चालू घडामोडी : २७ जानेवारी
कॅरोलिन वोझ्नियाकीला ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद
- डेन्मार्कच्या द्वितीय मानांकित कॅरोलिन वोझ्नियाकीने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. तिचे हे कारकीर्दीतील पहिलेच ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले.
- महिला एकेरीच्या अंतिम लढतीत कॅरोलिनने रोमानियाच्या अव्वल मानांकित सिमोना हॅलेपला ७-६ (२), ३-६, ६-४ असे पराभूत केले.
- यापूर्वी या दोघी सहा वेळा आमनेसामने आल्या होत्या. त्यात चार वेळा कॅरोलिनने, तर दोन वेळा सिमोनाने बाजी मारली होती.
- यापूर्वी कॅरोलिनला २००९ व २०१४मध्ये युएस ओपनच्या तर २०११मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
- सिमोना हॅलेपला फ्रेंच ओपनच्या दोन उपविजेतेपदानंतर आता पुन्हा एकदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
आधार : हिंदी वर्ड ऑफ दि इयर २०१७
- जगभरात प्रसिद्ध असलेला इंग्रजी शब्दकोश अर्थात ऑक्सफोर्ड डिक्शनरी दरवर्षी ‘इंग्रजी वर्ड ऑफ दि इयर’ घोषित करते.
- त्याचप्रमाणे ऑक्सफोर्डने यंदा पहिल्यांदाच ‘हिंदी वर्ड ऑफ दि इयर’ घोषित केला असून २०१७सालासाठी हा मान ‘आधार’ या शब्दाला मिळाला आहे.
- राजस्थानात सुरु असलेल्या जयपूर साहित्य संमेलनात (जेएलएफ) ऑक्सफोर्ड डिक्शनरीकडून ही घोषणा करण्यात आली.
- गेल्या वर्षी सर्वात जास्त चर्चा झालेला आणि जनतेचे लक्ष वेधून घेणाऱ्या शब्दाची निवड समितीने निवड केली.
- ‘हिंदी वर्ड ऑफ दि इयर’च्या स्पर्धेमध्ये नोटबंदी, स्वच्छ, आधार, योग, विकास, बाहुबली असे अनेक पर्यायी शब्द होते. अखेर यांमधून ‘आधार’ या शब्दाची निवड करण्यात आली.
- भारत सरकारने देशवासियांना एक विशिष्ट ओळख क्रमांक देण्यासाठी ‘आधार’ ही योजना जाहीर केली.
- सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. त्याचबरोबर बँक खाती आणि मोबाईलसाठीही ‘आधार’ गरजेचा झाला आहे. त्यामुळे आधार कार्ड आता हळूहळू प्रमुख ओळखपत्र म्हणून पुढे येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा