- हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांच्या जन्मदिनी आणि राष्ट्रीय क्रीडादिनाचे औचित्य साधून २९ ऑगस्ट रोजी भारतातील गुणवत्तावान खेळाडूंना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पुरस्कार प्रदान करण्यात आले.
- यावेळी क्रीडा मंत्रालयाने राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद जीवनगौरव या पुरस्कारांची घोषणा केली आहे.
- यामध्ये २ खेळाडूंना खेलरत्न, ७ प्रशिक्षकांना द्रोणाचार्य, १७ क्रीडापटूंना अर्जुन तर ३ जणांना ध्यानचंद पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
- भालाफेकपटू देवेंद्र झांझरिया आणि हॉकीपटू सरदारसिंग यांना २०१७चा सर्वोच्च क्रीडा सन्मान राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला.
- देवेंद्र झाझरिया खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस झालेला आणि हा पुरस्कार मिळविणारा पहिलाच पॅरालिम्पिक (दिव्यांग) खेळाडू ठरला आहे.
- देवेंद्रने २००४ आणि २०१६ सालच्या पॅरालिम्पिकमध्ये भारताला भालाफेकीमध्ये २ सुवर्णपदकांची कमाई करुन दिली आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय दिव्यांग खेळाडू आहे.
- जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या देवेंद्रने २०१६पॅरालिम्पिकमध्ये ६३.९७ मीटर भालाफेक करून विश्वविक्रम रचला होता. २०१३मध्ये जागतिक स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक जिंकले होते.
- त्याला २००४साली अर्जुन पुरस्काराने आणि २०१२मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. पद्मश्री पुरस्कार मिळवणारा तो पहिला पॅरालिम्पियनपटू आहे.
- भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंह याने सुमारे १० वर्षे आंतरराष्ट्रीय हॉकीत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने ८ वर्षे भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवले आहे.
पुरस्कार्थींची अंतिम यादी | |
---|---|
खेळाडू | खेळ |
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार | |
देवेंद्र झाझरिया | भालाफेक |
सरदार सिंग | हॉकी |
अर्जुन पुरस्कार | |
व्ही जे सुरेखा | तिरंदाजी |
खुशबीर सिंग | ॲथलेटिक्स |
अरोकिया राजीव | ॲथलेटिक्स |
प्रशांती सिंग | बास्केटबॉल |
लैशराम देवेंद्रो सिंग | बॉक्सिंग |
चेतेश्वर पुजारा | क्रिकेट |
हरमनप्रीत कौर | क्रिकेट |
ओईनाम बेमबेम देवी | फुटबॉल |
एसएसपी चौरसिया | गॉल्फ |
एस व्ही सुनील | हॉकी |
जसवीर सिंग | कबड्डी |
पी एन प्रकाश | नेमबाजी |
ए अमलराज | टेबलटेनिस |
साकेत मायनेनी | टेनिस |
सत्यव्रत कादियन | कुस्ती |
मरियप्पन | दिव्यांग खेळाडू |
वरुण सिंग भाती | दिव्यांग खेळाडू |
द्रोणाचार्य पुरस्कार | |
स्व. डॉ आर गांधी | अथलेटिक्स |
हिरानंद कटारिया | कबड्डी |
जी एस एस व्ही प्रसाद | बॅडमिंटन |
ब्रिजभूषण मोहंती | बॉक्सिंग |
पी ए राफेल | हॉकी |
संजय चक्रवर्ती | नेमबाजी |
रोशन लाल | कुस्ती |
ध्यानचंद पुरस्कार | |
भूपेंदर सिंग | अथलेटिक्स |
सय्यद शाहिद हकीम | फुटबॉल |
सुमाराई टेटे | हॉकी |
ही नोट्स मोफत PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी MPSC Toppersचे मोबाईल अॅप डाउनलोड करा. Link : MPSC Toppers Mobile App (Version 3.0) ★ अभ्यासासाठी सर्वांना शुभेच्छा ★ |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा