चालू घडामोडी : २५ डिसेंबर

भाग्यवान ग्राहक आणि डिजि-धन व्यापार योजना

 • निश्चलनीकरणांनतर डिजिटल किंवा कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना पुरस्कार देण्याची योजना ‘निती’ आयोगातर्फे जाहीर करण्यात आली.
 • यानुसार ‘भाग्यवान ग्राहक योजना’ आणि ‘डिजि-धन व्यापार योजना’ नावाने दोन योजना सुरू करण्यात येणार असून त्या अंतर्गत एकूण ३४० कोटी रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.
 • या योजनेचा गरीब, मध्यमवर्गीय ग्राहक आणि छोट्या व्यापाऱ्यांना फायदा व्हावा, हा वर्ग डिजिटल क्रांतीचा भाग बनावा हा या योजनांचा मुख्य उद्देश आहे.
 • ‘द नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (एनपीसीआय)च्या माध्यमातून योजनेची अंमलबजावणी केली जाईल.
 • २५ डिसेंबरपासून (नाताळ) पुढील १०० दिवस म्हणजेच १४ एप्रिलपर्यंत या योजना राबवली जाणार आहेत.
 • या योजनेतील भव्यतम सोडत १४ एप्रिल २०१७ रोजी म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिवशी काढण्यात येईल.
 • या योजनांचा भर सामान्य ग्राहक आणि लघु व मध्यम व्यापारी यांच्यावर असेल आणि त्यांना डिजिटल व्यवहारांसाठी प्रेरित केले जाईल.
 • निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी: अमिताभ कांत
 दररोजचे आणि साप्ताहिक पुरस्कार 
 • लकी ग्राहक योजनेअंतर्गत २५ डिसेंबर २०१६ ते १४ एप्रिल २०१७ या काळात दररोज १५,००० ग्राहकांना प्रत्येकी १००० रुपयांची कॅशबॅक बक्षिसे.
 • याशियावाय दर आठवडय़ाला ७००० ग्राहकांना १ लाख, १० हजार आणि ५ हजार रुपयांची बक्षिसे.
 • डिजिधन व्यापार योजनेअंतर्गत दर आठवडय़ाला ७००० व्यापाऱ्यांना ५० हजार, ५००० आणि २५०० रुपयांची बक्षिसे देण्यात येतील.
 • १४ एप्रिल २०१७ रोजी विजेत्या ग्राहकाला १ कोटी, दुसऱ्या क्रमांकाला ५० लाख आणि तिसऱ्या क्रमांकाला २५ लाख रुपयांचे बक्षिस दिले जाईल.
 • तर व्यापाऱ्यांना ५० लाख, २५ लाख आणि ५ लाख रुपये किंमतीची एकूण तीन बक्षिसे दिली जाणार आहेत.
 योजनेत सहभागी होण्यासाठी पात्रता 
 • ५० ते ३००० रुपयांपर्यंतचे डिजिटल व्यवहार त्यासाठी पात्र असतील.
 • यूपीआय, यूएसएसडी, आधार कार्डाशी संलग्न डिजिटल पेमेंट यंत्रणा, रुपे कार्ड यांच्या माध्यमातून केलेले कॅशलेस व्यवहार पात्र असतील.
 • मात्र खासगी क्रेडिट कार्ड आणि खासगी कंपन्यांनी दिलेली ई-वॉलेट्स यांच्या माध्यमातून केलेले व्यवहार योजनेत पात्र ठरणार नाहीत.
 • ग्राहक व व्यापाऱ्यांच्या डिजिटल व्यवहार आयडींमधून लकी ड्रॉ काढून विजेते ठरवले जातील.

विराट कोहली देशातील सर्वात लोकप्रिय व्यक्तिमत्त्व

 • फोर्ब्स इंडियाने २०१६ या वर्षांतील देशातील लोकप्रिय व्यक्तींची यादी जाहीर केली असून, त्यात विराट कोहली देशातील सर्वात लोकप्रिय व्यक्तिमत्त्व ठरले आहे.
 • तसेच सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली प्रथम स्थानावर आहे. 
 • कोहली वर्षभरातील १३४.४४ कोटींच्या कमाईसह प्रथम स्थानावर आहे. तर महेंद्रसिंग धोनी १२२.४८ कोटींच्या कमाईसह दुसऱ्या स्थानावर आहे.
 • सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असली तरी सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे.
 • लोकप्रियतेच्या यादीत कोहलीनंतर सलमान आणि शाहरूख यांचा क्रमांक आहे. धोनी चौथ्या आणि अमिताभ बच्चन पाचव्या क्रमांकावर आहेत.
 • सलमान खान २७० कोटींसह सर्वाधिक कमाई करणारा भारतीय सेलिब्रिटी आहे. तर शाहरूख खान २२१.७५ कोटींसह दुसऱ्या स्थानावर आहे.
 • सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत टेलिव्हिजन कॉमेडी शो कलावंत कपिल शर्मा सातव्या स्थानावर आहे.

अशोक स्तंभाचे चित्रकार दिनानाथ भार्गव यांचे निधन

 • राष्ट्रीय बोधचिन्ह अशोक स्तंभाचे डिझाईन करणाऱ्या कलाकारांच्या संचातील सहकलाकार प्रख्यात चित्रकार दिनानाथ भार्गव यांचे इंदूरमध्ये २४ डिसेंबर रोजी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.
 • भार्गव हे एक दशकाहून अधिक काळ हृदयासंबंधी विकारांनी ग्रस्त होते. त्यांच्यावर अॅंजिओप्लास्टीही करण्यात आली होती.
 • १ नोव्हेंबर १९२७ रोजी मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात मुलताई जन्मलेल्या भार्गव यांनी भारतीय संविधानातील पांडुलिपीची काही पानेही तयार केली होती.
 • कला भवन शांती निकेतनचे कलागुरु नंदलाल बोस यांचे ते शिष्य होते. बोस यांनीच संविधानातील पांडुलिपीची पाने तयार करण्यासाठी भार्गव यांची निवड केली होती.
 • कपड्यांमधील प्रसिद्ध मधुबनी पेंटींग ही त्यांचीच देणगी होती. त्यांच्या वॉश पेंटींग चित्रकला जगात प्रसिद्ध होती.
 • १९५०च्या दशकात युरोपमधील वर्ल्ड आर्ट टूरमध्येही त्यांच्या चित्रांचा समावेश करण्यात आला होता. या चित्रांसाठी त्यांना सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा