चालू घडामोडी : २९ डिसेंबर

शशिकला यांच्याकडे अण्णाद्रमुक पक्षाची धुरा

  • तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निकटवर्तीय व्ही.के. शशिकला (चिनम्मा) यांची सर्वसंमतीने ऑल इंडिया अण्णाद्रमुक पक्षाच्या (एआयडीएमके) सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.
  • अण्णाद्रमुक पक्षातील पदांच्या रचनेनुसार सरचिटणीसपदी असलेली व्यक्ती पक्षाची प्रमुख असते. गेली तीस वर्षे हे पद जयललिता यांच्याकडे होते.
  • लोकसभेचे उपसभापती एम. थंबीदुराई, ज्येष्ठ नेते पनरुती एस. रामचंद्रन, राज्याचे मंत्री, पक्षाचे आमदार आणि खासदार या बैठकीला उपस्थित होते.
  • पक्षामध्ये शशिकला यांच्या नेतृत्वाला कोणाचेही अंतर्गत आव्हान नाही. पक्षाचे जिल्हा सचिव आणि विविध विभागांच्या अध्यक्षांनी यापूर्वीच शशिकला यांच्या नेतृत्वाला मान्यता दिली होती.
  • याशिवाय अण्णा द्रमुकच्या या सर्वसाधारण बैठकीत जयललिता यांचा जन्मदिवस राष्ट्रीय कृषी दिन म्हणून साजरा करण्यात यावा हा ठरावही मंजूर करण्यात आला.

इस्रो एकाच वेळी ८३ उपग्रह प्रक्षेपित करणार

  • भारतीय अवकाश संशोधन संघटना (इस्रो) एकाच वेळी ८३ उपग्रह अवकाशात सोडून एक नवा विश्वविक्रम करणार आहे.
  • जानेवारी २०१७मध्ये इस्रो ३ भारतीय व ८० परकीय उपग्रह पीएसएलव्ही-सी३७ या प्रक्षेपकातून एकाच वेळी सोडणार आहे.
  • जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही मोहीम राबविली जाईल. याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. 
  • यातील ८० उपग्रह इस्राईल, कझाकिस्तान, नेदरलॅंड्‌स, स्वित्झर्लंड व अमेरिका या देशांचे आहेत. या सर्व उपग्रहांचे एकत्रित वजन ५०० किलोग्रॅम आहे.
  • कॅटोसॅट-२ या भारतीय उपग्रहाचे वजन ७३० ग्रॅम, तर आयएनएस-आयए व आयएनएस-१बी या उपग्रहांचे वजन ३० किलो आहे.
  • जून २०१६मध्ये इस्रोने श्रीहरीकोटा येथून पीएसएलव्ही-सी३४ प्रक्षेपणातून २० उपग्रह अवकाशात सोडले होते. ती इस्रोची उत्तम कामगिरी होती.
  • २००८मध्ये १० उपग्रह एकाच वेळी सोडण्यात आले होते. आतापर्यंत इस्रोने ५० परकी उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे.
  • इस्रोचे अध्यक्ष: ए. एस. किरण कुमार

रोनाल्डो आणि सांतोस यांना ग्लोब फुटबॉल पुरस्कार

  • रिअल माद्रिदचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि युरो अजिंक्यपद जिंकून देणारे पोर्तुगालचे प्रशिक्षक फर्नाडो सांतोस यांचा ग्लोब फुटबॉल पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.
  • रोनाल्डोने यंदा प्रतिष्ठेचे युरो अजिंक्यपद देशाला प्रथमच जिंकून दिले. याचप्रमाणे रिअल माद्रिदला विक्रमी ११वे युरोपियन विजेतेपद जिंकून दिले.
  • फ्रान्समध्ये झालेल्या युरोपियन स्पर्धेत सांतोस यांनी पोर्तुगालच्या विजयाचा अध्याय लिहिला.
  • डिसेंबर २०१६मध्ये रोनाल्डोने प्रतिष्ठेचा बॅलॉन डी’ओर पुरस्कार चौथ्यांदा जिंकण्याचीही किमया साधली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा