चालू घडामोडी : २६ नोव्हेंबर
आशियाई कबड्डी स्पर्धेत भारताचे वर्चस्व
- भारताने आंतरराष्ट्रीय कबड्डीमधील आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध करताना आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष व महिला गटात सुवर्ण पदकाची कमाई केली.
- इराणच्या गोरगान शहरात सुरु असलेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने अंतिम फेरीत पाकिस्तानवर ३६-२२ अशी मात करत स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले.
- एकाच स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा सलग दुसऱ्यांचा पराभव केला आहे. याआधी झालेल्या साखळी फेरीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ४४-१८ अशी मात केली होती.
- अजय ठाकूरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने ४० मिनीटांच्या या सामन्यावर बहुतांश काळ आपले वर्चस्व कायम राखले.
- दुसरीकडे अभिलाषा म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघानेही अंतिम फेरीत दक्षिण कोरियावर मात करत विजेतेपदावर मोहोर उमटवली.
- अंतिम फेरीत भारतीय महिला संघाला फारसा प्रतिकार झाला नाही. ४२-२०च्या फरकाने भारतीय महिला संघाने हा सामना आपल्या नावावर केला.
हाँगकाँग ओपनमध्ये सिंधूला उपविजेतेपद
- हाँगकाँग ओपन सुपरसीरिज स्पर्धेत अंतिम सामन्यात झालेल्या पराभवामुळे भारताच्या पी. व्ही. सिंधूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
- जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू चीनच्या ताइ जु यिंग हिने सिंधूचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. यिंगचे हे या मोसमातील सुपर सीरिजचे पाचवे जेतेपद ठरले.
- तर अंतिम सामन्यात मोक्याच्या वेळी झालेल्या चुका महागात पडल्याने सिंधूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
- ४४ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या लढतीत यिंगविरुद्ध सिंधू १८-२१, १८-२१ अशी पराभूत झाली. विशेष म्हणजे सिंधूला सलग दुसऱ्यांदा यिंगविरुद्ध पराभूत व्हावे लागले.
- यंदाच्या मोसमात सिंधूने सुपर सीरिज स्पर्धेच्या चार अंतिम लढती खेळल्या असून, त्यापैकी दोन लढती तिने जिंकल्या असून दोन लढती गमावल्या आहेत.
- २००७पासून या स्पर्धेचा सुपर सीरिजमध्ये समावेश झाला असून, तेव्हापासून या स्पर्धेतील महिला एकेरीचे जेतेपद सलग दोनवेळा जिंकणारी यिंग पहिलीच खेळाडू ठरली.
- मागील वर्षी सिंधुलाच पराभूत करत यिंगने ही स्पर्धा जिंकली होती. तसेच, यिंगने २०१४मध्येही ही स्पर्धा जिंकली होती.
जेफ बेजॉस जगात सर्वात श्रीमंत
- जगातली सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ जेफ बेजॉस यांनी श्रीमंतीच्या बाबतीत बिल गेट्सचा १८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे.
- ब्लॅक फ्रायडे सेल्सनंत त्यांच्या अॅमेझॉन कंपनीचे शेअर्स २ टक्के वाढल्याने बेजॉस यांची संपत्ती १००.३ अब्ज डॉलर्स (सुमारे ६,४६,५७५ कोटी रुपये)वर पोहोचली आहे.
- त्यामुळे १०० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक संपत्ती असणारी बेजॉस ही जगातली दुसरी व्यक्ती आहे. यापूर्वी १९९९मध्ये मायक्रोसॉफ्टचे संपादक बिल गेट्स यांनी हा विक्रम केला होता.
- यावर्षी २३ नोव्हेंबरपर्यंत बेजॉस यांच्या संपत्तीत ३२.६ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. या आठवड्यात अॅमेझॉनला ५ टक्के वाढ मिळाली आहे.
- बिल गेट्स यांच्याकडे अजूनही ८६.८ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. त्यांनी मायक्रोसॉफ्टचे ७० कोटी शेअर्स, २.९ अब्ज डॉलर्स रोख आणि अन्य संपत्तीचे दान केले नसते तर ते आतापर्यंत १५० अब्ज डॉलर्सचे मालक असते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा