१०० टक्के सेंद्रिय कृषी उत्पादने पिकविणारे सिक्कीम देशातील पहिले राज्य
१ एप्रिल २०१८ पासून सिक्कीमध्ये असेंद्रिय म्हणजेच रसायनांचा वापर करून पिकवलेल्या भाज्या आणि फळे यांच्यावर बंदी घालण्यात येणार आहे.
१ एप्रिल २०१८ पासून सिक्कीममध्ये केवळ आणि केवळ रसायनांचा वापर न करता पिकवलेल्या सेंद्रिय भाज्याच मिळणार आहेत.
अन्य राज्यांतून रसायनांचा वापर करून पिकवलेल्या भाज्या येऊ न देण्याचा निर्णय सिक्कीम सरकारने घेतला आहे.
केवळ सेंद्रिय कृषी उत्पादने म्हणजे भाज्या आणि फळेच उपलब्ध असणारे सिक्कीम हे त्यामुळे भारतातील पहिले राज्य असेल.
सेंद्रिय खतांचा वापर करून पिकवलेल्या भाज्या आणि फळे बाजारात आणण्यासाठी राज्य सरकार वाहने उपलब्ध करून देणार आहे.
२००३मध्ये मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांनी विधानसभेत राज्यातील संपूर्ण शेती सेंद्रिय करण्याची घोषणा केली होती. ती आता प्रत्यक्षात आली आहे.
सिक्कीमचे मुख्यमंत्री : पवनकुमार चामलिंग
चारा घोटाळ्याशी निगडीत चैबासा प्रकरणी लालू दोषी
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना रांचीच्या विशेष सीबीआय न्यायालयाने चारा घोटाळ्याशी निगडीत चैबासा कोषागार घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरविले आहे.
चैबासा प्रकरणी लालूप्रसाद यांना दोषी ठरवत ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच ५ लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे या घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांनाही ५ वर्षाची शिक्षा आणि ५ लाखाचा दंड ठोठाविण्यात आला आहे.
चारा घोटाळ्यातील हे तिसरे प्रकरण आहे. न्यायालयाने याप्रकरणी ५६ पैकी ५० आरोपींना दोषी ठरवत ५ वर्षांची शिक्षा सुनाविली आहे.
याआधी देवघर कोषागार चारा घोटाळ्यात साडे तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेले लालूप्रसाद रांची येथील बिरसा मुंडा कारागृहात शिक्षा भोगत आहेत.
आता त्यांना हजारीबाग येथील खुल्या कारागृहात पाठवण्यात येणार आहे. तुरुंगात एक कैदी म्हणून त्यांना माळीकाम देण्यात आले असून, त्यासाठी त्यांनी वेतनही मिळणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा