पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १७ सप्टेंबर रोजी गुजरातमधील महत्त्वाकांक्षी सरदार सरोवर धरणाचे लोकार्पण करण्यात आले.
नर्मदा नदीवर बांधण्यात आलेल्या या धरणाचे भूमिपुजन ६० वर्षांपूर्वी ५ एप्रिल १९६१ रोजी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते झाले होते.
अमेरिकेतील ग्रँड कुली धरणानंतर सरदार सरोवर धरण हे जगातील दुसरे सर्वात मोठे धरण असून, काँक्रिटच्या वापरात हे जगातील सर्वात मोठे धरण आहे.
धरणाच्या बांधकामाला १९८७मध्ये सुरुवात झाली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा प्रकल्प पूर्णत्वास जावा यावर भर दिला.
गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांना सरदार सरोवर प्रकल्पातून फायदा होणार आहे.
कोरिया सुपर सीरिजमध्ये सिंधूने विजयी
कोरिया ओपन सुपर सीरिजच्या अंतिम सामन्यात भारताच्या पी व्ही सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराचा २२-२०, ११-२१, २१-१८ असा पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेली पी व्ही सिंधू कोरियन ओपन जिंकणारी पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे.
सिंधूचे हे कारकिर्दीतील तिसरे सुपरसीरिज विजेतेपद आहे. तिने २०१६मध्ये चायना सुपर सिरीज आणि इंडियन ओपन सुपर सिरीज स्पर्धा जिंकली होती.
या विजयासह जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत ओकुहाराकडून झालेल्या पराभवाची परतफेड सिंधूने केली आहे.
२०१७ या वर्षात भारताचे सर्वाधिक ६ खेळाडू वेगवेगळ्या सुपर सिरीज स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहचले आहेत. याबाबतीत भारताने जपान, चीन यासारख्या मातब्बर देशांनाही मागे टाकले आहे.
पंतप्रधान स्कॉलरशिप योजना
देशातील उच्च विद्याविभूषितांसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान स्कॉलरशिप योजना जाहीर केली आहे.
या योजनेद्वारे, देशातील प्रतिभावान विद्यार्थ्यांनी परदेशात जाऊ नये व भारतातच त्यांना उत्कृष्ट दर्जाचे उच्च शिक्षण घेता यावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
या योजनेंतर्गत दरवर्षी गुणवत्तेच्या निकषांवर निवडलेल्या १००० विद्यार्थ्यांना दरमहा ७५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाईल.
भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाची २० विद्यापीठे असावीत आणि जगातील पहिल्या २०० विद्यापीठांमध्ये त्यांची गणना व्हावी, यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विविध स्तरांवर प्रयत्न चालविले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा