चालू घडामोडी : १ नोव्हेंबर

उद्योगस्नेही देशांच्या यादीत भारत १००वा

  • जागतिक बँकेतर्फे जाहीर करण्यात येणाऱ्या ‘ईझ ऑफ डुइंग बिझनेस’ अर्थात व्यवसाय सुलभता निर्देशांकाच्या १९० देशांच्या क्रमवारीत भारताने यंदा शंभरावे स्थान पटकावले आहे. 
  • गेल्यावर्षी याच यादीत भारताचा क्रमांक १३०वा होता. त्यामुळे मानांकनात सुधारणा साधणाऱ्या सर्वोत्तम १० देशांमध्येही यंदा भारताने स्थान पटकावले आहे.
  • हे मानांकन ठरवण्यासाठी जून २०१६ ते जून २०१७ या काळातील विविध मापदंड तपासण्यात आले. भारताने यंदा एकूण १० पैकी ८ निकषांवर उत्तम कामगिरी केली.
  • हा निर्देशांक ठरवताना भारतातील मुंबई व दिल्ली या २ शहरातील परिस्थिती प्रामुख्याने लक्षात घेण्यात आली आहे.
  • या मानांकनातून हे स्पष्ट होते की, भारत व्यवसाय करण्यासाठी अधिक सज्ज आणि खुला आहे.
  • या क्रमवारीमध्ये भारताचा प्रमुख प्रतिस्पर्धी असणाऱ्या चीनने ७८वा क्रमांक पटकावला आहे.
 भारताची प्रगती 
  • व्यवसाय करण्यास सुलभ वातावरण निर्माण करण्यास सर्व व्यासपीठांवरून प्राधान्य दिल्याचे हे फलित आहे.
  • कर भरण्याची प्रक्रिया सुलभ करम्यात आली तसेच कर भरण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यात आला.
  • दहापैकी ९ सुधारणा निकषांत टक्केवारीनुसार सुधारणा उच्च आहे.
  • बांधकामासाठी लागण्याऱ्या प्रक्रिया सुलभ व वेगवान करण्यात आल्या.
  • मुंबईने मूल्वर्धित कर आणि व्यवसाय कर यांसाठी लागणारे स्वतंत्र अर्ज एकत्र करून व्यवसाय सुरू करण्यास लागणारी सुलभता वाढवली.
  • ऊर्जा किंवा वीज मिळणे आता अधिक सुलभ व वेगवान झाले असून त्याची किंमतही खाली आली आहे.
  • विजेची किंमत दरडोई उत्पन्नाच्या १३३ टक्क्य़ांवरून १८ टक्क्य़ांवर आली आहे.
 टीका 
  • भारतात नवा व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्यासाठी १५ वर्षांपूर्वी १२७ दिवस लागत होते. आता हा वेळ ३० दिवसांवर आला आहे. मात्र आजही भारतात नवा व्यवसाय सुरू होताना बराच त्रास सहन करावा लागतो.
  • मुंबईमध्ये नवा व्यवसाय सुरू करण्यास १२ प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागतात. जगातील प्रगत व उच्च उत्पन्न असलेल्या देशांत त्यासाठी केवळ सरासरी ५ परवानग्या घ्याव्या लागतात.
  • कंत्राट पूर्ण करण्यासाठी राबवण्यासाठी १५ वर्षांपूर्वी भारतात १४२० दिवस लागत होते. आता तो कालावधी वाढून १४४५ दिवसांवर आला आहे. या बाबतीत भारताची पिछेहाट झाली आहे.
 भारत एका दृष्टिक्षेपात 
  • १. छोट्या शेअरधारकांच्या सुरक्षेत ५व्या स्थानी.
  • २. वीजजोडणीच्या बाबतीत १२८व्या स्थानी.
  • ३. व्यवसाय सुरू करण्यामध्ये १५६व्या स्थानी.
  • ४. कॉन्ट्रॅक्ट लागू करण्यामध्ये १६४व्या स्थानी.
  • ५. प्रॉपर्टी नोंदविण्यामध्ये १५४व्या स्थानी.
  • ६. सीमापार व्यापारात १४६व्या क्रमांकावर.
  • ७. बँकरप्ट प्रक्रिया निवारणामध्ये १०३व्या स्थानी.
  • ८. व्यवसाय क्रमवारीत २९व्या स्थानी.
  • ९. करदायित्वामध्ये ११९व्या स्थानी.
  • १०. बांधकाम परमिटमध्ये १८१व्या स्थानी.

तामिळ लेखक मेलनमाई पोन्नुसामी यांचे निधन

  • साहित्य अकादमीचा पुरस्कार विजेते तामिळ लेखक मेलनमाई पोन्नुसामी ३० ऑक्टोबर २०१७ रोजी निधन झाले.
  • पोन्नुसामी हे शेतकरी होते. तसेच तामिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यातील मेलानमरैनाडू या गावात किराणा दुकानही चालवीत असत.
  • कम्युनिस्ट पक्षाच्या ‘सेमालार’ या साहित्यविषयक नियतकालिकात त्यांची पहिली कथा १९७२मध्ये प्रसिद्ध झाली.
  • नंतर आनंद विकटन, काल्की या नियतकालिकांतून त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले. त्यांनी एकूण २२ लघुकथासंग्रह, ६ कादंबऱ्या व १ निबंधसंग्रह लिहिले.
  • तामिळनाडूतील शेतकरी, ग्रामीण भागांतील गरीब लोक यांच्या जीवनाचा पट त्यांनी लेखनातून मांडला.
  • दक्षिण तामिळनाडूतील करीसाल भूमी म्हणजे निम्न कोरडवाहू शेतीच्या प्रदेशातील वंचितांचे जीवन त्यांनी रेखाटले.
  • ते पूर्णवेळ लेखक होते. शिवाय ते कम्युनिस्ट पक्षाचे काम करीत असत. सोव्हिएत साहित्याचा त्यांच्यावर प्रभाव होता.
  • स्वत:ला ते जाहीरपणे कम्युनिस्ट लेखक म्हणून घेत असत. त्यामुळे त्यांनी त्या विचारसरणीशी असलेले नाते कधी लपवले नाही.
  • पोन्नुसामी यांना ‘मिनसारापो’ या लघुकथा संग्रहासाठी २००८मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता.
  • त्यांना मक्कल टीव्ही पुरस्कार, इलाकिया चिंतनी पुरस्कार, अदिथनार पुरस्कार व तामिळनाडू सरकारचा साहित्य पुरस्कारही मिळाले होते.

पाकिस्तान उच्चायुक्तपदी अजय बिसारीया

  • पोलंडमधील भारतीय राजदूत आणि अनुभवी राजनाईक अजय बिसारीया यांची पाकिस्तानमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती  करण्यात आली आहे.
  • अजय बिसारीया हे १९८७च्या बॅचचे आयएफएस अधिकारी आहेत. ते आता गौतम बंबावले यांची जागा घेतील. गेल्या महिन्यात बंबावले यांची चीनमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.
  • अजय बिसारिया १९८८-९१मध्ये मॉस्को दूतावासमध्ये तैनात होते. त्यांनी १९९९-२००४ दरम्यान पंतप्रधानांचे खासगी सचिव म्हणून देखील काम केले आहे. जानेवारी २०१५पासून ते पोलंडमध्ये भारतीय राजदूत म्हणून कार्यरत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा