चालू घडामोडी : ३१ डिसेंबर

भारत इंटरफेस फॉर मनी अ‍ॅपचे उद्घाटन

  • मोबाइल आणि अंगठय़ाचा ठसा एवढीच आवश्यकता असणारे आधार क्रमांकावर आधारलेल्या ‘भीम’ नावाच्या पेमेंट अ‍ॅपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० डिसेंबर रोजी उद्घाटन केले.
  • ‘भारत इंटरफेस फॉर मनी’ असे या अ‍ॅपचे पूर्ण नाव आहे. पण त्यावरून ‘भीम’ असे राजकीयदृष्टय़ा सूचक असणारे नामाभिधान मोदींनी केले आहे.
  • याद्वारे ‘लेस कॅश’ मोहिमेला थेट राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न मोदींनी केला आहे.
 ‘भीम’ अ‍ॅपबद्दल 
  • दोन आठवडय़ांत हे अ‍ॅप पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे. तूर्तास अ‍ॅपवरून ३० बँकांचे व्यवहार होऊ शकतात.
  • सध्या हे अ‍ॅप फक्त अँड्रॉइडवर उपलब्ध असून युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय)च्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण करते.
  • त्यासाठी कोणताही प्रक्रिया कर नाही. मात्र वापरकर्त्यांची बँक व्यवहारांवरील कर लावू शकते.
  • ‘भीम’वरून व्यवहार करण्यासाठी पैसे पाठविणारा आणि स्वीकारणारा या दोघांचेही ‘यूपीआय’सक्षम बँकेत खाते हवे.
  • वापरणाऱ्याच्या फोनमध्ये मोबाइल बँकिंग सुरू असणे आवश्यक नाही. मात्र वापरणाऱ्याच्या मोबाइल क्रमांकाची नोंद बँकेत असणे गरजेचे.

एटीएममधून पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ

  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १ जानेवारी २०१७पासून एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा २,५०० रुपयांवरून ४,५०० रूपयांपर्यंत वाढविली आहे.
  • परंतु एका आठवड्यात पैसे काढण्याच्या मर्यादेत कोणताच बदल करण्यात आलेला नाही. अजूनही ही मर्यादा २४,००० इतकी कायम आहे.
  • नोटाबंदीच्या निर्णयानंतर एटीएममधून तसेच बँक खात्यामधून पैसे काढण्यावर मर्यादा घालण्यात आली होती.
  • नोटाबंदी करून कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल उचलले आहे.
  • बँकांमध्ये जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा जमा करण्याची मुदत ३० डिसेंबरला संपली आहे.

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन निलंबित

  • भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या सुरेश कलमाडी आणि अभय सिंग चौताला यांची भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या (आयओए) आजीव अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल क्रीडा मंत्रालयाने आयओएवर निलंबनाची कारवाई केली आहे.
  • याप्रकरणी क्रीडा मंत्रालयाने ‘आयओए’ला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. त्याला उत्तर देण्यासाठी ‘आयओए’ला शुक्रवापर्यंतची मुदत दिली होती.
  • या मुदतीमध्ये ‘आयओए’ने क्रीडा मंत्रालयाला उत्तर पाठवले नसल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
  • आयओएवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यामुळे त्यांचे कामकाज करण्याचे अधिकार राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला देण्यात आले आहेत.
  • जोपर्यंत ‘आयओए’ आपला निर्णय मागे घेत नाही आणि त्यांच्यावरील निलंबन उठत नाही, तोपर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारचे आर्थिक साहाय्य, सुविधा देण्यात येणार नाही.
  • ‘आयओए’ची २७ डिसेंबरला वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती. या सभेत कलमाडी आणि अभयसिंग चौताला यांची आजीव अध्यक्षपदी  निवड करण्यात आली होती.
  • याच्या निषेधार्थ २९ डिसेंबर रोजी नरेंद्र बात्रा यांनी आयओएच्या सहयोगी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
  • आयओएचे अध्यक्ष: एन. रामचंद्रन

भारताचा सिंगापूरबरोबर दुहेरी करवसुली प्रतिबंध करार

  • भारताने ३१ डिसेंबर रोजी सिंगापूरबरोबर दुहेरी करवसुली प्रतिबंधाचा सुधारीत करार केला.
  • २०१६ वर्षांच्या सुरुवातीला मॉरिशस व सायप्रसबरोबर भारताने असाच करार केला होता.
  • सुधारीत करारान्वये सिंगापूरस्थित गुंतवणूकदारांना भारतातील भांडवली नफ्यावरील कर सवलतीचा लाभ घेता येणार नाही. यामुळे सिंगापूरच्या माध्यमातून तयार होणाऱ्या काळ्या पैशाला पायबंद बसेल.
  • दशकापासून अस्तित्वात असलेल्या जुन्या करारातील सिंगापूरमधून येणाऱ्या गुंतवणुकींकरिता असलेल्या सर्व कर सवलती आता रद्द होणार आहेत.
  • भारतासाठी थेट विदेशी गुंतवणुकीचे मॉरिशस व सिंगापूर हे दोन प्रमुख स्रोत आहेत. भारतातील एकूण एफडीआयपैकी या दोन देशांचा हिस्सा निम्म्याहून अधिक आहे.
  • सिंगापूरमधून होणाऱ्या गुंतवणुकीवरील नफ्यावर कर लागू करण्याची प्रक्रिया नव्या आर्थिक वर्षांत एप्रिल २०१७ पासून सुरू होणार आहे.

अरुणाचल प्रदेशमध्ये सत्ताबदल

  • अरुणाचल प्रदेशातील पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलने (पीपीए) मुख्यमंत्री पेमा खंडू यांच्यासह ६ आमदारांना निलंबित करत तकाम पारियो यांना मुख्यमंत्री घोषित केले होते.
  • त्यानंतर पेमा खंडू यांच्यासह ३३ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे अरुणाचल प्रदेशात भाजपचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे.
  • ६० जागांच्या या विधानसभेत आता भाजपची संख्या ४५ आणि दोन अपक्ष अशी ४७ झाली आहे. त्यात भाजपाचे स्वत:चे १२ आमदार आहेत.
  • काँग्रेसचे तीनपैकी दोन आमदारही भाजपाच्या वाटेवर आहेत. त्यांनीही पक्षांतर केले की विधानसभेत पीपीएचे शिल्लक राहिलेले १० व एक अपक्ष एवढे अकराच सदस्य विरोधी बाकांवर असतील
  • अशा प्रकारे पक्षांतराच्या माध्यमातून का होईना भाजपाला ईशान्येकडील राज्यात प्रथमच पूर्ण बहुमताचे स्वत:चे सरकार आणण्यात यश आले आहे.

अमेरिकेची रशियाविरोधात कारवाई

  • अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील हॅकिंगच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने रशियाच्या ३५ राजनैतिक अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
  • याशिवाय रशियाच्या अमेरिकेतील दोन ठिकाणच्या कार्यालयांवर बंदी देखील घालण्यात आली आहे.
  • अमेरिकेतील रशियाच्या ३५ राजनैतिक अधिकाऱ्यांना देशात राहण्यास अयोग्य ठरविण्यात आले असून, मेरिलॅंड आणि न्यूयॉर्कमधील रशियाची दोन कार्यालये बंद करण्याचा आदेशही देण्यात आला आहेत.
  • रशियाच्या ‘जीआरयू’ आणि ‘एफएसबी’ या दोन गुप्तचर संस्था आणि या संस्थांना सायबर हल्ल्यांसाठी साहित्याचा पुरवठा करणाऱ्या तीन कंपन्यांच्या विरोधात कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

चीनमध्ये हस्तीदंत व्यवसायावर बंदी

  • हत्तींच्या सुरक्षतेसाठी हस्तीदंतच्या सर्व प्रकारच्या व्यवसायावर बंदी घालण्याची घोषणा चीनतर्फे करण्यात आली आहे. २०१७ अखेरपर्यंत हस्तीदंताचा सर्व प्रकारचा व्यवसाय बंद होणार आहे. 
  • ऑक्टोबर २०१६मध्ये नामशेष होणाऱ्या प्रजातीबाबत साऊथ आफ्रिकेमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या दबावानंतर चीनतर्फे हा निर्णय घेण्यात आला.
  • जगातील हस्तीदंत व्यवसायात चीनचा ७० टक्के सहभाग आहे. यापूर्वी केनिया देशाने एप्रिल २०१६मध्ये १०५ टन हस्तीदंत्त नष्ट केलेले आहे.

चालू घडामोडी : ३० डिसेंबर

पशुधन संजीवनी योजना

  • प्रत्येक नागरिकासाठी विशिष्ट ओळख क्रमांक (यूआयडी) देण्याच्या धर्तीवर आता दुधाळ जनावरांसाठीही यूआयडी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कृषी खात्याच्या पशुधन संजीवनी योजनेतून हे यूआयडी दिले जातील.
  • दुधाळ जनावरे रोगमुक्त ठेवणे आणि दुग्धोत्पादन वाढविणे हे उद्दिष्ट गाठण्यासाठी ही योजना महत्वपूर्ण आहे.
  • त्यासाठी प्रत्येक जनावराचा तपशील हाताशी असावा आणि त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जावी, यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे.
  • सुमारे साडेआठ कोटी पशूंची माहिती यातून संग्रहीत केली जाणार असून, प्रत्येक दुधाळ जनावरासाठी हेल्थ कार्ड (आरोग्यविषयक तपशिलांच्या नोंदी असलेले कार्ड) दिले जाईल.
  • त्यामध्ये जनावराची जात, वय, लसीकरण, आहार यांसारख्या नोंदी असतील. ही संपूर्ण माहिती राष्ट्रीय पातळीवरील डाटाबेसमध्ये जमा केली जाईल.
  • देशभरातील सर्व दुधाळ जनावरांच्या नोंदी घेऊन त्यांना यूआयडी देण्याची प्रक्रिया आगामी दोन वर्षांत (२०१९ पर्यंत) पूर्ण होणे अपेक्षित आहे.
  • या पाहणीतून उपलब्ध होणारी आकडेवारी, जनावरे खरेदीसाठी कर्ज देणाऱ्या बॅंकांसाठीही लाभदायक ठरणार आहे.

एलईटीचे दोन नेते जागतिक दहशतवादी घोषित

  • अमेरिकेने पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा (एलईटी) या संघटनेच्या मोहम्मद सरवर आणि शाहीद महमूद दोन नेत्यांना ‘जागतिक दहशतवादी’ घोषित केले आहे.
  • अमेरिकेच्या अर्थ खात्याने यांना जागतिक दहशतवादी जाहीर केले आहे. लष्करचे हे दोन्ही नेते सध्या पाकिस्तानात वास्तव्याला आहेत.
  • एलईटीचा वरिष्ठ अधिकारी असलेला मोहम्मद सरवर हा १० वर्षांहून अधिक काळ लाहोरमध्ये असून त्याने संघटनेत अनेक पदे भूषवली आहेत.
  • शाहीद महमूद हा दीर्घकाळापासून कराचीमध्ये एलईटीचा वरिष्ठ सदस्य असून २००७पासून त्याचा या संघटनेशी संबंध आहे.
  • त्याने एलईटीची निधी गोळा करणारी शाखा असलेल्या ‘फलह-इ-इन्सानियत फाऊंडेशन’ (एफआयएफ)चा उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.
  • याशिवाय एलईटीच्या ‘अल मुहम्मदिया स्टुडंट्स’ या विद्यार्थी संघटनेला अमेरिकेने दहशतवादी संघटना जाहीर केले आहे.
  • लोकांची भरती करण्यासाठी आणि युवकांचे संघटनात्मक कार्यक्रम आयोजित ही एलईटीची संघटना काम करते.
  • लष्कर-ए-तोयबाला अमेरिकेने डिसेंबर २००१मध्येच दहशतवादी संघटना घोषित केले होते.

अ‍ॅना इव्हानोव्हिक आंतराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्त

  • सर्बियाची टेनिसपटू २९ वर्षीय अ‍ॅना इव्हानोव्हिकने प्रकृतीच्या कारणास्तव आंतराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
  • जुलै २०१६मध्ये अ‍ॅना इव्हानोव्हिकने जर्मनीचा माजी फुटबॉलपटू बॅस्टियन श्वेनस्टायगरशी विवाह केला होता.
  • फ्रेंच खुली स्पर्धा जिंकल्यानंतर इव्हानोव्हिकने १२ आठवडे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले होते.
  • परंतु त्यानंतर आठ वर्षांत तिला एकदाच अव्वल दहामध्ये स्थान मिळवता आले. सध्या ती जागतिक क्रमवारीत ६५व्या स्थानावर आहे.
  • तिने कारकीर्दीत एकूण १५ डब्लूटीए व ५ आयटीएफ जेतेपदांना गवसणी घातली आहे.

पाकिस्तानच्या अणुऊर्जाप्रकल्पाचे उद्घाटन

  • पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी ३४० मेगावॅट ऊर्जानिर्मिती करणाऱ्या अणुऊर्जाप्रकल्पाचे २८ डिसेंबर रोजी उद्घाटन केले.
  • पाकिस्तानातील मिआनवली जिल्ह्यात या अणुप्रकल्पाचे ठिकाण असून चष्मा ३ असे या प्रकल्पाला नाव देण्यात आले आहे.
  • पाकिस्तान ऍटोमिक एनर्जी कमिशन (पीएईसी) व चायना नॅशनल न्यूक्लिअर कॉर्पोरेशन (सीएनएनसी) यांच्या संयुक्त भागीदारीतून हा अणुऊर्जा प्रकल्प साकारण्यात आलेला आहे.
  • आगामी वर्षामध्ये चष्मा ३च्या धर्तीवर सी ४ प्रकल्प उभारणी करण्यात येणार आहे.

चालू घडामोडी : २९ डिसेंबर

शशिकला यांच्याकडे अण्णाद्रमुक पक्षाची धुरा

  • तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निकटवर्तीय व्ही.के. शशिकला (चिनम्मा) यांची सर्वसंमतीने ऑल इंडिया अण्णाद्रमुक पक्षाच्या (एआयडीएमके) सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.
  • अण्णाद्रमुक पक्षातील पदांच्या रचनेनुसार सरचिटणीसपदी असलेली व्यक्ती पक्षाची प्रमुख असते. गेली तीस वर्षे हे पद जयललिता यांच्याकडे होते.
  • लोकसभेचे उपसभापती एम. थंबीदुराई, ज्येष्ठ नेते पनरुती एस. रामचंद्रन, राज्याचे मंत्री, पक्षाचे आमदार आणि खासदार या बैठकीला उपस्थित होते.
  • पक्षामध्ये शशिकला यांच्या नेतृत्वाला कोणाचेही अंतर्गत आव्हान नाही. पक्षाचे जिल्हा सचिव आणि विविध विभागांच्या अध्यक्षांनी यापूर्वीच शशिकला यांच्या नेतृत्वाला मान्यता दिली होती.
  • याशिवाय अण्णा द्रमुकच्या या सर्वसाधारण बैठकीत जयललिता यांचा जन्मदिवस राष्ट्रीय कृषी दिन म्हणून साजरा करण्यात यावा हा ठरावही मंजूर करण्यात आला.

इस्रो एकाच वेळी ८३ उपग्रह प्रक्षेपित करणार

  • भारतीय अवकाश संशोधन संघटना (इस्रो) एकाच वेळी ८३ उपग्रह अवकाशात सोडून एक नवा विश्वविक्रम करणार आहे.
  • जानेवारी २०१७मध्ये इस्रो ३ भारतीय व ८० परकीय उपग्रह पीएसएलव्ही-सी३७ या प्रक्षेपकातून एकाच वेळी सोडणार आहे.
  • जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही मोहीम राबविली जाईल. याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. 
  • यातील ८० उपग्रह इस्राईल, कझाकिस्तान, नेदरलॅंड्‌स, स्वित्झर्लंड व अमेरिका या देशांचे आहेत. या सर्व उपग्रहांचे एकत्रित वजन ५०० किलोग्रॅम आहे.
  • कॅटोसॅट-२ या भारतीय उपग्रहाचे वजन ७३० ग्रॅम, तर आयएनएस-आयए व आयएनएस-१बी या उपग्रहांचे वजन ३० किलो आहे.
  • जून २०१६मध्ये इस्रोने श्रीहरीकोटा येथून पीएसएलव्ही-सी३४ प्रक्षेपणातून २० उपग्रह अवकाशात सोडले होते. ती इस्रोची उत्तम कामगिरी होती.
  • २००८मध्ये १० उपग्रह एकाच वेळी सोडण्यात आले होते. आतापर्यंत इस्रोने ५० परकी उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे.
  • इस्रोचे अध्यक्ष: ए. एस. किरण कुमार

रोनाल्डो आणि सांतोस यांना ग्लोब फुटबॉल पुरस्कार

  • रिअल माद्रिदचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि युरो अजिंक्यपद जिंकून देणारे पोर्तुगालचे प्रशिक्षक फर्नाडो सांतोस यांचा ग्लोब फुटबॉल पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.
  • रोनाल्डोने यंदा प्रतिष्ठेचे युरो अजिंक्यपद देशाला प्रथमच जिंकून दिले. याचप्रमाणे रिअल माद्रिदला विक्रमी ११वे युरोपियन विजेतेपद जिंकून दिले.
  • फ्रान्समध्ये झालेल्या युरोपियन स्पर्धेत सांतोस यांनी पोर्तुगालच्या विजयाचा अध्याय लिहिला.
  • डिसेंबर २०१६मध्ये रोनाल्डोने प्रतिष्ठेचा बॅलॉन डी’ओर पुरस्कार चौथ्यांदा जिंकण्याचीही किमया साधली होती.

चालू घडामोडी : २८ डिसेंबर

विरल व्ही. आचार्य आरबीआयचे नवे डेप्युटी गव्हर्नर

  • केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीतील अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक विरल व्ही. आचार्य यांची नियुक्ती केली आहे.
  • उर्जित पटेल यांची गव्हर्नरपदी नियुक्ती झाल्यानंतर रिक्त झालेल्या डेप्युटी गव्हर्नरपदी आचार्य यांची तीन वर्षांसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.
  • देशाचे पतधोरण निश्चित करताना आता एन एस विश्वनाथन, एस एस मुंद्रा, आर गांधी या इतर तीन डेप्युटी गव्हर्नरबरोबर आचार्य यांचाही सहभाग असेल.
  • आचार्य हे न्यूयॉर्क विद्यापीठातील स्टर्न स्कूल ऑफ बिझनेस येथे २००८पासून प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.
  • आचार्य यांनी १९९५मध्ये मुंबई आयआयटीतून कम्प्युटर सायन्स आणि इंजिनीअरिंगमधील पदवी प्राप्त केली आहे. २००१मध्ये न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीतून त्यांनी पीएचडी पूर्ण केली आहे.
  • २००१ ते २००८ या कालावधीत त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अध्यापनही केले आहे. त्यांनी बँक ऑफ इंग्लंडमध्येही काम केले आहे.
  • बँका आणि वित्तीय संस्था आणि कॉर्पोरेट कर्जाचे मूल्यांकन यासारख्या विषयांमध्ये आचार्य यांनी संशोधन केले आहे.
  • अनेक आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. नुकताच त्यांना आर्थिक क्षेत्रातील उभरते नेतृत्व म्हणून पुरस्कार मिळाला आहे.
  • आचार्य यांना संगीतक्षेत्रातही रस असून त्यांनी संगीतबद्ध केलेला एक अल्बमही बाजारात आला आहे. यातील गीते ऋषिकेश व प्राजक्ता रानडे यांनी गायली आहेत.

जुन्या नोटा बाळगल्यास दंडात्मक कारवाई

  • १० पेक्षा अधिक ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा जवळ बाळगल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
  • या बैठकीत यासंदर्भातील वटहुकूम जारी करण्यास मंजुरी देण्यात आली असून, हा वटहुकूम लवकरच राष्ट्रपतींकडे पाठवला जाणार आहे.
  • या अध्यादेशानुसार ३० डिसेंबरनंतर जुन्या नोटा बाळगणाऱ्यांना १० हजार रुपये दंड किंवा जप्त रकमेच्या पाच पट रक्कम यापैकी जी जास्त रक्कम असेल तितका दंड आकारला जाईल.
  • या प्रकरणात कोणत्याही तुरुंगवासाची तरतूद करण्यात आलेली नसून, याप्रकरणातील किमान दंड १० हजार रुपये असणार आहे.
  • पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
  • नोटाबंदीच्या ५० दिवसांत आतापर्यंत बँकांमध्ये ९० टक्के म्हणजे १४ लाख कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत. उर्वरित १० टक्के रक्कम अद्याप जमा होऊ शकलेली नाही.

दिल्लीच्या नायब राज्यपालपदी अनिल बैजल

  • नजीब जंग यांनी दिल्लीच्या नायब राज्यपालपदाचा दिलेला राजीनामा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना मंजूर केला आहे.
  • केंद्रीय गृहमंत्रालयाने या पदासाठी आता अनिल बैजल यांची यांचे नाव सुचविले असून आता राष्ट्रपतींनीही त्यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे बैजल हे दिल्लीचे २१वे नायब राज्यपाल असतील.
  • कार्यकाळ पूर्ण होण्यास १८ महिने बाकी असताना नजीब जंग यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या नायब राज्यपालपदाचा राजीनामा दिला होता.
  • ७० वर्षीय बैजल हे १९६९च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात बैजल यांनी गृहसचिव म्हणून काम केले होते.
  • केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये त्यांनी काम केले असून नगर विकास मंत्रालयातील सचिवपदावरुन ते २००६मध्ये निवृत्त झाले होते.
  • दिल्ली विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. ‘विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशन’ या थिंक-टॅंकचेही ते सदस्य होते.
  • जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियान (जेएनएनयूआरएम) या मोहीमेची संकल्पना आणि अंमलबजावणीत बैजल यांचा मोलाचा वाटा होता.

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांचे निधन

  • मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांचे २८ डिसेंबर रोजी हृदयविकाराने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.
  • केंद्रीय मंत्री राहिलेल्या सुंदरलाल पटवा यांनी मध्यप्रदेशचे दोन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवले आहे.
  • सुंदरलाल पटवा यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९२४ मध्ये झाला होता. त्यांनी आपली राजकीय कारकिर्दीची सुरूवात जनसंघापासून केली होती.
  • १९७७मध्ये ते जनता पार्टीशी जोडले गेले. पटवा हे १९७७मध्ये छिंदवाडामधून पोटनिवडणूक लढवून खासदार झाले होते.
  • १९९८मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

‘स्टार वॉर्स’ फेम अभिनेत्री कॅरी फिशर यांचे निधन

  • १९७७साली प्रदर्शित झालेल्या ‘स्टार वॉर्स’ या चित्रपटातील प्रिन्सेस लेया म्हणून नावारुपास आलेल्या अभिनेत्री कॅरी फिशर यांचे निधन झाले आहे.
  • १९७५मध्ये अभिनेता वॉरन बिटीसोबतच्या ‘शॅम्पू’ या चित्रपटाद्वारे फिशर यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते.
  • या सुपरहिट चित्रपटानंतर कॅरी फिशर यांनी ऑस्टिन पॉवर्स, द ब्लूस ब्रदर्स, चार्लिज एन्जेल्स, हॅना अॅण्ड हर सिस्टर्स, स्क्रिम ३ आणि व्हेन हॅरी मेट सॅली अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते.
  • १९७७साली प्रदर्शित झालेल्या ‘स्टार वॉर्स’ या चित्रपटाने कॅरी फिशर यांनी विशेष लोकप्रियता मिळाली.
  • त्यांची ही भूमिका आणि 'हेल्प मी ओबी वन, यु आर माय ओन्ली होप' हा संवाद आजही चित्रपट रसिकांच्या स्मरणात आहे.
  • हॉलिवूडपटांमध्ये धीट, सक्षम आणि काहीशा चिडखोर स्वभावाच्या व्यक्तिरेखा साकारण्याला फिशर यांनी प्राधान्य दिले होते.
  • गेल्या बऱ्याच काळापासून फिशर व्यसनाच्या आहारी गेल्या होत्या. त्यासोबतच त्यांचे मानसिक संतुलनही बिघडले होते. त्यांच्यावर उपचारही सुरु होते.

चालू घडामोडी : २७ डिसेंबर

देशातील २० हजार एनजीओंची नोंदणी रद्द

  • परदेशी निधी नियंत्रण कायद्याचे (एफसीआरए) उल्लंघन करणाऱ्या २० हजार बिगर सरकारी स्वयंसेवी संस्थांची (एनजीओ) एफसीआरएअंतर्गत झालेली नोंदणी रद्द करण्यात आली आहे.
  • अशा एनजीओंचा एफसीआरएचा परवाना रद्द करण्यात आला असून, त्यांना आता परदेशातून निधी स्वीकारता येणार नाही.
  • केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या परदेश विभागाला अशा प्रकारच्या कारवाईचे अधिकार आहेत.
  • देशभरात आतापर्यंत एकूण ३३ हजार एनजीओ अधिकृतरीत्या कार्यरत होते. या कारवाईनंतर त्यांची संख्या १३ हजार झाली आहे.
  • एनजीओंकडून सुरू असलेल्या कामकाजाची तपासणी वर्षभरापासून सुरू असून, त्यातून समोर आलेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
 परदेशी निधी नियंत्रण कायदा 
  • १९७६मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना देशाच्या कारभारात ‘विदेशी’ हात हस्तक्षेप करीत आहे असे वाटले. त्यावेळी सरकारने प्रथमच स्वयंसेवी व सरकारी संस्थांना परवानगी आवश्यक असल्याची अट लागू केली.
  • त्यानंतर परदेशी निधी नियंत्रण कायदा सन २०१०मध्ये करण्यात आला. त्यानुसार व्यक्ती, संस्था, कंपनी यांनी परदेशातून किती प्रमाणात निधी घ्यायचा, किती खर्च करायचा, यावर या कायद्याने काही र्निबध घातले आहेत.
  • तसेच, देशहितास बाधा आणणारे प्रकार या निधीच्या जोरावर सुरू नाहीत ना, यावरही सदर कायद्याद्वारे नजर ठेवली जाते.
  • डॉ. मनमोहन सिंग सरकारने एफसीआरए कायदा आणखी कडक केला होता. मोदी सरकारनेही आता या कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करायला सुरुवात केली आहे.
  • गेल्या तीन वर्षांत साठपेक्षा अधिक देशांनी स्वयंसेवी संस्थांवर कारवाई केली आहे. त्यात चीन, रशिया, इजिप्त आघाडीवर आहेत.

सुरेश कलमाडी यांना आयओएचे आजीवन अध्यक्षपद

  • राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अडचणीत आलेले सुरेश कलमाडी यांची भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या (आयओए) आजीवन अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
  • परंतु सध्याच्या परिस्थितीत हे पद स्वीकारणे योग्य नसल्याचे सांगत कलमाडी यांनी आयओएचे आजीवन अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला आहे.
  • २०१०मध्ये दिल्लीत आयोजन करण्यात आलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे समोर आले होते.
  • फसवणूक व कटकारस्थानच्या आरोपावरून कलमाडी यांना सुमारे १० महिने तुरुंगात काढावे लागले होते. तसेच त्यांना आयओएचे अध्यक्षपदही गमवावे लागले होते. 
  • कलमाडी यांच्यासोबतच बॉक्सिंग महासंघाचे वादग्रस्त माजी अध्यक्ष अभय चौटाला यांचीही आजीवन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • इंडियन नॅशनल लोकदलाचे नेते असलेल्या अभयसिंह चौटाला यांच्यावर बेहिशेबी उत्पन्नाप्रकरणी खटला सुरू आहे.
  • अभय चौटाला यांनी याआधी विविध क्रीडा संघटनांवर  प्रशासक म्हणून काम पाहिले आहे. तसेच ते सध्या हरयाणा ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आहेत.
  • आयओएच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत सर्व माजी अध्यक्षांची आजीवन अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • याशिवाय भारतीय हौशी बॉक्सिंग महासंघाला पुन्हा परवानगी मिळावी यासाठी त्रिसदस्यीस समितीही नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शंख घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर

  • प्रसिद्ध बंगाली कवी व समीक्षक शंख घोष यांना साहित्यातील सर्वोच्च सन्मान असलेला ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. अकरा लाख रुपये रोख व वाग्देवीची प्रतिमा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • कवी व समीक्षक याशिवाय शिक्षण क्षेत्रात त्यांनी मोठे काम केले आहे. आदिम लता गुलमोमय, मुर्खो बारो, सामाजिक नॉय, बाबोरेर प्रार्थना, दिंगुली रातगुली, निहिता पतलछाया या त्यांच्या साहित्यकृती विशेष गाजल्या.
  • त्यांच्या साहित्यकृतींचे हिंदी, मराठी, आसामी, पंजाबी व मल्याळम तसेच पंजाबी या भारतीय तसेच काही परदेशी भाषांत भाषांतर झालेले आहे.
  • त्यांना २०११मध्ये पद्मभूषण हा सन्मान मिळाला, त्याशिवाय साहित्य अकादमी पुरस्कार, सरस्वती सन्मान, रवींद्र पुरस्कार, नरसिंहदास पुरस्कार हे इतर मानाचे पुरस्कार त्यांना पूर्वीच मिळाले आहेत.
  • घोष यांचा जन्म आता बांगलादेशात असलेल्या चांदपूर येथे १९३२मध्ये झाला. त्यांचे शिक्षण कोलकात्यात झाले.
  • त्यांनी टागोरांवर काही निबंधही लिहिले आहेत. टागोरांवर अधिकारवाणीने लेखन करणारे साहित्यिक म्हणून ते परिचित आहेत.
  • दिल्ली विद्यापीठ, सिमल्याची इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स स्टडीज तसेच विश्वभारती विद्यापीठात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले आहे. 
  • ताराशंकर, विष्णू डे, सुभाष मुखोपाध्याय, आशापूर्णा देवी, महाश्वेता देवी या बंगाली ज्ञानपीठ विजेत्यांमध्ये आता शंख घोष यांचाही समावेश झाला आहे.

९५ कोटी भारतीय इंटरनेट सुविधांपासून वंचित

  • अ‍ॅसोचेम आणि डेलॉइट यांनी केलेल्या संयुक्त पाहणीत भारतातील फक्त ३० ते ३५ कोटी लोक इंटरनेटचा वापर करत असल्याचे आढळून आले आहे.
  • ‘सायबर गुन्ह्यांविरोधी धोरणात्मक राष्ट्रीय उपाय’ असे या अहवालाचे शीर्षक असून डिजिटल साक्षरतेचा प्रसार आवश्यक असल्याचे या अहवालात म्हंटले आहे.
 अहवालातील ठळक मुद्दे 
  • दुर्गम भागांपर्यंत डिजिटल सेवा पोहचवण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या सरकारी पायाभूत सोयींचा विस्तार करणे गरजेचे.
  • शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये संस्थात्मक प्रशिक्षण देऊन डिजिटल साक्षरतेचा प्रसार होणे आवश्यक.
  • ‘डिजिटल भारत’ आणि ‘कुशल भारत’ यांचा एकात्मिक उपक्रम आखून त्याअंतर्गत गरजूंना प्रशिक्षण दिले जावे. त्यात खासगी क्षेत्रातील संस्थांचा समावेश असावा.
  • डिजिटल साक्षरता वाढविण्यासाठी स्थानिक भाषा आणि तंत्रज्ञान यांची सांगड घातली जावी.
  • देशात डिजिटल व्यवहारांवर भर दिला जात असला तरी सायबर गुन्ह्यांचा धोका वाढत आहे. ते रोखण्यासाठी कठोर उपाययोजना केले जाणे महत्त्वाचे आहे.
  • स्वस्त इंटरनेट, डेटा योजना, स्मार्टफोनच्या घटत्या किमती अशी अनुकूल परिस्थिती असूनही ९५ कोटी भारतीय इंटरनेट सुविधांपासून वंचित आहेत.

हरियाणात धावणार देशातील पहिली कॅटरपिलर ट्रेन

  • प्रवासी वाहतूक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी हरियाणातील गुरुग्राममध्ये देशातील पहिली कॅटरपिलर ट्रेनची सुविधा सुरू करण्यात येणार आहे.
  • कॅटरपिलटर रेल्वेचे डिझाईन भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत असलेल्या अश्वनी उपाध्याय या अधिकाऱ्याने तयार केले आहे.
  • एमआयटीमधून पीएचडी झालेल्या इमिल जेकब यांच्या मदतीने उपाध्याय यांनी कॅटरपिलर ट्रेनची संकल्पना विकसित केली आहे.
  • अश्वनी उपाध्याय यांनी एमआयटीमधून पीएचडी केली असून या संकल्पनेसाठी यासाठी त्यांना एमआयटीचा पुरस्कारदेखील मिळाला आहे.
  • हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी त्यांच्या कार्यालयाला कॅटरपिलर ट्रेनच्या प्रकल्पात प्राधान्याने लक्ष घालण्यास सांगितले आहे.
  • कॅटरपिलर ट्रेनचे वजन कमी असते. ही ट्रेन मेट्रो किंवा मोनोरेलसारखी असते. १०० किलोमीटर प्रतितास वेगाने कॅटरपिलर ट्रेन धावू शकते.
  • एक ट्रेन रुळांवरुन जात असताना दुसरी ट्रेन रुळांच्या खालील बाजूने जाऊ शकते, हे कॅटलपिलर ट्रेनचे वैशिष्ट्य आहे.

चालू घडामोडी : २६ डिसेंबर

अग्नी-५ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी

  • भारताच्या सर्वांत लांब पल्ल्याच्या आणि अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या अग्नी ५ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली.
  • ओडिशा किनाऱ्यालगत व्हीलर बेटावरून डिफेन्स रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनकडून (डीआरडीओ) या तीनस्तरीय भरीव प्रॉपेलंट क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करण्यात आले. 
  • ही लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची ही चौथी विकासात्मक चाचणी, तर दारुगोळ्यातील धातूचे सिलिंडर वापरून घेतलेली ही दुसरी चाचणी आहे.
 अग्नी-५ 
  • १७ मीटर लांब जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या अग्नी ५ या स्वप्नातीत क्षेपणास्त्राचा पल्ला ५००० किलोमीटर एवढा आहे. संपूर्ण क्षमतेनुसार मारा करण्यासाठी अग्नी-५ चे ३ टप्पे आहेत. 
  • हे क्षेपणास्त्र वाहतुकीसाठी सोपे असून, अपेक्षित लक्ष्य गाठण्यासाठी कुठूनही डागता येईल अशा पद्धतीने विकसित केले आहे.
  • आशियातील बहुतांश प्रदेश आणि युरोपातील लक्ष्य भेदण्याची क्षमता त्यामध्ये आहे. उत्तर चीनमध्येही हे क्षेपणास्त्र पोचू शकते. 
  • या क्षेपणास्त्राच्या याआधी एप्रिल २०१२, सप्टेंबर २०१३ व जानेवारी २०१५मध्ये चाचण्या करण्यात आल्या होत्या. मात्र, त्या पूर्णपणे यशस्वी झाल्या नव्हत्या.
  • स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडला सुपूर्द करण्याआधीची अग्नी-५ ची ही शेवटची चाचणी होती.
  • स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडची (एसएफसी) स्थापना २००३मध्ये करण्यात आली आहे. देशाच्या अण्वस्त्रांच्या नियंत्रणाचे काम स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडकडे आहे.
  • सध्या फक्त अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, ब्रिटन या देशांकडे ५००० किमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत. ५००० किमी पल्ल्याचे क्षेपणास्त्र असलेला भारत जगातील सहावा देश आहे.

ब्रिटिश पॉप गायक मायकल जॉर्ज यांचे निधन

    George Michael
  • ब्रिटिश पॉप गायक मायकल जॉर्ज यांचे २५ डिसेंबर रोजी वयाच्या ५३व्या वर्षी निधन झाले.
  • जॉर्जिओस किरियाकोस पनाईओटोऊ असे त्यांचे पूर्ण नाव होते. जॉर्जने १९८०मध्ये मित्र ऍण्ड्यू रिजेले याच्या साथीने वॅम हा बँड सुरु केला.
  • क्लब ट्रॉपिकॅना, लास्ट ख्रिसमस, केअरलेस विस्पर आणि फेथ या अल्बम्समुळे मायकल जॉर्ज अनेकांच्या लक्षात आहेत.
  • यशस्वी गायक असण्याबरोबर ते गीतकारही होते. वेक मी अप बीफोर यू गो-गो, यंग गन्स आणि फ्रीडम ही त्यांची गाणी प्रचंड गाजली.
  • ८०-९०च्या दशकात ते प्रचंड लोकप्रिय होते. चार दशकांच्या करीयरमध्ये जगभरात त्यांच्या १०० कोटी पेक्षा जास्त अल्बमची विक्री झाली.
  • सहजसोपी चाल, जनसामान्यांना उत्कंटपणे भिडणारा आवाज, त्यामध्ये खोलवर असलेले दु:ख यामुळे जॉर्ज मायकल लोकप्रिय होते.
  • चीनमध्ये निर्बंध असताना जॉर्ज चीनमध्ये जाऊन गायले होते. त्यावेळी त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली होती.
  • जॉर्ज मायकल यांची जीवनशैलीदेखील थोडी बेधुंद होती. त्यांना अंमली पदार्थ सेवन करण्याची सवय लागली होती. त्यामुळे त्यांना काही वेळा तुरुंगवासदेखील भोगावा लागला होता.
  • जॉर्जला दोनवेळा ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता. तसेच जॉर्जच्या जीवनावर आधारित 'अ डिफरेंट स्टोरी' हा चित्रपट २००५मध्ये प्रदर्शित झाला होता.

मिथून चक्रवर्ती यांचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा

  • तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर राज्यसभेत दाखल झालेले अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी २६ डिसेंबर रोजी खासदारकीचा राजीनामा दिला आहे.
  • प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असून त्यांच्या खासदारकीचा कार्यकाळ संपण्यासाठी आणखी दीड वर्षांचा कालावधी बाकी होता.
  • तृणमूल काँग्रेसने फेब्रुवारी २०१४मध्ये मिथून चक्रवर्ती यांना राज्यसभेत खासदार म्हणून पाठवले होते.
  • मात्र पश्चिम बंगालमधील बहुचर्चित शारदा घोटाळ्यात मिथून चक्रवर्ती यांचे नाव आल्याने ते अडचणीत आले होते. याप्रकरणी मिथून चक्रवर्ती यांना सक्तवसुली संचालनालयाने समन्सही बजावले होते. 
  • मिथुन चक्रवर्ती यांची संसदेतील कामगिरी फारशी चमकदार नव्हती. राज्यसभेत मिथुन चक्रवर्ती यांच्या हजेरीचे प्रमाण फक्त १० टक्केच होते.
  • राज्यसभेतील चर्चेत त्यांनी कधीच सहभाग घेतला नव्हता. तसेच त्यांनी राज्यसभेत कधी प्रश्नही उपस्थित केला नव्हता.

शाहरुख खानला डॉक्टरेट पदवी

  • हैदराबादेमधील मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठाकडून अभिनेता शाहरुख खानला डॉक्टरेट पदवीने गौरवण्यात आले आहे.
  • या विद्यापीठाच्या ६व्या दीक्षान्त समारंभात राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते शाहरुखला हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.
  • ऊर्दू भाषा आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी दिलेल्या योगदानाखासाठी राजीव सराफ यांनाही शाहरुख खानसोबत डॉक्टरेटने सन्मानित करण्यात आले.

२५५ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द

  • निवडणूक आयोगाने देशातील २५५ राजकीय पक्षांना यादीतून हटविले असून, यात महाराष्ट्रातील २५ राजकीय पक्षांचा समावेश आहे.
  • रद्द करण्यात आलेल्या या राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेली आहे; पण २००५नंतर या पक्षांनी एकही निवडणूक लढविलेली नाही. देणग्या आणि करातून सूट याचा लाभ या पक्षांकडून घेण्यात येत होता. 
  • या राजकीय पक्षांनी निवडणूकच लढविली नाही आणि याच कारणास्तव त्यांची नोंदणी किंवा मान्यता रद्द करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही.
  • त्यामुळे केवळ कागदोपत्री असणाऱ्या या पक्षांविरुद्ध कार्यवाहीसाठी आयोगाने केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाला एक पत्र देऊन या पक्षांना यादीतून हटविण्याबाबत सांगितले.

स्पर्धापरीक्षा तयारीसाठी उत्कृष्ट प्रश्नसंच

राज्यसेवा २०१७ तसेच येणाऱ्या सर्व महत्वाच्या स्पर्धापरीक्षांकरिता प्रगती बुक्सचे "प्रश्नपत्रिका विश्लेषण" हे पुस्तक अत्यंत उत्कृष्ट आहे. यात तुम्हाला स्पर्धापरीक्षेत विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे विश्लेषणासाहित मिळतील.
या पुस्तकाचा काही मजकूर (Sample) डाउनलोड करण्यासाठी पुस्तकाच्या खालील प्रतिमेवर क्लिक करा.

पुस्तक आवडल्यास जवळच्या दुकानातून तुम्ही ते खरेदी करू शकता.



चालू घडामोडी : २५ डिसेंबर

भाग्यवान ग्राहक आणि डिजि-धन व्यापार योजना

  • निश्चलनीकरणांनतर डिजिटल किंवा कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना पुरस्कार देण्याची योजना ‘निती’ आयोगातर्फे जाहीर करण्यात आली.
  • यानुसार ‘भाग्यवान ग्राहक योजना’ आणि ‘डिजि-धन व्यापार योजना’ नावाने दोन योजना सुरू करण्यात येणार असून त्या अंतर्गत एकूण ३४० कोटी रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.
  • या योजनेचा गरीब, मध्यमवर्गीय ग्राहक आणि छोट्या व्यापाऱ्यांना फायदा व्हावा, हा वर्ग डिजिटल क्रांतीचा भाग बनावा हा या योजनांचा मुख्य उद्देश आहे.
  • ‘द नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (एनपीसीआय)च्या माध्यमातून योजनेची अंमलबजावणी केली जाईल.
  • २५ डिसेंबरपासून (नाताळ) पुढील १०० दिवस म्हणजेच १४ एप्रिलपर्यंत या योजना राबवली जाणार आहेत.
  • या योजनेतील भव्यतम सोडत १४ एप्रिल २०१७ रोजी म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिवशी काढण्यात येईल.
  • या योजनांचा भर सामान्य ग्राहक आणि लघु व मध्यम व्यापारी यांच्यावर असेल आणि त्यांना डिजिटल व्यवहारांसाठी प्रेरित केले जाईल.
  • निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी: अमिताभ कांत
 दररोजचे आणि साप्ताहिक पुरस्कार 
  • लकी ग्राहक योजनेअंतर्गत २५ डिसेंबर २०१६ ते १४ एप्रिल २०१७ या काळात दररोज १५,००० ग्राहकांना प्रत्येकी १००० रुपयांची कॅशबॅक बक्षिसे.
  • याशियावाय दर आठवडय़ाला ७००० ग्राहकांना १ लाख, १० हजार आणि ५ हजार रुपयांची बक्षिसे.
  • डिजिधन व्यापार योजनेअंतर्गत दर आठवडय़ाला ७००० व्यापाऱ्यांना ५० हजार, ५००० आणि २५०० रुपयांची बक्षिसे देण्यात येतील.
  • १४ एप्रिल २०१७ रोजी विजेत्या ग्राहकाला १ कोटी, दुसऱ्या क्रमांकाला ५० लाख आणि तिसऱ्या क्रमांकाला २५ लाख रुपयांचे बक्षिस दिले जाईल.
  • तर व्यापाऱ्यांना ५० लाख, २५ लाख आणि ५ लाख रुपये किंमतीची एकूण तीन बक्षिसे दिली जाणार आहेत.
 योजनेत सहभागी होण्यासाठी पात्रता 
  • ५० ते ३००० रुपयांपर्यंतचे डिजिटल व्यवहार त्यासाठी पात्र असतील.
  • यूपीआय, यूएसएसडी, आधार कार्डाशी संलग्न डिजिटल पेमेंट यंत्रणा, रुपे कार्ड यांच्या माध्यमातून केलेले कॅशलेस व्यवहार पात्र असतील.
  • मात्र खासगी क्रेडिट कार्ड आणि खासगी कंपन्यांनी दिलेली ई-वॉलेट्स यांच्या माध्यमातून केलेले व्यवहार योजनेत पात्र ठरणार नाहीत.
  • ग्राहक व व्यापाऱ्यांच्या डिजिटल व्यवहार आयडींमधून लकी ड्रॉ काढून विजेते ठरवले जातील.

विराट कोहली देशातील सर्वात लोकप्रिय व्यक्तिमत्त्व

  • फोर्ब्स इंडियाने २०१६ या वर्षांतील देशातील लोकप्रिय व्यक्तींची यादी जाहीर केली असून, त्यात विराट कोहली देशातील सर्वात लोकप्रिय व्यक्तिमत्त्व ठरले आहे.
  • तसेच सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली प्रथम स्थानावर आहे. 
  • कोहली वर्षभरातील १३४.४४ कोटींच्या कमाईसह प्रथम स्थानावर आहे. तर महेंद्रसिंग धोनी १२२.४८ कोटींच्या कमाईसह दुसऱ्या स्थानावर आहे.
  • सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असली तरी सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे.
  • लोकप्रियतेच्या यादीत कोहलीनंतर सलमान आणि शाहरूख यांचा क्रमांक आहे. धोनी चौथ्या आणि अमिताभ बच्चन पाचव्या क्रमांकावर आहेत.
  • सलमान खान २७० कोटींसह सर्वाधिक कमाई करणारा भारतीय सेलिब्रिटी आहे. तर शाहरूख खान २२१.७५ कोटींसह दुसऱ्या स्थानावर आहे.
  • सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत टेलिव्हिजन कॉमेडी शो कलावंत कपिल शर्मा सातव्या स्थानावर आहे.

अशोक स्तंभाचे चित्रकार दिनानाथ भार्गव यांचे निधन

  • राष्ट्रीय बोधचिन्ह अशोक स्तंभाचे डिझाईन करणाऱ्या कलाकारांच्या संचातील सहकलाकार प्रख्यात चित्रकार दिनानाथ भार्गव यांचे इंदूरमध्ये २४ डिसेंबर रोजी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.
  • भार्गव हे एक दशकाहून अधिक काळ हृदयासंबंधी विकारांनी ग्रस्त होते. त्यांच्यावर अॅंजिओप्लास्टीही करण्यात आली होती.
  • १ नोव्हेंबर १९२७ रोजी मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात मुलताई जन्मलेल्या भार्गव यांनी भारतीय संविधानातील पांडुलिपीची काही पानेही तयार केली होती.
  • कला भवन शांती निकेतनचे कलागुरु नंदलाल बोस यांचे ते शिष्य होते. बोस यांनीच संविधानातील पांडुलिपीची पाने तयार करण्यासाठी भार्गव यांची निवड केली होती.
  • कपड्यांमधील प्रसिद्ध मधुबनी पेंटींग ही त्यांचीच देणगी होती. त्यांच्या वॉश पेंटींग चित्रकला जगात प्रसिद्ध होती.
  • १९५०च्या दशकात युरोपमधील वर्ल्ड आर्ट टूरमध्येही त्यांच्या चित्रांचा समावेश करण्यात आला होता. या चित्रांसाठी त्यांना सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले होते.

चालू घडामोडी : २४ डिसेंबर

पासपोर्ट नियमांत मोठे फेरबदल

  • परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी पारपत्र (पासपोर्ट) नियमांत मोठे फेरबदल २३ डिसेंबर रोजी जाहीर केले.
  • पासपोर्ट प्रक्रिया वेगवान आणि सोपी होण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे. नव्या नियमानुसार नागरिकांसाठी अर्ज प्रक्रिया सोपी असेल.
 महत्वाचे बदल : 
  • साधू व संन्यासी यांना आता त्यांच्या जैविक पालकांऐवजी आध्यात्मिक गुरूंच्या नावाचा उल्लेख करण्याची परवानगी. मात्र त्यांना गुरूच्या नावाचा उल्लेख असलेला किमान एक पुरावा द्यावा लागेल.
  • २६ जानेवारी १९८९नंतर जन्मलेल्या सर्व अर्जदारांना पारपत्र मिळण्यासाठी जन्मतारखेचा पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य होते. आताही हे प्रमाणपत्र चालणार असले, तरी ते अनिवार्य असणार नाही.
  • आधार कार्ड, ई-आधार, पॅन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, स्थलांतर प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र, एलआयसी पॉलिसी बाँड, इत्यादी दस्तावेज जन्म तारखेचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जातील.
  • कोणताही जन्म दाखला नसलेल्या अनाथ व्यक्ती आपल्या अनाथालयाच्या प्रमुखाकडून जन्मतारिख निश्चित करून त्याचा अधिकृत दाखला पारपत्र मिळविण्यासाठी जोडू शकतात.
  • आपल्या विभागाकडून ओळखपत्र, नाहरकत प्रमाणपत्र मिळवण्यास अडचणी येत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना आता प्रतिज्ञापत्राद्वारे पासपोर्ट मिळवता येईल.
  • एकल पालकाला पारपत्रात आपल्या जोडीदाराचे नाव जाहीर करण्याची गरज नसेल. त्यांच्या पारपत्रावर जोडीदाराऐवजी पालक किंवा कायदेशीर ताबा असलेल्या व्यक्तीचे नाव देता येईल.
  • अर्जदाराला यापुढे कोणतेही विवाह प्रमाणपत्र सादर करावे लागणार नाही. जर अर्जदार घटस्फोटित असेल, तर त्याला घटस्फोटत प्रमाणपत्रही सादर करण्याची गरज नाही.
  • दत्तक घेतलेल्या मुलांनाही दत्तक घेतल्याचे प्रमाणपत्र सादर न करता, ज्यांनी दत्तक घेतले आहे, त्यांच्याकडून पत्र अर्जासोबत जोडावे लागेल.
  • आई किंवा व‌डिलांचे नाव पासपोर्टवर नमूद केले जाऊ नये अशी अर्जदार व्यक्तीची इच्छा असेल तर तीही आता मान्य होणार आहे.
  • यापुढे कोणतंही अॅनेक्सेस अटेस्टेटड, शपथपत्र, नोटरी करुन देण्याची गरज नाही. सर्व अॅनेक्सेस अर्जदार स्वत: लिहून पासपोर्टसाठी सादर करु शकतो.
  • पासपोर्टसाठी याआधी १५ अॅनेक्सेस असायचे, ते आता १५ वरुन ९  वर आणले आहेत.

युवा भारतीय संघाला आशिया करंडक स्पर्धेचे विजेतेपद

  • भारताने श्रीलंकेवर मात करत तिसऱ्यांदा १९ वर्षांखालील आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. भारताने यापूर्वी २०१२ आणि २००४मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. 
  • कर्णधार अभिषेक शर्माच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने अंतिम सामन्यात यजमान श्रीलंकेचा ३४ धावांनी पराभव केला.
  • भारताने प्रथम फलंदाजी करताना हिमांशु राणा आणि शुभम गिल यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ८ बाद २७३ धावांची मजल मारली होती.
  • भारतीय संघाच्या २७४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव ४८.४ षटकांत २३९ धावांतच संपुष्टात आला.
  • सामन्यात २९ धावा आणि ४ विकेट घेणारा अभिषेक शर्मा सामनावीर ठरला. तर हिमांशू राणाला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.
  • तसेच सर्वोत्कृष्ट एकदिवसीय युवा पदार्पण पुरस्कारासाठी राहुल चहर, कमलेश नागरकोटी आणि हेत पटेल या भारतीयांची निवड करण्यात आली.

नजीब जंग यांचा राजीनामा नामंजूर

  • दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी दिलेला राजीनामा केंद्र सरकारने तूर्तास मंजूर केलेला नाही.
  • सध्या पदावर कायम राहण्याची सूचना जंग यांना करण्यात आली आहे. यामुळे जंग यांना आपला प्रस्तावित गोवा दौरा रद्द करावा लागला आहे. 
  • जंग यांनी यानंतरही आग्रह धरला तर पुढच्या महिन्यात त्यांच्या जागी नवी नियुक्ती केली जाऊ शकते. 

सेहवाग किंग्ज इलेव्हन पंजाबचा प्रशिक्षक

  • भारताचे फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर यांनी किंग्ज इलेव्हन पंजाब या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेतील संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे.
  • त्यामुळे आता पंजाबच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागकडे सोपवण्यात आली आहेत. तो गेली दोन वर्षे या संघाचा सल्लागार म्हणून काम पाहत आहे.
  • २०१४च्या आयपीएल हंगामाआधी सहाय्यक प्रशिक्षकपदाची सूत्रे बांगर यांनी स्वीकारली. त्यानंतर त्यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली.
  • या वेळी पंजाबने आश्चर्यकारक कामगिरीचे प्रदर्शन करताना अंतिम फेरीपर्यंत मजल मारत उपविजेतेपद प्राप्त केले होते.

चालू घडामोडी : २३ डिसेंबर

भारतीय महिलांना आशिया चषक स्पर्धेत ब्रॉंझपदक

  • भारतीय महिला हॉकी संघाने आशिया चषक महिला (१८ वर्षांखालील) हॉकी स्पर्धेत कोरियाचा ३-० असा पराभव करून ब्रॉंझपदक जिंकले. 
  • रितुने ४५व्या मिनिटाला गोल करून भारताचे खाते उघडले. त्यानंतर संगीताने ५५ आणि नंतर ५८व्या मिनिटाला गोल करून भारताचा विजय निश्चित केला.
  • कोरियन खेळाडूंनीदेखील चांगले प्रतिआक्रमण केले. त्यांनी अनेक पेनल्टी कॉर्नरदेखील मिळविले. पण, त्यापैकी एकही सार्थकी लागला नाही.
  • या उल्लेखनीय कामगिरीनंतर हॉकी इंडियाने विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूस एक लाख, तर सपोर्ट स्टाफला ५० हजार रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर केले.

बौद्धिक संपदा हक्क संरक्षण प्राधिकरणाची पुनर्रचना

  • राष्ट्रीय बौद्धिक संपदा अधिकार धोरणांतर्गत सरकारने पीक वाण आणि शेतकऱ्यांच्या हक्कांची जपणूक यासाठी बौद्धिक संपदा हक्क संरक्षण प्राधिकरणाची पुनर्रचना करण्याचे ठरविले आहे.
  • हे संरक्षण प्राधिकरण बौद्धिक संपदा अधिकारांच्या निकषांमध्ये सुधारणा करणे आणि संकरित वाणांमध्ये बौद्धिक संपदेचा वापर करणे यासाठी काम करेल.
  • त्याचप्रमाणे भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या संस्था, राज्यांमधील कृषी विद्यापीठे, एनएसएआय (नॅशनल सीड असोसिएशन ऑफ इंडिया) या संस्थांशीही प्राधिकरणाचे सहकार्य असेल.
  • सरकारने प्राधिकरणाला पालमपूर (हिमाचल प्रदेश), पुणे (महाराष्ट्र) आणि शिवमोगा (कर्नाटक) या तीन ठिकाणी शाखा कार्यालये सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
  • वनस्पतींच्या बौद्धिक संपदा अधिकारांचे त्याचप्रमाणे स्थानिक शेतकऱ्यांनी विकसित केलेल्या बियाण्यांचे संरक्षण यासाठी हे प्राधिकरण महत्त्वाचे आहे.

लिबियाच्या विमानाचे अपहरण आणि सुटका

  • लिबियाच्या आफ्रिकिया एअरवेजच्या एअरबस ए३२० या विमानाचे दोन अपहरणकर्त्यांनी अपहरण केले.
  • हे विमान १११ प्रवासी आणि ७ केबिन क्रू सदस्यांसह लिबियातील सेबावरुन त्रिपोली येथे निघाले होते.
  • हे अपहणकर्ते गद्दाफी समर्थक होते. त्यांनी हे विमान त्रिपोलीऐवजी हे माल्टा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविले होते.
  • आपली मागणी पूर्ण झाल्यास विमानातील सर्व प्रवासी आणि केबिन क्रू सदस्यांची सुटका केली जाईल असे अपहरणकर्त्यांचे म्हणणे होते.
  • त्यानंतर या अपहरणकर्त्यांशी वाटाघाटी यशस्वी झाल्याने सर्व प्रवासी व कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली.
  • अपहरणकर्त्यांशी माल्टामध्ये राजकीय आश्रयाची मागणी केली होती. पण माल्टा सरकारने ही मागणी अमान्य केल्यामुळे अपहरणकर्त्यांनी शरणागती पत्करली.
  • माल्टामध्ये विमान अपहरणाची ही दुसरी मोठी घटना आहे. यापूर्वी १९८५मध्ये माल्टामध्ये इजिप्त एअर ७३७ हे अपह्रत विमान उतरवण्यात आले होते.
  • २४ तासांच्या हिंसक लढ्यानंतर या विमानातील प्रवाशांची सुटका झाली होती. या घटनेत ६२ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

अल्लेप्पो शहरावर सीरियन लष्कराने पूर्ण नियंत्रण

  • वर्ष २०११मध्ये सुरू झालेल्या गृहयुद्धानंतर सुमारे चार वर्षानंतर सीरियन लष्कराने अल्लेप्पो शहरावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे.
  • सीरियातील अल्लेप्पो शहराला बंडखोरांपासून पूर्णपणे मुक्त करण्यात आल्याची घोषणा सीरियाच्या लष्कराकडून करण्यात आली.
  • याबरोबरच गेल्या एक महिन्यांपासून पूर्व अलेप्पोमध्ये सुरू असलेला रक्तरंजित संघर्षही संपुष्टात आला आहे. या आंदोलनात आतापर्यंत ३ लाख १० हजार लोक मारले गेले आहेत.
  • सीरियन लष्कराने आतापर्यंत देशातील अलेप्पो, होम्स, हमा, दमिश्क आणि लताकिया या पाच प्रमुख शहरांवर नियंत्रण मिळवले आहे..
  • सीरियाचे  राष्ट्राध्यक्ष: बशर अल असद

चालू घडामोडी : २२ डिसेंबर

अश्विनला क्रिकेटर ऑफ द इअर पुरस्कार

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडूच्या (आयसीसी) ‘क्रिकेटर ऑफ द इअर’ पुरस्कारासाठी भारताचा अष्टपैलू खेळाडू रवीचंद्रन अश्विनची निवड झाली आहे.
  • यासाठी आश्विनला सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफीने गौरविण्यात येईल. ही ट्रॉफी जिंकणारा आश्विन भारतात तिसरा तसेच जगात १२वा खेळाडू आहे.
  • याआधी २००४ मध्ये राहुल द्रविड आणि २०१० मध्ये सचिन तेंडुलकर यांना हा पुरस्कार मिळाला होता.
  • याशिवाय अश्विनला ‘टेस्ट क्रिकेटर ऑफ द इअर’चाही पुरस्कार मिळाला आहे. राहुल द्रविड (२००४) आणि गौतम गंभीर (२००९) यांच्यानंतर हा पुरस्कार मिळवणारा अश्विन भारताचा तिसरा क्रिकेटपटू आहे. 
  • सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आणि सर्वोत्कृष्ट कसोटीपटू हे दोन्ही पुरस्कार एकाच वर्षी मिळवणारा अश्विन हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी द्रविडने २००४मध्ये हा पराक्रम केला होता.
  • याशिवाय आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी संघामध्ये स्थान मिळवणारा अश्विन हा एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे.
  • आयसीसीच्या कसोटी संघाचे नेतृत्त्व इंग्लंडच्या अॅलिस्टर कुक याला तर एकदिवसीय संघाचे नेतृत्त्व विराट कोहलीला देण्यात आले आहे.
  • आयसीसीच्या एकदिवसीय संघात रवींद्र जडेजा आणि रोहित शर्मा यांनाही स्थान मिळाले आहे.
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात १४ सप्टेंबर २०१५ ते २० सप्टेंबर २०१६ या वर्षभरात केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या आधारावर पुरस्कार दिले जातात.
पुरस्कार खेळाडू
सर्वोत्कृष्ट एकदिवसीय खेळाडू क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका)
टी-२० परफॉर्मर ऑफ द इयर कार्लोस ब्रेथवेट (वेस्ट इंडीज)
स्पिरीट ऑफ क्रिकेट मिस्बा उल हक (पाकिस्तान)
युवा प्रतिभावान खेळाडू मुस्तफिझूर रेहमान (बांगलादेश)
आयसीसीच्या सहयोगी देशांतील सर्वोत्कृष्ट खेळाडू मोहम्मद शेहजाद (अफगाणिस्तान)
सर्वोत्कृष्ट एकदिवसीय खेळाडू (महिला) सुझी बेट्स (न्यूझीलंड)
सर्वोत्कृष्ट टी-२० खेळाडू (महिला) सुझी बेट्स (न्यूझीलंड)
सर्वोत्कृष्ट पंच मरेइस इरॅस्मस

दिल्लीते नायब राज्यपाल नजीब जंग यांचा राजीनामा

  • दिल्लीते नायब राज्यपाल नजीब जंग यांनी गृहमंत्रालयाकडे राजीनामा दिला आहे. राजीनाम्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
  • जंग यांचा कार्यकाळ संपण्यासाठी दीड वर्षांचा कालावधी बाकी असताना त्यांनी राजीनामा दिला आहे.
  • आप सरकार दिल्लीत सत्तेत आल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी यांच्याशी जंग यांचे सातत्याने खटके उडाले.
  • जंग हे ‘केंद्र सरकारचे हस्तक’ असून दिल्ली सरकारच्या कामात ते अडथळे आणतात अशी टीका केजरीवाल वारंवार करायचे.
  • ६५ वर्षीय नजीब जंग हे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. तसेच, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचे ते उपकुलगुरुही होते.
  • २०१३च्या जुलैमध्ये त्यांनी दिल्लीचे नायब राज्यपालपद स्वीकारले होते. जंग हे दिल्लीचे २०वे नायब राज्यपाल आहेत.

बीएफआयला आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनचे पूर्ण सदस्यत्व

  • सप्टेंबरमध्ये कार्यान्वित झालेल्या भारतीय बॉक्सिंग महासंघास (बीएफआय) आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनचे पूर्ण सदस्यत्व देण्यात आले आहे.
  • मॉन्ट्र्यू, स्वीत्झर्लंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनच्या ७०व्या वार्षिक बैठकीत बीएफआयला पूर्ण सदस्यत्व दिले आहे.
  • पण भारतीय ऑलिंपिक संघटनेने अजय सिंग अध्यक्ष असलेल्या या महासंघास अद्याप मान्यता दिलेली नाही.
  • चार वर्षांपूर्वी म्हणजे २०१२मध्ये निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याने भारतीय हौशी बॉक्सिंग महासंघ बरखास्त करण्यात आला होता.
  • त्यानंतर दोन वर्षांतच बॉक्सिंग इंडियाची स्थापना झाली; पण दीड वर्षात नव्या कार्यकारिणीविरुद्ध अविश्वास ठराव संमत झाला.
  • सप्टेंबर २०१६मध्ये भारतीय बॉक्सिंग महासंघाची स्थापना झाली. बीएफआयला मिळालेल्या सदस्यत्वामुळे भारतीय बॉक्सरच्या आंतरराष्ट्रीय सहभागाचा मार्ग मोकळा झाला आहे.

गांधीवादी कार्यकर्ते अनुपम मिश्र यांचे निधन

  • नर्मदा प्रश्नावर पहिल्यांदा आवाज उठविणारे पर्यावरणवादी व गांधीवादी कार्यकर्ते अनुपम मिश्र यांचे १९ डिसेंबर रोजी निधन झाले.
  • त्यांचे व्यक्तिमत्त्व गांधीवाद्याला साजेसेच साधे, सरळ, विनम्र, हसतमुख होते. त्यांचे नुकतेच निधन झाले.
  • ‘गांधी मार्ग’ या नियतकालिकाचे ते संपादक होते. त्यांच्याच प्रयत्नातून ‘सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एनव्हायर्नमेंट’ ही संस्था स्थापन झाली.
  • पर्यावरणातील विचारवंतही म्हणून त्यांचे नाव घेतले जात होते. ‘राजस्थान की रजत बूँदे’ व ‘आज भी खरे है तालाब’ ही पुस्तके त्यांनी लिहिली.
  • त्यांनी पर्यावरणाचा बारकाईने अभ्यास केला, अनेक योजनांतील दोष दाखवून दिले. उत्तराखंड व राजस्थानात बंद जलस्रोतांचे पुनरुज्जीवन त्यांनी केले होते. 
  • त्यांचा जन्म महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण दिल्ली विद्यापीठातून झाले. दिल्लीत त्यांनी ‘गांधी शांती प्रतिष्ठान’ची स्थापना केली.
  • त्यांच्या ‘आज भी खरे हैं तालाब’ या पुस्तकाला २०११मध्ये जमनालाल बजाज पुरस्कार मिळाला होता. मध्यप्रदेश सरकारने त्यांना चंद्रशेखर आजाद पुरस्कार देऊन सन्मानित केले.

गिरिजा वैद्यनाथन तामिळनाडूच्या मुख्य सचिव

  • प्राप्तिकर विभागाच्या धाडींमुळे वादात सापडलेले पी. रामा मोहन राव यांच्या जागी तामिळनाडूच्या मुख्य सचिव म्हणून डॉ. गिरिजा वैद्यनाथन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • मुख्य सचिवपदासोबत गिरिजा वैद्यनाथन दक्षता आयुक्त व प्रशासकीय सुधारणा आयुक्तपदाचाही अतिरिक्त पदभार सांभाळतील.
  • गिरिजा वैद्यनाथन या १९८२च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे १९९० ते १९९३ या काळात गव्हर्नर असलेले एस. वेंकटीरमणन यांच्या त्या कन्या आहेत.

टाटा स्टीलच्या संचालकपदावरुन वाडियांना हटविले

  • टाटा स्टीलच्या स्वतंत्र संचालकपदावरुन नसली वाडिया यांना काढून टाकण्यात आले आहे.
  • विशेष सर्वसाधारण बैठकीत ९०.८ टक्के समभागधारकांनी त्यांना काढून टाकण्याच्या प्रस्तावाला अनुमोदन दिले.
  • यानंतर त्यांनी आपल्या समभागधारकांना एक विस्तृत पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्यावर झालेल्या आरोपांना उत्तर दिले आहे.
  • नसली वाडिया आणि सायरस मिस्त्री यांनी दोघांनी मिळून संचालक मंडळाला स्वतःच्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न केला होता असा आरोप रतन टाटांनी केला होता.
  • तर मागील आठवड्यात वाडिया यांनी टाटा सन्सचे पदाधिकारी आणि रतन टाटा यांच्यावर ३,००० कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा खटला टाकला होता.

द. अफ्रिकेच्या पीटरसनवर दोन वर्षांची बंदी

  • द. अफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू अल्विरो पीटरसन याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
  • भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. ही बंदी १२ नोव्हेंबरपासून लागू राहील.
  • दक्षिण अफ्रिकेसाठी ३६ कसोटी सामने खेळलेला पीटरसन भ्रष्टाचाराच्या आरोपात बंदीची शिक्षा भोगणारा सहावा खेळाडू आहे.

पीएसआय परीक्षेसाठीची वयोमर्यादेत वाढ

  • पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदाच्या परीक्षेसाठीची वयोमर्यादा वाढविण्यात आली असून, त्यासंबंधीची सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केली आहे.
  • आता पोलिस उपनिरीक्षक पदाच्या भरतीकरीता कमाल वयोमर्यादा खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी ३१ वर्षे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३४ वर्षे करण्यात आली आहे.
  • या सुधारित निर्णयामुळे पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना पुढील वर्षीच्या पोलिस उपनिरीक्षक पूर्वपरीक्षेसाठी अर्ज भरण्यासाठीची मुदत वाढविण्यात आली आहे.
  • अर्ज सादर करून ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची मुदत ३१ डिसेंबर २०१६ आहे. त्यानंतर ती वेबलिंक बंद होईल. 
  • तसेच, स्टेट बँकेत शुल्क भरावयाचे असल्यास त्यासाठी आवश्यक चलनाची प्रिंट आऊट ३१ डिसेंबरपर्यंतच घेता येईल. ते चलन बँकेत २ जानेवारीपर्यंतच स्वीकारले जाणार आहे. त्यानंतर भरलेले शुल्क अवैध ठरेल.

चालू घडामोडी : २१ डिसेंबर

आसाराम लोमटे यांना साहित्य अकादमी पुरस्कार

  • ‘आलोक’ या कथासंग्रहातून खेड्यातील वास्तवाचे भेदक चित्रण करणारे आसाराम लोमटे यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • २२ फेब्रुवारी रोजी आसाराम लोमटे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. १ लाख रुपये रोख आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असते.
  • आलोक या कथासंग्रहासाठी त्यांना मराठी भाषेसाठीचा हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • या कादंबरीत सहा कथांचा समावेश असून कथासंग्रहातून लोमटे यांनी ग्रामीण भागातील वास्तव मांडले होते.
  • कोंकणी भाषेसाठीच्या साहित्य अकादमी पुरस्कारासाठी काले बांगर या कादंबरीसाठी अॅडविन जे एफ डिसूझा यांची निवड झाली आहे.
  • २८ भाषांसाठीचे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आले असून तर साहित्य अकादमी भाषा सन्मान या पुरस्कारासाठी ६ साहित्यिकांची निवड करण्यात आली आहे.

आरबीआयकडून ५ आंतरराष्ट्रीय बँकांवर कारवाई

  • नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ५ आंतरराष्ट्रीय बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
  • यात बँक ऑफ अमेरिका, बँक ऑफ टोकिओ-मित्सुबिशी, डॉएश बँक, बँक ऑफ स्कॉटलंड, स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेचा समावेश आहे.
  • या बँकांवर परकीय विनिमय व्यवस्थापन कायद्याचे (फेमा) उल्लंघन केल्यामुळे रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे.
  • या प्रकरणात बँक ऑफ अमेरिका, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, आरबीएस आणि बँक ऑफ टोकियो मित्सुबिशी तया बँकांना १० हजार तर जर्मनीच्या डच बँकेला २० हजारांचा दंड ठोठावण्यात आल आहे.
  • आरबीआयने फेमा १९९९च्या कलम ११(३)अंतर्गत ही कारवाई करताना खाते, सूचना, निर्देश, मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
  • आरबीआयने या बँकांना बजावलेल्या नोटीसला बँकांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

२०० निष्क्रिय राजकीय पक्षांची नोंदणी रद्द

  • केवळ कागदोपत्रीच अस्तित्व असलेल्या आणि २००५पासून एकही निवडणूक न लढविलेल्या सुमारे २०० राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.
  • या २०० राजकीय पक्षांपैकी बहुसंख्य पक्ष केवळ देणग्यांच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करण्याचे काम करीत असल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले आहे.
  • येत्या काही दिवसांत आयोग या पक्षांची यादी आयकर विभागाला कळवणार असून, हे पक्ष आर्थिक गैरव्यवहारात गुंतले असल्यास त्यांच्यावर योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
  • निवडणूक आयोगाने आतापर्यंत देशभरातील सतराशे ऐशी राजकीय पक्षांना मान्यता दिली आहे.
  • यातील भाजप, काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, तृणमूल काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे सात पक्ष राष्ट्रीय आहेत. तर, ५८ पक्ष राज्यस्तरावर कार्यरत आहेत.

औद्योगिक क्षेत्रात कॅशलेस वेतन

  • केंद्र सरकारने वेतनविषयक दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील वेतन चेक व इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करावे लागणार आहे.
  • ज्या आस्थापनांमध्ये १० किंवा त्याहून अधिक कामगार आहेत आणि ज्यांचे वेतन १८ हजार रुपये किंवा त्याहून अधिक आहे, त्यांचे वेतन रोखीने न देता चेक अथवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करावे लागेल.
  • या वेतनविषयक कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार असली तरी कामगारांना रोखीने पगार देण्याचा पर्याय बंद करण्यात आलेला नाही.
  • जिथे रोजंदारीने काम करणारे कामगार आहेत वा ज्या कामगारांचे वेतन १८ हजार रुपयांहून कमी आहे, तिथे त्यांना रोख रकमेत पगार देता येईल.
  • वेतन कायदा (दुरुस्ती) २०१६नुसार मूळ कायद्याच्या कलम ६मध्ये दुरुस्ती करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने वटहुकुमाचा मार्ग निवडला आहे.
  • नव्या नियमांना तत्काळ क्रियान्वित करण्यासाठी सरकार वटहुकूम आणते. मात्र वटहुकूम सहा महिन्यांसाठी वैध असतो.
  • या काळात वटहुकुमाचे नियमित कायद्यात रूपांतर करण्यासाठी त्याबातचे विधेयक संसदेत मांडून मंजूर करून घेणे आवश्यक असते.

एआयएफएफच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल

  • प्रफुल्ल पटेल यांची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) अध्यक्ष म्हणून पुढील चार वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे.
  • निवडणूक अधिकारी न्या. चंद्र कांडपाल (सेवानिवृत्त) यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
  • पटेल यांना २०१७-२०२० या कालावधीसाठी अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले. हा त्यांचा अध्यक्षपदाचा सलग तिसरा कार्यकाळ आहे.
  • एआयएफएफचे तत्कालीन अध्यक्ष प्रियरंजन दासमुन्शी २००८मध्ये आजारी पडल्यानंतर पटेल प्रभारी अध्यक्षपदी विराजमान झाले होते.

चालू घडामोडी : २० डिसेंबर

२०१६ची विश्वसुंदरी स्टेफनी डेल व्हॅले

  • पोर्तु रिकोच्या स्टेफनी डेल व्हॅले या सौंदर्यवतीने ‘मिस वर्ल्ड २०१६’ (विश्वसुंदरी) हा मानाचा किताब पटकाविला आहे.
  • १९५१मध्ये ब्रिटनमध्ये सुरू झालेल्या या सर्वात जुन्या जागतिक सौंदर्य स्पर्धेचे यंदाचे ६६वे वर्ष होते. ही स्पर्धा ऑक्सन हिल, मेरीलॅण्ड, अमेरिका येथे झाली.
  • परीक्षकांनी जगभरातील ११७ स्पर्धकांमधून स्टेफनीची ‘मिस वर्ल्ड’ म्हणून निवड केली.
  • गेल्या वर्षी मिस वर्ल्डचा किताब जिंकलेल्या स्पेनच्या मेरिया लालागुना हिने डेल व्हॅलेला मिस वर्ल्डचा किताब प्रदान केला.
  • १९ वर्षीय विद्यार्थी असलेल्या डेल व्हॅलेला स्पॅनिश, फ्रेंच आणि इंग्रजी या भाषा अवगत आहेत.
  • कॅरेबियन आयलँडच्या विल्नेलिया मर्सेडनंतर (१९७५) हा किताब पटकाविणारी डेल व्हॅले ही दुसरी कॅरेबियन सौंदर्यवती आहे.
  • डॉमिनिकन रिपब्लीकची यारित्झा मिग्युलिना रेज रमिरेझ हिने दुसरे स्थान तर इंडोनेशियाच्या नताशा मॅन्युएला हिने तिसरे स्थान पटकाविले.
  • मिस फिलीपिन्स कैट्रीओना एलिसा ग्रे आणि मिस केनिया एवलिन एनजाम्बी यांनी अंतिम फेरीत शेवटच्या पाच स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले होते.
  • या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व प्रियदर्शनी चॅटर्जी हिने केले. प्रियदर्शनीने ‘मिस इंडिया वर्ल्ड २०१६’ हा खिताब जिंकला आहे.

डिजिटल लघुउद्योगांना प्राप्तिकरात सवलत

  • लघुउद्योगांमध्ये रोखरहित (कॅशलेस) व्यवहारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने प्राप्तिकरात सवलत देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे.
  • सरकारच्या धोरणानुसार असे व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांना ‘डिजिटल पेमेंट’वरील करातही सूट मिळणार आहे.
  • दरवर्षी २ कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या व्यापाऱ्यांचे अंदाजित उत्पन्न ८ टक्के (१६ लाख) मानून त्यावर प्राप्तीकर आकारण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली होती.
  • परंतु, हे व्यापारी जर रोखरहित (कॅशलेस) व्यवहार करायला तयार असतील तर त्यांचं अंदाजित उत्पन्न सहा टक्के (१२ लाख) गृहित धरून कर आकारणी केली जाणार आहे.
  • याशिवाय त्यांना ‘डिजिटल पेमेंट’वर आकारल्या जाणाऱ्या ८ टक्के करातही सूट देण्यात येणार आहे.
  • काळा पैसा आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी जनतेला डिजिटल अर्थव्यवस्थेकडे वळवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे.
  • रोखरहित प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने लकी ग्राहक योजना आणि डिजि-धन व्यापार योजनादेखील जाहीर केल्या आहेत.

डॉक्टर हेन्री हेम्लिच यांचे निधन

  • श्वास अवरोध होऊन उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर प्रथमोपचार शोधून काढणारे अमेरिकेचे डॉक्टर हेन्री हेम्लिच यांचे १७ डिसेंबर रोजी निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते.
  • १९७०मध्ये त्यांनी व्यक्तीच्या ओटीपोटात विशिष्ट पद्धतीने दाब देऊन श्वासनलिका व अन्ननलिका मोकळी करण्याचे तंत्र शोधले.
  • त्यांच्या या तंत्राने ४० वर्षांत अनेकांचे प्राण वाचले. ही पद्धती ‘हेम्लिच मॅन्युव्हर’ म्हणून ओळखली जाते.
  • अशा अटीतटीच्या प्रसंगी प्राण वाचवणाऱ्या काही उपकरणांचे पेटंटही त्यांनी घेतले होते.
  • त्यांच्या या तंत्राची कुचेष्टा झाली असली तरी नंतर त्याला जगात मान्यता मिळाली.
  • व्हिएतनाम युद्धात त्यांच्या ‘हेम्लिच चेस्ट ड्रेन व्हॉल्व्ह’ने अनेक सैनिकांचे प्राण युद्धभूमीवर वाचवले.
  • हेन्री हेम्लिच यांचा जन्म डेलावरमधील विलमिंग्टन येथे झाला. त्यांचे वडील सामाजिक कार्यकर्ते होते.
  • वेल कॉर्नेल मेडिकल कॉलेजमधून ते १९४३मध्ये पदवीधर झाले. नंतर छातीचे शल्यचिकित्सक झाले. ते निवासी डॉक्टर म्हणून काम करीत होते.
  • सिनसिनाटीच्या झेवियर विद्यापीठात ते प्राध्यापक होते, तर हेम्लिच इन्स्टिटय़ूटचे अध्यक्षही होते.
  • त्यांची पत्नी जेन हिने त्यांच्यासमवेत ‘व्हॉट डॉक्टर वोंट टेल यू’ नावाचे एक पुस्तक लिहिले  आहे.

हाँगकाँगला जाण्यासाठी भारतीय पर्यटकांना व्हिसा अनिवार्य

  • भारतातून हाँगकाँगला जाण्यासाठी आता भारतीय पर्यटकांना व्हिसा घ्यावा लागणार आहे. याआधी भारतातून हाँगकाँगला जाण्यासाठी व्हिसा लागत नसे.
  • नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून भारतीय पर्यटकांना हाँगकाँगला जाण्यासाठी प्री-अराइव्हल रजिस्ट्रेशन किंवा जाण्यापूर्वी नोंदणी करावी लागणार आहे.
  • आतापर्यंत, १४ दिवसांपेक्षा कमी काळ हाँगकाँगमध्ये राहण्यासाठी व्हिसाची आवश्यकता नव्हती.
  • हाँगकाँगमध्ये आसरा घेणाऱ्या निर्वासितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत होती त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
  • दरवर्षी हाँगकाँगला हजारो निर्वासितांचे अर्ज येतात. या निर्वासितांना परवानगी मिळेपर्यंत त्यांना तेथे राहण्याची आणि खाण्याची मोफत व्यवस्था केली जाते.
  • भारताव्यतिरिक्त पाकिस्तान, व्हिएतनाम, बांग्लादेश या देशातून अनेक निर्वासित अर्ज करतात.

एटीकेला दुसऱ्यांदा आयएसएलचे जेतेपद

  • अटीतटीच्या लढतीत पेनल्टी शूटआऊटवर ऍटलेटिको द कोलकता (एटीके) संघाने हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद मिळविले.
  • सौरव गांगुलीची सहमालकी असलेल्या एटीके संघाने केरळा ब्लास्टर्सला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-३ अशा फरकाने हरवून दुसऱ्यांदा विजेतेपद पटकाविले.
  • तर सचिन तेंडुलकरची सहमालकी असलेल्या केरळास दुसऱ्यांदा या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
  • नवी मुंबईत दोन वर्षांपूर्वी झालेल्या अंतिम लढतीत कोलकताने केरळास एका गोलने हरवून जेतेपद मिळविले होते.

तमिळनाडूतील शरिया न्यायालयांवर बंदी

  • तमिळनाडूतील मशिदींमध्ये भरणाऱ्या शरिया न्यायालयांवर मद्रास उच्च न्यायालयाने बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.
  • अनिवासी भारतीय अब्दुल रहमान यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायाधीश संजय कौल व एम. सुंदर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
  • चेन्नईतील अण्णा सलाई मशिदीत अगदी न्यायव्यस्थेनुसार न्यायालय सुरू असल्याचे निदर्शनास आणून देत अशा ठिकाणी फक्त प्रार्थना होणे अपेक्षित असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
  • या न्यायालयांत समन्स बजावणे, विवाह, तलाकसंबंधी प्रकरणांवर सुनावणी घेणे, अशी अन्य कामे पार पडतात.
  • राज्य सरकारने अशा शरिया न्यायालयांवर बंदी घालून त्याबाबतचा अहवाल चार आठवड्यात न्यायालयास सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

रेयाल माद्रिदला क्लब विश्वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद

  • स्ट्रायकर ख्रिस्तिआनो रोनाल्डोच्या हॅटट्रिकच्या जोरावर रेयाल माद्रिदने कशिमा अँटलर्सचा ४-२ असा पराभव करून क्लब विश्वकरंडक स्पर्धेत विजेतेपद मिळविले.
  • रोनाल्डोसाठी हे विजेतेपद खास ठरले. या वर्षी त्याने चॅंपियन्स लीग, युरोपियन चॅंपियन्स लीग अशा दोन विजेतेपदाबरोबरच वर्षातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा किताबही मिळविला आहे.
  • क्लब विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रेयालसाठी रोनाल्डोने तीन, तर करीम बेन्झेंमाने एक गोल केला. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी रोनाल्डोच ‘गोल्डन बॉल’चा मानकरी ठरला.

पाकिस्तानमध्येही नोटाबंदी

  • काळ्या पैशावर नियंत्रणासाठी भारताने घेतेल्या नोटबंदीच्या निर्णयाचे अनुकरण पाकिस्तानने केले आहे.
  • काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी पाच हजाराची नोट बंद करण्याचा प्रस्ताव पाकिस्तानच्या संसदेत बहूमताने पारित करण्यात आला आहे.
  • पाच हजाराची नोट चलनातून रद्द केल्याने देशातील भ्रष्टाचार व काळ्यापैशावर नियंत्रण आणणे सोपे होणार असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे.
  • त्यानुसार येत्या तीन ते पाच वर्षांत पाच हजार रुपयांच्या नोटा टप्प्याटप्प्याने मागे घेण्यात येणार आहेत.