भारतीय बॅडमिंटन महासंघातर्फे यंदापासून जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार असून त्याचा पहिला मान ऑल इंग्लंड स्पर्धा विजेते पहिले भारतीय खेळाडू प्रकाश पदुकोण यांना मिळाला आहे.
बंगळुरू येथे महासंघाच्या झालेल्या कार्यकारिणीत जीवनगौरव पुरस्कार सुरू करण्याचा ठराव संमत करण्यात आला.
पदुकोण यांनी १९८०मध्ये ऑल इंग्लंड स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते. अशी कामगिरी करणारे ते पहिलेच भारतीय होते.
१९७८च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्यांना सुवर्णपदक मिळाले होते, तर १९८३मध्ये कोपनहेगन येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत त्यांनी कांस्यपदक मिळविले होते.
देशी पारंपरिक वाद्यांना जीएसटीमधून सूट
पुंगी, एकतारा, हार्मोनिअम, सरोद, सितार आणि तबला अशा हातांनी बनविलेल्या १३४ देशी पारंपरिक वाद्यांना वस्तू आणि सेवा कर परिषदेने अप्रत्यक्ष करातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे.
संगीताच्या देशी उपकरणांना करातून सूट दिल्यामुळे, त्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन, त्यांच्या वापराला उत्तेजन मिळेल.
वाद्ये, हस्तकला आणि खेळांच्या साहित्यावर कर लादला जाऊ नये, हा मुद्दा काही आठवड्यांपूर्वी समितीसमोर आला होता.
संगीतकार आणि या वस्तू विक्रेत्यांनी २८ टक्के कराबद्दल तक्रार करताना, या वस्तुंच्या गटातील काही विसंगती सरकारने दूर कराव्यात, असे म्हटले होते.
सर्जिकल स्ट्राईकचे अनुभव पुस्तकरूपात
पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या दहशतवादी कारवायांना सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने २८ सप्टेंबर व २९ सप्टेंबर २०१६ रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईकची कारवाई केली होती.
या सर्जिकल स्ट्राईकचे नेतृत्व करणारे मेजर माइक टँगो यांनी या कारवाईचा थरारक अनुभव एका पुस्तकाच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडला आहे.
‘इंडियाज मोस्ट फीयरलेस: ट्रू स्टोरीज ऑफ मॉडर्न मिलिटरी हीरोज’ असे या पुस्तकाचे नाव आहे.
मेजर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकव्याप्त काश्मीरमध्ये करण्यात आलेला हल्ला योजना आखल्यानुसार अत्यंत योग्य पद्धतीने व गतीने करण्यात आला.
भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईकसाठी उरी दहशतवादी हल्ल्यामुळे नुकसान सहन करणाऱ्या दोन युनिटमधून सैनिकांची निवड करण्याचा निर्णय घेतला होता.
भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक कारवाईत ३८ दहशतवादी तर पाकिस्तानचे २ सैनिक ठार झाले होते.
अभिजित कटकेला भारत केसरी किताब
कर्नाटकातील जमखंडी येथे पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या अभिजित कटके याने ‘भारत केसरी’ किताब पटकावला.
अभिजितने पाच लढती जिंकल्या. त्याने दिल्लीचा भीमसिंग, हरियानाचा अनिल कुमार, हवाई दलाचा सतीश फडतरे, उत्तर प्रदेशचा अमित कुमार यांना हरविले.
निर्णायक फेरीत त्याने ‘कर्नाटक केसरी’ शिवय्याला १०-२ असे हरविले. चांदीची गदा आणि ५१ हजार रुपये असे इनाम त्याला मिळाले.
अभिजित कटके शिवरामदादा तालमीत भरत मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा