भारत आणि पोर्तुगाल दरम्यान ११ करार
- तीन देशांच्या दौऱ्यावर निघालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ जून रोजी पोर्तुगालमध्ये पोहोचले. यानंतर ते अमेरिका आणि नेदरलँडला भेट देणार आहेत.
- पोर्तुगालमध्ये मोदी यांनी लिस्बन येथे भारतीय वंशाचे पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनिओ कोस्टा यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली.
- यावेळी पोर्तुगाल आणि भारत या दोन्ही देशांदरम्यान ११ महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत
- तसेच वाढत्या दहशतवादाविरोधात पोर्तुगाल आणि भारत हे एकत्र आले असल्याची घोषणादेखील करण्यात आली.
- नरेंद्र मोडी यांनी अँटोनिओ कोस्टा यांना ओव्हरसिज सिटीझन ऑफ इंडियाचे कार्डही यावेळी भेट दिले.
- भारत आणि पोर्तुगाल यांच्या दरम्यान, विज्ञान, तंत्रज्ञानासाठी ४० लाख युरोंचा कोष स्थापण्यावर एकमत झाले आहे.
- तसेच लिस्बनमध्ये मोदींनी भारत आणि पोर्तुगाल यांच्यातल्या आंतरराष्ट्रीय स्टार्ट-अप हबचे उद्घाटनही केले.
- गेल्या १५ वर्षांत पोर्तुगालला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत.
किदाम्बी श्रीकांतला ऑस्ट्रेलियन सुपर सीरिजचे जेतेपद
- भारताचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत याने आपल्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिजचे जेतेपद पटकावले.
- अंतिम सामन्यात श्रीकांतने ऑलिम्पिक विजेता आणि दोनवेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या चेन लाँगवर २२-२०, २१-१६ अशी मात केली.
- जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानी असलेल्या श्रीकांतने आपला फॉर्म कायम राखताना क्रमवारीमध्ये ६व्या स्थानी असलेल्या लाँगला सरळ दोन गेममध्ये नमविले.
- गेल्या दोन आठवड्यांत श्रीकांतने पटकावलेले हे सलग दुसरे सुपर सीरिज विजेतेपद ठरले. १८ जून रोजी श्रीकांतने इंडोनेशिया ओपन सुपर सीरिजचे जेतेपद पटकावले होते.
- या शानदार विजयासह श्रीकांत हा सर्वाधिक सुपरसीरिज विजेतेपदे पटकावणारा भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू ठरला आहे.
जगातील केवळ पाचवा खेळाडू |
---|
|
चार सुपर सीरिज जिंकणारा पहिला भारतीय |
|
पहिला भारतीय पुरुष खेळाडू |
|
मितालीचा सलग ७ अर्धशतके झळकवण्याचा विक्रम
- आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताने इंग्लंडचा ३५ धावांनी पराभव केला.
- या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार मिताली राजने ७३ चेंडूंत ७१ धावांची खेळी करत, सलग सात सामन्यात अर्धशतक करण्याचा पराक्रम केला.
- मितालीने गेल्या सहा वनडे डावांत नाबाद ६२, ५४, नाबाद ५१, नाबाद ७३, ६४ आणि नाबाद ७० धावा केल्या आहेत.
- महिला आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारी मिताली पहिली क्रिकेटपट्टू ठरली आहे.
- याआधी इंग्लंडची शार्लट एडवर्ड्स, लिंडसे रिलर आणि एलिस पेरी (दोघीही ऑस्ट्रेलियाच्या खेळाडू) यांनी सलग सहा अर्धशतके केली होती.
- मितालीने सात अर्धशकांमध्ये ४ अर्धशतके दक्षिण आफ्रिकेविरोधात तर इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि बांगलादेश विरोधात प्रत्येकी १ अर्धशतकी खेळी केली आहे.
- याबरोबरच मितालीने ४७वे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय अर्धशतक झळकावताना, इंग्लंडच्या शार्लट एडवर्ड्सचा सर्वाधिक ४६ अर्धशतकांचा विक्रम मोडीत काढला.
- ३ डिसेंबर १९८२ रोजी राजस्थानमधील जोधपूरमध्ये जन्मलेली मिताली गेल्या १६ वर्षांपासून भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करते आहे.
- मिताली राज आतापर्यंत १७८ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळली आहे. यामध्ये मिताली राजने ५२.२५ च्या सरासरीने ५,८५२ धावा केल्या आहेत.
- सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक सामने यांचा विचार करता इंग्लंडची निवृत्त खेळाडू शार्लट एडवर्ड्स मितालीच्या पुढे आहे. एडवर्ड्सने १९१ सामन्यांमध्ये ५,९९२ धावा केल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा