चालू घडामोडी : १२ ऑक्टोबर

जागतिक भूक निर्देशांकामध्ये भारत १००वा

 • इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूटने जाहीर केलेल्या जागतिक भूक निर्देशांकामध्ये भारताला १००वे स्थान मिळाले आहे.
 • जागतिक भूक निर्देशांकाची आकडेवारी तयार करताना ११९ विकसनशील देशांमधील स्थितीचा अभ्यास करण्यात आला होता.
 • लहान मुलांचे कुपोषण, बाल मृत्यू दर, मुलांच्या विकासात अडथळे हे मुद्दे विचारात घेऊन भूक निर्देशांक काढला जातो.
 • जागतिक भूक निर्देशांकात गेल्या ३ वर्षांमध्ये भारताची कामगिरी अतिशय वाईट झाली असून, भारताची सतत घसरण झाली आहे.
 • दक्षिण आशिया प्रांताचा विचार केल्यास भारताची स्थिती केवळ अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या तुलनेत चांगली झाली आहे. इतर सर्व देश भारतापेक्षा पुढे आहेत.
 • उत्तर कोरिया, बांगलादेश, इराक, श्रीलंका, नेपाळ या देशांमधील स्थितीदेखील भारतापेक्षा उत्तम आहे.
 • जागतिक भूक निर्देशांकात २०१४मध्ये ५५व्या स्थानावर व मागील वर्षी ९७व्या स्थानावर असलेला भारत आता १००व्या स्थानावर आला आहे.
 • भारतातील भूक निर्देशांक ३१.४ इतका आहे. त्यामुळे भारताचा समावेश गंभीर परिस्थिती असलेल्या देशांच्या यादीत करण्यात आला आहे.
 • भारतातील बालकांची शारीरिक स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे जागतिक भूक निर्देशांकातून समोर आले आहे.
 • देशातील पाच वर्षांहून कमी वय असलेल्या एक पंचमांश बालकांचे वजन त्यांच्या उंचीच्या तुलनेत अतिशय कमी आहे.
 • तर एक तृतीयांश बालकांचे वजन त्यांच्या वयाच्या तुलनेत अतिशय कमी आहे, असे आकडेवारी सांगते.
 • जगाचा विचार करता, सेन्ट्रल आफ्रिकन रिपब्लिक देशाची अवस्था सर्वाधिक वाईट असून, जागतिक भूक निर्देशांकात हा देश ११९व्या स्थानी आहे. त्यांनतर चाड, सिएरा लिओन या देशांचे क्रमांक लागतात.

गौतम बंबवाले चीनमधील भारताचे नवे राजदूत

 • भारताचे पाकिस्तानातील उच्चायुक्त गौतम बंबवाले यांची चीनमध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 • गौतम बंबवाले यांची २०१५मध्ये पाकिस्तानमधील भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
 • यापूर्वी २००७मध्ये चीनमधील गुआँगझोहुमध्ये भारताचे पहिले काऊन्सील ऑफ जनरल बनण्याचा मान गौतम बंबवाले यांना मिळाला होता.
 • २००९ ते २०१४ या कालावधीदरम्यान त्यांनी परराष्ट्र खात्यातसह सचिव म्हणून काम केले आहे.
 • अमेरिका, चीन आणि जर्मनी अशा महत्त्वांच्या देशात बंबवाले यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.
 • बंबवाले यांनी पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमधून अर्थशास्त्राची पदवी घेतली आहे. १९८४मध्ये ते इंडियन फॉरेन सर्व्हिस (आयएफएस)मध्ये रूजू झाले.
 • १९८५ आणि १९९१मध्ये त्यांची नियुक्ती हाँगकाँग आणि बीजिंगमध्ये करण्यात आली. १९९३मध्ये अमेरिकन डिव्हिजन ऑफ मिनिस्टरच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
 • बंबवाले यांच्या जागी परराष्ट्र सेवेच्या १९८४च्या तुकडीतील अधिकारी अजय बिसारिया यांची पाकिस्तानामध्ये उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 • अतिशय बुद्धिमान अधिकारी अशी त्यांची प्रतिमा आहे. मध्य आशियासाठी भारतीय धोरणाची रूपरेषा ठरवण्यात बिसारिया यांची भूमिका महत्त्वाची होती.
 • सध्याचे चीनचे राजदूत विजय गोखले यांची परराष्ट्र खात्यातील आर्थिक संबंधविषयक विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

हाफिज सईदचा पक्ष स्थापनेसाठीचा अर्ज फेटाळला

 • मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि ‘जमात-उद-दावा’चा म्होरक्या हाफिज सईदने पक्ष स्थापनेसाठी केलेला अर्ज पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. 
 • या निर्णयामुळे हाफिज सईदला जबरदस्त झटका बसला आहे. राजकीय पक्ष स्थापन करुन पाकिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेण्याचा त्याचा मानस होता.
 • त्याने पक्ष स्थापनेसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला होता. यासाठी त्याने ‘जमात-उद-दावा’चे नाव बदलून ते ‘मिल्ली मुस्लिम लीग’ केले होते.
 • दहशतवादी संघटनांशी संबंध असलेल्या एखाद्या संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता कशी काय मिळू शकते, असा आक्षेप गृह मंत्रालयाकडून नोंदवण्यात आला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा