राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (एनएसजी) महासंचालकपदी नुकतीच आयपीएस अधिकारी सुदीप लखटाकिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लखटाकिया हे तेलंगण केडरचे १९८४च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी असून सध्या ते केंद्रीय राखीव पोलीस दलाचे विशेष महासंचालक आहेत.
सध्या एनएसजीचे महासंचालक असलेले एस पी सिंह हे ३१ जानेवारी रोजी निवृत्त होत असून त्यांच्याकडून ते सूत्रे घेतील.
पुढील वर्षी जुलैपर्यंत लखटाकिया हे एनएसजीचे महासंचालक राहतील त्यानंतर ते निवृत्त होत आहेत.
प्रत्यक्ष दहशतवाद व नक्षलवाद मोहिमांविरोधातील मोर्चेबांधणीत लखटाकिया हे निपुण आहेत.
केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त महासंचालक या पदावर नियुक्त होण्यापूर्वी ते आठ वर्षे एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रूप) या सुरक्षा संस्थेत महानिरीक्षक होते.
मोदींच्या काळात भारताची अधोगती : गॅलप अहवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारताची अधोगती झाली असा निष्कर्ष गॅलप पाहणी अहवालात नमूद करण्यात आला आहे.
ऑक्सफॅम अहवाल : देशात आर्थिक विषमतेमध्ये वाढ
दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या पार्श्वभूमीवर ऑक्सफॅम या संस्थेने ‘रिवॉर्ड वर्क, नॉट वेल्थ’ हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
देशात आणि जागतिक पातळीवर असलेली आर्थिक विषमता या अहवालातून समोर आली आहे.
जगातील १० देशांमधील सुमारे ७० हजार लोकांची मते जाणून घेतल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा