चालू घडामोडी : ३० व ३१ मार्च
चीनची अवकाश प्रयोगशाळा पृथ्वीवर कोसळणार
- चीनची पहिली अवकाश प्रयोगशाळा (स्पेस स्टेशन) ‘तियांगोंग-१’ १ एप्रिल रोजी पृथ्वीवर कोसळणार असल्याचे संकेत युरोपीयन स्पेस एजन्सीने दिले आहेत.
- एका स्कूल बसच्या आकाराची ही प्रयोगशाळा आठ हजार पाचशे किलोग्रॅम वजनाची असून सुमारे साडेदहा मीटर लांबीची आहे.
- ही प्रयोगशाळा पृथ्वीकडे झेपावताना रविवार १ एप्रिल रोजी पहाटे १ वाजल्यापासून सायं. ७ वाजेपर्यंत कधीही चार मिनिटे भारतावरून जाणार आहे.
- यामध्ये महाराष्ट्रासह मुंबईचा बराचसा भाग येत असून ती अडीच मिनिटांत महाराष्ट्रावरून जाईल. या प्रवासात ती भारतातही कोसळण्याची शक्यता आहे.
- अर्थात अवकाशात वरच्यावर तिचे तुकडे होतील त्यामुळे घाबरण्याचे काहीही कारण नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
- स्पेस स्टेशनच्या संभाव्य मार्गात मुंबईसह महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बंगालचा उपसागराचा समावेश असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
- परंतु स्पेस स्टेशन अतितीव्र वेगाने येत असल्याने कुठे पडेल, याचा अंदाज बांधणे कठीण आहे.
- खाली कोसळताना त्याचे लहान तुकडे होतील. या तुकड्यांमध्ये विषारी वायू असण्याची शक्यता आहे. हे तुकडे २०० ते ३०० किलोमीटर परिसरात पसरण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
- या स्पेस स्टेशनची एजन्सी चायना नॅशनल स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (सीएनएसए)ने २०१६पासून स्पेस स्टेशनसोबतचा संपर्क तुटल्याचे सांगितले होते. तेव्हापासून हे स्पेस स्टेशन अंतराळात फिरत आहे.
- २०११मध्ये प्रक्षेपित करण्यात आलेले हे चीनचे पहिले स्पेस स्टेशन होते. त्यावेळी स्वर्गातील राजमहल असे त्याला नाव देण्यात आले होते.
डॉ. रॉबर्ट लँगलँड्स यांना आबेल पुरस्कार
- प्रसिद्ध गणितज्ञ डॉ. रॉबर्ट लँगलँड्स यांना गणितातील नोबेल मानला जाणारा आबेल पुरस्कार नुकताच मिळाला आहे.
- कॅनडाचे नागरिक असलेल्या लँगलँड्स यांना ‘लँगलँड्स प्रोग्रॅम’ या नावाने गणितात प्रसिद्ध असलेल्या संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.
- आधुनिक गणितात इतक्या मोठय़ा प्रमाणावर फलनिष्पत्ती असलेले कुठलेही गणिती संशोधन सध्या तरी अस्तित्वात नाही. त्यांचा हा प्रकल्प गणितातील महाएकात्मिक सिद्धांत मानला जातो.
- गेल्या पन्नास वर्षांतील एक उत्तम गणितज्ञ असा त्यांचा गौरव आबेल पुरस्कार निवड समितीने केला आहे.
- लँगलँड्स प्रोग्रॅमव्यतिरिक्त क्लास फिल्ड थिअरी, ऑटोमॉर्फिक फॉर्म व नंबर थिअरी यात त्यांनी बरेच काम केले आहे.
- सध्या ते प्रिन्स्टनमध्ये इन्स्टिटय़ूट फॉर अॅडव्हान्सड स्टडी या संस्थेत मानद प्राध्यापक आहेत. याच कार्यालयात आइनस्टाइन यांनीदेखील गणितज्ञ म्हणून काम केले आहे.
- येल विद्यापीठात असताना त्यांनी ‘प्रॉब्लेम्स इन थिअरी ऑफ ऑटोमॉर्फिक फॉर्मस’ हे पुस्तकही लिहिले आहे.
- आतापर्यंत त्यांना वुल्फ, स्टीली, नेमर्स, शॉ यांच्या नावाने दिले जाणारे गणितातील सर्व मोठे पुरस्कार मिळाले आहेत.
फोर्ब्सच्या ‘३० अंडर ३० अशिया’ यादीत भारताला प्रथम स्थान
- भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना या तिघीही फोर्ब्सच्या यादीत झळकल्या आहेत.
- फोर्ब्सने आशियातील मनोरंजन आणि क्रिडाक्षेत्रातील नामवंतांची ‘३० अंडर ३० अशिया’ ही यादी जाहीर केली असून, त्यात या तिघींचा समावेश करण्यात आला आहे.
- फोर्ब्सच्या या ३०० उद्योन्मुख प्रतिभावंतांच्या यादीत भारताने प्रथम स्थान पटकावले असून चीनला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.
- या यादीसाठी फोर्ब्सने एकूण १० श्रेणी तयार केल्या असून, या यादीत आशिया पॅसिफिकमधील २५ देशांचा समावेश करण्यात आला आहे.
- या यादीत भारताच्या ६५ प्रतिभावंतांना स्थान मिळाले असून, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या ५९ प्रतिभावंतांचा या यादीत समावेश झालेला आहे.
- या यादीत उत्तर कोरिया आणि अझरबैजान या देशांना पहिल्यांदाच स्थान मिळाले आहे. ऑनलाइन मतदानाद्वारे ही निवड करण्यात आली.
- इंडियन नॅशनल पोलो टीमचा कर्णधार पद्मनाभ सिंह, अंकित प्रसाद, प्रिया प्रकाश, बाला सरदा, सुहानी जलोटा, राहुल ज्ञान, श्रेयस भंडारी, रमेश धामी आणि भूमिका अरोरा आदी भारतीयांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
- कोणत्या देशाचे किती तरूण?
- भारत - ६५
- चीन - ५९
- ऑस्ट्रेलिया - ३५
- दक्षिण कोरिया- २५
- जपान - २१
- हाँगकाँग - १२
- पाकिस्तान- ७
अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची रशियातून हकालपट्टी
- रशियाने अमेरिकेच्या ६० राजनैतिक अधिकाऱ्यांना माघारी धाडण्याचा तसेच सेंट पीटर्सबर्ग येथील अमेरिकेचा दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
- संबंधित अधिकाऱ्यांना ५ एप्रिलपर्यंत रशिया सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- ब्रिटनमध्ये ४ मार्च रोजी रशियाचा माजी गुप्तहेर सर्गई स्क्रिपल आणि त्याची मुलगी यूलिया स्क्रिपल या दोघांवर विषप्रयोग करण्यात आला होता.
- यामागे रशियाचा हात असल्याचे सिद्ध झाल्यानंतर अमेरिकेने ब्रिटनला साथ देत अमेरिकेतील रशियाच्या ६० राजनैतिक अधिकाऱ्यांची देशातून हकालपट्टी केली होती.
- त्याचवेळी ट्रम्प सरकारने सिएटलमधील रशियन दूतावासही बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
- याला उत्तर देण्यासाठीच रशियाने अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. या कारवाईनंतर दोन्ही देशांमधील तणावात अधिकच भर पडली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा