चालू घडामोडी : २० सप्टेंबर
विजय मल्ल्याची संपत्ती जप्त
- विदेशात फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्याची संपत्ती जप्त करण्याची प्रत्यक्ष कारवाई अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सुरू केली आहे.
- मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये मल्ल्याच्या युनायटेड ब्रेव्हरीज लिमिटेड (यूबीएल) कंपनीच्या १०० कोटी रूपयांच्या समभागांचे मालकी हक्क केंद्र सरकारकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत.
- ‘स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.’द्वारे (SHCIL) हस्तांतरित झालेले समभाग विजय मल्ल्याच्या थेट मालकीचे होते. ते कुठेही तारण नव्हते.
- मनी लाँड्रिंग कायद्याच्या कलम ९ अन्वये ते जप्त करण्याच्या सूचना देणारे पत्र ईडीने दोन महिन्यांपूर्वी SHCIL कंपनीला पाठविले होते.
- याशिवाय मॅक्डॉवेल होल्डिंग या कंपनीतील सुमारे ४ हजार कोटी रुपयांचे समभागही अशाच पद्धतीने जप्त करण्याचे आदेश ईडीने दिले आहेत.
- मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार समभागधारकाचा मृत्यू झाल्यास किंवा त्याला फरारी घोषित केल्यास विशेष न्यायालय संबंधित समभागधारकाची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देऊ शकते.
- मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाइन्स या बंद पडलेल्या कंपनीकडे विविध बँकांचे ६ हजार कोटी थकले आहेत. या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.
राष्ट्रीय वैद्यकीय शिक्षण समिती
- राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे पुनर्मुल्यांकन करण्यासाठी काम मानव संसाधन मंत्रालयाने डॉ. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय वैद्यकीय शिक्षण समिती स्थापन केली आहे.
- या राष्ट्रीय वैद्यकीय शिक्षण समितीवर मुंबई कॉलेज ऑफ फिजीशियनचे (सीपीएस) अध्यक्ष डॉ. गिरीष मैंदरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- वैद्यकीय शिक्षणात कोणते बदल घडवायला हवेत?, यासाठी ही समिती शिफारशी देणार आहे.
- डॉ. गिरीष मैंदरकर हे बालरोगतज्ञ असून ते मुळचे लातूरचे आहेत. मुंबईतल्या सगळ्यात जुन्या सीपीएस या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत.
- या समितीचे समन्वयक म्हणून बेंगलोरच्या असोसिएशन ऑफ हॉस्पीटल सर्व्हिस प्रोव्हायडर्सचे अध्यक्ष डॉ. अलेक्झांडर थॉमस यांना निवडण्यात आले आहे.
- याशिवाय या समितीवर नारायणा हेल्थ केअरचे डॉ. देवी शेट्टी, ख्रिश्चन मेडीकल कॉलेजचे डॉ. अन्ना पुलीमोड, राष्ट्रीय परीक्षा परिषदचे डॉ. बबीतोष बिश्वास, हेल्थ युनिर्व्हसिटी असोसिएशन दिल्लीचे अध्यक्ष डॉ. ओ. पी. कारला, बेंगलोरच्या निमहॅम्सचे संचालक डॉ. बी. एन. गंगाधर व एअरफोर्स मेडीकल सर्व्हिसेसचे महासंचालक डॉ. पवन कपूर यांचा समावेश आहे.
मार्क ब्युमॉन्टची सायकलने पृथ्वी प्रदक्षिणा
- मार्क ब्युमॉन्ट या ब्रिटिश सायकलपटूने ७८ दिवसांत सायकलने पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण करून सर्वात कमी वेळात जगप्रवास करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
- याबरोबरच एका महिन्यात सर्वात जास्त अंतर सायकल चालविल्याचा नवा जागतिक विक्रमही मार्कने आपल्या नावे केला आहे.
- दररोज सरासरी १८ तास याप्रमाणे सायकल चालवून मार्कने पोलंड, रशिया, मंगोलिया, चीन, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका हे देश पार केले.
- पॅरिसमधील ‘आर्क डी ट्रायम्फ’ (विजय कमान) येथे आपल्या या १८ हजार मैलाच्या (२९ हजार किमी) सफरीची त्याने सांगता केली.
- सायकलने ही पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करण्यास मार्कला ७८ दिवस, १४ तास ४० मिनिटे एवढा वेळ लागला.
- सायकलने सर्वात कमी वेळात जगप्रवास करण्याचा हा नवा विक्रम असल्याचे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने जाहीर केले.
- या आधीचा विक्रम अँड्र्यू निकलसन या न्यूझीलंडच्या सायकलपटूच्या नावे होता. त्याने ही सफर १२३ दिवसांत पूर्ण केली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा