पंजाबमधील अमृतसरमध्ये हार्ट ऑफ एशिया परिषदेला ३ डिसेंबर रोजी सुरूवात झाली आहे.
भारताचे विदेश सचिव एस. जयशंकर आणि अफगाणिस्तानचे उपविदेश मंत्री हिकम खलील करझाई यांनी बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले.
युद्धामुळे जर्जर झालेल्या अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करून विकासाला हातभार लावण्यासाठी शक्तीशाली देश या संमेलनात सहभागी होत आहे.
या परिषदेत प्रामुख्याने दहशतवाद, जहालमतवादाविरोधातील उपाय, शिक्षणाच्या क्षेत्रातील सहकार्य वाढवणे यावर चर्चा केली जाणार आहे.
या परिषदेत भारत, पाकिस्तान, चीन, इराण, रशिया, सौदी अरेबिया, अझरबैजानसह १४ देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
त्याचबरोबर १७ सहयोगी देशांचे प्रतिनिधीही सामील होतील. युरोपीय संघासह ४० देश संमेलनात सहभागी होत आहेत.
सीमेवरील दहशतवादी कारवाया या अफगाणिस्तानसह भारतासाठीदेखील सर्वात मोठी समस्या ठरत आहे.
या कारवायांसाठी पाकिस्तान जबाबदार आहे. त्यामुळे पाकिस्तानविरोधात दहशतवादाच्या मुद्यावर भारत-अफगाणिस्तानचे एकमत झाले आहे.
हार्ट ऑफ एशिया परिषदेत पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार सरताज अजीज पाकिस्तानचे प्रतिनिधीत्व करत आहेत.
जानेवारीमध्ये मुंबईत उद्योगबोध २०१७ परिषद
जगभरातील महाराष्ट्रीय उद्योजकांचा उपस्थिती अपेक्षित असलेली ‘उद्योगबोध २०१७’ ही जागतिक स्तरावरील औद्योगिक परिषद मुंबईत १३ व १४ जानेवारी २०१७ रोजी होत आहे.
१,१०० उद्योजक या परिषदेला हजेरी लावणार असून व्यावसायिक भागीदारी व देवाणघेवाणीसाठी सर्वोत्तम व्यासपीठ या निमित्ताने उपलब्ध होणार आहे.
राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय उद्योग समूहांचे प्रतिनिधी परिषदेला येणार असून महिलांसाठी विशेष संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
भांडवल, मार्केटिंग, लघू व मध्यम उद्योग, सागरी व्यवसाय संधी, यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन या परिषदेत करण्यात आले आहे.
बिग मॅक बर्गरचे निर्माते जिम डेलीगट्टी यांचे निधन
मॅकडोनाल्डच्या लोकप्रिय ठरलेल्या ‘बिग मॅक’ बर्गरचे निर्माते जिम डेलीगट्टी यांचे २८ नोव्हेंबर रोजी निधन झाले.
त्यांनी तयार केलेला बिग मॅक बर्गर एक वर्षांत मॅकडोनाल्डच्या सर्व दुकानांतील मेनूत झळकला.
आज एकटय़ा अमेरिकेत वर्षांला ५५० दशलक्ष बिग मॅक बर्गर विकले जातात. जगातील शंभर देशांत हा बर्गर लोकप्रिय ठरला आहे.
डेलीगट्टी यांचा जन्म युनियन टाउन येथे १९१८मध्ये झाला. त्यांनी कँडी मेकरपासून अनेक कामे केली.
कॅलिफोर्नियातील अनेक रेस्टॉरंटमध्ये त्यांनी काम केले. १९५३मध्ये डेलीगट्टी व त्यांचे मित्र जॉन स्वीनी यांनी ‘डेलनीज’ नावाचे रेस्टॉरंट सुरू केले होते.
नंतर त्यांनी पीटसबर्ग येथे मॅकडोनाल्डची शाखा सुरू केली. २५ वर्षांत तशी ४७ दुकाने त्यांनी सुरू केली.
त्यांनीच तयार केलेले हॉट केक व सॉसेज मील हे आणखी दोन पदार्थ मॅकडोनल्डच्या राष्ट्रीय मेन्यूत समाविष्ट झाले होते.
त्यांचा बिग मॅक बर्गर गाणी व कथांतूनही अजरामर झाला. नंतरच्या काळात उत्तर हटिंग्टन येथे त्यांनी बिग मॅक म्यूझियम सुरू केले.
द इकॉनॉमिस्टने बिग मॅकच्या किमतीवरून चलनाच्या चढउताराचा अंदाज देणारा बिग मॅक इंडेक्सही तयार केला होता.
जिओच्या जाहिरातीत परवानगीशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरल्याप्रकरणी रिलायन्सला ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
सरकारची दुरसंचार कंपनी असताना खाजगी दुरसंचार कंपनीच्या जाहिरातीत पंतप्रधानांचा फोटो छापून आल्याने विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. त्याची दखल घेत रिलायन्सला हा दंड ठोठावण्यात येणार आहे.
राष्ट्रीय प्रतिके आणि नावांचा गैरवापर टाळण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यातंर्गत ही कारवाई करण्यात येणार आहे.
ग्राहक मंच. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयामार्फत राष्ट्रीय प्रतिके आणि नावांच्या गैरवापरावर देखरेख केली जाते.
सरकारच्या परवनागीशिवाय वापरण्यात न येणाऱ्या नाव आणि बोधचिन्हांमध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, केंद्र किंवा राज्य सरकार, महात्मा गांधी, इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरु, युएनओ, अशोकचक्र यांचा समावेश आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा