘सेबी’चे पूर्णवेळ सदस्य एस रमण या तीन नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • या तीन सदस्यांपैकी देवस्थळी आणि राव यांची नियुक्ती ताबडतोब अमलात येत असून, रमण यांची नियुक्ती ७ सप्टेंबरपासून करण्यात आली आहे.
  • बँकांच्या बुडीत कर्जाची समस्या हाताळण्यासाठी आरबीआयला वाढीव अधिकार बहाल करणाऱ्या केंद्र सरकारच्या ताज्या वटहुकूमानुसार ही समिती बनविण्यात आली आहे.
  • यापूर्वी या समितीवर माजी मुख्य दक्षता आयुक्त प्रदीप कुमार आणि स्टेट बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जानकी वल्लभ हे दोन सदस्य नेमण्यात आले आहेत.
  • ही पाच सदस्यीय समिती प्रदीप कुमार यांच्या नेतृत्वात आपले कामकाज करेल. धोरणात्मक पुनर्रचना करूनही वसुली होत नसलेली कर्ज प्रकरणे या समितीकडे आरबीआयकडून मसलतीसाठी सोपविली जातील.
  • जून २०१६ मध्ये आरबीआयने बडय़ा थकीत कर्ज खात्यासंबंधी तोडग्यासाठी शाश्वत कर्ज पुनर्रचना योजना (एस४ए) अमलात आणली होती.
  • नवस्थापित देखरेख समितीने मात्र या योजनेव्यतिरिक्त बुडीत कर्ज प्रकरणांवर लक्ष देणे अपेक्षित आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना

  • १३ जानेवारी २०१६ रोजी ‘प्रधानमंत्री पीक विमा योजने’स केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या योजनेने राष्ट्रीय कृषी विमा योजना आणि सुधारित राष्ट्रीय कृषी विमा योजना यांची जागा घेतली.
  • या योजनेअंतर्गत पिकाच्या विम्यासाठी शेतकऱ्यांना भराव्या लागणाऱ्या हप्त्याची रक्कम अतिशय कमी करण्यात आली आहे.
  • यामुळे जास्तीत जास्त शेतकरी या योजनेचा लाभ घेऊन नैसर्गिक संकटांमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून बचाव करू शकणार आहेत.
  • २०१६ वर्षातील पावसाळ्यात सुरू होणाऱ्या खरीप हंगामापासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
  • सध्या या विम्यांचे हप्ते भरण्यासाठी सरकारला अंदाजे २३०० कोटी रुपये खर्च येत आहे. भविष्यात हा खर्च प्रतिवर्ष ८००० कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
  • ही विमा योजना सर्व शेतकऱ्यांसाठी खुली आहे, मात्र कोणावरही बंधनकारक नाही.

यापूर्वीच्या पीक विमा योजना

  • १९८५साली राजीव गांधी पंतप्रधान असताना केंद्र शासनाने देशातील पहिली पीकविमा योजना सुरू केली. 
  • १९९९साली एनडीए. सरकारने ‘राष्ट्रीय कृषी विमा योजना’ (National Agricultural Insurance Scheme) लागू केली.
  • या योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षणासाठी विमा काढण्यात येत असला, तरी या योजनेत सर्व पिकांचा समावेश करण्यात आला नव्हता.
  • २००४नंतर सत्तेत आलेल्या कॉंग्रेस शासनाने काही बदलांसह ही योजना चालू ठेवली होती.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेची उद्दिष्ट्ये

  • नैसर्गिक आपत्ती, कीटक आणि रोगराई यामुळे पिकांना नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण व आर्थिक आधार देणे.
  • सध्या भारतामधील केवळ २३ टक्के पिकांचे विमे उतरवले जात असून या योजनेअंतर्गत हे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे.
  • नवीन व आधुनिक शेतीपद्धतीचा स्वीकार करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे.
  • शेतीमध्ये टिकून राहण्यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर करणे. 

प्रधानमंत्री पीक विमा योजनेची योजनेची वैशिष्ट्ये 

  • अत्यंत कमी प्रिमियममध्ये अधिक विमा संरक्षण. 
  • या योजनेअंतर्गत भरणा करण्यात येणारा प्रिमियम दर शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी अत्यंत कमी ठेवण्यात आला आहे. 
  • याअंतर्गत सुमारे ९० टक्क्यांपेक्षा जास्त भार शासनाकडून उचलला जाईल
  • अन्नधान्य, डाळी, तेलबिया आदी पिकांसाठी प्रत्येक हंगामावरील एकच दर असेल. यापूर्वीची एकाच हंगामासाठी जिल्हावार आणि पीकवार दरातील भिन्नता आणि तफावत आता दूर केली आहे.
  • पिकांच्या नुकसानीची स्थिती जाणून घेण्यासाठी या योजनेमध्ये सुदूर संवेदन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार आहे.
  • यामुळे पिकांच्या नुकसानीचे आकलन तात्काळ होऊन दावा केलेली विम्याची रक्कम देण्याची प्रक्रिया जलद होणार आहे. तसेच शेतकऱ्यांनाही ऑनलाईन घरी बसून हे नुकसान पडताळता येईल.
  • या योजनेच्या अंमलबजावणीसाठी एकच विमा कंपनी असणार असून इतर खाजगी विमा कंपन्या ‘ऍग्रिकल्चर इंशुरन्स कंपनी ऑफ इंडिया’शी संलग्न करण्यात येणार आहेत.
  • हा विमा केवळ ‘उत्पन्नातील घट’ एवढ्यापुरताच मर्यादित नसून पीक काढणीनंतर पिकाचे झालेले नुकसान, तसेच चक्रीवादळे, भूस्खलन, बिगरमोसमी पाऊस इ. स्थानिक पातळीवरील आपत्तींपासूनच्या संरक्षणासाठीही हा विमा उपलब्ध करण्यात येणार आहे.

विमा लाभ मिळण्यास पात्र परिस्थिती

  • शेतात पाणी साठणे, पूर येणे अशा आपत्तींना स्थानिक संकट मानण्यात येईल. प्रभावित शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून भरपाई किंवा दावा रक्कम दिली जाईल.
  • पीक काढण्याच्या दिवसापर्यंत जर पीक शेतातच असेल आणि त्या दरम्यान आपत्ती, वादळ, अवकाळी पाऊस आल्यास शेतकऱ्यांना दावा रक्कम मिळेल. 
  • अपवाद - मानवनिर्मित आपत्ती उदा. आग लागणे, चोरी होणे यांचा या योजनेत अंतर्भाव नाही.

चालू घडामोडी : २३ जून

इस्रोद्वारे एकाचवेळी ३१ उपग्रहांचे प्रक्षेपण

  • इस्रोने २३ जून रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन पीएसएलव्ही-सी३८ या प्रक्षेपकाद्वारे ३१ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले.
  • एकाचवेळी ३१ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करून इस्त्रोने पुन्हा एकदा आपले कौशल्य सिद्ध केले आहे.
  • यापूर्वी इस्त्रोने जून २०१५मध्ये २३ उपग्रह तर फेब्रुवारी २०१७मध्ये महिन्यात १०४ उपग्रह एकाचवेळी प्रक्षेपित करुन इतिहास रचला होता.
  • इस्त्रोच्या पीएसएलव्हीचे हे ४०वे उड्डाण होते. प्रक्षेपित करण्यात आलेल्या ३१ उपग्रहांमध्ये भारताचे २ आणि इतर १४ देशांचे २९ नॅनो उपग्रह आहेत.
  • या उपग्रहांमध्ये भारताचा कार्टोसेट-२ मालिकेतील सहावा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला असून कार्टोसॅटमुळे भारताची टेहळणी क्षमता वाढणार आहे.
  • याशिवाय कन्याकुमारी जिल्ह्यातील नुरुल इस्लाम विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बनवलेला उपग्रह अवकाशात पाठवण्यात आला आहे. शेती पीक आणि आपत्ती व्यवस्थापनामध्ये या उपग्रहाची मदत होईल.
  • कार्टोसेट-२ मालिकेतील उपग्रहाचे वजन ७१२ किलो, तर प्रक्षेपित करण्यात आलेल्या इतर ३० उपग्रहांचे वजन २४३ किलो आहे.
  • या देशांचे उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले:- ऑस्ट्रिया, बेल्जियम, चिली, झेक प्रजासत्ताक, फिनलॅंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, लात्विया, लिथुआनिया, स्लोव्हाकिया, ब्रिटन आणि अमेरिका
  • इस्रोचे अध्यक्ष ए एस किरण कुमार
 ‘कार्टोसेट-२’बद्दल 
  • प्रक्षेपित करण्यात आलेल्या ३१ उपग्रहांपैकी कार्टोसेट-२ हा उपग्रह सर्वांत महत्त्वाचा आहे.
  • कार्टोसॅट मालिकेतील उपग्रहांना भारताचे आकाशातील नेत्र म्हटले जाते. सप्टेंबर महिन्यात सर्जिकल स्ट्राईक करताना या उपग्रहांची मदत घेण्यात आली होती. 
  • कार्टोसेट-२ या मालिकेतील हा सहावा उपग्रह आहे. भारताकडे याआधीच अशा प्रकारचे पाच उपग्रह आहेत.
  • कार्टोसॅटचे वजन ७१२ किलो असून, तो पृथ्वीवरील घडामोडींकडे लक्ष ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
  • कार्टोसेट-२चे फायदे
    • भारताला सीमावर्ती भागात आणि शेजारी देशांवर नजर ठेवता येणार.
    • स्मार्ट सिटी योजनेतील विविध उपक्रमांसाठीदेखील मोठी मदत होणार.
    • ५०० किलोमीटर अंतरावरुनही सीमावर्ती भागातील दहशतवाद्यांचे तळ, बंकर याची माहिती मिळू शकेल.
    • उच्च क्षमतेची छायाचित्र, डाटा मिळवण्यासाठी उपयुक्त. 

न्या. दलवीर भंडारी

  • नेदरलॅण्ड्समधील द हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे भारतीय न्यायाधीश दलवीर भंडारी यांचा सध्याचा कार्यकाल ५ फेब्रुवारी २०१८ रोजी संपत आहे.
  • तत्पूर्वी भारताने या पदावरील फेरनियुक्तीसाठी भंडारी यांचे पुन्हा नामांकन जाहीर केले आहे.
  • आंतरराष्ट्रीय न्यायालयात संयुक्त राष्ट्रे आणि त्यांच्या सुरक्षा परिषदेतर्फे ९ वर्षांसाठी १५ न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात येते.
  • दलवीर बंडारी यांचा जन्म १ ऑक्टोबर १९४७ रोजी राजस्थानमध्ये झाला. जोधपूर विद्यापीठातून त्यांनी मानवशास्त्र आणि कायद्याची पदवी घेतली.
  • अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी स्कूल येथून कायद्यातील पदव्युत्तर पदवी मिळवली. राजस्थान उच्च न्यायालयात वकिली केल्यानंतर त्यांनी शिकागो येथेही काही काळ वकिली केली.
  • अमेरिकेतून परतल्यानंतर त्यांनी १९७३ ते १९७६ या काळात राजस्थान उच्च न्यायालयात वकिली केली.
  • १९७७ साली ते दिल्ली उच्च न्यायालयात वकिली करण्यासाठी गेले. नंतर १९९१साली त्यांची दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नेमणूक झाली.
  • त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला. ऑक्टोबर २००५मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली.
  • तेथील उल्लेखनीय कामगिरीनंतर भंडारी यांची १९ जून २०१२ रोजी द हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात निवड झाली.
  • २००७साली त्यांची इंडिया इंटरनॅशनल लॉ फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी निवड झाली. अद्याप ते पद त्यांच्याकडे आहे.
  • दलवीर भंडारी यांच्या अनेक महत्वाच्या निर्णयांमुळे देशाच्या अनेक क्षेत्रांत बदल घडून आला आहे. त्यांच्या या कार्याची दाखल घेत २०१४साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.
  • कर्नाटकामधील टुमकूर विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ लॉज, तर कोटा येथील वर्धमान महावीर ओपन युनिव्हर्सिटीने त्यांना डॉक्टर ऑफ लेटर्स ही पदवी बहाल केली आहे.

पुणे महानगरपालिका कर्जरोखे सूचीबद्ध

  • पुणे महानगरपालिका कर्जरोख्यांची २२ जून रोजी मुंबई शेअर बाजारात नोंदणी करण्यात आली आहे.
  • या माध्यमातून पुणे शहरातील २४ तास पाणीपुरवठा योजनेसाठी महानगर पालिकेने २०० कोटी रुपये उभारणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
  • वार्षिक ७.५९ टक्के दराने १० वर्षांचे रोखे याद्वारे उभारले गेले आहेत. याकरिता रोख्यांना सहापट प्रतिसाद मिळाला. 
  • भारतीय कर्जरोखे आणि नियामक मंडळ अर्थात सेबीने महानगरपालिका अधिनियम २०१५द्वारे चालू केलेल्या कर्जरोख्यांची सूची संदर्भातील ही पहिली प्रक्रिया आहे.
  • केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत वर्षभरात १० शहरांनी ही प्रक्रिया राबविण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले होते.
  • या व्यतिरिक्त केंद्र सरकारने एकूण कर्ज रोख्यांच्या आकारावर आधारित २ टक्के व्याज अनुदान देण्याचे सुचविले होते.
  • पुणे महानगरपालिकेने आगामी कालावधीतही याच माध्यमातून २,२६४ कोटी रुपये उभारण्याचा संकल्प केला आहे.

महागड्या शहरांच्या यादीत मुंबईला ५७वा क्रमांक

  • मर्सर संस्थेतर्फे दरवर्षी जगभरातील शहरांमधील जीवनावश्यक खर्चाबाबत सर्वेक्षण केले जाते.
  • यावर्षीच्या सर्वेक्षणात जगातील सर्वात महागड्या शहरांच्या यादीत मुंबईला ५७वे स्थान मिळाले आहे. २०१६साली मुंबईचा याबाबत ८२वा क्रमांक होता.
  • अँगोला या देशाची राजधानी असलेल्या ल्युएण्डा हे शहर जगातील सर्वात महाग शहर ठरले आहे. हे शहर सर्वेक्षणात प्रथम स्थानावर आहे.
  • ल्युएण्डा या शहरानंतर अनुक्रमे हाँगकाँग, टोकियो, झ्युरिच, सिंगापूर ही  जगभरातील महागडी शहरे आहेत.
  • याशिवाय सेऊल, जिनेव्हा, शांघाय, न्यूयार्क, बर्न या शहरांचा क्रमवारीत पहिल्या १०मध्ये समावेश आहे.
  • तर टय़ुनिस (२०९वे स्थान), बिशकेक (२०८वे स्थान) ही जगातील सर्वात स्वस्त शहरे आहेत असे या सर्वेक्षणात नमूद केले आहे.
  • भारताचा विचार केल्यास नवी दिल्ली ९९व्या, चेन्नई १३५व्या, बेंगळूरु १६६व्या आणि कोलकाता १८४व्या स्थानावर आहे.

कोलकात्यात भारतातील पहिली अंडरवॉटर मेट्रो

  • कोलकत्यातील हुगळी नदीखाली सुरु असलेल्या अंडरवॉटर बोगद्याचे काम पुर्ण झाले असून लवकरच या मार्गावरुन मेट्रो धावणार आहे.
  • देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रोजेक्ट असून, या बोगद्याच्या माध्यमातून हावडा आणि कोलकाताला मेट्रोद्वारे जोडण्यात येणार आहे.
  • कोलकाता मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने या मार्गाचे बांधकाम केले आहे. १९८४मध्ये देशातील पहिली मेट्रो धावल्यानंतर कोलकाताने मिळवलेले हे दुसरे महत्वाचे यश आहे.
  • हावडा आणि महाकरन मेट्रो स्टेशनचे प्रवासी एका मिनिटासाठी नदीखालून प्रवास करतील. या बोगद्यात मेट्रोचा वेग ताशी ८० किमी असेल.
  • या मार्गावर मेट्रो १०.६ किमीचा प्रवास बोगद्यातून करणार असून, नदीखाली बांधण्यात आलेल्या बोगद्याची लांबी ५२० मीटर इतकी आहे. 
  • नदीच्या खाली तयार करण्यात आलेल्या या बोगद्यासाठी ६० कोटी खर्च करण्यात आले आहेत.

आयर्लंड आणि अफगाणिस्तानला कसोटी संघांचा दर्जा

  • आयर्लंड आणि अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघांना आयसीसीचे पूर्ण सदस्यत्व आणि कसोटी संघांचा दर्जा देण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) घेतला आहे.
  • त्यामुळे कसोटी खेळणाऱ्या देशांची संख्या आता १२ होणार आहे. यापूर्वी २०००साली बांगलादेश कसोटी संघाचा दर्जा प्राप्त करणारा १०वा देश ठरला होता.
  • अफगाणिस्तान हा कसोटी दर्जा लाभलेला आशिया खंडातील पाचवा देश  आहे. तर आयर्लंड कसोटी दर्जा मिळवणारा युरोपमधील दुसरा देश आहे.

चालू घडामोडी : २२ जून

यूपीएकडून राष्ट्रपतीपदासाठी मीरा कुमार यांना उमेदवारी

  • ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम यांच्या कन्या मीरा कुमार यांना काँग्रेसप्रणीत यूपीएकडून राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
  • भाजपप्रणीत एनडीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्याविरोधात त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
  • लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा राहिलेल्या मीरा कुमार यादेखील रामनाथ कोविंद यांच्याप्रमाणे दलित कुटुंबातून येतात.
  • मीरा कुमार यांचा जन्म १९४५ मध्ये पाटणा येथे झाला. कायद्यातून पदवी आणि इंग्रजी साहित्यातून पदव्युत्तर पदवी त्यांनी प्राप्त केली आहे.
  • १९७३मध्ये त्यांची भारतीय विदेश सेवेत (आयएफएस) निवड झाली. त्यानंतर त्यांनी स्पेन, ब्रिटन आणि मॉरिशसमध्ये उच्चायुक्त म्हणून काम केले.
  • त्यानंतर त्यांनी नोकरीचा राजीनामा देत राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपली राजकीय कारकीर्द उत्तर प्रदेशमधून सुरू केली.
  • १९८५मध्ये बिजनौर मतदारसंघातून त्या प्रथम लोकसभेत निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्या पाच वेळा लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. 
  • माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्रिपदही भूषविले आहे. तर २००९ ते २०१४ या कालावधीत त्या लोकसभाध्यक्ष होत्या.
  • त्या लोकसभेच्या पहिल्या महिला व दलित समाजाच्या दुसऱ्या अध्यक्षा बनल्या. त्यांच्यापूर्वी दलित समाजातील बालयोगी यांनी हे पद भूषविले होते.

साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर

  • देशातील प्रतिष्ठेच्या साहित्य अकादमीच्या पुरस्कारांची घोषणा २२ जून रोजी विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत करण्यात आली.
  • २४ भाषांमधील लेखकांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली. यामध्ये  मराठीतील दोन साहित्यिकांचा समावेश आहे.
  • मराठी भाषा विभागात अकादमीचा युवा पुरस्कार राधानगरी तालुक्यातील राहुल पांडुरंग कोसंबी यांच्या ‘उभं-आडवं’ या कथासंग्रहाला जाहीर झाला.
  • तर एल. एम. कडू यांच्या ‘खारीचा वाटा’ या पुस्तकाला बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला. 
  • कोकणी भाषेत ‘मोग डॉट कॉम’ या कवितासंग्रहासाठी अमेय विश्राम नायक यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
  • याशिवाय विन्सी क्वाद्रूस यांच्या जादूचे पेटूल या पुस्तकाला कोकणी भाषेतील बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • हिंदीमध्ये तारो सिदिक आणि उर्दूमध्ये रशीद अशरफ खान यांची युवा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
  • ३५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या साहित्यिकांची साहित्य अकादमीच्या युवा पुरस्कारासाठी निवड केली जाते. ५० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
  • युवा पुरस्कारांसह साहित्य अकादमीने बाल साहित्य पुरस्कारांची घोषणाही केली आहे. ५० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

भारतीय रिफत शाहरूखच्या उपग्रहाचे नासाकडून प्रक्षेपण

  • रिफत शाहरूख या भारतीय विद्यार्थ्याने तयार केलेल्या जगातील सगळ्यात हलक्या ६४ ग्रॅम वजनाच्या उपग्रहाचे ‘नासा’ने २२ जून रोजी यशस्वी प्रक्षेपण केले.
  • १८ वर्षीय रिफत शाहरुख नासा आणि ‘आय डुडल लर्निंग’ने आयोजित केलेल्या ‘क्युब इन स्पेस’ या स्पर्धेत सहभागी झाला होता.
  • या स्पर्धेसाठी त्याने ठोकळ्याच्या आकाराचा ‘कलामसॅट’ नावाचा उपग्रह तयार केला होता.
  • जगातील अनेक उपग्रहांवर अभ्यास करण्यात आल्यावर रिफतने बनवलेला उपग्रह सर्वात हलका आणि लहान असल्याचे नासाने म्हटले आहे.
  • भारतीय विद्यार्थ्याने एका स्पर्धेत बनवलेला उपग्रह पहिल्यांदाच नासाद्वारे प्रक्षेपित करण्यात आला आहे.
  • २४० मिनिटांची ही प्रक्षेपण मोहिम असून तो १२ मिनिटे अंतराळाच्या कक्षेत ‘कलामसॅट’ भ्रमण करणार आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रवर आरबीआयकडून निर्बंध

  • बँक ऑफ महाराष्ट्रच्या वाढत्या अनुत्पादित कर्जांमुळे (एनपीए) रिझर्व्ह बँकेने या बँकेवर (प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अॅक्शन) निर्बंध घातले आहेत.
  • बँकेची कामगिरी सुधारावी, बँकेच्या व्यवस्थापनात सुधारणा व्हावी, नफा वाढावा आणि बँकेच्या मत्तेचा (अॅसेट्स) दर्जा सुधारावा, या उद्देशाने हे निर्बंध घालण्यात आले आहेत.
  • मात्र, या निर्बंधांमुळे बँकेच्या नियमित कामकाजावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे बँकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
  • प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अॅक्शनमधील निर्बंधांनुसार बँकांना रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय नव्या शाखा सुरू करता येत नाहीत. बँकांच्या उपकंपन्यांमध्ये गुंतवणूक करता येत नाही.
  • तसेच बँकांच्या कामकाजातील काही गोष्टींवर रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण राहते. बँकांना मान्यतेशिवाय मोठ्या रकमेची कर्ज (कॉपोरेट लेंडिंग) देण्यावरही निर्बंध असतात.
  • केंद्र सरकारने राष्ट्रीयीकृत बँकांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी व रोडमॅप निश्चित करण्यासाठी दोन वर्ष ज्ञानसंगम परिषदेचे आयोजन केले होते.
  • पुण्यातील पहिल्या ज्ञानसंगम परिषदेनंतर बँकांची कामगिरी सुधारण्यासाठी इंद्रधनुष्य या सात कलमी कार्यक्रमाची निश्चिती करण्यात आली.
  • बँकांना या निकषांनुसार आपली आर्थिक कामगिरी सुधारण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर बँकांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला.
  • या आढाव्यानंतरही ज्या बँकांची कामगिरी सुधारलेली नाही, अशा बँकांवर रिझर्व्ह बँकेने बंधने घालण्यास सुरुवात केली आहे.
  • आरबीआयकडून निर्बंध लादण्यात आलेली बँक ऑफ महाराष्ट्र आयडीबीआय, देना, युको आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियानंतरची पाचवी राष्ट्रीय बँक आहे.

संयुक्त राष्ट्राचा लोकसंख्येबद्दलच्या अंदाजाचा अहवाल प्रसिद्ध

  • संयुक्त राष्ट्राच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, जगामधील एकूण लोकसंख्या २०५०पर्यंत ९.८ अब्ज इतकी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या जगाची लोकसंख्या सध्या ७.६ अब्ज इतकी आहे.
  • संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक विषयक विभागाने २०१७मधील लोकसंख्येची समीक्षा करुन अहवाल तयार केला आहे.
  • संयुक्त राष्ट्राकडून प्रसिद्ध करण्यात आलेला लोकसंख्येबद्दलच्या अंदाजाचा हा २५वा अहवाल आहे. याआधीचा अहवाल २०१५मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता.
 या अहवालामधील महत्त्वपूर्ण अंदाज 
  • सध्या चीनची लोकसंख्या १४१ कोटी इतकी आहे. तर भारताची लोकसंख्या १३४ कोटी इतकी आहे.
  • जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी १९ टक्के लोक चीनमध्ये, तर १८ टक्के लोक भारतात राहतात.
  • २०२४पर्यंत भारत हा चीनला मागे टाकून जगातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला देश बनेल.
  • यापूर्वीच्या २४व्या अहवालामध्ये भारत २०२२ मध्येच चीनला मागे टाकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
  • २०३०मध्ये भारताची लोकसंख्या १५० कोटींवर जाऊन पोहोचेल. २०५०पर्यंत भारताची लोकसंख्या १६६ कोटी इतकी प्रचंड असेल.
  • भारताच्या लोकसंख्या वाढीचे प्रमाण २०५० नंतर कमी होईल, अशी शक्यतादेखील संयुक्त राष्ट्राने अहवालातून व्यक्त केली आहे.
  • २०५०पर्यंत नायजेरिया हा अमेरिकेस मागे टाकून जगातील तिसरा सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला देश बनेल.
  • दरवर्षी जागतिक लोकसंख्येत सुमारे ८.३ कोटींची भर पडत आहे.
  • प्रजोत्पादनाचा घटणारा दर विचारात घेऊनही २०३०पर्यंत जगाची लोकसंख्या ८.६ अब्ज; २०५०पर्यंत ९.८ अब्ज; तर २१००पर्यंत ११.२ अब्ज इतकी असेल.
  • नायजेरियामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग सर्वाधिक आहे. याशिवाय २०५०पर्यंत आफ्रिकेमधील २६ देशांमधील लोकसंख्या वाढीचा वेग किमान दुप्पट झाला असेल.
  • सध्या जगातील वृद्ध नागरिकांची संख्या ९६.२ कोटी इतकी आहे. २०५०पर्यंत ती २.१ अब्ज; तर २१०० मध्ये ती ३.१ अब्ज इतकी असेल.

टेनिसपटू बोरिस बेकर दिवाळखोर घोषित

  • सहा ग्रँडस्लॅम जेतेपदांची कमाई करणारा ख्यातनाम माजी टेनिसपटू बोरिस बेकरला दिवाळखोर म्हणून घोषित करण्यात आले आहे.
  • एका बँकेचे कर्ज थकवल्याने ब्रिटनमधील न्यायालयाने बेकरला दिवाळखोर म्हणून जाहीर केले आहे.
  • मूळचा जर्मनीचा पण सध्या ब्रिटनमधील लंडन येथे राहणाऱ्या बोरिस बेकरने आर्बटनोट लँथम अँड कंपनी या बँकेचे कर्ज २०१५पासून थकवले होते.
  • ४९ वर्षीय बेकरचा जन्म जर्मनीत झाला होता. त्यानंतर बेकर लंडनमध्ये वास्तव्यास आला होता. तो जर्मनीकडून टेनिस खेळत होता.
  • नोवाक जोकोविचला बेकरने प्रशिक्षण दिले असून सध्या तो समालोचक म्हणूनही काम करतो.
  • बोरिस बेकरने १९८५, १९८६ आणि १९८९ साली विम्बल्डनमध्ये जेतेपद पटकावले होते.
  • याशिवाय १९९१ आणि १९९६मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, १९८९मध्ये यूएस ओपनमध्येही त्याने बाजी मारली होती.
  • १९८८ आणि १९८९मध्ये त्याने डेव्हिस कपमध्ये पश्चिम जर्मनीला विजेतेपद पटकावून दिले होते.