अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा २०१७
दृष्टीक्षेपात अमेरिकन ओपन २०१७ | ||
---|---|---|
प्रकार | विजेते | उपविजेते |
पुरुष एकेरी | राफेल नदाल | केविन अँडरसन |
महिला एकेरी | स्लोआनी स्टीफन्स | मॅडिसन किज |
पुरुष दुहेरी | जीन जुलिअन रॉजर-होरीया तकाऊ | फेलिसियानो लोपेझ-मार्क लोपेझ |
महिला दुहेरी | मार्टिना हिंगिस - चॅन युंग जॅन | ल्युसी हॅराडेका - कॅटेरिना सिनिआकोव्हा |
मिश्र दुहेरी | मार्टिना हिंगिस-जॅमी मरे | हो चॅन-मायकल व्हीनस |
टॉम यांची आयसिसच्या तावडीतून सुटका
- येमेनमध्ये आयसिस या दहशतवादी संघटनेने अपहरण केलेले ख्रिश्चन धर्मगुरु टॉम उझहन्निल यांची येमेनमधील परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने दीड वर्षाने सुटका करण्यात यश आले आहे.
- फादर टॉम यांच्या सुटकेमध्ये सुल्तान ऑफ ओमानने महत्वाची भूमिका बजावली आहे.
- टॉम उझहन्निल हे केरळचे रहिवासी आहेत. ख्रिश्चन मिशनरीतर्फे चालवण्यात येणाऱ्या वृद्धाश्रमात धर्मगुरु टॉम उझहन्निल कार्यरत होते.
- मार्च २०१६मध्ये येमेनमधील अदेन शहराच्या दक्षिण भागात आयसिसच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यानंतर दहशतवाद्यांनी टॉम उझहन्निल यांचे अपहरण केले होते.
- त्यांच्या सुटकेसाठी भारताचे प्रयत्न सुरु होते. यात येमेनसह सौदी अरेबिया आणि ओमान या देशांची मदत घेतली जात होती.
उत्तर कोरियावर कठोर निर्बंध
- ३ सप्टेंबर रोजी उत्तर कोरियाने सहावी आणि सगळ्यात मोठी अणूचाचणी केल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी त्यांच्यावर कठोर निर्बंध लादले आहेत.
- ११ सप्टेंबर रोजी उत्तर कोरियावर संयुक्त राष्ट्रांच्या १५ सदस्यांच्या सुरक्षा परिषदेने कठोर निर्बंध लादणारा ठराव एकमताने संमत केला. या निर्बंधांचा मसुदा अमेरिकेने तयार केला होता.
- उत्तर कोरियाला त्याच्या अणु कार्यक्रमापासून रोखण्यासाठी त्याच्या तेलाच्या आयातीला आणि कापडाच्या निर्यातीवर बंदी घालण्याच्या निर्बंधांचा समावेश आहे.
- उत्तर कोरियाकडून होत असलेल्या संपूर्ण तेल आयातीवर बंदीसह अमेरिकेने मूळात कठोर निर्बंधांचा प्रस्ताव मांडला होता.
- परंतु निर्बंधांत कपात केल्यानंतरच उत्तर कोरियाचे मित्र देश रशिया आणि चीनच्या संमतीनंतर ठराव संमत झाला.
- या निर्बंधांमुळे उत्तर कोरियाच्या वार्षिक महसूलात ५०० दशलक्ष किंवा त्यापेक्षाही जास्त अमेरिकन डॉलरची कपात होणार आहे.
प्रियांका पन्वर डोपिंगमध्ये दोषी
- एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारी धावपटू प्रियांका पन्वरवर डोपिंगमध्ये दोषी आढळल्याप्रकरणी राष्ट्रीय उत्तेजक द्रव सेवन विरोधी संस्थेने (नाडा) आठ वर्षांची बंदी घातली आहे.
- डोपिंगमध्ये ती दुसऱ्यांदा दोषी आढळली आहे. यामुळे २९ वर्षाच्या प्रियांकाची कारकीर्द जवळपास संपुष्टात आली आहे.
- गेल्या वर्षी आंतरराज्य अॅथलेटिक्स स्पर्धेदरम्यान खेळाडूंची डोपिंग टेस्ट घेण्यात आली होती. त्यात तिने बंदी घातलेल्या ‘मेफेन्टेरमाइन’चे सेवन केल्याचे समोर आले आहे.
- २०११मध्ये प्रियांकासह पाच अॅथलिटना डोपिंगमध्ये दोषी आढळल्याप्रकरणी दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते.
- दुसऱ्यांदा दोषी आढळल्यामुळे नियमानुसार प्रियांकावर ८ वर्षांची बंदी घालण्यात आली.
- प्रियांकाने २०१४च्या एशियन गेम्समध्ये ४ बाय ४०० मीटर रिलेत सुवर्णपदक जिंकले आहे. यात तिच्यासह टिंटू लुका, मनदीप कौर, एम. आर. पूवम्माचाही समावेश आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा