अश्विनला क्रिकेटर ऑफ द इअर पुरस्कार
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडूच्या (आयसीसी) ‘क्रिकेटर ऑफ द इअर’ पुरस्कारासाठी भारताचा अष्टपैलू खेळाडू रवीचंद्रन अश्विनची निवड झाली आहे.
- यासाठी आश्विनला सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफीने गौरविण्यात येईल. ही ट्रॉफी जिंकणारा आश्विन भारतात तिसरा तसेच जगात १२वा खेळाडू आहे.
- याआधी २००४ मध्ये राहुल द्रविड आणि २०१० मध्ये सचिन तेंडुलकर यांना हा पुरस्कार मिळाला होता.
- याशिवाय अश्विनला ‘टेस्ट क्रिकेटर ऑफ द इअर’चाही पुरस्कार मिळाला आहे. राहुल द्रविड (२००४) आणि गौतम गंभीर (२००९) यांच्यानंतर हा पुरस्कार मिळवणारा अश्विन भारताचा तिसरा क्रिकेटपटू आहे.
- सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आणि सर्वोत्कृष्ट कसोटीपटू हे दोन्ही पुरस्कार एकाच वर्षी मिळवणारा अश्विन हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी द्रविडने २००४मध्ये हा पराक्रम केला होता.
- याशिवाय आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी संघामध्ये स्थान मिळवणारा अश्विन हा एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे.
- आयसीसीच्या कसोटी संघाचे नेतृत्त्व इंग्लंडच्या अॅलिस्टर कुक याला तर एकदिवसीय संघाचे नेतृत्त्व विराट कोहलीला देण्यात आले आहे.
- आयसीसीच्या एकदिवसीय संघात रवींद्र जडेजा आणि रोहित शर्मा यांनाही स्थान मिळाले आहे.
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात १४ सप्टेंबर २०१५ ते २० सप्टेंबर २०१६ या वर्षभरात केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या आधारावर पुरस्कार दिले जातात.
पुरस्कार | खेळाडू |
---|---|
सर्वोत्कृष्ट एकदिवसीय खेळाडू | क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका) |
टी-२० परफॉर्मर ऑफ द इयर | कार्लोस ब्रेथवेट (वेस्ट इंडीज) |
स्पिरीट ऑफ क्रिकेट | मिस्बा उल हक (पाकिस्तान) |
युवा प्रतिभावान खेळाडू | मुस्तफिझूर रेहमान (बांगलादेश) |
आयसीसीच्या सहयोगी देशांतील सर्वोत्कृष्ट खेळाडू | मोहम्मद शेहजाद (अफगाणिस्तान) |
सर्वोत्कृष्ट एकदिवसीय खेळाडू (महिला) | सुझी बेट्स (न्यूझीलंड) |
सर्वोत्कृष्ट टी-२० खेळाडू (महिला) | सुझी बेट्स (न्यूझीलंड) |
सर्वोत्कृष्ट पंच | मरेइस इरॅस्मस |
दिल्लीते नायब राज्यपाल नजीब जंग यांचा राजीनामा
- दिल्लीते नायब राज्यपाल नजीब जंग यांनी गृहमंत्रालयाकडे राजीनामा दिला आहे. राजीनाम्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
- जंग यांचा कार्यकाळ संपण्यासाठी दीड वर्षांचा कालावधी बाकी असताना त्यांनी राजीनामा दिला आहे.
- आप सरकार दिल्लीत सत्तेत आल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी यांच्याशी जंग यांचे सातत्याने खटके उडाले.
- जंग हे ‘केंद्र सरकारचे हस्तक’ असून दिल्ली सरकारच्या कामात ते अडथळे आणतात अशी टीका केजरीवाल वारंवार करायचे.
- ६५ वर्षीय नजीब जंग हे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. तसेच, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचे ते उपकुलगुरुही होते.
- २०१३च्या जुलैमध्ये त्यांनी दिल्लीचे नायब राज्यपालपद स्वीकारले होते. जंग हे दिल्लीचे २०वे नायब राज्यपाल आहेत.
बीएफआयला आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनचे पूर्ण सदस्यत्व
- सप्टेंबरमध्ये कार्यान्वित झालेल्या भारतीय बॉक्सिंग महासंघास (बीएफआय) आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनचे पूर्ण सदस्यत्व देण्यात आले आहे.
- मॉन्ट्र्यू, स्वीत्झर्लंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनच्या ७०व्या वार्षिक बैठकीत बीएफआयला पूर्ण सदस्यत्व दिले आहे.
- पण भारतीय ऑलिंपिक संघटनेने अजय सिंग अध्यक्ष असलेल्या या महासंघास अद्याप मान्यता दिलेली नाही.
- चार वर्षांपूर्वी म्हणजे २०१२मध्ये निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याने भारतीय हौशी बॉक्सिंग महासंघ बरखास्त करण्यात आला होता.
- त्यानंतर दोन वर्षांतच बॉक्सिंग इंडियाची स्थापना झाली; पण दीड वर्षात नव्या कार्यकारिणीविरुद्ध अविश्वास ठराव संमत झाला.
- सप्टेंबर २०१६मध्ये भारतीय बॉक्सिंग महासंघाची स्थापना झाली. बीएफआयला मिळालेल्या सदस्यत्वामुळे भारतीय बॉक्सरच्या आंतरराष्ट्रीय सहभागाचा मार्ग मोकळा झाला आहे.
गांधीवादी कार्यकर्ते अनुपम मिश्र यांचे निधन
- नर्मदा प्रश्नावर पहिल्यांदा आवाज उठविणारे पर्यावरणवादी व गांधीवादी कार्यकर्ते अनुपम मिश्र यांचे १९ डिसेंबर रोजी निधन झाले.
- त्यांचे व्यक्तिमत्त्व गांधीवाद्याला साजेसेच साधे, सरळ, विनम्र, हसतमुख होते. त्यांचे नुकतेच निधन झाले.
- ‘गांधी मार्ग’ या नियतकालिकाचे ते संपादक होते. त्यांच्याच प्रयत्नातून ‘सेंटर फॉर सायन्स अॅण्ड एनव्हायर्नमेंट’ ही संस्था स्थापन झाली.
- पर्यावरणातील विचारवंतही म्हणून त्यांचे नाव घेतले जात होते. ‘राजस्थान की रजत बूँदे’ व ‘आज भी खरे है तालाब’ ही पुस्तके त्यांनी लिहिली.
- त्यांनी पर्यावरणाचा बारकाईने अभ्यास केला, अनेक योजनांतील दोष दाखवून दिले. उत्तराखंड व राजस्थानात बंद जलस्रोतांचे पुनरुज्जीवन त्यांनी केले होते.
- त्यांचा जन्म महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण दिल्ली विद्यापीठातून झाले. दिल्लीत त्यांनी ‘गांधी शांती प्रतिष्ठान’ची स्थापना केली.
- त्यांच्या ‘आज भी खरे हैं तालाब’ या पुस्तकाला २०११मध्ये जमनालाल बजाज पुरस्कार मिळाला होता. मध्यप्रदेश सरकारने त्यांना चंद्रशेखर आजाद पुरस्कार देऊन सन्मानित केले.
गिरिजा वैद्यनाथन तामिळनाडूच्या मुख्य सचिव
- प्राप्तिकर विभागाच्या धाडींमुळे वादात सापडलेले पी. रामा मोहन राव यांच्या जागी तामिळनाडूच्या मुख्य सचिव म्हणून डॉ. गिरिजा वैद्यनाथन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- मुख्य सचिवपदासोबत गिरिजा वैद्यनाथन दक्षता आयुक्त व प्रशासकीय सुधारणा आयुक्तपदाचाही अतिरिक्त पदभार सांभाळतील.
- गिरिजा वैद्यनाथन या १९८२च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे १९९० ते १९९३ या काळात गव्हर्नर असलेले एस. वेंकटीरमणन यांच्या त्या कन्या आहेत.
टाटा स्टीलच्या संचालकपदावरुन वाडियांना हटविले
- टाटा स्टीलच्या स्वतंत्र संचालकपदावरुन नसली वाडिया यांना काढून टाकण्यात आले आहे.
- विशेष सर्वसाधारण बैठकीत ९०.८ टक्के समभागधारकांनी त्यांना काढून टाकण्याच्या प्रस्तावाला अनुमोदन दिले.
- यानंतर त्यांनी आपल्या समभागधारकांना एक विस्तृत पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्यावर झालेल्या आरोपांना उत्तर दिले आहे.
- नसली वाडिया आणि सायरस मिस्त्री यांनी दोघांनी मिळून संचालक मंडळाला स्वतःच्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न केला होता असा आरोप रतन टाटांनी केला होता.
- तर मागील आठवड्यात वाडिया यांनी टाटा सन्सचे पदाधिकारी आणि रतन टाटा यांच्यावर ३,००० कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा खटला टाकला होता.
द. अफ्रिकेच्या पीटरसनवर दोन वर्षांची बंदी
- द. अफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू अल्विरो पीटरसन याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
- भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. ही बंदी १२ नोव्हेंबरपासून लागू राहील.
- दक्षिण अफ्रिकेसाठी ३६ कसोटी सामने खेळलेला पीटरसन भ्रष्टाचाराच्या आरोपात बंदीची शिक्षा भोगणारा सहावा खेळाडू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा