चालू घडामोडी : २२ सप्टेंबर
रजनीकांत मिश्रा एसएसबीचे महासंचालक
- केंद्र सरकारने आयपीएस अधिकारी रजनीकांत मिश्रा यांची नुकतीच सशस्त्र सीमा बलाच्या (एसएसबी) महासंचालकपदी नियुक्ती केली आहे.
- मिश्रा हे १९८४च्या तुकडीतील उत्तर प्रदेश केडरचे आयपीएस अधिकारी असून, ३१ ऑगस्ट २०१९पर्यंत ते या पदावर राहणार आहेत.
- विज्ञान शाखेतून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतलेले रजनीकांत मिश्रा हे मूळचे बिहारचे आहेत.
- २०१२मध्ये सीमा सुरक्षा दलात महानिरीक्षकपदावर नियुक्ती करण्यात आली होती. पुढे २०१४मध्ये त्यांच्यावरील जबाबदारी आणखी वाढविताना त्यांना अतिरिक्त महानिर्देशकपदावर बढती देण्यात आली होती.
- अलीकडेच त्यांची बीएसएफच्या विशेष महासंचालकपदी तसेच उत्तर प्रदेशातील पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती.
- सशस्त्र सीमा बलाच्या सध्याच्या महासंचालक अर्चना रामसुंदरम या १९८०च्या तुकडीतील तामिळनाडू केडरच्या आयपीएस अधिकारी ३० सप्टेंबर रोजी निवृत्त होत असल्याने त्यांची जागा आता मिश्रा घेतील.
टाटा सन्स होणार प्रायव्हेट लिमिटेड
- टाटा समूह लवकरच प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होणार असून, टाटा समूहाची पालक कंपनी असणाऱ्या टाटा सन्सच्या प्रवर्तक व समभागधारकांनी एकमताने या प्रस्तावाला मंजुरी दिली.
- टाटा सन्सच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीमध्ये भागधारकांनी टाटा सन्स सार्वजनिकवरून खासगी करण्याच्या प्रस्तावाला बहुमताने मंजुरी दिली.
- टाटा सन्सच्या प्रशासनाला कंपनी कायदा २०१४अंतर्गत ‘डीम्ड पब्लिक’ कंपनीचा दर्जा मान्य नव्हता. याचमुळे कंपनीचे खासगीकरण करण्याची तयारी सुरू होती.
- टाटा सन्सचे पदच्युत अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे कुटुंबीय ‘टाटा’चे समभाग बाहेरील गुंतवणूकदारांना विकणार असण्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीने हा निर्णय घेतला. यामुळे मिस्त्रींच्या समभागविक्रीवर मर्यादा येणार आहेत.
- टाटा कंपनीच्या खासगीकरणाला मिस्त्री कुटुंबीयांचा विरोध होता. टाटा कंपनीत मिस्त्री कुटुंबीयांचे १८.४ टक्के हिस्सा आहे.
‘उबर’चा लंडनमधील परवाना संपणार
- ‘उबर’ या अमेरिकी कंपनीला लंडनमधील टॅक्सी सेवेच्या परवान्याचे नुतनीकरण लंडन परिवहन विभागाने नकार दिला आहे.
- ३० सप्टेंबरला ‘उबर’चा लंडनमधील परवाना संपणार असून परिवहन विभागाच्या या निर्णयाला ‘उबर’ला न्यायालयात आव्हान देता येणार आहे.
- ऑनलाइन टॅक्सी सेवा देणारी ‘उबर’ ही अमेरिकेतील कंपनी असून जभरातील विविध शहरांमध्ये ‘उबर’तर्फे टॅक्सी सेवा दिली जाते.
- परंतु ‘उबर’ लंडनमध्ये टॅक्सी सेवा देण्यास सक्षम आणि योग्य नाही, असे सांगत ‘ट्रान्स्पोर्ट ऑफ लंडन’ने ‘उबर’चा परवाना नुतनीकरणासाठी अर्ज फेटाळून लावला आहे.
- ‘उबर’ने वाहनचालकांची निवड करताना त्यांची पार्श्वभूमी तपासली नाही. तसेच चालकांच्या गुन्ह्यांप्रकरणी ‘उबर’ने दाखवलेला निष्काळजीपणा यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा