ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने माजी हवाईदल प्रमुख एसपी त्यागी यांना अटक केली आहे.
भारत इटलीच्या फिनमेकॅनिका या कंपनीची उपकंपनी असलेल्या ऑगस्टा वेस्टलँड या कंपनीकडून हेलिकॉप्टर खरेदी करणार होता.
या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप असून सीबीआयने त्यागी यांच्यासह दिल्लीतील वकील गौतम खैतान आणि संजीव त्यागी यांनाही अटक केली.
करार पूर्णत्वास जाण्यासाठी आर्थिक मोबादला घे णाऱ्या दलालाने केलेल्या आरोपांच्या आधारावर ही अटक करण्यात आली आहे.
विजय चौधरी सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी
जळगावचा विजय चौधरी याने पुण्याच्या अभिजित कटकेला पराभूत करत सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला.
वारजे येथील दिवंगत आमदार रमेश वांजळे क्रीडानगरीत ही ६०वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली.
किताबाची निर्णायक लढत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते लावण्यात आली.
विजय हा मातीवरचा मल्ल आहे. पण त्याने मॅटवरही उल्लेखनीय कामगिरी करत विजय मिळवला.
विजयने यापूर्वी २०१४, २०१५ मध्ये जेतेपद पटकावले होते. नरसिंग यादव नंतर महाराष्ट्र केसरीची गदा सलग तीन वेळा मिळवणारा विजय दुसरा मल्ल ठरला.
कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारी मानाची चांदीची गदा विजयला देण्यात आली.
‘वरदाह’चे चक्रीवादळात रुपांतर
बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेले ‘वरदाह’ वादळ तीव्र चक्रीवादळात बदलले आहे.
सध्या हे चक्रीवादळ मच्छलीपट्टणमपासून ८३० किलोमीटरवर आणि नेल्लोरच्या पूर्वेला ८८० किलोमीटरवर आहे.
वरदाह अतिशय संथगतीने प्रवास करत आहे. सध्याची गती ताशी सात किलोमीटर आहे.
येत्या चोवीस तासात वरदाह अधिक तीव्र स्वरूप धारण करेल आणि त्यानंतर वादळ आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवरून पुढे सरकेल, असा अंदाज आहे.
चक्रीवादळाची तीव्रता वाढण्यासारखे अनुकूल वातावरण बंगालच्या उपसागरात तयार झाले आहे. ११ डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत वरदाह सर्वोच्च तीव्रता गाठेल.
आंध्र प्रदेशातील नेल्लोर ते मच्छलीपट्टणम या किनारपट्टीच्या पट्टीच्या प्रदेशात १२ डिसेंबरला संध्याकाळच्या सुमारास वादळ धडकेल, असे हवामान खात्याचा अंदाज आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा