चालू घडामोडी : १५ डिसेंबर
सर्वाधिक शक्तीशाली व्यक्तींच्या यादीत मोदी नवव्या स्थानी
- फोर्ब्ज मासिकाने प्रसिद्ध केलल्या जगातील सर्वाधिक शक्तीशाली ‘टॉप १०’ व्यक्तींच्या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्थान मिळाले आहे.
- फोर्ब्सकडून दरवर्षी अशाप्रकारे जागतिक घडामोडींवर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींची यादी तयार केली जाते.
- या यादीमध्ये जगातील १०० कोटी लोकांमधून एका व्यक्तीची निवड करण्यात आली असून अशा ७४ सर्वाधिक शक्तीशाली व्यक्तींचा यात समावेश आहे.
- या यादीत नरेंद्र मोदी नवव्या क्रमांकावर आहेत. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी सलग चौथ्या वर्षी यादीतील पहिले स्थान कायम ठेवले आहे.
- अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्या क्रमांकावर तर फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग दहाव्या क्रमांकावर आहेत.
- भ्रष्टाचार कमी करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी अचानकपणे घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाची दखल या यादीमध्ये घेण्यात आलेली आहे.
- या यादीत रोमन कॅथलिक चर्चचे पोप फ्रान्सिस, बिल गेटस्, गुगलचे संस्थापक आणि ‘अल्फाबेट’चे अध्यक्ष लॅरी पेज यांचाही समावेश आहे.
- अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा या यादीत ४८व्या स्थानावर फेकले गेले आहेत.
एलआयसी अध्यक्षपदी व्ही. के. शर्मा
- भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) अध्यक्ष म्हणून व्ही. के. शर्मा यांची सरकारने निवड केली.
- शर्मा यांची निवड पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे. शर्मा हे सध्या एलआयसीचे प्रभारी अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
- १९८१मध्ये शर्मा एलआयसीमध्ये डायरेक्ट रिक्रुट ऑफिसर या पदावर रुजू झाले. एलआयसीमध्ये त्यांनी एलआयसी हाउसिंग फायनान्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
ए. आर. रहमान यांना ऑस्करसाठी नामांकन
- ए. आर. रहमान यांना पेले : द बर्थ ऑफ अ लिजंड चित्रपटामध्ये दिलेल्या संगीतासाठी ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे.
- आता यंदाच्या ८९व्या अॅकॅडमी पुरस्कारांच्या ओरिजनल स्कोर गटात रहमान यांना नामांकन देण्यात आले आहे.
- हा चित्रपट महान फुटबॉलपटू पेले यांच्या जीवनावर आधारित असून या चित्रपटातील रहमान यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘गिंगा’ या गाण्याला ओरिजनल स्कोर श्रेणीत नामांकन मिळाले आहे.
- ऑस्कर पुरस्कारांसाठी नामांकनाची अंतिम यादी २४ जानेवारी २०१७ रोजी प्रसिद्ध होणार आहे. तसेच पुरस्कारांचे वितरण २६ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
- २००९साली स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटासाठी रहमान यांनी जागतिक चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार मिळविला आहे.
- रहमान यांना चित्रपटाचे गाणे ‘जय हो’साठी बेस्ट ओरिजनल स्कोर आणि बेस्ट ओरिजनल साँग असे दोन पुरस्कार प्राप्त झाले होते.
आयसीसीच्या महिला संघात स्मृती मंधानाचा समावेश
- पहिल्यांदाच जाहीर झालेल्या आयसीसीच्या ‘द वूमन्स टीम ऑफ द इयर’मध्ये भारतीय फलंदाज स्मृती मंधानाचा समावेश करण्यात आला आहे.
- गेल्या वर्षभरात सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंचा समावेश या यादीत केला जातो. स्मृतीने २३ सामन्यांमध्ये ३० च्या सरासरीने ७०१ धावा केल्या आहेत.
- सप्टेंबर २०१५ ते सप्टेंबर २०१६ या काळात झालेल्या खेळाच्या आधारावर ही निवड करण्यात आली आहे.
- आयसीसीने प्रथमच ‘द वूमन्स टीम ऑफ द इयर’ जाहीर केली आहे. या संघाची कर्णधार वेस्टइंडिजची स्टीफनी टेलर ही असेल.
- सुझी बेट्सची २०१६साठी आयसीसी वूमन्स ओडीआय आणि टी-२० प्लेयर ऑफ द इअर म्हणून निवड करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा