चालू घडामोडी : ३० व ३१ मार्च

चीनची अवकाश प्रयोगशाळा पृथ्वीवर कोसळणार

  • चीनची पहिली अवकाश प्रयोगशाळा (स्पेस स्टेशन) ‘तियांगोंग-१’ १ एप्रिल रोजी पृथ्वीवर कोसळणार असल्याचे संकेत युरोपीयन स्पेस एजन्सीने दिले आहेत.
  • एका स्कूल बसच्या आकाराची ही प्रयोगशाळा आठ हजार पाचशे किलोग्रॅम वजनाची असून सुमारे साडेदहा मीटर लांबीची आहे.
  • ही प्रयोगशाळा पृथ्वीकडे झेपावताना रविवार १ एप्रिल रोजी पहाटे १ वाजल्यापासून सायं. ७ वाजेपर्यंत कधीही चार मिनिटे भारतावरून जाणार आहे.
  • यामध्ये महाराष्ट्रासह मुंबईचा बराचसा भाग येत असून ती अडीच मिनिटांत महाराष्ट्रावरून जाईल. या प्रवासात ती भारतातही कोसळण्याची शक्यता आहे.
  • अर्थात अवकाशात वरच्यावर तिचे तुकडे होतील त्यामुळे घाबरण्याचे काहीही कारण नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
  • स्पेस स्टेशनच्या संभाव्य मार्गात मुंबईसह महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बंगालचा उपसागराचा समावेश असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
  • परंतु स्पेस स्टेशन अतितीव्र वेगाने येत असल्याने कुठे पडेल, याचा अंदाज बांधणे कठीण आहे.
  • खाली कोसळताना त्याचे लहान तुकडे होतील. या तुकड्यांमध्ये विषारी वायू असण्याची शक्यता आहे. हे तुकडे २०० ते ३०० किलोमीटर परिसरात पसरण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
  • या स्पेस स्टेशनची एजन्सी चायना नॅशनल स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (सीएनएसए)ने २०१६पासून स्पेस स्टेशनसोबतचा संपर्क तुटल्याचे सांगितले होते. तेव्हापासून हे स्पेस स्टेशन अंतराळात फिरत आहे.
  • २०११मध्ये प्रक्षेपित करण्यात आलेले हे चीनचे पहिले स्पेस स्टेशन होते. त्यावेळी स्वर्गातील राजमहल असे त्याला नाव देण्यात आले होते.

डॉ. रॉबर्ट लँगलँड्स यांना आबेल पुरस्कार

  • प्रसिद्ध गणितज्ञ डॉ. रॉबर्ट लँगलँड्स यांना गणितातील नोबेल मानला जाणारा आबेल पुरस्कार नुकताच मिळाला आहे.
  • कॅनडाचे नागरिक असलेल्या लँगलँड्स यांना ‘लँगलँड्स प्रोग्रॅम’ या नावाने गणितात प्रसिद्ध असलेल्या संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.
  • आधुनिक गणितात इतक्या मोठय़ा प्रमाणावर फलनिष्पत्ती असलेले कुठलेही गणिती संशोधन सध्या तरी अस्तित्वात नाही. त्यांचा हा प्रकल्प गणितातील महाएकात्मिक सिद्धांत मानला जातो.
  • गेल्या पन्नास वर्षांतील एक उत्तम गणितज्ञ असा त्यांचा गौरव आबेल पुरस्कार निवड समितीने केला आहे. 
  • लँगलँड्स प्रोग्रॅमव्यतिरिक्त क्लास फिल्ड थिअरी, ऑटोमॉर्फिक फॉर्म व नंबर थिअरी यात त्यांनी बरेच काम केले आहे.
  • सध्या ते प्रिन्स्टनमध्ये इन्स्टिटय़ूट फॉर अ‍ॅडव्हान्सड स्टडी या संस्थेत मानद प्राध्यापक आहेत. याच कार्यालयात आइनस्टाइन यांनीदेखील गणितज्ञ म्हणून काम केले आहे. 
  • येल विद्यापीठात असताना त्यांनी ‘प्रॉब्लेम्स इन थिअरी ऑफ ऑटोमॉर्फिक फॉर्मस’ हे पुस्तकही लिहिले आहे.
  • आतापर्यंत त्यांना वुल्फ, स्टीली, नेमर्स, शॉ यांच्या नावाने दिले जाणारे गणितातील सर्व मोठे पुरस्कार मिळाले आहेत.

फोर्ब्सच्या ‘३० अंडर ३० अशिया’ यादीत भारताला प्रथम स्थान

  • भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना या तिघीही फोर्ब्सच्या यादीत झळकल्या आहेत.
  • फोर्ब्सने आशियातील मनोरंजन आणि क्रिडाक्षेत्रातील नामवंतांची ‘३० अंडर ३० अशिया’ ही यादी जाहीर केली असून, त्यात या तिघींचा समावेश करण्यात आला आहे.
  • फोर्ब्सच्या या ३०० उद्योन्मुख प्रतिभावंतांच्या यादीत भारताने प्रथम स्थान पटकावले असून चीनला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. 
  • या यादीसाठी फोर्ब्सने एकूण १० श्रेणी तयार केल्या असून, या यादीत आशिया पॅसिफिकमधील २५ देशांचा समावेश करण्यात आला आहे.
  • या यादीत भारताच्या ६५ प्रतिभावंतांना स्थान मिळाले असून, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या ५९ प्रतिभावंतांचा या यादीत समावेश झालेला आहे.
  • या यादीत उत्तर कोरिया आणि अझरबैजान या देशांना पहिल्यांदाच स्थान मिळाले आहे. ऑनलाइन मतदानाद्वारे ही निवड करण्यात आली.
  • इंडियन नॅशनल पोलो टीमचा कर्णधार पद्मनाभ सिंह, अंकित प्रसाद, प्रिया प्रकाश, बाला सरदा, सुहानी जलोटा, राहुल ज्ञान, श्रेयस भंडारी, रमेश धामी आणि भूमिका अरोरा आदी भारतीयांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
  • कोणत्या देशाचे किती तरूण?
    • भारत - ६५ 
    • चीन - ५९ 
    • ऑस्ट्रेलिया - ३५ 
    • दक्षिण कोरिया- २५ 
    • जपान - २१ 
    • हाँगकाँग - १२ 
    • पाकिस्तान- ७

अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची रशियातून हकालपट्टी

  • रशियाने अमेरिकेच्या ६० राजनैतिक अधिकाऱ्यांना माघारी धाडण्याचा तसेच सेंट पीटर्सबर्ग येथील अमेरिकेचा दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • संबंधित अधिकाऱ्यांना ५ एप्रिलपर्यंत रशिया सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 
  • ब्रिटनमध्ये ४ मार्च रोजी रशियाचा माजी गुप्तहेर सर्गई स्क्रिपल आणि त्याची मुलगी यूलिया स्क्रिपल या दोघांवर विषप्रयोग करण्यात आला होता.
  • यामागे रशियाचा हात असल्याचे सिद्ध झाल्यानंतर अमेरिकेने ब्रिटनला साथ देत अमेरिकेतील रशियाच्या ६० राजनैतिक अधिकाऱ्यांची देशातून हकालपट्टी केली होती.
  • त्याचवेळी ट्रम्प सरकारने सिएटलमधील रशियन दूतावासही बंद करण्याचा निर्णय घेतला होता. 
  • याला उत्तर देण्यासाठीच रशियाने अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. या कारवाईनंतर दोन्ही देशांमधील तणावात अधिकच भर पडली आहे.

चालू घडामोडी : २९ मार्च

जीसॅट-६ए या दळणवळण उपग्रहाचे इस्त्रोद्वारे यशस्वी प्रक्षेपण

  • भारताच्या आजवरच्या सर्वात मोठया स्वदेशी बनावटीच्या जीसॅट-६ए या दळणवळण उपग्रहाचे इस्त्रोने २९ मार्च रोजी यशस्वी प्रक्षेपण केले.
  • आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरुन जीएसएलव्ही रॉकेटमधून जीसॅट-६ए उपग्रह अवकाशात झेपावला.
  • इस्रोच्या या अभूतपूर्व यशामुळे लष्कराच्या सामर्थ्यात वाढ होणार असून, संपर्काचं जाळ विस्तारण्यासाठी याची मदत होणार आहे.
  • २०६६ किलो वजनाच्या या उपग्रहाच्या बांधणीसाठी २७० कोटी रुपये खर्च आला आहे. या उपग्रहाचे आयुर्मान १० वर्षे आहे.
  • जीसॅट-६ए या दळणवळण उपग्रहाकडे सर्वात मोठी अँटिना असून इस्त्रोने या अँटिनाची निर्मिती केली आहे. उपग्रह अवकाश कक्षेत स्थिर झाल्यानंतर ६ मीटर व्यासाचा हा अँटिना छत्रीसारखा उघडेल.
  • जीसॅट-६ए हा उपग्रह तीन वर्षांपूर्वी अवकाशात पाठवण्यात आलेल्या जीसॅट-६ या उपग्रहाला मदत करणार आहे.
  • जीसॅट-६ए मुळे सॅटलाइट आधारित मोबाइल कॉलिंग आणि कम्युनिकेशन सेवा अधिक प्रभावी होईल.
  • जीसॅट-६ए मुळे दुर्गम ठिकाणी तैनात असलेल्या भारतीय सैन्य दलांमध्ये समन्वय आणि संवाद अधिक सुलभ होईल.
  • जीसॅट-६एच्या प्रक्षेपणासाठी वापरण्यात आलेल्या जीएसएलव्हीत शक्तिशाली क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करण्यात आला आहे. या इंजिनाचा चांद्रयान-२ मोहिमेतही वापर केला जाण्याची शक्यता आहे.
  • इस्रोचे नवे अध्यक्ष के. सिवन यांनी जानेवारी २०१८मध्ये सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांचे हे पहिलेच यशस्वी मिशन आहे.

अण्णा हजारे यांचे उपोषण मागे

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्तीनंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सात दिवसांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.
  • अण्णा हजारे यांच्या बहुतांश मागण्यांना तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी अण्णांनी सरकारला ६ महिन्यांची मुदत दिली आहे.
  • लोकपालची मागणी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडूणक प्रक्रियेतील महत्त्वाच्या बदलांना संमती या मागण्यांसाठी अण्णा हजारे मागील सात दिवसांपासून दिल्लीतील रामलीला मैदानावरील उपोषणाला बसले होते.
  • त्यानंतर सातव्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली आणि त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले.
  • कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी अण्णा हजारेंनी केलेल्या मागण्यांपैकी मान्य झालेल्या मागण्यांचे पत्र वाचून दाखवले.
  • या पत्रात कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आलेले नाही. मात्र या मागण्यांना तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.
 अण्णांच्या मागण्या 
  • शेतीमालाला उत्पादन खर्चाहून ५० टक्के अधिक भाव.
  • शेतीवर अवलंबून असलेल्या ६० वर्षांवरील शेतकरी व मजुरांना दरमहा ५ हजार रुपये निवृत्तिवेतन.
  • निवडणूक आयोगाप्रमाणेच कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता.
  • लोकपालची त्वरित नियुक्ती व्हावी. लोकपालप्रमाणे राज्यांत सक्षम लोकायुक्त कायदा, त्यातील कमकुवत करणारे कलम ६३ व ४४मध्ये बदल.
  • मतपत्रिकेवर उमेदवाराचे रंगीत छायाचित्र असावे.
  • मतमोजणीसाठी टोटलायझर मशिनचा उपयोग.
  • लोकप्रतिनिधीला परत बोलावण्याचा अधिकार.

चालू घडामोडी : २८ मार्च

कोटक समितीच्या शिफारशी सेबीने स्वीकारल्या

  • कंपनी सुशासनाकरिता कोटक महिंद्र बँकेचे कार्यकारी उपाध्यक्ष उदय कोटक यांच्या अध्यक्षतेखाली जून २०१७मध्ये नेमलेल्या समितीच्या बहुतांश शिफारशी सेबीने स्वीकारल्या आहेत.
  • भांडवली बाजार नियामक सेबीच्या संचालक मंडळाच्या मुंबईमध्ये झालेल्या  बैठकीनंतर कोटक समितीच्या ८० शिफारसी स्वीकारण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
  • भांडवली बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी पद भिन्न व्यक्तींकडे असावे, ही मुख्य शिफारस कोटक समितीने केली होती.
  • या समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी एप्रिल २०१९ पासून होणार असून, पहिल्या टप्प्यात ५०० कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्षपद विलग करण्यात येणार आहे.
  • त्याचबरोबर १ एप्रिल २०१९पासून या ५०० कंपन्यांना त्यांच्या संचालक मंडळावर किमान एका महिलेला प्रतिनिधित्व देणे बंधनकारक करण्यात येणार आहे.
  • सेबीचे अध्यक्ष : अजय त्यागी



    न्यूयॉर्कमधील फौजदारी न्यायालयाच्या न्यायाधीशपदी दीपा आंबेकर

    • भारतीय वंशाच्या अमेरिकेतील न्यायाधीश दीपा आंबेकर यांची न्यूयॉर्क येथील फौजदारी न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे.
    • दीपा या अमेरिकेत स्थायिक असलेल्या प्रज्ञा व सुधीर आंबेकर यांच्या कनिष्ठ कन्या  आहेत. न्यूयॉर्कमधील पहिल्या मराठी न्यायाधीश असा त्यांचा नावलौकिक आहे.
    • दीपा यांचे लहानपण न्यू जर्सीत गेले. अन आर्बर येथील मिशिगन विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी घेतल्यानंतर रूटगर्स युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉ या संस्थेतून ज्युरिस डॉक्टर (जेडी) ही विधि शाखेतली पदवी घेतली.
    • नंतर लीगल एड्स सोसायटीत त्यांनी वकील म्हणून काम केले. ओमेलवनी अ‍ॅण्ड मायर्स, असेंशुअर, अमेरिकॉर्पस, व्हिसा व्हॉल्युंटर्स या कंपन्यांसाठी त्यांनी वकिली केली.
    • त्यांनी लीगल एड्स सोसायटीच्या माध्यमातून २००० गरजू लोकांना न्याय मिळवून देण्यात मदत केली. गरीब लोकांचे खटले त्यांनी विनाशुल्क लढवले.
    • आठ वर्षे सरकारी वकील म्हणूनही काम केले. कायदेविषयक ज्ञानाची पुरेशी शिदोरी मिळाल्यानंतर त्यांनी न्यायाधीशपदासाठी अर्ज केला.
    • तज्ज्ञांनी घेतलेल्या मुलाखती आणि चाचण्या या सोपस्कारानंतर त्यांची न्यूयॉर्कच्या महापौरांनी न्यायाधीशपदी नियुक्ती केली आहे.

    सरकारचा एअर इंडियातून ७६ टक्के हिस्सा विकण्याचा निर्णय

    • केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील विमान कंपनी असलेल्या एअर इंडियातून ७६ टक्के हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे.
    • एअर इंडियामधील ७६ टक्के हिस्सा विकल्यानंतर या कंपनीचे सर्व अधिकार संबंधीत खासगी कंपनीकडे जातील. यामुळे सरकारचा एअर इंडयावरील मालकी हक्क संपून जाईल.
    • नागरी उड्डाण मंत्रालयाने एअर इंडिया आणि त्याच्या दोन सहाय्यक कंपन्यांमधील समभाग खरेदी करण्यासाठी खासगी कंपन्यांना आपले अर्ज पाठवण्याचे आवाहन केले आहे.
    • केंद्र सरकारने एअर इंडियासह एअर इंडिया एक्स्प्रेस आणि एअर इंडिया एअरपोर्ट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील मालकी हक्क देखील विकण्याचा निर्णय घेतला आहे.
    • एअर इंडियाच्या घटनेच्या नियमांनुसार, ही कंपनी केवळ भारतीय नागरिकच खरेदी करु शकतो.
    • तसेच या लिलाव प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या कंपनीचे मुळ मुल्य (नेट वर्थ) ५००० कोटी रुपयांपेक्षा जास्त असणे बंधनकारक आहे.
    • केंद्र सरकारने ही संपूर्ण लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी EY इंडियाची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.
    • एअर इंडियाचे कर्मचारी सरकारी गुंतवणूक काढून घेण्याला आणि या कंपनीला इतर खासगी कंपनीला विकण्याला सुरुवातीपासून विरोध दर्शवला आहे. त्यांना यामुळे आपल्या नोकरीवर गदा येण्याची भिती वाटत आहे.

    चालू घडामोडी : २७ मार्च

    ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांचे निधन

    • ज्येष्ठ साहित्यिक, अस्मितादर्श चळवळीचे जनक आणि पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणे यांचे २७ मार्च रोजी निधन झाले.
    • गंगाधर विठोबाजी पानतावणे यांचा जन्म २८ जून १९३७ साली नागपूर येथे झाला. नागपूर महाविद्यालयातून त्यांनी बी.ए. आणि एम.ए.ची पदवी मिळवली. मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी पी.एच.डी. मिळवली.
    • डॉ. पानतावणे यांच्याकडे स्वच्छपणे समजलेला आंबेडकरी ध्येयवाद होता व साहित्य म्हणजे काय याची त्यांना तेवढीच जाणीवही होती.
    • दलित साहित्य आणि दलित चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या पानतावणे यांनी लोकसाहित्य, कविता, नाटक, समीक्षा आणि संशोधनपर लेखन केले.
    • पानतावणे यांचे धम्मचर्चा, मूल्यवेध, मूकनायनक, विद्रोहाचे पाणी पेटले आहे, वादळाचे वंशज, दुसऱ्या पिढीचे मनोगत, लेणी आदी साहित्य प्रकाशित झाले होते.
    • ‘अस्मितादर्श’ या नियतकालिकाच्या संपादकपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारीही त्यांनी घेतली होती.
    • डॉ. गंगाधर पानतावणे यांनी २००९साली अमेरिकेतील सॅन होजे येथे झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते.
    • डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार, दलित साहित्य अकादमी, फाय फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची गौरववृत्ती आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. केंद्र सरकारने नुकतेच त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.

    डॅरेन लेहमनला ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकपदावरुन पायउतार

    • बॉल टॅम्परिंगच्या वादामुळे ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये खळबळ माजली असून डॅरेन लेहमनला ऑस्ट्रेलिया संघाच्या प्रशिक्षकपदावरुन पायउतार करण्यात आले आहे.
    • दक्षिण आफ्रिकेविरोधात चौथा कसोटी सामना सुरु होण्याआधीच डॅरेन लेहमनने प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे.
    • दक्षिण आफ्रिकेविरोधातील तिसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार स्टिव्ह स्मिथने वरिष्ठ खेळाडूंसोबत मिळून कॅमरून बेनक्राफ्टकडून बॉल टॅम्परिंग करण्याची रणनीती आखल्याची कबुली दिली होती.
    • यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये खळबळ माजली असून खेळाडूंवर टीकेची झोड उठली आहे. यानंतर ऑस्ट्रेलिया सरकारने स्टिव्ह स्मिथला कर्णधारपदावरुन तातडीने हटविण्याचे आदेश क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दिले होते.
    • त्यानंतर काहीवेळातच कर्णधार स्मिथ आपल्या पदावरून पायउतार झाला. याचसोबत डेव्हिड वॉर्नरनेही उप-कर्णधारपदाचा राजीनामा दिला.
    • या प्रकारामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची प्रतिमा चांगलीच डागाळली असून दोषी खेळाडूंवर आजीवन बंदीची कारवाई होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

    चालू घडामोडी : २६ मार्च

    अमेरिकेतून ६० रशियन राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी

    • अमेरिकेतल्या ट्रम्प सरकारने अमेरिकेतून ६० रशियन राजनैतिक अधिकाऱ्यांची हेर असल्याचा ठपका ठेवून हकालपट्टी केली आहे. तसेच सिएटल येथील रशियन दुतावास बंद करण्याचाही आदेशही दिला आहे.
    • हकालपट्टी केलेल्या अधिकाऱ्यांना अमेरिका सोडण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
    • ब्रिटनच्या एका माजी गुप्तहेरावर विषप्रयोग करण्यात रशियाचा हात असल्याचा युरोपियन महासंघाला संशय आहे.
    • या पार्श्वभूमीवर युरोपियन देश आणि अमेरिकेने रशियाला धडा शिकवण्यासाठी उचललेले हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. 
    • अमेरिकेसह जर्मनी, पोलंड, फ्रान्स, युक्रेन, लॅटीव्हिया आणि लिथुआनिया या देशांनीही त्यांच्या रशियन दुतावासाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना निलंबित करणार असल्याची माहिती दिली आहे.
    • हेरगिरीच्या आरोपावरून युरोपियन संघातील १४ देश रशियन राजनैतिक अधिकाऱ्यांना निलंबित करणार आहेत, असे युरोपियन युनियनचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी सांगितले आहे.

    डेटा सुरक्षेसाठी बी. एन. श्रीकृष्ण समिती

    • डेटा सुरक्षेच्या विविध मुद्यांवर एक स्पष्ट कायदा असावा आणि त्याच्या कक्षेत तंत्रज्ञानाशी संबंधित कंपन्या आणि डेटाशी छेडछाड करणाऱ्यांना आणावे, या उद्देशाने माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने मागील वर्षी ऑगस्टमध्ये सेवानिवृत्त न्यायाधीश बी. एन. श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यीय समितीची स्थापना केली होती.
    • सद्या सरकारकडे याबाबत कोणताही कायदा नाही. त्यामुळे संबंधित प्रकरणात कायदेशीर कारवाई करता येत नाही.
    • यात माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाचे तत्कालिन अतिरिक्त सचिव अजय कुमार यांच्याशिवाय दूरसंचार सचिव अरुणा सुंदरराजन आणि आधार प्राधिकरणाचे सीईओ अजय भूषण पांडेय यांचा समावेश करण्यात आला आहे.

    चालू घडामोडी : २५ मार्च

    गोरखा जनमुक्ती मोर्चा रालोआमधून बाहेर

    • भाजपाच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तारूढ असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून (रालोआ) गोरखा जनमुक्ती मोर्चा (जीजेएम) पक्ष बाहेर पडला आहे.
    • या महिन्यात रालोआ सोडणारा हा दुसरा पक्ष ठरला आहे. यापूर्वी तेलुगू देसम पार्टीने (टीडीपी) रालोआतून बाहेर पडत भाजपावर आश्वासने न पाळल्याचा आरोपही केला होता.
    • जीजेएमचे नेते एल एम लामा यांनी आमच्या पक्षाचा आता भाजपा आणि रालोआशी कुठलाही संबंध नाही असे जाहीर केले.
    • भाजपाचे लोक गोरखा लोकांच्या समस्या आणि त्यांच्या संवेदनांप्रती सजग नसल्याचा आरोप त्यांनी केला.

    चेंडू छेडछाडप्रकरणी ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथ अडचणीत

    • दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कसोटीत चेंडूबरोबर छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले आहे.
    • याचसोबत डेव्हिड वॉर्नरनेही उप-कर्णधारपदाचा राजीनामा दिला असून, आता यष्टीरक्षक-फलंदाज टीम पेन ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करेल.
    • दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी दरम्यान ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमेरून बेनक्रॉफ्ट हा चेंडू एका पिवळसर वस्तूशी घासत असल्याचे टेलिव्हिजन चित्रिकरणात स्पष्ट दिसले.
    • या घटनेनंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने मीडियासमोर चेंडूशी छेडछाड चुकीने नाही तर रणनितीचाच भाग होता असे मान्य केले.
    • यानंतर ऑस्ट्रेलिया सरकारने स्टीव्ह स्मिथला कर्णधारपदावरुन तातडीने काढून टाका असा आदेश क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दिला. पण त्यापूर्वीच स्मिथ आपल्या पदावरून पायउतार झाला.
    • या प्रकारामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची प्रतिमा चांगलीच डागाळली असून क्रिकेटविश्वातून ऑस्ट्रेलियावर टीकेचा भडीमार होत आहे.
    • याप्रकरणी आयसीसीने स्मिथला एका कसोटी सामन्यासाठी निलंबित केले. तसेच त्याला मॅच फी इतकाच म्हणजेच १०० टक्के दंडही ठोठावण्यात आला.
    • क्रिकेटपटू बॅनक्राफ्टला आयसीसीने ३ डिमेरिट अंक दिले आहेत. त्यालाही मॅच शुल्काच्या ७५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
    • आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका दोन्ही खेळाडूंवर ठेवण्यात आला आहे.

    पंकज अडवाणीला आशियाई बिलीअर्ड्स स्पर्धेचे विजेतेपद

    • पंकज अडवाणीने अंतिम फेरीत बी. भास्करवर ६-१ अशा फरकाने मात करत आशियाई बिलीअर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. आशियाई पातळीवर पंकज अडवाणीचे हे अकरावे सुवर्णपदक ठरले.
    • महिलांच्या आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अमी कमानीने थायलंडच्या प्रतिस्पर्ध्याला ३-०ने पराभूत केले.

    महाराष्ट्राच्या कांची आडवाणीला मिस इंडियाचा बहुमान

    • महाराष्ट्राच्या कांची आडवाणीने ११व्या मि. इंडिया शरीरसौष्ठव स्पर्धेच्या महिला शरीरसौष्ठव स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकून मिस इंडियाचा बहुमान पटकावला.
    • नऊ वर्षांच्या मुलीची आई असलेल्या कांचीने ऐतिहासिक कामगिरी करीत महिला शरीरसौष्ठवात मणिपूरच्या वर्चस्वाला धक्का दिला.
    • मणिपूरच्या ममता देवी यमनमवर मात करीत कांचीने या स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले. हरयाणाची गीता सैनी या स्पर्धेत तिसरी आली.
    • महिलांच्या स्पोर्टस् मॉडेल प्रकारात उत्तर प्रदेशची संजू विजेती ठरली. पश्चिम बंगालच्या सोनिया मित्राने रूपेरी कामगिरी करण्यात यश मिळविले.
    • पुरुषांच्या स्पर्धेत महाराष्ट्राचा ‘होल्ड मॅन’ आणि मि. वर्ल्ड नितीन म्हात्रे याने ६० किलो वजनी गटात जबरदस्त कामगिरी करत सुवर्णपदक मिळविले.
    • नितीनच्या सुवर्ण कामगिरीमुळे महाराष्ट्राने ११व्या भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत आपले पहिले सुवर्ण पदक पटकावले.

    मासिक : जानेवारी २०१८

    चालू घडामोडींच्या सखोल अभ्यासासाठी तसेच MPSC, PSI, STI, ADO व इतर अनेक परीक्षांच्या परिपूर्ण तयारीसाठी MPSC Toppersचे PDF स्वरूपातील हे मासिक मोफत डाउनलोड करा.
    मासिक आवडल्यास आपल्या मित्र-मैत्रिणींना नक्की SHARE करा.
    हे मासिक फक्त MPSC Toppers मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे.
    हे मासिक मोफत PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी MPSC Toppersचे मोबाईल अॅप डाउनलोड करा.
    Link : MPSC Toppers Mobile App
    ★ अभ्यासासाठी सर्वांना शुभेच्छा ★

    चालू घडामोडी : २४ मार्च

    अमेरिका व चीनमध्ये व्यापार युध्द

    • अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर ६० अब्ज डॉलरचे शुल्क लावण्याचे निर्देश व्यापार मंत्रालयाला ट्रम्प यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे दोन्ही देशांत व्यापार युद्ध भडकण्याची चिन्हे आहेत.
    • चीनने बेकायदेशीर मार्गांनी अमेरिकी बौद्धिक संपदा हस्तगत केल्याचा आरोप करून ट्रम्प यांनी चीनमधून होणाऱ्या आयातीवर हे शुल्क लावले आहे.
    • चीनसोबतच्या व्यापारी तुटीमुळे अमेरिकेला २ दशलक्ष रोजगार गमवावे लागले आहेत, अशी माहिती देत व्हाइट हाऊसने या निर्णयाचे जोरदार समर्थन केले आहे.
    • अमेरिकेने केलेल्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून चीनही अमेरिकी वस्तूंवर वाढीव आयात शुल्क लावणार आहे.
    • या व्यापार युद्धामुळे बाजारातील आर्थिक तरलता धोक्यात येत आहे. यामुळेच विदेशी गुंतवणूकदार भारतीय भांडवली बाजारातून पैसा काढून घेण्याची शक्यता आहे.
    • आयात शुल्क वाढीच्या कारवाईतून अमेरिकेने युरोपीय देश, बिटन, ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, दक्षिण कोरिया अशा काही देशांना वगळले आहे.
    • याआधी अमेरिकेने कॅनडा आणि मेक्सिको या शेजारी देशांनाही शुल्कवाढीतून दिलासा दिला होता.
    • अमेरिकेने आयातीवर लावलेल्या करांचा भारतीय बाजारावर थेट परिणाम होण्याची शक्यता फार कमी आहे.

    चारा घोटाळ्याप्रकरणी लालूंना १४ वर्षांची शिक्षा

    • चारा घोटाळ्याच्या चौथ्या प्रकरणात राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने १४ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर त्यांना ६० लाख रूपयांचा दंड ही ठोठावण्यात आला आहे.
    • त्यांना दोन वेगवेगळ्या कलमांखाली प्रत्येकी सात वर्षे याप्रमाणे एकूण १४ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या दोन्ही शिक्षा त्यांना वेगवेगळ्या भोगाव्या लागणार आहेत.
    • त्याचबरोबर त्यांना ३०-३० लाख रूपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दंड न दिल्यास एक वर्षांची शिक्षा वाढेल.
    • दुमका कोषागारमधून ३.१३ कोटी रूपये अवैधरित्या काढल्याप्रकरणी लालूंना विशेष न्यायालयाने दोषी ठरवले. याच खटल्यात बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांना निर्दोष ठरवण्यात आले आहे.
    • आतापर्यंत चारा घोटाळ्याच्या चार प्रकरणांत मिळून लालू प्रसाद यादव यांना एकूण २७ वर्षे व ६ महिने कारावासाची शिक्षा झाली आहे.
    • लालूप्रसाद यांना चारा घोटाळ्याच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या प्रकरणात अनुक्रमे ५ वर्षे, साडेतीन वर्षे व पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.
    • लालू यादव सध्या बिरसा मुंडा कारागृहात आधीच्या घोटाळाप्रकरणी शिक्षा भोगत आहेत.

    कर्नाटक सरकारकडून लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा

    • लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी, अशी केंद्र सरकारकडे शिफारस करण्याचा निर्णय घेणाऱ्या कर्नाटक सरकारने लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा बहाल केला आहे.
    • लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी सिद्धरामय्या सरकारने मान्य केली आहे. याबाबत राज्य सरकार केंद्राकडे शिफारस करणार आहे.
    • या निर्णयाला भाजप तसेच अखिल भारतीय वीरशैव महासभेनेही तीव्र विरोध केला आहे.
    • आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचा वीरशैव महासभेचा आरोप आहे.

    राष्ट्रकुल स्पर्धा २०१८ : भारतीय पथकाचे नेतृत्व पी व्ही सिंधूकडे

    • ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथे ४ ते १५ एप्रिल या कालावधीत आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय पथकाचे नेतृत्व बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूकडे देण्यात आले आहे.
    • राष्ट्रकुलच्या उद्घाटन सोहळ्यात होणाऱ्या पथसंचलनात सिंधू भारतीय पथकाची ध्वजवाहक असेल.
    • जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या सिंधूकडून राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे. ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सिंधूने महिला एकेरीत कांस्यपदक जिंकले होते.
    • २०१४च्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत पिस्तूल नेमबाज विजय कुमार तर २०१०च्या नवी दिल्ली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाज अभिनव बिंद्रा भारतीय पथकाचा ध्वजवाहक होता.
    • वर्षभरातील सिंधूची विश्व बॅडमिंटनमधील कामगिरी पाहता ऑलिम्पिक संघटनेने सायना नेहवाल आणि मेरी कोम या सिनियर खेळाडूंना वगळून सिंधूला हा बहुमान दिला.
    • सायना नेहवाल आणि मेरी कोम यांची ही दुसरी राष्ट्रकुल स्पर्धा असणार आहे. मात्र या दोन्ही खेळाडूंना आतापर्यंत भारतीय पथकाचे नेतृत्व करण्याचा मान मिळालेला नाही.

    विद्यादेवी भंडारी दुसऱ्यांदा नेपाळच्या राष्ट्रपतीपदी

    • नेपाळच्या पहिल्या महिला राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांची या पदावर फेरनिवड झाली आहे.
    • भंडारी यांनी नेपाळी काँग्रेसचे उमेदवार कुमार लक्ष्मी राय यांना पराभूत केले. भंडारी यांना दोन-तृतीयांश पेक्षा जास्त मते मिळाली.
    • विद्या देवी भंडारी यांना सत्तारूढ़ सीपीएन-यूएमएल आणि सीपीएन (माओवादी) यांच्याव्यतिरिक्त वाम आघाडी, संघीय समाजवादी फोरम-नेपाल तसेच अन्य छोट्या पक्षांकडून समर्थन मिळाले.
    • विद्यादेवी २०१५मध्ये नेपाळच्या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या होत्या. तसेच १९९४ व १९९९च्या संसदीय निवडणुकीतही त्या निवडून आल्या होत्या.
    • संसद सदस्य झाल्यानंतर ३ वर्षांनंतर विद्यादेवी यांना पर्यावरण मंत्रिपद देण्यात आले. मात्र, केवळ महिला मंत्री असल्याने त्यांना इतरांकडून सहकार्य मिळत नव्हते.
    • विद्यादेवी या दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदावर विराजमान होणे भारतासाठी अधिक समाधानकारक आहे. कारण त्यांच्या काळातच भारत-नेपाळ द्विपक्षीय संबंधांना गती मिळाली आहे.

    अण्णा हजारेंचे दिल्लीत उपोषण सुरू

    • शेतकऱ्यांचे प्रश्न, लोकपाल नियुक्ती व निष्पक्ष निवडणुका या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी २३ मार्चपासून ‘करेंगे या मरेंगे’ या निर्धाराने सत्याग्रह सुरू केला.
    • राजघाटवर महात्मा गांधीजींच्या, तसेच शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या समाधीचे दर्शन घेऊन अण्णांनी रामलीला मैदानावर उपोषणाला सुरुवात केली.
    • आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरातून येणाऱ्या शेतकरी संघटनांचे, सामाजिक कार्यकर्त्यांचे त्यांनी स्वागत केले.
    • अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पहिल्याच दिवशी देशभरात विविध ठिकाणी आंदोलनेही झाली. अनेक संघटनांनी अण्णांचा फोटो सोबत घेऊन आंदोलन केले.

    चालू घडामोडी : २३ मार्च

    सौदी अरेबियाच्या आकाशातून पहिल्यांदाच इस्राइलला गेले विमान

    • एअर इंडियाचे एक विमान २२ मार्च रोजी पहिल्यांदाच सौदी अरेबियाच्या आकाशातून प्रवास करत इस्त्राइलमधील बेन गुरियन एअरपोर्टवर पोहोचले. 
    • सौदी अरेबियाने इस्राइलला जाणाऱ्या विमानांना आपल्या आकाशाचा वापर करू देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
    • काही दिवसांपूर्वी भारतातून इस्त्रायल आणि इस्त्रायलहून भारताकडे जाणारी विमाने सौदी अरेबियाच्या आकाशातून नेण्यास सौदी अरेबियाने परवानगी दिली होती. यामुळे प्रवासाचा वेळ सुमारे २ तासांनी कमी झाला आहे.
    • सौदी अरेबियाच्या धोरणात झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा कूटनीतिक बदल आहे. दोन वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर असे होऊ शकले आहे.

    राज्यसभा निवडणुकांनंतर भाजपा राज्यसभेतील सर्वात मोठा पक्ष

    • राज्यसभेच्या २६ जागांसाठी झालेल्या मतदानात सर्वाधिक १२ जागा जिंकून भाजपाने इतिहास रचला आहे.
    • पक्षाच्या स्थापनेनंतर ३८ वर्षांत पहिल्यांदाच भाजपा हा राज्यसभेतील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
    • परंतु, राष्ट्रीय लोकशाही आघाडी संसदेच्या वरिष्ठ सभागृहात बहुमतापासून दूर आहे. राज्यसभेत आता भाजपाचे ६९ खासदार आहेत, तर काँग्रेस सदस्यांची संख्या ५० आहे.
    • एकूण २४५ सदस्यांच्या राज्यसभेत बहुमतासाठी १२६चा आकडा गाठणे आवश्यक आहे. मात्र, रालोआच्या सदस्यांची एकत्रित संख्या त्यापेक्षा कमी आहे.
    • २३ मार्च रोजी ७ राज्यांमध्ये राज्यसभेच्या २५ जागांसाठी मतदान झाले. त्यात भाजपाला १२, काँग्रेसला ५, तृणमूल काँग्रेसला ४, तेलंगणा राष्ट्र समितीला ३ आणि जदयूला १ जागा मिळाल्या.
    • यावर्षभरात राज्यसभेच्या १७ राज्यांमधील ५९ जागा रिक्त झाल्या. त्यातील ३३ जागा बिनविरोध निवडल्या गेल्या. त्यापैकी १६ जण भाजपाचे होते.

    फणसाला केरळकडून राज्यफळाचा दर्जा बहाल

    • केरळ राज्याने फणस या फळाला राज्यफळाचा मान बहाल केला. राज्याचे कृषिमंत्री व्ही. एस. सुनीलकुमार यांनी विधानसभेत ही घोषणा केली.
    • झाडाला लागणारे सर्वांत मोठे फळ अशी ओळख असलेल्या फणसाला हा मान देणारे केरळ हे पहिलेच राज्य आहे.
    • फणसाच्या उत्पादनात केरळचा देशात सहावा क्रमांक लागतो. केरळमध्ये दरवर्षी ३० कोटींहून अधिक फणसांचे उत्पादन होते.
    • देशातील २० राज्यांमध्ये फणस पिकत असून, फणस उत्पादनात त्रिपुराचा क्रमांक पहिला आहे.
    • त्याखालोखाल ओरिसा, आसाम, प. बंगाल, कर्नाटक, केरळ, छत्तीसगढ ही  फणसाची सर्वाधिक उत्पादन करणारी राज्ये आहेत. फणस उत्पादनात महाराष्ट्राचा देशात १५वा क्रमांक लागतो.

    चालू घडामोडी : २२ मार्च

    सुपरसॉनिक ब्राम्होस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

    • जगातील सर्वाधिक वेगवान क्षेपणास्त्रांमध्ये गणल्या जाणाऱ्या सुपरसॉनिक ब्राम्होस क्षेपणास्त्राची भारताकडून पोखरण येथील तळावरुन यशस्वी चाचणी घेण्यात आली.
    • कमी उंचीवर वेगाने उड्डाण घेणारे आणि रडारच्या टप्प्यातही ने येणारे क्षेपणास्त्र अशी ब्रह्मोसची ओळख आहे.
    • भारत आणि रशिया यांनी संयुक्तरित्या जून २००१मध्ये या क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे.
    • भारताच्या डीआरडीओ आणि रशियाच्या एनपीओएम या संस्थांकडून हे क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले आहे.
    • भारतातील ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियातील मस्कवा नदी यांच्यावरुन याचे नाव ब्राम्होस असे ठेवण्यात आले.
    • या क्षेपणास्त्राचा वेग आवाजाच्या गतीपेक्षा तीनपट अधिक आहे. २९० किमी पर्यंत मारा करु शकण्याची तर ३०० किग्रॅ वजनाची स्फोटके वाहून नेण्याची याची क्षमता आहे.
    • हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या ब्रह्मोसला पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांना टार्गेट करण्यासाठीही वापरता येणे शक्य आहे.
    • जमिनीखालील बंकर्स, कन्ट्रोल सेंटर्स आणि समुद्रावरून उडणाऱ्या विमानांनाही क्षणात उध्वस्त करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे.

    आयुष्मान भारत योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

    • देशातील प्रत्येक गरीब कुटुंबाला प्रतिवर्षी ५ लाख रुपयांचे आरोग्यविमा कवच देणाऱ्या ‘आयुष्मान भारत’ योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने २१ मार्च रोजी मंजुरी दिली.
    • केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. या योजनेसाठी अर्थसंकल्पात ८५२.१७ अब्ज रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
    • या योजनेनुसार रुग्णालयात दाखल करण्याआधीचा आणि नंतरचा खर्च दिला जाणार आहे. या योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेखालील १० कोटी कुटुंबांना होणार आहे. 
    • आता राष्ट्रीय स्वास्थ्य विमायोजना आणि ज्येष्ठ नागरिक आरोग्य विमा योजना या योजना आता ‘आयुष्मान भारत’मध्येच समाविष्ट होणार आहेत.
    • ग्रामीण भागांत जे कुटुंब एकाच खोलीत राहाते आणि त्या खोलीच्या भिंती आणि छप्पर कच्चे आहे, ज्या कुटुंबात १६ ते ५९ या वयोगटातील कुणीही नाही, ज्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून अपंगावरच जबाबदारी आहे असे कुटुंब, कुटुंब प्रमुखाची जबाबदारी स्त्री पार पाडत असेल असे कुटुंब, अनुसूचित जाती व जमातीचे कुटुंब आणि मजुरीवर पोट भरणारे कुटुंब; यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

    अंगणवाडी सेविकांवर लावण्यात आलेला मेस्मा अखेर रद्द

    • अंगणवाडी सेविकांवर लावण्यात आलेला महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा कायदा (मेस्मा) अखेर रद्द करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे.
    • राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांवर मेस्मा लावण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर मित्रपक्ष शिवसेनेसहित विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली होती.
    • राज्यात सध्या ९७ हजार अंगणवाडय़ा असून या अंगणवाडय़ांमधून २ लाख अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ० ते ६ वयोगटातील ७३ लाख बालकांना पोषण आहार दिला जातो.
    • गेली अनेक वर्षे ५ हजार रुपये मानधनावर काम करणाऱ्या राज्यातील २ लाख अंगणवाडी सेविकांना मानधनवाढीसाठी गेल्या वर्षी संप पुकारला होता.
    • २६ दिवसाचा या संपानंतर सरकारने त्यांच्या मानधनात १५०० रुपये वाढ केली. त्याचप्रमाणे १ एप्रिल २०१८ पासून ५ टक्के मानधनवाढ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला.
    • तथापि ५ टक्केवाढीचा आदेश अद्यापपर्यंत काढण्यात आला नसून सरकारने अंगणवाडय़ांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
    • अंगणवाडी सेविका संपकाळात बाल मृत्यू झाल्याचे निदर्शनास आणुन देत राज्य सरकारने त्यांना अत्यावश्यक सेवा कायद्याच्या (मेस्मा) कक्षेत आणण्याचा निर्णय घेतला होता.
    • अंगणवाडी सेविका आणि कमर्चाऱ्यांना मेस्मा कायद्याच्या कक्षेत आणण्याचा निर्णय हा त्यांच्या संप करण्याच्या हक्कावर गदा आणणारा आहे. त्यामुळे या कायद्यावर सर्व स्तरातून टीका होत होती.

    उ. महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव

    • उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवियत्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे.
    • भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केलेली ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य करत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची घोषणा केली. 
    • १५ ऑगस्ट १९९० रोजी जळगाव येथे उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती. यात जळगावसह धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचा समावेश करण्यात आला होता.
    • बऱ्याच वर्षांपासून विद्यापीठाला खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची मागणी सर्वपक्षीय संघटना तसेच सामाजिक संस्थांच्या माध्यमातून केली जात होती.

    नेपाळची शारदा नदी यमुना नदीशी जोडण्याची योजना प्रस्तावित

    • भारत आणि नेपाळदरम्यान असलेला पंचशील करारांतर्गत नेपाळहून वाहत येणारी शारदा नदीला यमुना नदीशी जोडण्याची योजना भारत आणि नेपाळ आखत आहे.
    • ही योजना तसेच देशातील प्रमुख पर्यावरण पर्यटन योजनांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. तसेच दिल्लीसह उत्तराखंडला ही या योजनेचा मोठा लाभ मिळणार आहे.
    • या योजनेमुळे डोंगराळ भागात वीज, पाणी आणि रोजगाराबरोबरच देशी-विदेशी पर्यटकांची संख्याही वाढणार आहे.
    • या योजनेचा आराखडा (डीपीआर) तयार करण्यात आला असून, त्यावर दोन्ही देशांतील तज्ञांची टीम अध्ययन करते आहे.
    • दोन दशकांपूर्वी महाकाली पाणी कराराच्या माध्यमातून भारत व नेपाळने शारदा नदीवर पंचेश्वर बांध योजनेचे काम सुरू केले होते.
    • पंचेश्वर बांध तयार झाल्यानंतर यमुना नदीला अतिरिक्त पाणी मिळणार आहे. यमुनेच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने नदीचे पाणी स्वच्छदेखील होणार आहे. त्यामुळे दिल्लीला स्वच्छ पाण्याचा पुरवठाही वाढणार आहे.
    • ही योजना अस्तित्वात येण्यासाठी जवळपास ३३,१०८ कोटी रुपये इतका खर्च होणार आहे. त्यातील ६२.३ टक्के खर्च भारत देणार असून, उर्वरित खर्च नेपाळ करणार आहे.
    • यामुळे ५,०५० मेगावॉट विजेचे उत्पादन होणार आहे. तसेच ४.३ लाख हेक्टर क्षेत्रही ओलिताखाली येणार आहे. भारतातल्या जवळपास २.६ लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

    चालू घडामोडी : २१ मार्च

    हिंदी कवी केदारनाथ सिंह यांचे निधन

    • ज्ञानपीठ पुरस्कार विजेते हिंदी कवी केदारनाथ सिंह यांचे २१ मार्च रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.
    • केदारनाथसिंह हे मुळचे उत्तरप्रदेशातील रहिवासी होते. सोपे लिखाण हे त्यांचे वैशिष्ट्य होते. हिंदी साहित्यातील ते एक प्रख्यात कवी म्हणून त्यांची ओळख आहे.
    • त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराबरोबरच (२०१३) साहित्य अकादमी पुरस्कारानेही (१९८९) गौरवण्यात आले आहे. 
    • अकाल मे सरस, बाग, अभी बिलकुल अभी, जमीन पाक रही है, यहॉंसे देखो हे त्यांचे काव्य संग्रह विशेष गाजले आहेत.
    • ते कथाकार आणि निबंधकार म्हणूनही परिचीत होते. त्यांच्या निधनाने हिंदी साहित्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

    देशात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक भिकारी

    • भारतातल्या भिकाऱ्यांची यादी सामाजिक न्यायमंत्री थावर चंद गेहलोत यांनी लोकसभेत जाहीर केली आहे.
    • या माहितीनुसार संपूर्ण देशात ४,१३,७६० भिकारी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही आकडेवारी २०११ मधली आहे.
    • यानुसार मिझोराम राज्यात सर्वात कमी भिकाऱ्यांची संख्या आहे. मिझोरामध्ये ५३ भिकारी आहेत. तर लक्षद्विप, दादरा नगर हवेली, दिव दमण या केंद्रशासित प्रदेशात अनुक्रमे २, १९ आणि २२ भिकारी आहेत.
    • सर्वाधिक भिकारी असणाऱ्यांमध्ये पश्चिम बंगाल अव्वलस्थानी असून उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे.
    • पश्चिम बंगालमध्ये ८१,२४४ तर उत्तर प्रदेशात ६५,८३५ भिकारी आहेत. महाराष्ट्रातील भिकाऱ्यांची संख्या २४,३०७ इतकी आहे.

    ५ कोटी फेसबुक युजर्सचा डेटा लिक

    • जवळपास ५ कोटी फेसबुक युजर्सचा डेटा त्यांच्या परवानगीविना वापरण्यात आल्यामुळे फेसबुक आणि केंब्रिज अॅनालिटिका ही राजकीय डेटा विश्लेषक कंपनी वादात सापडली आहे.
    • २०१६मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकांत अगदी अनपेक्षितपणे डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय मिळवला.
    • हिलेरी क्लिंटनसारख्या बलशाली दावेदाराला हरवून ट्रम्प महासत्तेच्या गादीवर आले. या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना मदत केल्याचे श्रेय केंब्रिज अॅनालिटिका या कंपनीला दिले जाते.
    • २०१४मध्ये फेसबुकच्या माध्यमातून २ कोटी ७० लाख लोकांनी कोगन फेसबुक अॅप इन्स्टॉल आले. जे अॅप पर्सनॅलिटी क्विझ असल्याचे भासवण्यात आले.
    • द ऑब्जर्व्हरच्या माहितीनुसार एखादा फेसबुक युजर ही क्विझ खेळत असेल तर त्याच्या अकाऊंटमध्ये असलेल्या जवळपास १६० युजर्सचा डेटा, वैयक्तीक माहितीचाही अॅक्सेस कोगनला मिळत होता.
    • त्यामुळे २ कोटी ७० लाख लोकांनी सहभाग घेतल्यानंतर त्यांच्या नेटवर्कमधून ५ कोटी लोकांची वैयक्तिक माहिती मिळवण्यात आली.
    • या माहितीचा वापर करताना संबधीत व्यक्तींची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. माहिती मिळवलेल्या युजर्सपैकी बहुतांश लोक हे अमेरिकन होते.
    • या संपूर्ण प्रकरणानंतर फेसबुकवरील गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
    • या घटनेनंतर फेसबुकच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये घसरण झाल्याने फेसबुकला जवळपास ६.०६ अब्ज डॉलरचे (३९५ अब्ज रुपये) नुकसान झाले.
    • तसेच अमेरिका आणि कॅनडात फेसबुक युजर्सची संख्या सुमारे एक कोटीने घटली आहे.
    • फेसबुकने डेटा लीक प्रकरणाचा तपास करण्यासाठी दोन फॉरेन्सिक कंपन्यांची नियुक्ती केली आहे.

    फ्रान्सचे माजी अध्यक्ष सार्कोझी यांना अटक

    • फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सार्कोझी यांना २००७मध्ये निवडणूक प्रचारासाठी लिबियाकडून आर्थिक मदत मिळाल्याप्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले.
    • सार्कोझी आणि त्यांच्या मंत्र्यांना निवडणूक प्रचारासाठी लिबियाचा नेता मौमर कदाफी आणि त्याचा मुलगा सैफ अल-इस्लाम यांनी पैसे पुरविल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
    • कदाफीची राजवट उलथवण्यासाठी अमेरिकन लष्कराच्या मदतीला फ्रान्सने जाऊ नये या उद्देशाने हा पैसा देण्यात आला होता. २०१३मध्ये याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला.
    • या प्रकरणी तपास यंत्रणांनी पाठविलेल्या नोटिसींना सार्कोझी यांनी आतापर्यंत भीक घातली नव्हती.
    • सार्कोझी यांच्याबरोबर त्यांच्या मंत्रिमंडळात सहभागी असलेले तत्कालीन मंत्री ब्रिस होर्टफेक्स यांचीही पोलिसांनी चौकशी केली आहे.

    चालू घडामोडी : २० मार्च

    नॅशनल हेराल्ड प्रकरणी यंग इंडियनला १० कोटी जमा करण्याचे आदेश

    • नॅशनल हेराल्ड प्रकरणात दिल्ली हायकोर्टाने सोनिया गांधी व राहुल गांधी हे भागधारक असलेल्या यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडला १० कोटी रुपये दोन टप्प्यात प्राप्तीकर विभागाकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
    • निम्मी रक्कम ३१ मार्चपर्यंत आणि उर्वरित रक्कम १५ एप्रिलपर्यंत प्राप्तिकर विभागाकडे जमा करावी, असे हायकोर्टाच्या आदेशात म्हटले आहे.
    • यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने प्राप्तीकर खात्याने २४९.१५ कोटी रुपये जमा करण्याच्या दिलेल्या आदेशास स्थगिती मिळावी, अशी विनंती न्यायालयास केली होती.
    • ही रक्कम भरल्यास प्राप्तीकर विभागाने २०११-१२ या वर्षासाठी कंपनीकडून २४९.१५ कोटी रुपयांच्या मागणीचा आग्रह करु नये, असे महत्त्वपूर्ण निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.
    • यापूर्वी कनिष्ठ न्यायालयाने सोनिया व राहुल गांधी यांच्यासह अन्य काँग्रेस नेत्यांना समन्स पाठवून हजर राहण्यास सांगितले होते. त्यांनतर हे प्रकरण दिल्ली हायकोर्टात पोहोचले.
     नॅशनल हेराल्ड प्रकरण 
    • असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड या कंपनीतर्फे लखनौच्या कैसरबाग येथील हेराल्ड हाऊस या मुख्यालयातून नॅशनल हेराल्ड हे इंग्रजी, नवजीवन हे हिंदी व कौमी आवाज हे उर्दू दैनिक प्रसिद्ध व्हायचे.
    • त्यांचा काँग्रेस पक्षाशी थेट संबंध असूनही संपादक एम चलपती राव यांनी आपला स्वतंत्र बाणा जोपासला होता.
    • माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, माजी संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्ण मेनन अशा दिग्गजांचा तेथे कायम राबता असायचा.
    • मात्र इंदिरा गांधी यांच्या हाती पंतप्रधानपद येताच त्यांनी हेराल्डवर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
    • नॅशनल हेराल्डच्या मोक्याच्या जागी असलेली आणि सोन्याचा भाव आलेली स्थावर मालमत्ता हडपण्यासाठी सोनिया आणि राहुल यांनी यंग इंडिया लिमिटेड या कंपनीमार्फत घोटाळा केला, असा आरोप आहे.
    • या प्रकरणाची तक्रार भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केली. त्यात त्यांनी यंग इंडिया कंपनीद्वारे असोसिएट जर्नल लिमिटेडच्या अधिग्रहणात घोटाळ्याचा आरोप केला होता.

    सागरी जीवशास्त्रज्ञ प्रा. एन. आर. मेनन यांचे निधन

    • सागरी जीवशास्त्रज्ञ प्रा. डॉ. एन. आर. मेनन यांचे १८ मार्च रोजी वयाच्या ७६ व्या वर्षी कोची येथे निधन झाले.
    • मच्छीमारीपासून ‘मत्स्योद्योगा’कडे जाण्याचा भारताचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी आणि त्या मार्गात प्रदूषक यांत्रिकीकरणाची धोंड नसावी यासाठीही ते हातभार लावत होते.
    • सागरी पर्यावरणाची हानी करणाऱ्या घटकांचा अभ्यास त्यांनी केलाच, पण समुद्रालगतच्या मानवी वसाहतींना उपयुक्त ठरणारे संशोधनही त्यांनी केले.
    • काही सागरी जीव हे किनाऱ्याच्या आसपासच्या खडकांची तसेच घरे अथवा मानवनिर्मित साहित्याचीही हानी करतात. त्या जीवांच्या जीवनक्रमाचा अभ्यास प्रा. मेनन यांनी केला.
    • माशांना खाद्य म्हणून उपयोगी पडणाऱ्या वनस्पतींत काही विषारी वनस्पतीही आढळतात, त्यांच्या विशेष अभ्यासासाठी प्रा. मेनन ओळखले जातात.
    • एकंदर १५० शोधनिबंध प्रा. मेनन यांच्या नावावर आहेत. त्याहून किती तरी अधिक त्यांनी घडवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे. गेली ४० वर्षे प्रा. मेनन विविध संस्थांमधून सागरशास्त्रज्ञ घडवीत होते.
    • कोचीमध्ये विज्ञान-तंत्रज्ञान विद्यापीठाची (क्युसॅट) स्थापना झाल्यानंतर, या विद्यापीठात सागरी अभ्यास केंद्राच्या स्थापनेपासून ते प्रमुखपदी राहिले.
    • पुढे याच विद्यापीठाचे हंगामी रजिस्ट्रार, हंगामी प्रकुलगुरू अशी पदेही त्यांनी सांभाळली. त्यांचे निधन ही एका अर्थाने सागरी जीवसृष्टीच्या अभ्यासकांची हानी आहे.

    शशिकला यांचे पती एम. नटराजन यांचे निधन

    • बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात असलेल्या आणि अण्णाद्रमुकमधून बडतर्फ करण्यात आलेल्या व्ही. के. शशिकला यांचे पती एम. नटराजन यांचे २० मार्च रोजी निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते.
    • अनेक अवयव निकामी झाल्याने एम. नटराजन यांचे निधन झाले. तसेच, गेल्या वर्षी त्यांच्यावर किडनी आणि यकृत प्रत्यारोपण करण्यात आले होते. 
    • बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी शशिकला यांना न्यायालयाने ४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असून सध्या त्या बंगळुरुमधील तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.
    • नटराजन यांच्या अंत्यविधीसाठी शशिकला यांना १५ दिवसांचा पॅरोल मंजूर होण्याची शक्यता आहे.
    • नटराजन हे देखील अण्णाद्रमुकच्या दिवंगत नेत्या जयललिता यांचे निकटवर्तीय होते. १९८९च्या सुमारात तिकीट वाटपात भ्रष्टाचार केल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता.

    डेल पोट्रोला इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेचे जेतेपद

    • अर्जेंटिनाच्या ज्युआन मार्टिन डेल पोट्रोने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या रॉजर फेडररला पराभूत करून इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले.
    • पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत सहाव्या मानांकित पोट्रोने अग्रमानांकित फेडररला ६-४, ६-७ (८), ७-६ (२) असे नमविले.
    • हे त्याचे सलग दुसरे एटीपी विजेतेपद ठरले. या महिन्याच्या सुरुवातीला पोट्रोने मेक्सिकन ओपन स्पर्धा जिंकली होती.
    • पोट्रोचे हे कारकिर्दीतील २१वे विजेतेपद ठरले. त्याने फेडररला कारकिर्दीत सातव्यांदा पराभूत केले. तर फेडररचा यंदाच्या मोसमातील हा पहिलाच पराभव ठरला.

    वीरधवल खाडेला सुवर्णपदक

    • भारताचा आघाडीचा जलतरणपटू वीरधवल खाडे याने सिंगापूर येथे सुरू असलेल्या नॅशनल एज ग्रुप जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत ५० मीटर फ्रीस्टाइलमध्ये सुवर्णपदक पटकाविले.
    • आंतरराष्ट्रीय जलतरणपटूंचा समावेश असलेल्या या स्पर्धेत २३.०२ सेकंद अशी वेळ देत वीरधवलने ही कामगिरी केली.

    चालू घडामोडी : १८ व १९ मार्च

    कर्नाटक सरकार लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देणार

    • कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.
    • आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातीय समीकरण लक्षात घेऊन कर्नाटकातील काँग्रेस सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.
    • लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्यांकाचा दर्जा देण्याची केंद्र सरकारकडे लिखित मागणी करण्यात येईल असा निर्णय मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
    • कर्नाटक राज्याच्या अल्पसंख्य आयोगाने या दर्जा देण्याच्या विषयाबाबत सात सदस्यांची समिती स्थापन केली होती. त्या समितीचे अध्यक्ष उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एच एन नागमोहन दास हे होते.
    • कर्नाटक अल्पसंख्याक कायद्याच्या कलम २ (डी) अंतर्गत लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्याक म्हणून मान्यता देण्याचा विचार व्हावा असे नागामोहन दास समितीने म्हटले होते.
    • नागामोहन दास समितीने दिलेल्या या अहवालाच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आला.
    • कर्नाटकच्या एकूण लोकसंख्येच्या १७ टक्के लोकसंख्या लिंगायत असून भाजपाकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असणारे माजी मुख्यमंत्री असणारे बी एस येडीयुरप्पा देखिल लिंगायत आहेत. 
    • हा समाज १२व्या शतकातील समाज सुधारक बसवेश्वरांचा पाईक आहे. गेल्या काही वर्षांपासून लिंगायतांनी वेगळ्या धर्माचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
    • लिंगायतांना अल्पसंख्याक धर्माचा दर्जा मिळाला तर कलम २५, २८, २९ आणि ३० अंतर्गत फायदे मिळतील.

    लालूप्रसाद चारा घोटाळ्याच्या चौथ्या प्रकरणातही दोषी

    • राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी रांची न्यायालयाने चारा घोटाळ्याच्या चौथ्या प्रकरणातही दोषी ठरवले. न्यायालयाने यापूर्वी चारा घोटाळ्याच्या तीन प्रकरणांमध्ये लालूंना दोषी ठरवले होते.
    • लालूप्रसाद यांच्यावर डिसेंबर १९९५ ते जानेवारी १९९६दरम्यान झारखंडमधील दुमका कोषागारमधून १३.१३ कोटी रुपये बेकायदेशीररित्या काढल्याचा आरोप आहे.
    • या सुनावणीदरम्यान न्यायालयाने १२ जणांना दोषी ठरवले तर १९ जणांची निर्दोष मुक्तता केली. 
    • चारा घोटाळ्याच्या पहिल्या प्रकरणात लालूंना २०१३मध्ये पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.
    • दुसऱ्या प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लालूंना दोषी ठरवत २३ डिसेंबर २०१७ रोजी साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावली.
    • याशिवाय चारा घोटाळ्याच्या तिसऱ्या प्रकरणात न्यायालयाने २४ जानेवारी २०१८ ला लालूंना पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. लालूप्रसाद यादव सध्या बिरसा मुंडा कारागृहात शिक्षा भोगत आहेत.
     काय आहे चारा घोटाळा? 
    • पूर्वी बिहारमध्ये व आता झारखंडमध्ये असलेल्या देवघर येथील सरकारी तिजोरीतून, सन १९९१ ते १९९७ या काळात खोटी बिले बनवून फसवणुकीने ८९.२७ लाख रुपये काढून अपहार केल्याच्या संदर्भात हा खटला होता.
    • प्रत्यक्षात चाऱ्याच्या पुरवठा न करताच कंत्राटदारांच्या नावे असे पैसे काढले जात असल्याचे माहीत असूनही मुख्यमंत्री या नात्याने लालूंनी त्याकडे कानाडोळा केला, असा त्यांच्यावर आरोप होता.
    • या घोटाळ्याच्या एकूण ३३ खटल्यांपैकी ६ खटल्यांमध्ये लालू प्रसाद आरोपी होते. सहापैकी चार खटल्यात लालूंवरील दोष सिद्ध झाले आहेत.
    • २०१३मध्ये सर्वोच्च न्यायालयाने लालूंना त्या खटल्यात जामीन दिला. पण शिक्षेला स्थगिती न दिली गेल्याने त्यांना ११ वर्षे कोणतीही निवडणूक न लढण्याची अपात्रता लागू झाली.

    विदर्भाने प्रथमच इराणी करंडकावर नाव कोरले

    • प्रथमच रणजी करंडक जिंकणाऱ्या विदर्भाच्या संघाने इराणी करंडकाच्या रूपाने स्थानिक क्रिकेट मोसमातील दुसरे जेतेपद पटकावले.
    • नागपूरातील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पार पडलेल्या लढतीत विदर्भाने शेष भारतावर मात करून प्रथमच इराणी करंडकावर नाव कोरले.
    • शेष भारतविरुद्धची लढत अखेरच्या दिवशी अपेक्षेप्रमाणे अनिर्णीत संपली, पण पहिल्या डावातील आघाडीच्या आधारवर विदर्भाने चषकावर नाव कोरले. 
    • विदर्भातर्फे २८६ धावांची खेळी करणारा अनुभवी फलंदाज वसीम जाफर सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
    • विदर्भाने जाफरच्या द्विशतकी खेळीव्यतिरिक्त गणेश सतीश (१२०) व अपूर्व वानखेडे (नाबाद १५७) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर पल्यिा डावात ७ बाद ८०० धावांची दमदार मजल मारली होती.
    • प्रत्युत्तरात शेष भारत संघाचा पहिला डाव ३९० धावांत संपुष्टात आला. विदर्भाने पहिल्या डावात ४१० धावांची निर्णायक आघाडी घेतली. 

    रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा व्लादिमीर पुतिन

    • रशियामध्ये अध्यक्ष निवडीसाठी पार पडलेल्या मतदानात रशियाचे विद्यमान अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला आहे.
    • गेली दोन दशके रशियातील राजकारण व जनमानसावर प्रभाव टाकणाऱ्या पुतिन यांनी ७५.९ टक्के मते मिळवत विरोधकांवर एकतर्फी विजय मिळवला.
    • त्यामुळे आता पुढील आणखी ६ वर्षांसाठी ते रशियाचे अध्यक्ष असतील. २०२४पर्यंत ते राष्ट्राध्यक्षपदी राहणार आहेत. 
    • २०२४मध्ये जोसेफ स्टॅलिन यांच्यानंतर दीर्घकाळ रशियाचे नेतृत्व केल्याचा मान पुतीन यांना मिळणार आहे. २०००पासून ते रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान आहेत.
    • गेल्या २० वर्षांमध्ये पुतीन यांनी आर्थिक आघाडीसह लष्कराचा विस्तार आणि परराष्ट्र धोरणांमध्येही ठसा उमटविला होता. देशांतर्गत राजकारणामध्येही त्यांनी पकड निर्माण केली आहे.
    • हुकुमशाह म्हणून ओळख असलेल्या पुतिन यांची कार्यशैली आणि नेतृत्व याला रशियातील जनतेने कौल दिला आहे.

    मल्याळम लेखक एम. सुकुमारन यांचे निधन

    • सुप्रसिद्ध मल्याळम लेखक एम सुकुमारन यांचे १६ मार्च २०१८ रोजी निधन झाले आहे. ते ७६ वर्षांचे होते.
    • कट्टर कम्युनिस्ट असूनही त्यांना माकपमधील उणिवा दिसल्या व त्या उणिवा दाखवण्यासाठी त्यांनी १९७९ मध्ये ‘शेषक्रिया’ ही कादंबरी लिहिली होती.
    • त्यांना ‘मरिचितिल्लावरुदे समराकांगल’ या पुस्तकासाठी १९७६मध्ये व ‘जनीथाकम’ पुस्तकासाठी १९९४ मध्ये असा दोनदा केरळ साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
    • त्यांना ‘चुवना चिहनांगल’ या लघुकथा संग्रहासाठी २००६मध्ये राष्ट्रीय साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.
    • त्यांच्या ‘संगागनाम’ आणि ‘उनर्थपट्टू’ या लघुकथांवर चित्रपट निर्मिती करण्यात आलेली आहे.

    गिलानी यांचा हुर्रियत कॉन्फरन्स पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

    • काश्मीरमधील दहशतवाद्यांना फंड पुरविल्याप्रकरणी एनआयएच्या रडारवर आलेले फुटीरतावादी नेते सैय्यद अली शाह गिलानी यांनी अखेर तहरीक-ए- हुर्रियत कॉन्फरन्स पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
    • २००१मध्ये पक्षाच्या स्थापनेपासून सलग १८ वर्ष त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. पक्षाचे ज्येष्ठ नेते मुहम्मद अशरफ सेहराई यांची हुर्रियतचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 
    • टेरर फंडिंग प्रकरणात नाव आल्यानंतर तपास यंत्रणेच्या कारवाईच्या भीतीने गिलानी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे.
    • गिलानी यांच्या कुटुंबीयांकडे एकूण १४ मालमत्ता असून त्याची किंमत १५० कोटी एवढी आहे.
    • त्यांचा मोठा मुलगा सर्जन असून दुसरा मुलगा जम्मू-कश्मीर सरकारमध्ये नोकरीला आहे. टेरर फंडिंग प्रकरणी तपास यंत्रणेने गिलानी यांच्या दोन्ही मुलांची चौकशी केली होती.

    चालू घडामोडी : १७ मार्च

    प्रा. मार्गारेट मुरनन यांना सेंट पॅट्रिक विज्ञान पदक प्रदान

    • जगातील सर्वात वेगवान लेसरची निर्मिती करणाऱ्या लेसर तंत्रज्ञ प्रा. मार्गारेट मुरनन यांना आर्यलडचे सेंट पॅट्रिक विज्ञान पदक प्रदान करण्यात आले.
    • अमेरिकेत काम करत असतानाही त्यांना आयर्लंडमध्ये गौरवण्यात येण्याचे कारण म्हणजे त्या जन्माने आयरिश आहेत. आयर्लंडमध्ये संशोधनासाठी वेगळे वातावरण निर्माण करण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे.
    • प्रा. मुरनन अमेरिकेतील सर्वोत्तम भौतिकशास्त्रज्ञ व तंत्रज्ञांपैकी एक आहेत. लेसर अभियांत्रिकीत त्यांनी मोठे काम केले आहे. अतिशय वेगवान प्रकाशीय व क्ष-किरण विज्ञान हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.
    • जगातील सर्वात वेगवान लेसर शलाका त्यांनी तयार केल्या. त्यांनी तयार केलेले लेसर रासायनिक अभिक्रियांतील अणूंची गती मोजू शकतील इतके वेगवान आहेत.
    • त्यांनी तयार केलेल्या काही लेसर शलाका या १२ फेमटोसेकंदात (सेकंदातील दहाचा उणे पंधराव्या घाताएवढा भाग) निर्माण होणाऱ्या आहेत.
    • वैज्ञानिक संशोधनात नेक पदार्थाच्या रचना, शरीररचनेचा अभ्यास करण्यासाठी प्रतिमाचित्रणाला महत्त्व आहे. हे चित्रण अधिक सुस्पष्ट करणारे लेसर किरण तयार करण्यात डॉ. मुरनन यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
    • वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन व युनिव्हर्सिटी ऑफ कोलॅरॅडो येथे त्यांनी अध्यापनाचे काम केले आहे.
    • अमेरिकन फिजिकल सोसायटीच्या त्या फेलो असून यापूर्वी त्यांना मारिया गोपर्ट मेयर पुरस्कार मिळाला होता.
    • युनिव्हर्सिटी ऑफ कोलॅरॅडोच्या त्या मानद सदस्या तर अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस या प्रख्यात संस्थेच्या त्या फेलो आहेत.

    प्रशासक समिती व बीसीसीआय पदाधिकारी यांच्यातील मतभेद तीव्र

    • विनोद राय यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय क्रिकेट बोर्डाच्या प्रशासक समितीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे हंगामी अध्यक्ष सी के खन्ना, हंगामी सचिव अमिताभ चौधरी व खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांचे सर्व कार्यालयीन अधिकार काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
    • त्यामुळे बीसीसीआयची द्विसदस्यीय प्रशासकीय समिती आणि त्रिसदस्यीय पदाधिकारी यांच्यातील मतभेद आणखी तीव्र झाले आहेत.
    • विनोद राय यांच्या नेतृत्वाखालील प्रशासकीय समितीने प्रभारी अध्यक्ष सी. के. खन्ना, प्रभारी सचिव अमिताभ चौधरी आणि कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांचे सर्व
    • गेल्याच आठवड्यात प्रशासक समितीने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या आपल्या अहवालात या पदाधिकाऱ्यांना हटविण्याची मागणी केली होती. यापुढे जात आता या पदाधिकाऱ्यांचे सर्वाधिकार समितीने काढून घेतले आहेत.
    • आता प्रशासकीय समितीच्या परवानगीशिवाय या पदाधिकाऱ्यांच्या दौऱ्यांचा आणि निवासाचा खर्च केला जाणार नाही.
    • यापुढे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना लोढा समिती संदर्भातील खटल्यासाठी कायदेशीर खर्च करण्याचा अधिकारसुद्धा राहणार नाही.

    टीटीव्ही दिनकरन यांच्या नव्या पक्षाची स्थापना

    • अण्णा द्रमुकमधून हकालपट्टी झालेले नेते टीटीव्ही दिनकरन यांनी दिवंगत जयललिता यांच्या नावाने ‘अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघम’ नावाचा पक्ष स्थापन केला आहे.
    • त्यांनी आपल्या नव्या पक्षाच्या झेंड्याचेही अनावरण केले. त्यावर माजी मुख्यमंत्री जयललिता यांचे हसरे छायाचित्र आहे.
    • दिनकरन यांना अण्णा द्रमुक पक्षातील असंतुष्ट कार्यकर्ते आणि नेते यांचा पाठिंबा मिळताना दिसत आहे.
    • तामिळनाडूमध्ये आतापर्यंत द्रमुक, अण्णा द्रमुक, काँग्रेस, भाजपा हे प्रमुख पक्ष होते. याशिवाय रामदास यांचा पीएमके, वायको यांचा एमडीएमके हे पक्षही सक्रिय आहेत. दोन्ही डाव्या पक्षांची काही ठिकाणी ताकद आहे.
    • कमल हसन व रजनीकांत हेही आता राजकारणात सक्रिय झाले आहे. दिनकरन यांनीही नवा पक्ष स्थापन केला. एकूणच तामिळनाडूमध्ये पक्षांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.
    • सध्या तुरुंगात असलेल्या शशिकला यांचे दिनकरन हे भाचे आहेत. डिसेंबर महिन्यात झालेल्या चेन्नईतील आरके नगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते.

    लोकेश राहुल वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू : विस्डेन इंडिया

    • विस्डेन इंडिया अल्मनॅकच्या सहाव्या आवृत्तीमध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून भारताच्या लोकेश राहुलची निवड करण्यात आली आहे.
    • या नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर भारतीय महिला क्रिकेट संघाचे वर्ल्ड कपदरम्यान जल्लोष करतानाचे छायाचित्र वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
    • भारताचा कर्णधार विराट कोहलीला नियतकालिकाने सर्वांत यशस्वी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून गौरवले आहे.
    • महिला क्रिकेटमध्ये भारताच्या दीप्ती शर्माचा समावेश वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंमध्ये करण्यात आला आहे.
    • भारताच्या इरापल्ली प्रसन्ना आणि शांता रंगस्वामी या अनुक्रमे माजी पुरुष व महिला क्रिकेटपटूंचा समावेश विस्डेन इंडियाच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये करण्यात आला आहे.

    चालू घडामोडी : १६ मार्च

    तेलगु देसम पक्ष भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर

    • चंद्राबाबू नायडू यांचा तेलगु देसम पक्ष भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (रालोआ) बाहेर पडला आहे.
    • आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरुन मोदी सरकार विरोधात संसदेत अविश्वास ठराव मांडण्याचा प्रयत्न सुरु असताना चंद्राबाबू नायडू यांनी देखील भाजपाला धक्का दिला आहे. 
    • आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी मोदी सरकारने मान्य न केल्यामुळे आंध्र प्रदेशमधील राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत.
    • आंध्र प्रदेशमधील विरोधी पक्ष वायएसआर काँग्रेसने मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास ठराव मांडण्याचा निर्णय घेतला आहे.
    • तर भाजपाचा मित्रपक्ष आणि आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी तेलगू देसम पक्षानेही मोदी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.
    • ८ मार्च रोजी तेलगू देसम पक्षाचे नेते अशोक गजपती राजू आणि वाय. एस. चौधरी यांनी केंद्रीय मंत्रीपदाचे राजीनामे दिले होते.
    • लोकसभेत तेलगू देसमचे १६ तर राज्यसभेत ६ खासदार आहेत. त्यामुळे भाजपासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
    • रालोआतून बाहेर पडताच तेलगू देसम पक्षानेही मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास ठराव मांडणार, असे स्पष्ट केले आहे.
    • सद्यस्थितीत ५४३ सदस्यांच्या लोकसभेत ५३६ खासदार आहेत. त्यात एकट्या भाजपाचेच २७३ खासदार आहेत. ही संख्या बहुमतापेक्षाही जास्त आहे.
    • टीडीपीने पाठिंबा काढून घेतल्यानंतर रालोआचे संख्याबळ ३१२वर आले आहे. त्यामुळे अविश्वास ठराव आला तरी तो मंजूर होणार नाही, हे स्पष्ट आहे.

    मानव तस्करी प्रकरणात गायक दलेर मेहंदीला दोन वर्षे तुरुंगवास

    • पंजाब मधील पटियाला न्यायालयाने २००३सालच्या मानव तस्करी प्रकरणात प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक दलेर मेहंदीला दोषी ठरवून दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
    • दलेर मेहंदीचा भाऊ शमशेर सिंग यालाही या प्रकरणात दोषी ठरवले आहे. सध्या दलेर पंजाब पोलिसांच्या कोठडीत आहे. 
    • दलेर मेहंदी आणि शमशेर सिंग यांच्यावर बेकायदेशीररित्या लोकांना परदेशात पाठवल्याचा आरोप होता. मानवी तस्करीसंदर्भात दलेर मेंहदीवर ३१ गुन्हे आहेत. 
    • हे दोघे सामान्य नागरिकांना आपल्या म्युझिक ट्रुपचे सदस्य असल्याचे दाखवून परदेशात पाठवायचे. अवैधरित्या मानव तस्करी करण्यासाठी ते घसघशीत रक्कमही आकारायचे.
    • मेहंदी बंधु १९९८ आणि १९९९ साली दोन ट्रुप घेऊन परदेशात गेले होते. त्यावेळी ट्रुपचे सदस्य असल्याचे दाखवून ते बेकायदेशीररित्या १० जणांना अमेरिकेत घेऊन गेले.
    • बशिक्ष सिंग यांच्या तक्रारीवरुन २००३साली दलेर आणि शमशेर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर या दोघांविरोधात घोटाळयाच्या अनेक तक्रारी समोर आल्या.
    • पटियाला पोलिसांनी नवी दिल्लीतील कनॉट प्लेस येथील दलेर मेहंदीच्या ऑफीसवर छापा मारुन कागदपत्रेही जप्त केली होती.

    आशा बगे यांना पहिला साहित्यव्रती पुरस्कार जाहीर

    • प्रख्यात मराठी लेखिका आशा बगे यांना प्रथमच दिला जाणारा ‘प्रा. राम शेवाळकर स्मृती साहित्यव्रती पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
    • अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे दिला जाणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप एक लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे आहे.
    • विदर्भ साहित्य संघाचे व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेल्या व आयुष्यभर साहित्याची व्रतस्थपणे सेवा करणाऱ्या राम शेवाळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे.
    • स्त्रीकेंद्री जाणिवेच्या प्रभावी लेखिका अशी ओळख असलेल्या आशा बगे यांनी परंपरा आणि आधुनिकता याची सांगड घालत त्यांनी सुमारे चार दशके कथा, कांदबरी, ललित असे चौफेर लेखन केले आहे.
    • त्यांच्या ‘भूमी’ या कांदबरीला २००६साली साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला आहे. ‘दर्पण’ या कथासंग्रहासाठी केशवराव कोठावळे पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
    • साहित्य क्षेत्रातील त्यांचे हे योगदान डोळ्यापुढे ठेवून महामंडळाने त्यांना या पुरस्कारासाठी निवडले आहे.

    नेपाळ क्रिकेट संघाला एकदिवसीय क्रिकेटचा दर्जा

    • विश्वचषक पात्रता क्रिकेट स्पर्धेच्या प्ले-ऑफमध्ये नेपाळने पपुआ न्यू गिनी संघाला सहा विकेट राखून हरवले. त्यामुळे नेपाळ क्रिकेट संघाला एकदिवसीय क्रिकेटचा दर्जा मिळाला आहे.
    • दीपेंद्र सिंग ऐरीच्या अष्टपैलू खेळाने नेपाळच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. या पराभवामुळे गिनीने आपला एकदिवसीय क्रिकेटचा दर्जा गमावला आहे.
    • संदीप लॅमिचाने आणि दीपेंद्र यांनी प्रत्येकी चार बळी घेत पपुआ न्यू गिनीचा डाव २४.२ षटकांत ११४ धावांत गुंडाळला. 
    • त्यानंतर नेपाळने चार फलंदाजांच्या मोबदल्यात २३ षटकांत विजयी लक्ष्य पार केले. दीपेंद्रने ५८ चेंडूंत एक चौकार आणि तीन षटकारासह नाबाद ५० धावा काढल्या.

    चालू घडामोडी : १५ मार्च

    वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्टमध्ये भारताची पीछेहाट

    • संयुक्त राष्ट्राने तयार केलेल्या आनंदी देशांची यादीमध्ये (वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट २०१८) २०१७च्या क्रमवारीतही भारतापेक्षा आनंदी असणाऱ्या पाकिस्तानने २०१८मध्येही भारताला मागे टाकले आहे.
    • प्रत्येक वर्षी भारतीय जास्तीत जास्त दुखी होत असल्याचे, तर तुलनेने पाकिस्तानी जास्तीत जास्त समाधानी होत असल्याचे चित्र या अहवालातून समोर आले आहे.
    • २०१७मधील वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्टमध्ये भारताची ४ क्रमांकाने घसरण झाली होती. २०१८मध्ये मात्र भारत ११ क्रमांकांनी खाली आला आहे. १५६ देशांच्या यादीत भारत १३३व्या क्रमांकावर आहे.
    • दहशतवादाची टांगती तलावर डोक्यावर घेऊन वावरणाऱ्या पाकिस्तान मात्र ५ क्रमांकाने प्रगती करत ७५व्या स्थानी पोहोचला आहे.
    • आनंदी देशांच्या या क्रमवारीत बांगलादेश, भुतान, नेपाळ, चीन आणि श्रीलंकादेखील भारताच्या पुढे आहेत.
    • सामाजिक पाठिंबा, भ्रष्टाचारसारखे मुद्दे लक्षात घेऊन सोबतच लोकांच्या अपेक्षा यावरुन हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे.
    • या यादीत फिनलँड पहिल्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल नॉर्वे, डेन्मार्क, आइसलँड, स्वित्झलँड, नेदरलँड, कॅनडा, न्यूझीलँड, स्वीडन आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा नंबर लागतो.
    • अमेरिकेची या यादीत घसरण झाली आहे. गेल्या वर्षी यादीत अमेरिका १४व्या स्थानी होता. यावर्षीच्या यादीत अमेरिका १८व्या स्थानी आहे.

    नील बसू स्कॉटलंड यार्ड दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख

    • जगात नावाजलेल्या स्कॉटलंड यार्ड पोलीस दलातील दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून भारतीय वंशाच्या नील बसू यांची निवड झाली आहे. बसू यांचे वडील भारतीय वंशाचे आहेत.
    • या पदावर नियुक्ती झालेले बसू पहिले आशियायी व्यक्ती ठरले आहेत. २१ मार्च रोजी राजीनामा देणाऱ्या मार्क राउली यांची ते जागा घेणार आहेत.
    • ४९वर्षीय बसू सध्या मेट्रोपॉलिटन पोलिसचे उप-सहाय्यक आयुक्त आहेत. ब्रिटनमध्ये ही जबाबदारी सर्वात कठीण समजली जाते.
    • आता बसू हे दहशतवादविरोधी पथक आणि मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या विशेष मोहिमेचे प्रमुख असतील.
    • पदवीधर झाल्यानंतर बसू स्कॉटलंड यार्डच्या ‘घोस्ट स्क्वाड’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या गुप्तवार्ता विभागात ते इन्स्पेक्टर म्हणून रुजू झाले.
    • पोलीस दलातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर नजर ठेवून त्यांची माहिती गोळा करण्याचे अवघड काम त्यांच्यावर सोपवण्यात आले.
    • येथे आपल्या कामाची छाप पाडल्यानंतर संघटित गुन्हेगारी व गुंड टोळ्यांचा बीमोड करण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली.
    • या विभागात त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांना पदोन्नती मिळून ते एरिया कमांडर बनले. त्यानंतर ते दहशतवादविरोधी पथकात सामील झाले. विविध पदे त्यांनी या विभागात भूषवली.
    • आयसिसमध्ये ब्रिटनमधील काही तरुण सामील झाल्याचे संवेदनशील प्रकरणही त्यांनी कुशलतेने हाताळले होते.

    हरियाणामध्येही अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यास फाशीची शिक्षा

    • अल्पवयीन मुलींवर होत असलेल्या बलात्काराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हरियाणा विधानसभेने १२ वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्यास फाशीची शिक्षा देणाऱ्या ऐतिहासिक कायद्याला मंजूरी दिली आहे.
    • मध्यप्रदेश आणि राजस्थाननंतर हरियाणा असा कायदा करणारे तिसरे राज्य ठरले आहे.
    • हरियाणात गेल्या काही काळापासून अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामुळे हरियाणा सरकारला टीकेला सामोरे जावे लागत होते.
    • अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी हा कायदा आणण्यात आला आहे.

    पुणे देशातील उत्तम शासन असलेले शहर

    • विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेले पुणे देशातील उत्तम शासन असलेले शहर असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.
    • या स्पर्धेमध्ये २० राज्यांमधील २३ शहरांनी सहभाग घेतला होता. त्यात पुण्याने पहिला क्रमांक मिळवला आहे.
    • ‘इंडियाज सिटी सिस्टीम फॉर २०१७’ असे या सर्वेक्षणाचे नाव असून, पुण्याने १० पैकी ५.१ गुण मिळवत इतर शहरांना मागे टाकले आहे.
    • यामध्ये दिल्लीला ४.४ तर मुंबईला ४.२ गुण मिळाले आहेत. त्यामागोमाग कलकत्ता, थिरुवनंतपुरम, भुवनेश्वर, सुरत ही शहरे आहेत.
    • शहरातील एकूण शासकीय कामकाजाचा यामध्ये प्रामुख्याने विचार करण्यात आला होता. एकूण ८९ प्रश्नांवरुन हे गुण देण्यात आले आहेत. त्यातही कायदे, धोरणे आणि माहिती अधिकार यांचा विचार कऱण्यात आला आहे.
    • आयटीहब म्हणून ओळख असलेले बंगळुरु यामध्ये सगळ्यात खालच्या क्रमांकावर असल्याचे समोर आले आहे.
    • याअंतर्गत परदेशातील मेट्रो शहरांचेही सर्वेक्षण करण्यात आले आहे, त्यात दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग, यूकेतील लंडन आणि अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरांना चांगले गुण मिळाले आहेत.

    चालू घडामोडी : १४ मार्च

    ख्यातनाम विश्वरचना शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन

    • ब्रिटनचे ख्यातनाम विश्वरचना शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे १४ मार्च रोजी वयाच्या ७६व्या वर्षी केंब्रिजमध्ये निधन झाले.
    • दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर हाकिंग यांनी आपल्या दुर्धर अशा आजारपणावर मात करत विज्ञान विषयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यामुळे अनेकांसाठी ते एक आदर्श होते.
    • विश्वशास्त्र (कॉस्मॉलॉजी) आणि क्वांटम ग्रॅव्हिटी या दोन शाखांमध्ये विश्वाची उत्पत्ती आणि कृष्णविवरांच्या संदर्भात त्यांनी मांडलेले सिद्धांत वैज्ञानिक जगतात अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जातात.
    • स्टीफन हॉकिंग यांचा जन्म इंग्लंड येथील ऑक्सफर्ड येथे ८ जानेवारी १९४२ रोजी झाला. त्यांचे वडील डॉ. फ्रँक हॉकिंग हे जीवशास्त्राचे संशोधक होते. तर त्यांची आई वैद्यकीय संशोधन सचिव होती.
    • ऑक्सफर्ड विद्यापीठातून भौतिकशास्त्रात अव्वल क्रमांक पटकावल्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून पीएचडी केली.
    • विश्वाची निर्मिती कशी झाली, आकाशातील कृष्णविवरे कशी तयार होतात, अशा अनेक गूढ न उकललेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
    • वयाच्या २१व्या वर्षी ‘मोटार न्यूरॉन डिसीज’ने त्यांना ग्रासले होते. ते फार फार तर दोन वर्षे जगू शकतील अशी भीती डॉक्टरांनी वर्तवली होती.
    • परंतु असामान्य इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी आपल्या आजारपणावर मात करत आधुनिक काळातील न्यूटन अशी ख्याती जगभर मिळवली.
    • वयाच्या ३५व्या वर्षी हॉकिंग केंब्रिज विद्यापीठात ल्यूकॅशियन प्रोफेसर झाले. केंब्रिज विद्यापीठात हे पद महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेच मानले जाते. न्यूटन देखील ल्यूकॅशियन प्रोफेसरच होते.
    • हॉकिंग एनर्जी, हॉकिंग्ज रेडिएशन यांसह अनेक शोधांसाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यासाठी त्यांना भौतिकशास्त्रातले अत्यंत मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत.
    • २००९मध्ये त्यांना प्रेसिडेन्शिअल मेडल फॉर फ्रीडम या अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले होते. कमांडर ऑफ दी ब्रिटिश एम्पायर या पुरस्कारानेही त्यांना गौरवले होते.
    • २००१साली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या मुंबईतील संशोधन संस्थेने आयोजीत केलेल्या ‘स्ट्रींग’ या परिषदेसाठी त्यांना आमंत्रित केले होते.
    • त्या परिषदेत हॉकिंग यांनी दिलेले व्याख्यान प्रसिद्ध आहे. टीआयएफआरने त्यांना सरोजिनी दामोदरन फेलोशिपही दिली आहे.
    • त्यांनी भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र हे क्लिष्ट विषय सामान्यांनाही समाजावेत, यादृष्टीने लिखाण केले.
    • त्यांचे 'ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम' हे पुस्तक विशेष गाजले. या पुस्तकात त्यांनी बिग बँग आणि कृष्णविवरासंदर्भात सविस्तर विवेचन केले होते.
    • याशिवाय द ग्रँड डिझाईन, युनिव्हर्स इन नटशेल, माय ब्रीफ हिस्ट्री, द थिअरी ऑफ एव्हरीथिंग, ऑन द शोल्डर्स ऑफ जायंटस ही हॉकिंग यांची पुस्तके जगप्रसिद्ध आहेत.
     हॉकिंग यांनी मांडलेले सिद्धांत 
    • विश्वरचनेची मुळ उत्पत्ती कुठून झाली याचा शोध लावण्यासाठीच्या सिद्धांतांमध्ये त्यांनी बरीच शोधपत्रके सादर केली.
    • वेळ आणि त्यामागचे सिद्धांत त्यांनी मांडले.
    • द बिग बॅंग थिअरी (विश्वोत्पत्तीचा सिद्धांत).
    • विश्वाची सुरुवातच गुरुत्वाकर्षणातील विलक्षणतेमुळे झाली होती हा सिद्धांत त्यांनी मांडला.
    • सिंग्युलारिटी ही विश्वातील एक सर्वसामान्य बाब आहे.
    • कृष्णविवरे किरणोत्सर्ग करत असावीत हा सिद्धांत त्यांनी मांडला.
    • विश्वाला वेळ आणि सीमेच्या मर्यादा नाही.
    • देव अस्तित्वातच नाही, या मुद्द्यावरच ते ठाम होते.
    • परग्रहवासीयांचे अस्तित्व नाकारता येणार नाही. ते कदाचित आपल्यापेक्षा जास्त प्रगत असतील या मतावर ते ठाम होते.

    ‘क्षयरोगमुक्त भारत’ मोहिमेची सुरुवात

    • देशातून २०२५पर्यंत क्षयरोग पूर्णपणे नष्ट करण्याच्या ‘क्षयरोगमुक्त भारत’ मोहिमेची १३ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवात केली.
    • जागतिक आरोग्य संघटनेने २५ वर्षांपूर्वी क्षयरोगाबाबत भाष्य केले होते आणि तेव्हापासून अनेक देशांनी या रोगाचा नायनाट करण्यासाठी प्रयत्न केले.
    • मात्र अजूनही क्षयरोगाचा पूर्ण नायनाट झालेला नाही, त्यामुळे क्षयरोगमुक्त भारत उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भूमिकेत बदल करण्याची गरज असल्याचे मोदी यांनी सांगितले.
    • गाव, पंचायत, जिल्हा आणि राज्य क्षयरोगमुक्त करण्यासाठी विविध घटकांनी प्रत्येक स्तरावर सहभाग आणि त्या योगदान द्यावे, असेही मोदी म्हणाले.
    • क्षयरोगाला नष्ट करण्यासाठी भारतासह इतर देशांनी प्रमुख प्रयत्न करणे गरजेचे आहे. भारतामध्ये क्षयरोगामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.
    • २०१६मध्ये क्षयरोगाचे २६ लाख नवे रुग्ण आढळून आले. तसेच यामध्ये ४ लाख लोकांना क्षयरोग आणि एचआयव्हीची लागण झाली आहे.

    बॅडमिंटनच्या नियमांमध्ये बदल

    • बॅडमिंटन खेळाची लोकप्रियता वाढावी, यासाठी जागतिक बॅडमिंटन फेडरेशनने काही नवे नियम केले आहेत.
    • यापैकी काहींची अंमलबजावणी झाली आहे, तर काही बदल प्रास्तावित आहेत. या नियम बदलांवर प्रमुख बॅडमिंटनपटूंनी उघड नाराजी व्यक्त केली आहे.
    • १९ मे रोजी बँकॉकला जागतिक बॅडमिंटन फेडरेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यात इतर नियम बदलांवर शिक्कामोर्तब होईल.
    • यापैकी सर्व्हिसचा महत्वपूर्ण नियम १४ मार्चपासून सुरू झालेल्या ऑल इंग्लंड स्पर्धेपासून अंमलात येणार आहे.
     नवे नियम 
    • प्रायोगिक सर्व्हिस बदल : बॅडमिंटनपटूंनी सर्व्हिस करताना शटलकॉक जमीनीपासून ३.८ फूट अंतरावर धरावे. यापूर्वी खेळाडूंनी आपल्या कमरेच्या खाली शटलकॉक धरून सर्व्हिस करावी असा नियम होता. उंच बॅडमिंटन खेळाडूंसाठी हा नियम मारक ठरणार आहे.
    • गुणपद्धतीत बदल : गुणपद्धतीत बदल करण्यात येणार आहे. पूर्वी २१ गुणांचे सर्वोत्तम ३ गेमची लढत असे. आता ११ गुणांच्या सर्वोत्तम ५ गेमची झुंज असेल.
    • अनिवार्य सहभाग : जागतिक रँकिंगमध्ये अव्वल १५ क्रमांकाच्या महिला व पुरुष बॅडमिंटनपटूंना प्रत्येक मोसमात किमान १२ स्पर्धांमध्ये भाग घेणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास त्यांना दंड भरावा लागेल. त्यामुळे खेळाडूंची दमछाक होणार आहे.

    सौरमालेजवळ १५ नवीन बाह्यग्रहांचा शोध

    • टोकियो इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेने सौरमालेजवळ १५ नवीन बाह्यग्रह सापडल्याची घोषणा केली असून, त्यातील एका ग्रहावर पृथ्वीप्रमाणेच द्रवरूपात पाणी असण्याची शक्यता आहे.
    • तांबड्या लहान बटू ताऱ्यांभोवती हे ग्रह फिरत असून या संशोधनामुळे ग्रहांच्या निर्मिती प्रक्रियेवर नवा प्रकाश पडणार आहे.
    • लालबटू ताऱ्यांपैकी के २-१५५ हा तारा पृथ्वीपासून दोनशे प्रकाशवर्षे दूर आहे. त्याच्या भोवती महापृथ्वीसारखे तीन ग्रह फिरत असून ते पृथ्वीपेक्षा मोठे आहेत.
    • ताऱ्याभोवती सर्वात बाहेरच्या कक्षेत असलेल्या ग्रहाचे नाव के २-१५५डी असे ठेवण्यात आले आहे. तो गोल्डीलॉक झोन म्हणजे वसाहतयोग्य पट्टय़ात आहे.
    • तेरुयुकी हिरानो यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन झाले असून, नासाच्या केप्लर दुर्बिणीच्या साह्याने हे पंधरा ग्रह शोधण्यात आले आहेत.
    • या संशोधकांनी स्पेनमधील नॉर्डिक ऑप्टिकल टेलिस्कोप व हवाई येथील सुबारू टेलिस्कोप यांच्या मदतीने पृथ्वीवरून निरीक्षणे केली.
    • नासाने एप्रिलमध्ये टेस (ट्रान्सिटिंग एक्सोप्लॅनेट सर्व्हे) नावाचा उपग्रह सोडण्याचे ठरवले आहे.
    • या उपग्रहाच्या मदतीने बाह्यग्रह असलेले संभाव्य उमेदवार ग्रह सापडू शकतील. त्यानंतर पृथ्वीवरून निरीक्षणांच्या मदतीने त्यांची खातरजमाही करता येईल.