लष्कराकडून लाईट कॉम्बॅट विमान तेजस आणि अर्जुन रणगाड्याची निर्मिती थांबवण्याबद्दलचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
त्याऐवजी स्ट्रॅटजिक पार्टनरशिप धोरणातंर्गत मेक इन इंडियाच्या माध्यमातून परदेशी बनवाटीची सिंगल इंजिन फायटर जेट आणि रणगाडयांची निर्मिती करावी असे लष्कराचे मत आहे.
संरक्षण उत्पादन क्षेत्रातील भारताची अनुभव कमतरता दूर करण्यासाठी केंद्र सरकारने स्ट्रॅटजिक पार्टनरशिप धोरणावर भर दिला आहे.
नव्या धोरणामुळे भारतातील खासगी क्षेत्रातील कंपन्यांसाठीही शस्त्रास्त्र निर्मितीची दारे खुली होणार आहेत.
परदेशातील आघाडीच्या शस्त्रास्त्र निर्मिती कंपन्यांबरोबर भागीदारी करुन भारतीय कंपन्यांना शस्त्रास्त्र निर्मिती करता येईल. यामुळे तंत्रज्ञान हस्तांतरण सुद्धा शक्य होणार आहे.
गेल्याच आठवड्यात लष्कराने १,७७० रणगाड्यांसाठी प्राथमिक स्तरावरील निविदा मागवली आहे.
या रणगाड्यांना फ्युचर रेडी कॉम्बॅट व्हेईकल्सदेखील म्हटले जाते. युद्धजन्य परिस्थितीत शत्रू सैन्यावर वरचढ ठरण्यासाठी या रणगाड्यांचा उपयोग होऊ शकतो.
यासोबतच भारतीय हवाई दलाकडून लवकरच ११४ सिंगल फायटर जेट्स विमानांसाठी निविदा मागवल्या जाऊ शकतात.
‘मेक इन इंडिया’ला गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे भारतीय संरक्षण दलांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि युद्ध सामग्री मिळेल.
मात्र भारतीय सुरक्षा दलांसाठी करण्यात येणारी आर्थिक तरतूद अतिशय कमी आहे. त्याचा परिणाम संरक्षण दलांच्या शस्त्रसज्जतेवर होऊ शकतो.
ज्येष्ठ नागरिकांना घरपोच बँकिंग सेवा
७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तसेच अंध व अपंगांना डिसेंबर अखेरपासून घरपोच प्राथमिक बँकिंग सेवा द्या, असे आदेश रिझर्व्ह बँकेने व्यावसायिक बँकांना दिले आहेत.
त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिक व अंध-अपंगांना रोख रकमेचा भरणा व अदायगी (पीक-अप अॅण्ड डिलिव्हरी), चेकबुक आणि डिमांड ड्राफ्ट या सेवा घरपोच मिळतील.
ज्येष्ठ नागरिक आणि अंध-अपंगांना गैरसोयीचा सामना करावा लागू नये, यासाठी त्यांना बँकांनी घरपोच सेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात येत आहेत.
ज्येष्ठ नागरिक आणि अंध-अपंग यांसह वैद्यकीय प्रमाणित जुनाट आजार अथवा शारीरिक अक्षमता असलेल्या व्यक्तींनाही या सेवेचा लाभ मिळेल.
वरील श्रेणीत येणाऱ्या नागरिकांना रोख रकमेचा भरणा करण्यासाठी तसेच खात्यावरील पैसे काढण्यासाठी बँक शाखेत जाण्याची गरज पडणार नाही. डिमांड ड्राफ्टही त्यांना घरपोच मिळेल.
तसेच केवायसी दस्तावेज आणि हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी त्यांना बँकेत जावे लागणार नाही. बँकेचे प्रतिनिधी त्यांच्या घरी येऊन संबंधित दस्तावेज घेऊन जातील.
या निर्देशांची अंमलबजावणी ३१ डिसेंबरपासून करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत.
‘भारतनेट’साठी महाराष्ट्राला २,१७१ कोटी रुपये
केंद्र सरकारच्या ‘भारतनेट’ या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी महाराष्ट्राला २,१७१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
‘भारतनेट’च्या दुसऱ्या टप्प्यातील ब्रॉडबँड नेटवर्कच्या विस्तारामध्ये राज्यातील १४८ तालुके इंटरनेटने जोडण्यात येणार आहेत.
भारतनेट अंतर्गत ग्रामीण भारताला डिजिटल करण्यासाठी ऑप्टिकल फायबर नेटवर्कवर ब्रॉडबँडचे जाळे निर्माण केले जात आहे.
भारतनेटच्या पहिल्या टप्प्यात देशातील एक लाखापेक्षा अधिक ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात एकूण ७,४५१ गावामध्ये ब्रॉडबँड नेटवर्क सेवा पोहोचवण्यात आली. राज्यातील पहिल्या डिजिटल जिल्ह्याचा मान नागपूर जिल्ह्याला मिळाला.
केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद
केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा
हवामान वैज्ञानिक शेलह्युबर यांना दी ब्लू प्लॅनेट पुरस्कार
जागतिक तापमान वाढीच मुद्दा सर्वप्रथम मांडणारे हवामान वैज्ञानिक हान्स जोआकिम शेलह्युबर यांना टोकियो येथे ‘दी ब्लू प्लॅनेट पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
ग्लास फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा हा ब्लू प्लॅनेट पुरस्कार ५० दशलक्ष येनचा आहे.
जर्मनीतील पोटसडॅम इन्स्टिटय़ूट ऑफ क्लायमेट रीसर्च या संस्थेचे ते संचालक आहेत. ते जर्मनीच्या चॅन्सेलरचे सल्लागारही होते.
हवामानबदलासारख्या मुद्दय़ांवर उपाययोजनांसाठी त्यांनी जर्मनीत प्रसंगी राजकीय नेत्यांशी वादही घातले आहेत.
१९९२मध्ये त्यांनी हवामानबदलांचा अभ्यास करण्यासाठी ‘पॉट्सडॅम इन्स्टिटय़ूट फॉर क्लायमेट रीसर्च’ ही संस्था स्थापना केली. जपानचे हवामान धोरण ठरवण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे.
हवामान प्रणालीतील अरेषीय गतिकीचा गुंतागुंतीचा अभ्यास त्यांनी मांडला. संगणकीय सादृश्यीकरणाच्या मदतीने त्यांनी अतिशय विश्वासार्ह व वास्तववादी असे काही निष्कर्ष काढले होते.
हवामान बदलांचा प्रश्न जागतिक पातळीवर नेण्यात त्यांना पोप फ्रान्सिस यांची मदत झाली होती.
पृथ्वीच्या तापमानात २ ते ४ अंश सेल्सियसचा फरक पडला तर जागतिक समुदायातील समाज संपन्न सांस्कृतिकतेकडून विनाशाकडे केव्हा जाईल हे कळणार नाही, असा धोक्याचा इशारा त्यांनी देऊन ठेवला आहे.
हवामान बदलाच्या विषयास एक विज्ञान शाखा म्हणून नावारूपास आणण्यात शेलह्युबर यांचा मोठा वाटा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा