चालू घडामोडी : २६ डिसेंबर

अग्नी-५ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी

  • भारताच्या सर्वांत लांब पल्ल्याच्या आणि अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या अग्नी ५ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली.
  • ओडिशा किनाऱ्यालगत व्हीलर बेटावरून डिफेन्स रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनकडून (डीआरडीओ) या तीनस्तरीय भरीव प्रॉपेलंट क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करण्यात आले. 
  • ही लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची ही चौथी विकासात्मक चाचणी, तर दारुगोळ्यातील धातूचे सिलिंडर वापरून घेतलेली ही दुसरी चाचणी आहे.
 अग्नी-५ 
  • १७ मीटर लांब जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या अग्नी ५ या स्वप्नातीत क्षेपणास्त्राचा पल्ला ५००० किलोमीटर एवढा आहे. संपूर्ण क्षमतेनुसार मारा करण्यासाठी अग्नी-५ चे ३ टप्पे आहेत. 
  • हे क्षेपणास्त्र वाहतुकीसाठी सोपे असून, अपेक्षित लक्ष्य गाठण्यासाठी कुठूनही डागता येईल अशा पद्धतीने विकसित केले आहे.
  • आशियातील बहुतांश प्रदेश आणि युरोपातील लक्ष्य भेदण्याची क्षमता त्यामध्ये आहे. उत्तर चीनमध्येही हे क्षेपणास्त्र पोचू शकते. 
  • या क्षेपणास्त्राच्या याआधी एप्रिल २०१२, सप्टेंबर २०१३ व जानेवारी २०१५मध्ये चाचण्या करण्यात आल्या होत्या. मात्र, त्या पूर्णपणे यशस्वी झाल्या नव्हत्या.
  • स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडला सुपूर्द करण्याआधीची अग्नी-५ ची ही शेवटची चाचणी होती.
  • स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडची (एसएफसी) स्थापना २००३मध्ये करण्यात आली आहे. देशाच्या अण्वस्त्रांच्या नियंत्रणाचे काम स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडकडे आहे.
  • सध्या फक्त अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, ब्रिटन या देशांकडे ५००० किमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत. ५००० किमी पल्ल्याचे क्षेपणास्त्र असलेला भारत जगातील सहावा देश आहे.

ब्रिटिश पॉप गायक मायकल जॉर्ज यांचे निधन

    George Michael
  • ब्रिटिश पॉप गायक मायकल जॉर्ज यांचे २५ डिसेंबर रोजी वयाच्या ५३व्या वर्षी निधन झाले.
  • जॉर्जिओस किरियाकोस पनाईओटोऊ असे त्यांचे पूर्ण नाव होते. जॉर्जने १९८०मध्ये मित्र ऍण्ड्यू रिजेले याच्या साथीने वॅम हा बँड सुरु केला.
  • क्लब ट्रॉपिकॅना, लास्ट ख्रिसमस, केअरलेस विस्पर आणि फेथ या अल्बम्समुळे मायकल जॉर्ज अनेकांच्या लक्षात आहेत.
  • यशस्वी गायक असण्याबरोबर ते गीतकारही होते. वेक मी अप बीफोर यू गो-गो, यंग गन्स आणि फ्रीडम ही त्यांची गाणी प्रचंड गाजली.
  • ८०-९०च्या दशकात ते प्रचंड लोकप्रिय होते. चार दशकांच्या करीयरमध्ये जगभरात त्यांच्या १०० कोटी पेक्षा जास्त अल्बमची विक्री झाली.
  • सहजसोपी चाल, जनसामान्यांना उत्कंटपणे भिडणारा आवाज, त्यामध्ये खोलवर असलेले दु:ख यामुळे जॉर्ज मायकल लोकप्रिय होते.
  • चीनमध्ये निर्बंध असताना जॉर्ज चीनमध्ये जाऊन गायले होते. त्यावेळी त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली होती.
  • जॉर्ज मायकल यांची जीवनशैलीदेखील थोडी बेधुंद होती. त्यांना अंमली पदार्थ सेवन करण्याची सवय लागली होती. त्यामुळे त्यांना काही वेळा तुरुंगवासदेखील भोगावा लागला होता.
  • जॉर्जला दोनवेळा ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता. तसेच जॉर्जच्या जीवनावर आधारित 'अ डिफरेंट स्टोरी' हा चित्रपट २००५मध्ये प्रदर्शित झाला होता.

मिथून चक्रवर्ती यांचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा

  • तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर राज्यसभेत दाखल झालेले अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी २६ डिसेंबर रोजी खासदारकीचा राजीनामा दिला आहे.
  • प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असून त्यांच्या खासदारकीचा कार्यकाळ संपण्यासाठी आणखी दीड वर्षांचा कालावधी बाकी होता.
  • तृणमूल काँग्रेसने फेब्रुवारी २०१४मध्ये मिथून चक्रवर्ती यांना राज्यसभेत खासदार म्हणून पाठवले होते.
  • मात्र पश्चिम बंगालमधील बहुचर्चित शारदा घोटाळ्यात मिथून चक्रवर्ती यांचे नाव आल्याने ते अडचणीत आले होते. याप्रकरणी मिथून चक्रवर्ती यांना सक्तवसुली संचालनालयाने समन्सही बजावले होते. 
  • मिथुन चक्रवर्ती यांची संसदेतील कामगिरी फारशी चमकदार नव्हती. राज्यसभेत मिथुन चक्रवर्ती यांच्या हजेरीचे प्रमाण फक्त १० टक्केच होते.
  • राज्यसभेतील चर्चेत त्यांनी कधीच सहभाग घेतला नव्हता. तसेच त्यांनी राज्यसभेत कधी प्रश्नही उपस्थित केला नव्हता.

शाहरुख खानला डॉक्टरेट पदवी

  • हैदराबादेमधील मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठाकडून अभिनेता शाहरुख खानला डॉक्टरेट पदवीने गौरवण्यात आले आहे.
  • या विद्यापीठाच्या ६व्या दीक्षान्त समारंभात राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते शाहरुखला हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.
  • ऊर्दू भाषा आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी दिलेल्या योगदानाखासाठी राजीव सराफ यांनाही शाहरुख खानसोबत डॉक्टरेटने सन्मानित करण्यात आले.

२५५ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द

  • निवडणूक आयोगाने देशातील २५५ राजकीय पक्षांना यादीतून हटविले असून, यात महाराष्ट्रातील २५ राजकीय पक्षांचा समावेश आहे.
  • रद्द करण्यात आलेल्या या राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेली आहे; पण २००५नंतर या पक्षांनी एकही निवडणूक लढविलेली नाही. देणग्या आणि करातून सूट याचा लाभ या पक्षांकडून घेण्यात येत होता. 
  • या राजकीय पक्षांनी निवडणूकच लढविली नाही आणि याच कारणास्तव त्यांची नोंदणी किंवा मान्यता रद्द करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही.
  • त्यामुळे केवळ कागदोपत्री असणाऱ्या या पक्षांविरुद्ध कार्यवाहीसाठी आयोगाने केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाला एक पत्र देऊन या पक्षांना यादीतून हटविण्याबाबत सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा