चालू घडामोडी : १२ नोव्हेंबर

पंतप्रधान नरेंद्र मोदी फिलीपीन्स दौऱ्यावर

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी १५व्या दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांच्या (आशियान) भारत शिखर परिषदेसह १२व्या ईस्ट आशिया परिषदेला उपस्थितीत राहण्यासाठी फिलीपीन्सला रवाना झाले.
  • दोन्ही परिषदे व्यतिरिक्त या तीन दिवसीय दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री मोदी व अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची बैठक होऊ शकते.
  • या तीन दिवसीय फिलीपीन्स दौऱ्यात मोदी १३ नोव्हेंबर रोजी आशियानच्या व्यवसाय आणि गुंतवणुक परिषदेला उपस्थित राहतील.
  • यासोबतच प्रधानमंत्री मोदी फिलिपीन्सचे राष्ट्राध्यक्ष रोडीनो डुपेरटे यांच्या सोबत द्विपक्षीय बैठकीत सामील होतील. रोडीनो हे आशियानचे विद्यमान अध्यक्ष आहेत.
  • याच वेळी आशियानच्या ५०व्या वर्धापनदिनानिम्मित रोडीनो यांच्यातर्फे विशेष उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 
  • १४ नोव्हेंबर रोजी प्रधानमंत्री मोदी मनिला येथील प्रादेशिक व्यापक आर्थिक सहभागाच्या बैठकीत भाग घेतील आणि आशियाई देशांच्या राष्ट्रांशी भारताचे व्यापार आणि गुंतवणुकीचे संबंध वाढविण्यावर भर देतील.
  • आशियान राष्ट्रांसोबत भारताचा व्यापार हा इतर देशांच्या तुलनेत १० टक्क्यांहून अधिक आहे.
  • मनिलामध्ये, प्रधानमंत्री मोदी इतर काही जागतिक नेत्यांची भेट घेतील, जे पूर्व आशिया शिखर सम्मेलनात सहभागी होणार आहेत.
  • तसेच ते आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था आणि महावीर फिलीपीन्स फाउंडेशनलाही भेट देणार आहेत.
 डोनाल्ड ट्रंप यांच्यासोबत होऊ शकते बैठक 
  • आशिया खंडातील ५ देशाच्या यात्रे दरम्यान ट्रंप फिलिपिन्सला १३ नोव्हेंबर रोजी पोहोचणार आहेत.
  • भारत, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया यांचा एक संयुक्त गट तयार करण्याच्या प्रस्तावानंतर दोघांमधील हि पहिलीच बैठक असेल.
  • प्रधानमंत्री मोदी व ट्रंप बैठकी दरम्यान क्षत्रिय सुरक्षासंबंधी विविध विषयवार चर्चा करतील. 

बांगलादेशाच्या हिंदू सरन्यायाधीशांचा राजीनामा

  • सरकारबरोबरील मतभेदानंतर बांगलादेशाचे पहिले हिंदू सरन्यायाधीश सुरेंद्र कुमार सिन्हा यांनी राजीनामा दिला आहे.
  • सिन्हा यांच्यावर मनी लाँड्रिंग, भ्रष्टाचार आणि आर्थिक अनियमितता यासारखे आरोप लावण्यात आले होते. त्यामुळे गेल्या एक महिन्यांपासून ते सक्तीच्या सुटीवर होते.
  • या काळात ते परेदशात गेले होते. ऑस्ट्रेलियातून त्यांनी राष्ट्रपती अब्दुल हामिद यांच्याकडे राजीनामा पाठवला.
  • सिन्हा यांनी १७ जानेवारी २०१५ मध्ये बांगलादेशाचे २१वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांचा कार्यकाळ पुढील वर्ष ३१ जानेवारी रोजी पूर्ण होणार होता.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर महाभियोग चालवण्याचा संसदेचा अधिकार रद्द करण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे सरकार त्यांच्यावर नाराज होते.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या पाच वरिष्ठ न्यायाधीशांनी सिन्हा यांच्यावर मनी लाँड्रिंग आणि भ्रष्टाचारासारखे गंभीर आरोप करत त्यांच्याबरोबर काम करण्यास नकार दिला होता.

अमेरिकेक्डून पाकिस्तानला ७० कोटी डॉलरची मदत

  • अमेरिकन काँग्रेसने पाकिस्तानला ४.५ हजार कोटी रूपयांची (७० कोटी डॉलर) मदत देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
  • अमेरिकेकडून अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या अभियानाला समर्थन देण्याच्या बदल्यात पाकिस्तानला ही रक्कम दिली जाणार आहे.
  • पाकिस्तानने त्यांना मिळालेली मदत दहशतवादी समूहाला पुरवू नये याकडे अमेरिकेच्या संरक्षण विभागाने लक्ष ठेवण्याची विनंती अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा प्राधिकरणाने केली आहे.

‘न्यूड’ सिनेमाला इफ्फीमधून वगळले

  • रवि जाधव दिग्दर्शित ‘न्यूड’ या सिनेमाला ४८व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमधून (इफ्फी) वगळण्यात आले आहे.
  • १३ ज्युरी मेबर्सनी एकुण २४ सिनेमांची इफ्फीमध्ये इंडियन पॅनोरमा विभागासाठी निवड केली होती. पॅनोरमा विभागात न्यूड सिनेमाचे स्क्रीनिंगही होणार होते.
  • पण सिनेमाच्या नावावर आक्षेप घेत, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या यादीतून या सिनेमाला वगळण्यात आले आहे.
  • ज्युरी मेंबर्सचा सल्ला न घेता हा मोठा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे काही ज्युरी मेंबर्सनी केंद्राच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
  • दिग्दर्शक रवि जाधव यांचा ‘न्यूड’ हा सिनेमा न्यूड मॉडेल म्हणून काम करणाऱ्या एका तरूण स्त्रीच्या जीवनावर आधारीत आहे.
  • न्यूड सिनेमाव्यतिरिक्त सनलकुमार ससिधरन दिग्दर्शित मल्ल्याळम सिनेमा ‘एस दुर्गा’ला सुद्धा इफ्फीतून वगळण्यात आले आहे.

मुशर्रफ यांची २३ राजकीय पक्षांची महाआघाडी

  • पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आणि हुकूमशहा परवेज मुशर्रफ यांनी २३ राजकीय पक्षांची ‘पाकिस्तान अवामी इत्तेहाद’ (पीएआय) ही महाआघाडी स्थापन केली आहे.
  • याच्या अध्यक्षपदी मुशर्रफ असतील तर, इकबाल डार यांची महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • मुहाजीर समुदायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पक्षांना या नव्या राजकीय आघाडीत सहभागी होण्याचे आवाहन मुशर्रफ यांनी केले आहे.
  • या आघाडीतील सर्व पक्षांचे सदस्य यापुढे पाकिस्तान अवामी इत्तेहाद या एकाच पक्षाच्या नावाने निवडणुका लढतील.
  • मुशर्रफ यांच्यावर गतवर्षी विशेष न्यायालयाने देशद्रोहाचा आरोप लावला होता. यावर्षी ऑगस्टमध्ये बेनझीर भुट्टो हत्या प्रकरणात त्यांना फरार घोषित करण्यात आले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा