चालू घडामोडी : १८ व १९ ऑक्टोबर
जॉर्ज साँडर्स यांना मॅन बुकर पुरस्कार
- अमेरिकन लेखक जॉर्ज साँडर्स यांना ‘लिंकन इन दी बाडरे’ या प्रदीर्घ कांदबरीसाठी प्रख्यात मॅन बुकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
- साँडर्स यांना एक चषक आणि ५० हजार पौंडचा धनादेश प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार प्राप्त करणारे ते दुसरे अमेरिकन लेखक आहेत.
- लघु कथांसाठी प्रसिद्ध असणारे जॉर्ज साँडर्स यांना काल्पनिक कथा श्रेणीत हा पुरस्कार मिळाला आहे.
- अब्राहम लिंकन यांना त्यांच्या तरूण मुलाच्या मृत्यूनंतर झालेल्या दु:खद वेदनांवर आधारित ही कादंबरी आहे.
- या पुरस्कारासाठी साँडर्स यांच्यासह तीन अमेरिकी आणि तीन ब्रिटिश लेखकांना नामांकन मिळाले होते. त्यामध्ये साँडर्स यांनी बाजी मारली.
- साँडर्स यांनी आतापर्यंत विविध लेखनप्रकार हाताळले आहेत. लघुकथा, निबंध, विस्तृत दंतकथा आणि मुलांसाठी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.
- २००९ मध्ये त्यांना ‘अमेरिकन अॅकॅडमी ऑफ आर्ट्स अँड लेटर्स’चा अॅकॅडमी पुरस्कार मिळाला होता.
- ५८ वर्षीय साँडर्स यांचा जन्म टेक्सास येथे झाला असून बुकर पुरस्काराच्या ४९ वर्षांच्या इतिहासात हा पुरस्कार मिळवणारे ते दुसरे अमेरिकन आहेत.
- हा पुरस्कार १९६९ पासून देण्यात येतो. मात्र, केवळ कॉमनवेल्थ स्टेट्समधील लेखकांसाठीच तो खुला होता. २०१४मध्ये मात्र इतर इंग्रजीभाषक देशांतील लेखकांसाठीही तो खुला करण्यात आला.
- गेल्या वर्षी हा पुरस्कार मिळविणारे पॉल बेट्टी हे पहिले अमेरिकी लेखक ठरले. त्यांना ‘द सेलआउट’ या कादंबरीसाठी हा पुरस्कार मिळाला.
मध्यप्रदेश सरकारकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई
- मध्यप्रदेश सरकारने शेतकऱ्यांना पिकाच्या दरातील नुकसान भरपाई देण्याची योजना लागू केली आहे. अशी योजना राबविणारे मध्य प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
- पिकाला भाव मिळत नसल्याने कर्जबाजारीपणा, आत्महत्या हे प्रकार देशातील अनेक राज्यांमध्ये घडले. ते थांबविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
- यामुळे किमान हमी भावापेक्षा शेतकऱ्याला कमी भाव मिळाल्यास तेवढी नुकसान भरपाई त्याला मध्यप्रदेश सरकारकडून दिली जाणार आहे.
- ही नुकसान भरपाईची रक्कम देताना सरकार संबंधित पिकांचा शेजारील दोन राज्यांमध्ये खरेदीचा भाव विचारात घेणार आहे. ही रक्कम शेतकऱ्याच्या थेट खात्यात जमा होईल.
- या योजनेचा लाभ मिळविण्याकरिता शेतकऱ्यांना आपल्या पिकाची सरकारी यंत्रणांकडे नोंदणी करावी लागेल. तसेच बँक खाते आणि आधार यांचा क्रमांक द्यावा लागेल.
- शेतकऱ्यांकडून माल खरेदी करताना देण्यात आलेल्या रिसीट बघूनच मग नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल.
- सुरुवातीला कडधान्ये, तेलबियांकरिता ही योजना राबविण्यात येणार आहे. भविष्यात फलोत्पादनाचाही या योजनेत समावेश केला जाईल.
- मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री : शिवराजसिंग चौहान
केरळमध्ये दलित व हरिजन या शब्दांच्या वापरावर बंदी
- केरळ सरकारने एससी/एसटी आयोगाच्या शिफारशीचा हवाला देत ‘दलित’ आणि ‘हरिजन’ या शब्दांच्या वापरावर बंदी आणली आहे.
- केरळ सरकारने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, दलित, हरिजन या शब्दांऐवजी एससी, एसटी असा शब्दप्रयोग करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
- आजही समाजात सुरु असलेल्या भेदभावाला नष्ट करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे स्पष्टीकरण एससी/एसटी आयोगाने दिले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा