चालू घडामोडी : १६ ऑक्टोबर

आयएनएस किल्तान भारतीय नौदलात दाखल

 • शत्रूच्या पाणबुड्यांचा खात्मा करणारी आयएनएस किल्तान ही युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झाली आहे.
 • संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आणि नौदलाचे प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
 • शिवालिक, कोलकत्ता क्लासमधील युद्धनौकानंतर आयएनएस किल्तान ही भारतातच विकसित करण्यात आलेली स्वदेशी बनावटीची युध्दनौका आहे. 
 • किल्तानची निर्मिती ‘मेक इन इंडिया’च्या अंतर्गत करण्यात आली असून, डायरेक्टोरेट ऑफ नेवल डिजाइनने किल्तानचे डिझाईन केले आहे. 
 • कोलकाता येथील गार्डन रीच शिपबिल्डर्स ॲण्ड इंजीनियर्सकडून या युद्धनौकेची उभारणी करण्यात आली आहे.
 • आयएनएस किल्तान ही कमोरटा वर्गातील तिसरी युद्धनौका असून, आयएनएस किल्तानमुळे भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढले आहे.
 • पाणबुडीविरोधी तंत्रज्ञान हे किल्तानचे खास वैशिष्टय आहे. समुद्राखालून जाणाऱ्या पाणबुड्या उद्ध्वस्त करण्याची क्षमता किल्तानमध्ये आहे.
 • किल्तानमध्ये हेवीवेट टॉर्पिडोज, एएसडब्ल्यू रॉकेटस, मल्टी बॅरल गन्स आणि मिसाईल सिस्टम अशा घातक शस्त्रास्त्रांसह सेन्सरही लावण्यात आले आहेत. 
 • किल्तानवर समुद्राच्या पोटात शोध घेणारे अत्याधुनिक सोनार आणि हवाई हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या रेवती या दोन रडार यंत्रणा आहेत.
 फायबरचा वापर करुन बांधलेली पहिली युद्धनौका 
 • किल्तानच्या बांधणीत कार्बन फायबरचा वापर करण्यात आला आहे. फायबरचा वापर करुन बांधलेली ही पहिलीच भारतीय युद्धनौका आहे.
 • कार्बन फायबरमुळे स्टेल्थ क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. स्टेल्थ तंत्रज्ञानामुळे शत्रूच्या रडारला चकवा देता येतो. त्यामुळे शत्रूच्या प्रदेशात घुसून हल्ला करणे सोपे होते.
 • तसेच फायबरच्या वापरामुळे युद्धनौकेचे वजन कमी होते. याशिवाय युद्धनौकेची देखभाल करणेदेखील सोपे जाते.
 किल्तान हे नाव कशामुळे दिले? 
 • किल्तान हे लक्षद्वीप बेटसमूहाचा भाग आहे. त्यामुळेच या युध्दनौकेला आयएनएस किल्तान नाव देण्यात आले आहे.
 • दिल्लीपासून हे बेट १९४७ किलोमीटर अंतरावर आहे. त्या बेटाची लोकसंख्या ४०४१ इतकीच आहे.
 • एके काळी पर्शियन आखाताहून श्रीलंके (सिलोन)कडे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या मार्गातील हे बेट महत्त्वाचे ठिकाण म्हणून ओळखले जात असे.

पॉवरलिफ्टर कविता देवी डब्लूडब्लूईमध्ये

 • भारताच्या द ग्रेट खली आणि जिंदर महल यांच्यानंतर आता पॉवरलिफ्टर चॅम्पियन कविता देवी डब्लूडब्लूई (वर्ल्ड रेसलिंग इन्टरटेंनमेंट)मध्ये सहभागी होणार आहे.
 • कविता देवी डब्लूडब्लूईमधील पहिली भारतीय महिला खेळाडू ठरणार आहे. तिने यासंबंधी डब्लूडब्लूई बरोबर करार केला आहे.
 • मुळची हरयाणाची असलेल्या कविताने रेसलिंगचे व्यावसायिक प्रशिक्षण द ग्रेट खली (दलीपसिंग राणा) याच्या पंजाबमधील अॅकडमीमध्ये पूर्ण केले आहे.
 • महिला कुस्तीपटू बी बी बुल बुल विरूद्ध लढतीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कविता देवी कमालीची लोकप्रिय झाली होती.
 • कविता देवीने २०१६मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत पॉवरलिफ्टींगमध्ये देशाला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे.
 • कविता देवीने यापूर्वी महिलांच्या मई यंग क्लासिक टुर्नामेंटमध्ये सहभाग नोंदवला होता.
 • पुढीलवर्षी जानेवारी महिन्यापासून डब्लूडब्लूईच्या ओरलँडो येथील परफॉर्मन्स सेंटरमध्ये तिच्या प्रशिक्षणास सुरूवात होईल.
 • त्याचबरोबर डब्लूडब्लूई जॉर्डनची शादिया बेसिसोबरोबरही करार केला असून, डब्लूडब्लूईच्या रिंगणात उतरणारी ती पहिला अरब महिला ठरेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा