केंद्र सरकारचे सॉलिसिटर जनरल रणजीत कुमार यांनी २० ऑक्टोबर रोजी वैयक्तिक कारणांमुळे पदाचा राजीनामा दिला.
सॉलिसीटर जनरल हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात वरिष्ठ कायदा अधिकारी पद आहे. (पहिले: अॅटर्नी जनरल किंवा महाधिवक्ता )
काही महिन्यांपूर्वीच मुकूल रोहतगी यांनीदेखील अॅटर्नी जनरल पदाचा राजीनामा दिला होता. त्यापाठोपाठ रणजीतकुमार यांनी राजीनामा दिला आहे.
केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर तत्कालीन सॉलिसिटर जनरल मोहन पराशरन यांनी राजीनामा दिला होता.
त्यानंतर जून २०१४मध्ये रणजीत कुमार यांची सॉलिसिटर जनरल पदावर नियुक्ती करण्यात आली होती. तसेच जून २०१७मध्ये त्यांना एक वर्षासाठी मुदतवाढ दिली होती.
घटनात्मक कायदे, नागरी सेवा, करसंबंधीच्या कायद्यांविषयीचे जाणकार म्हणून त्यांना ओळखले जाते.
यापूर्वी कुमार यांनी गुजरात सरकारसाठी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिले होते. सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकप्रकरणात त्यांनी गुजरात सरकारची बाजू सुप्रीम कोर्टात मांडली होती.
गुगल भारतातील सर्वाधिक विश्वसनीय ब्रॅण्ड
न्यूयॉर्कमधील ‘कोन अॅण्ड वोल्फ’ या एजन्सीने केलेल्या सर्वेक्षणानुसार, सर्च इंजिन गुगल हे भारतातील सर्वाधिक विश्वसनीय ब्रॅण्ड ठरले आहे.
गुगलनंतर भारतीयांना मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉन, मारुती सुझुकी आणि अॅपल या ब्रॅण्ड्सबद्दल विश्वास वाटतो.
जगभरातील विश्वसनीय ब्रॅण्ड्सच्या यादीत अॅमेझॉनने पहिला क्रमांक पटकावला आहे. अॅमेझॉननंतर अॅपल, मायक्रोसॉफ्ट, गुगल, पेपाल यांचा क्रमांक लागतो.
वस्तूंची खरेदी करताना भारतातील लोक ब्रॅण्ड्सच्या विश्वसनीयतेचा गांभीर्याने विचार करत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.
भारतातील ६७ टक्के लोक वस्तू खरेदी करताना त्या वस्तूची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या विश्वासार्हतेचा विचार करतात, असे हे सर्वेक्षण सांगते.
जगभरातील विश्वसनीय ब्रॅण्डचा विचार केल्यास जगभरातील पहिल्या १० विश्वसनीय ब्रॅण्डपैकी ७ ब्रॅण्ड हे तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित आहेत.
जगभरातील सर्वात मोठ्या बाजारपेठांमधील १५ हजारांहून अधिक ग्राहकांशी संवाद साधून कोन अॅण्ड वोल्फने हा सर्वेक्षण अहवाल तयार केला आहे.
भारतातील प्रदूषणाची स्थिती चिंताजनक
लान्सेट या प्रतिष्ठित वैद्यकीय नियतकालिकाने जगभरातील देशांमधील प्रदूषण, त्याचा लोकांवर परिणाम आणि त्यामुळे होणारे मृत्यू यांचा अभ्यास केला.
यामध्ये देशातील हवा (वायू) आणि पाणी किती प्रदूषित आहेत, याचा आढावा घेण्यात आला.
हवा आणि पाणी यामधील प्रदूषण कोणत्या देशात, किती जणांच्या जीवावर बेतले, याबद्दलची आकडेवारी नियतकालिकाने प्रसिद्ध केली आहे.
लान्सेटकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या ४० हून अधिक प्रख्यात लेखकांचा सहभाग होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा