चालू घडामोडी : २७ सप्टेंबर

भारतीय सैन्याची म्यानमार सीमेवर कारवाई

  • भारतीय सैन्याने म्यानमार सीमेवर केलेल्या कारवाईत एनएससीएन (के) या दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले.
  • यात अनेक दहशतवादी मारले गेल्याची शक्यता आहे. भारतीय लष्कराचे या कारवाईत कोणतेही नुकसान झालेले नाही.
  • भारत- म्यानमार सीमेवर भारतीय सैन्याचे पथक गस्त घालत होते. यादरम्यान दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याच्या पथकावर गोळीबार केला.
  • भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिले. भारताच्या कारवाईत नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड (खापलांग) या प्रतिबंधित संघटनेच्या दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त झाले.
 एनएससीएन (के) दहशतवादी संघटना 
  • एनएससीएन (के) ही २००१ सालापर्यंत प्रतिबंधित संघटना होती. एस.एस. खापलांग हा या संघटनेचा म्होरक्या असून खापलांग हा म्यानमारमधील नागा नेता आहे. या संघटनेचे बहुतांशी तळ हे म्यानमारमध्येच आहेत.
  • जून २०१५मध्ये मणिपूरमध्ये भारतीय सैन्याचे १८ जवान शहीद झाले होते. या हल्ल्यामागे एनएससीएन (के) या दहशतवादी संघटनेचा हात होता.
  • यानंतर भारतीय सैन्याने म्यानमार सीमेवर एनएससीएन (के) या संघटनेवर कारवाई केली होती. यात २० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.
  • जून २०१५नंतर संघटनेवर पुन्हा ५ वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती.

हुरुनकडून भारतातील श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर

  • ‘हुरुन इंडिया’ने जारी केलेल्या २०१७च्या श्रीमंतांच्या सहाव्या वार्षिक यादीनुसार, रिलायन्स उद्योग समूहाचे मुकेश अंबानी हे सलग सहाव्या वर्षी भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
  • रिलायन्सच्या समभागांनी जोरदार उसळी घेतल्यामुळे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत तब्बल ५८ टक्के वाढ झाली आहे.
  • त्यांची संपत्ती आता २.५७ लाख कोटी झाली असून, हुरुनच्या जागतिक श्रीमंतांच्या यादीत ते आता १५व्या स्थानी पोहोचले आहेत.
  • अंबानी यांच्यासोबत पतंजलीचे सीईओ आचार्य बालकृष्ण आणि डी-मार्टचे राधाकृष्ण दमानी यांनीदेखील या श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळविले आहे.
  • गेल्या वर्षी २५व्या स्थानी असलेले बालकृष्ण यंदा आठव्या स्थानी आले आहेत. त्यांची संपत्ती १७३ टक्क्यांनी वाढून ७० हजार कोटी रुपये झाली आहे. तर डी-मार्टच्या दमानी यांची संपत्ती सर्वाधिक ३२१ टक्क्यांनी वाढली आहे. 
  • या अहवालानुसार, गेल्यावर्षीच्या तुलनेत यादीतील अब्बाधीशांची श्रीमंती ११ टक्क्यांनी वाढली आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते ‘शीर टेस्टर’चे अनावरण

  • दुधातील भेसळ त्वरित ओळखणाऱ्या उपकरणाचे अनावरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. या उपकरणाचा वापर अतिशय सोपा असून त्यामुळे दुधातील भेसळ ओळखण्यास मदत होणार आहे.
  • ‘काऊन्सिल ऑफ सायन्टिफीक अॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च’ म्हणजेच ‘सीएसआयआर’ने या उपकरणाची निर्मिती केली आहे.
  • या उपकरणाला ‘शीर टेस्टर’ असे नाव देण्यात आले आहे. या उपकरणामुळे दुधातील युरिया, मीठ, डिटर्जंट, साबण, सोडा, बोरिक अॅसिड, हायड्रोजन पॅरॉक्साईड या घटकांची भेसळ ओळखता येते.
  • वापरकर्त्यांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेल्या या उपकरणाची किंमत ५ हजार रुपये आहे.
  • एक बटण दाबताच अवघ्या ६० सेकंदांमध्ये हे उपकरण दूध भेसळयुक्त आहे की नाही, याची पडताळणी करते.

बिनेश जोसेफ यांना अ‍ॅडॉल्फ मेसर पुरस्कार

  • जर्मनीत गोथे विद्यापीठात संशोधन करणारे मूळ भारतीय असलेले वैज्ञानिक बिनेश जोसेफ यांना ‘अ‍ॅडॉल्फ मेसर पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
  • रोगकारक जिवाणूंवरील संशोधनासाठी मेसर फाऊंडेशनतर्फे दिला जाणाऱ्या या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे स्वरूप १९ लाख रुपये आहे.
  • बिनेश यांचा जन्म केरळातील कोळिकोड जिल्ह्य़ातील मराथोमकारा या खेडय़ात झाला. शालेय व महाविद्यालयीन शिक्षणानंतर ते उच्चशिक्षणासाठी जर्मनीत गेले.
  • जैवरसायनशास्त्र, वर्णपंक्तीशास्त्र, जैवभौतिकशास्त्र हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. त्यांनी एकूण २० शोधनिबंध लिहिले आहेत. फ्रँकफर्टच्या गुटे विद्यापीठात जोसेफ कार्यरत आहेत.
  • जिवाणूंचे मानवी पेशीविरोधातील युद्धतंत्र समजून घेण्याची मूलभूत कामगिरी जोसेफ व त्यांचे सहकारी करीत आहेत.
  • त्यांच्या या संशोधनातून महाजिवाणूंवर रामबाण उपाय ठरणाऱ्या नवीन औषधांची निर्मिती होण्याची शक्यता आहे.
  • बिनेश जोसेफ यांनी जिवाणूंविरोधात पर्यायी उपाययोजनांवर केलेले संशोधन ही त्यांची जमेची बाजू आहे. 
  • ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो ते मेसर हे जर्मनीतील एक संशोधक व उद्योगपती होते. त्यांनी अ‍ॅसिटिलिन जनरेटर कंपनी स्थापन केली होती.
  • मेसर समूहाचे नाव जगात औद्योगिक कारणांसाठी लागणाऱ्या वायूंच्या निर्मितीत अग्रक्रमाने घेतले जाते.

प्रेरणादायी महिलांच्या यादीत मिताली राज

  • बीबीसीच्या जगातील प्रेरणादायी महिलांच्या यादीत भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजला स्थान मिळाले आहे.
  • क्रीडा, राजकारण, व्यापार यासारख्या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या महिलांचा या यादीत समावेश करण्यात येतो. यात भारताच्या मिताली राज या एकमेव महिला खेळाडूने जागा पटकावली आहे.
  • मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने आयसीसी महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र अंतिम फेरीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.
  • मितालीने आतापर्यंत १८६ वन-डे सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. यात ५१.५८ च्या सरासरीने मितालीने ६१९० धावा केल्या आहेत.
  • आपल्या कामगिरीतून इतर महिलांनी प्रेरणा घ्यावी असे काम करणाऱ्या महिलांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.

बीसीसीआयचे महाव्यवस्थापक श्रीधर यांचा राजीनामा

  • गेले काही दिवस अधिकारकक्षा ओलांडून काम करणाऱ्या बीसीसीआयचे महाव्यवस्थापक एम व्ही श्रीधर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
  • त्यामुळे आता पुढील काही काळासाठी बीसीसीआयचे विशेष कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी श्रीधर यांचे काम पाहणार आहेत.
  • हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असताना श्रीधर हे आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी चर्चेत आले होते.
  • बीसीसीआयच्या महाव्यवस्थापकपदी नियुक्ती झाल्यानंतर श्रीधर यांना हैदराबादवरुन मुंबईत येण्याची विनंती बीसीसीआयने केली होती.
  • मात्र श्रीधर आपलं कामकाज मुंबईत येऊन जाऊन करायचे. या कार्यपद्धतीमुळे बीसीसीआयचे अनेक पदाधिकारी नाराज होते.
  • त्याआधी दुलीप करंडकाची स्पर्धा रद्द करण्यावरुनही श्रीधर यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. त्यात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत प्रशासकीय समितीला विश्वासात न घेता श्रीधर यांनी सोहम देसाई या ट्रेनरची नेमणुक केली.
  • या सर्व प्रकरणावरुन प्रशासकीय समिती नाराज होती, त्याचे पर्यावसन अखेर श्रीधर यांच्या राजीनाम्यात झाले आहे.

मधू कोडा यांच्यावर निवडणूक लढवण्यास बंदी

  • निवडणुकीतील खर्चाचा हिशेब न दिल्यामुळे निवडणूक आयोगाने झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांच्यावर ३ वर्षांपर्यंत निवडणूक लढवण्यास बंदी घातली आहे.
  • मधू कोडा यांनी झारखंडचे पाचवे मुख्यमंत्री म्हणून २००६ला पद सांभाळले होते. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात ते अपक्ष होते.
  • कोडा यांनी स्वतःच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ऑल झारखंड स्टुडंट युनियनच्या स्वरूपातून केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीही कोडा यांची जवळीक होती.
  • बाबूलाल मरांडा यांच्या नेतृत्वात झालेल्या सरकारमध्ये तसेच अर्जुन मुंडा यांच्या मंत्रिमंडळात ते पंचायत राज मंत्री होते.
  • २००५च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून तिकीट न मिळाल्यानं त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती व ते जिंकलेसुद्धा होते.
  • कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने भाजपाच्या नेतृत्वात अर्जुन मुंडा सरकारला त्यांनी समर्थन दिले होते.
  • सप्टेंबर २००६मध्ये कोडा आणि अन्य ३ अपक्ष आमदारांनी मुंडा सरकारमधून समर्थन मागे घेतल्यामुळे अल्पमतात आलेले भाजपा सरकार कोसळले. 
  • त्यानंतर काँग्रेसशी आघाडी करून त्यांनी सरकार स्थापन केले आणि त्यावेळी काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्रिपदही दिले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा