चालू घडामोडी : ७ ऑक्टोबर
एमआय १७ हेलिकॉप्टरला अपघात
- अरूणाचल प्रदेशातील तवांग परिसरात ६ ऑक्टोबर रोजी सकाळी भारतीय हवाईलदलाचे ‘एमआय १७ व्ही ५’ हे हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत हवाई दलाच्या ७ जवानांचा मृत्यू झाला आहे.
- या अपघाताच्या चौकशीचे आदेश लष्करी वरिष्ठांकडून देण्यात आले असून, हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा सध्या तपास सुरू आहे.
- अपघातग्रस्त हेलिकॉप्टर तवांगमधील एका लष्करी चौकीवर रसद घेऊन चालले होते. या परिसरातील दुर्गम ठिकाणी असलेल्या काही लष्करी ठाण्यांना केवळ हवाईमार्गेच रसद पुरवता येणे शक्य आहे.
- एमआय १७ हे हेलिकॉप्टर हे भारतीय हवाईदलाचा कणा मानले जाते. रशियन बनावटीच्या या हेलिकॉप्टरचा वापर प्रामुख्याने लष्करी मोहिमा आणि सैन्याच्या सामानाची ने-आण करण्यासाठी होतो.
- भारत आणि रशियामध्ये झालेल्या करारानुसार गेल्यावर्षी रशियाने एमआय १७ व्ही ५ कॅटगरीतील तीन हेलिकॉप्टर्स भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द केली.
- तांत्रिक मर्यादा आणि सुट्या भागांचा तुटवडा जाणवत असल्यामुळे एमआय १७च्या वापरावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.
- एमआय १७ मध्ये व्ही ५ ही यंत्रणा बसवण्यात आल्यामुळे हेलिकॉप्टर काही प्रमाणात अद्यायावत झाले होते. मात्र, तरीही प्रगत तंत्रज्ञानाच्यादृष्टीने पाहता एमआय १७मध्ये अनेक तांत्रिक दोष होते.
- यापूर्वी जुलै २०१३मध्ये उत्तराखंडमध्ये पुरग्रस्त भागात बचाव मोहिमेवर असताना एमआय १७ व्ही ५ हेलिकॉप्टरला मोठा अपघात झाला होता. या दुर्घटनेत एअर फोर्सच्या २० जवानांचा मृत्यू झाला होता.
जंतरमंतरवर आंदोलन करण्यास बंदी
- अनेक ऐतिहासिक आंदोलनांचे साक्षीदार असणाऱ्या जंतरमंतरवर यापुढे कोणत्याही संघटनेला वा राजकीय पक्षाला आंदोलन करता येणार नाही.
- राष्ट्रीय हरित लवादाने घेतलेल्या निर्णयानुसार, यापुढे जंतरमंतरवर कोणालाही कोणत्याही प्रकारचे आंदोलन वा धरणे धरता येणार नाही. हा आदेश तातडीने लागू झाला आहे.
- या ठिकाणी होणाऱ्या सततच्या आंदोलनांमुळे ध्वनिप्रदूषणात कमालीची वाढ होत आहे. याबाबत एक लवादाकडे एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.
- या याचिकेवर झालेल्या सुनावणीत राष्ट्रीय हरित लवादाने आंदोलनबंदीचा आदेश देताना नवी दिल्ली महानगरपालिकेला अनेक सूचना केल्या.
- जंतरमंतर येथे आंदोलनांसाठी उभारण्यात आलेली तात्पुरती बांधकामे, ध्वनिवर्धक यंत्रणा ताबडतोब हटवावीत असा आदेशही महानगरपालिकेला देण्यात आला आहे.
- याआधी मुंबई उच्च न्यायालयाने मंत्रालय व विधान भवन भागाकडे मोर्चे नेण्यास बंदी घातली होती. अनेक वर्षांनी तसाच निर्णय दिल्लीसाठी राष्ट्रीय हरित आयोगाने दिला आहे.
शास्त्रज्ञ निकोलस ब्लूमबर्गेन यांचे निधन
- लेसर वर्णपंक्तीशास्त्रासाठी नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ निकोलस ब्लूमबर्गेन यांचे ५ सप्टेंबर रोजी निधन झाले.
- ते जन्माने डच असले तरी अमेरिकी नागरिक होते. हार्वर्ड विद्यापीठात त्यांनी ४० वर्षे संशोधन केले. अरेषीय प्रकाशशास्त्रातील ते तज्ज्ञ होते.
- दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नेदरलँड्समध्ये नाझींपासून लपून राहत तेलाच्या दिव्यावर त्यांनी पुंज यांत्रिकीचे शिक्षण घेतले.
- विद्युतचुंबकीय लहरी द्रव्याशी कशी अभिक्रिया करतात यावर त्यांचे संशोधन होते. तर न्यूक्लियर मॅग्नेटिक रिलॅक्सेशन हा त्यांचा पीएचडीचा प्रबंध होता.
- ब्लूमबर्गेन यांना १९८१मध्ये आर्थर शॉलो व काइ एम सिगबान यांच्यासमवेत भौतिकशास्त्राचे नोबेल मिळाले होते.
- लेसरचे पूर्वरूप असलेल्या मेसरच्या संदर्भात त्यांनी सोप्या पद्धती विकसित करून शेवटी लेसरच्या निर्मितीतही मोठे योगदान दिले होते.
- नॅशनल मेडल फॉर सायन्स हा पुरस्कार त्यांना अमेरिकेचे अध्यक्ष फोर्ड यांच्या हस्ते मिळाला होता.
I think this іs among the most important informatiߋn for me.
उत्तर द्याहटवाAnd i am glad reading your article. But want to remark on few general things, The website style is wonderful, the articles is really excellent : D.
Good job, cheers