चालू घडामोडी : १० डिसेंबर

हेलीकॉप्टर घोटाळ्याप्रकरणी एसपी त्यागी यांना अटक

 • ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने माजी हवाईदल प्रमुख एसपी त्यागी यांना अटक केली आहे.
 • भारत इटलीच्या फिनमेकॅनिका या कंपनीची उपकंपनी असलेल्या ऑगस्टा वेस्टलँड या कंपनीकडून हेलिकॉप्टर खरेदी करणार होता.
 • या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप असून सीबीआयने त्यागी यांच्यासह दिल्लीतील वकील गौतम खैतान आणि संजीव त्यागी यांनाही अटक केली.
 • करार पूर्णत्वास जाण्यासाठी आर्थिक मोबादला घे णाऱ्या दलालाने केलेल्या आरोपांच्या आधारावर ही अटक करण्यात आली आहे.
 ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा 
 • ऑगस्टा वेस्टलँडकडून भारताला अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी ३६०० कोटींचे  ‘एडब्ल्यू १०१’ जातीची १२ हॅलिकॉप्टर्स पुरवण्यात येणार होती.
 • सुरुवातीला ६००० मीटर उंचीवर काम करू शकतील अशी हेलिकॉप्टर हवी असल्याची अट घालण्यात आली होती.
 • ही अट संरक्षण मंत्रालयाने २००६साली शिथिल करून ४५०० मीटरवर आणली. या अटी बदलल्याने इटलीच्या ऑगस्टा वेस्टलँड कंपनीला फायदा झाला.
 • अटी बदलण्यात हवाई दलाचे माजी प्रमुख एअर चीफ मार्शल एसपी त्यागी यांचा हात असल्याचा संशय आहे. याप्रकरणी त्यांची सीबीआयने चौकशीही केली होती.
 • एसपी त्यागी आणि त्यांच्या चुलतबंधुंनी २००४-०५च्या सुमारास मध्यस्थामार्फत लाच स्वीकारल्याचे सीबीआयच्या प्राथमिक तपासातच स्पष्ट झाले होते.
 • करारातील अटींचे उल्लंघन आणि लाच दिल्याचा आरोप झाल्यामुळे १ जानेवारी २०१४ रोजी हा करार रद्द करण्यात आला.
 • इटलीतील न्यायालयानेही ऑगस्टा वेस्टलँड कंपनीने भारतीय अधिकाऱ्यांना कंत्राट मिळवण्यासाठी कशाप्रकारे दलाली याचा उल्लेख केला होता.
 • ऑगस्टा वेस्टलँड कंपनीस फायदा दिला जावा, यासाठी एसपी त्यागी यांना काही निधी दिल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते.
 • त्यामुळे त्यागी, त्यांचे १३ नातेवाईक आणि युरोपातील मध्यस्थाविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला होता.

विजय चौधरी सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी

 • जळगावचा विजय चौधरी याने पुण्याच्या अभिजित कटकेला पराभूत करत सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला.
 • वारजे येथील दिवंगत आमदार रमेश वांजळे क्रीडानगरीत ही ६०वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली.
 • किताबाची निर्णायक लढत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते लावण्यात आली.
 • विजय हा मातीवरचा मल्ल आहे. पण त्याने मॅटवरही उल्लेखनीय कामगिरी करत विजय मिळवला.
 • विजयने यापूर्वी २०१४, २०१५ मध्ये जेतेपद पटकावले होते. नरसिंग यादव नंतर महाराष्ट्र केसरीची गदा सलग तीन वेळा मिळवणारा विजय दुसरा मल्ल ठरला.
 • कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारी मानाची चांदीची गदा विजयला देण्यात आली.

‘वरदाह’चे चक्रीवादळात रुपांतर

 • बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेले ‘वरदाह’ वादळ तीव्र चक्रीवादळात बदलले आहे.
 • सध्या हे चक्रीवादळ मच्छलीपट्टणमपासून ८३० किलोमीटरवर आणि नेल्लोरच्या पूर्वेला ८८० किलोमीटरवर आहे. 
 • वरदाह अतिशय संथगतीने प्रवास करत आहे. सध्याची गती ताशी सात किलोमीटर आहे.
 • येत्या चोवीस तासात वरदाह अधिक तीव्र स्वरूप धारण करेल आणि त्यानंतर वादळ आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवरून पुढे सरकेल, असा अंदाज आहे. 
 • चक्रीवादळाची तीव्रता वाढण्यासारखे अनुकूल वातावरण बंगालच्या उपसागरात तयार झाले आहे. ११ डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत वरदाह सर्वोच्च तीव्रता गाठेल.
 • आंध्र प्रदेशातील नेल्लोर ते मच्छलीपट्टणम या किनारपट्टीच्या पट्टीच्या प्रदेशात १२ डिसेंबरला संध्याकाळच्या सुमारास वादळ धडकेल, असे हवामान खात्याचा अंदाज आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा