अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) भारतीय फुटबॉलपटूंचा पहिल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात सत्कार केला.
यावेळी एझॉल एफसीला आय-लीगचे ऐतिहासिक जेतेपद पटकावून देणाऱ्या मुंबईच्या खलिद जमील यांना २०१६-१७ या वर्षांतील सर्वोत्तम प्रशिक्षकाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.
तर आघाडीचा खेळाडू व मोहन बगान संघाचा फॉरवर्ड जेजे लालपेखलुआ याला २०१६ या वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
मिझोरामच्या या खेळाडूने ४८ सामन्यांत भारताने प्रतिनिधित्व केले असून त्याच्या नावावर १८ गोल्स आहेत.
महिलांमध्ये हा मान सस्मिता मलिकने पटकावला. ओरिसाच्या या खेळाडूच्या नावावर ३५ सामन्यांत ३२ गोल्स आहेत.
२०१० ते २०१६ या कालावधीत झालेल्या चारही सॅफ महिला अजिंक्यपद विजेत्या भारतीय संघात तिचा सहभाग होता.
गेल्या वर्षी ९३ सामन्यांत ५३ गोल करणाऱ्या सुनील छेत्रीला विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
टाटा मोटर्सच्या सीईओ पदावर सतीश बोरवणकर
टाटा मोटर्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर सतीश बोरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रवींद्र पिशारोदी यांनी टाटा मोटर्सच्या कार्यकारी अधिकारीपदाचा अचानक राजीनामा दिल्यानंतर त्यांची जागी बोरवणकर यांची नियुक्ती झाली.
येत्या महिन्यातच निवृत्त होणारे कंपनीचे विद्यमान कार्यकारी संचालक बोरवणकर यांना टाटा समूहाने दोन वर्षांची मुदतवाढही दिली आहे.
मार्च २०१७ अखेर नोंदविलेल्या १४८ कोटी रुपयांच्या तोटय़ातून कंपनीला बाहेर काढण्याची जबाबदारीच बोरवणकर यांच्यावर असेल.
बोरवणकरांच्या रूपात टाटा मोटर्सला पुन्हा एकदा बिगर पारशी नेतृत्व लाभले आहे.
कानपूरच्या भारतीय प्रौद्योगिकी संस्थेचे यांत्रिकी अभियांत्रिकी पदवीधर बोरवणकर यांच्या टाटा मोटर्समधील कारकीर्दीला १९७४ मध्ये सुरूवात झाली.
टाटा मोटर्सच्या संचालक मंडळात ते जून २०१२मध्ये गुणवत्ता विभागासाठी कार्यकारी संचालक म्हणून नियुक्त झाले.
टाटा मोटर्समधील अनेक हरित प्रकल्पांची उभारणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
एससीओ परिषदेसाठी मोदी कझाकस्तानमध्ये
भारत आणि कझाकस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कझाकस्तानचे अध्यक्ष नूर सुलतान नझरबयेव यांच्यात अस्थाना येथे चर्चा झाली.
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचे कझाकस्तानची राजधानी अस्थाना येथे आगमन झाले आहे. या परिषदेमध्ये पाकिस्तानही सहभागी झाला आहे.
शांधाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन दहशतवादाशी लढ्यासाठी भारताशी सहकार्य करेल, अशी आशा पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा