जपानी वंशाचे प्रसिद्ध ब्रिटिश कादंबरीकार, साहित्यिक कझुओ इशिगुरो यांना यंदाचा साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
‘नॉवेल्स ऑफ ग्रेट इमोशनल फोर्स’या त्यांच्या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. जगाशी जोडल्या गेलेल्या भ्रामक भावनांचा उलगडा त्यांनी आपल्या या पुस्तकातून केला.
नोबेल पुरस्काराच्या रुपात इशिगुरो यांना सुमारे ११ लाख डॉलर इतकी रक्कम प्राप्त होणार आहे. भारतीय चलनात याची किंमत सहा कोटी रुपयांहून अधिक आहे.
इशिगुरो यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९५४ ला जपानमधील नागासाकी येथे झाला. १९६०मध्ये त्यांचे कुटुंब ब्रिटनला स्थलांतरीत झाले. १९८२मध्ये त्यांना ब्रिटनचे नागरिकत्व मिळाले.
इशिगुरो यांनी केंट विद्यापीठातून इंग्रजी आणि तत्वज्ञान या विषयात बीएची पदवी संपादन केली. पुढे इस्ट विद्यापीठातून त्यांनी क्रिएटीव्ह रायटिंगमध्ये एमएची पदवी मिळवली.
इशिगोरो यांनी आठ पुस्तके लिहीली आहेत. त्याचबरोबर त्यांनी सिनेमा आणि टिव्ही कार्यक्रमांसाठी लेखनही केले आहे.
२००५मध्ये जगप्रसिद्ध टाईम या मासिकाने ‘नेव्हर लेट मी गो’ या कादंबरीसाठी सर्वोत्कृष्ट शंभर इंग्रजी लेखकांमध्ये इशिगुरो यांना स्थान दिले होते.
याशिवाय २००८मध्ये १९९५ पासूनच्या सर्वोत्कृष्ट ५० ब्रिटिश लेखकांच्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला होता.
त्यांच्या ‘द रिमेन्स ऑफ द डे’ या जगप्रसिद्ध कादंबरीसाठी त्यांना यापूर्वी मॅन बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या कादंबरीवर एक सिनेमाही येऊन गेला आहे.
गेल्यावर्षी साहित्याचे नोबेल गायक, गीतकार बाब डिलन यांना जाहीर करुन नोबेल समितीने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
‘गितांजली’साठी रविंद्रनाथ टागोर यांना १९१३साली नोबेल पुरस्कार मिळाला आहे. नोबेल पुरस्कार प्राप्त झालेले रविद्रनाथ हे एकमेव भारतीय साहित्यिक आहेत.
डब्लूएचओच्या उपमहासंचालकपदी डॉ. सौम्या स्वामिनाथन
प्रसिध्द भारतीय बालरोगतज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन यांची जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्लूएचओ) उपमहासंचालक या अत्यंत जबाबदारीच्या आणि महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
१४ देशांतील विविध प्रतिनिधींनी डॉ. सौम्या यांच्या आजवरच्या कार्याची दखल घेऊन त्यांची या मानाच्या पदावर नियुक्ती केली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेत एवढ्या मोठ्या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय आहेत.
भारतात मुकेश अंबानी सर्वाधिक श्रीमंत
फोर्ब्ज मॅगझिनने जाहीर केलेल्या भारतातील १०० सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांनी सलग दहाव्या वर्षी पहिला क्रमांक पटकावला आहे.
या यादीमध्ये अझीम प्रेमजी दुसऱ्या, हिंदुजा बंधू तिसऱ्या तर लक्ष्मी मित्तल चौथ्या स्थानावर आहेत.
यादीतील पहिले दहा व्यक्ती
क्र.
नाव
संपत्ती (अब्ज डॉलर)
१.
मुकेश अंबानी
३८
२.
अझीम प्रेमजी
१९
३.
हिंदुजा बंधू
१८.४
४.
लक्ष्मी मित्तल
१६.५
५.
पालोनजी मिस्त्री
१६
६.
गोदरेज कुटुंब
१४.२
७.
शिव नाडर
१३.६
८.
कुमार बिर्ला
१२.६
९.
दिलीप संघवी
१२.१
१०.
गौतम अदानी
११
‘सपा’च्या अध्यक्षपदी पुन्हा अखिलेश यादव
अखिलेश यादव यांची एकमताने पुढील पाच वर्षांसाठी समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुन्हा निवड झाली आहे.
पक्षावर आपली पकड घट्ट करीत अखिलेश यांनी वडील मुलायमसिंह यादव आणि चुलते शिवपाल यादव यांना बाजूला सारत पुन्हा एकदा पक्षाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे.
त्यामुळे २०१९मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका समाजवादी पक्षाकडून अखिलेश यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा