मोरोक्को येथे जन्मलेले फ्रेंच दिग्दर्शक रॉबिन कॅम्पिल्लो यांच्या ‘वन ट्वेंटी बिट्स पर मिनिट’ या चित्रपटाने ४८व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी)सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ‘गोल्डन पिकॉक’ सुवर्णमयुर पुरस्कार मिळवला.
४० लाख रुपये, सुवर्ण मयुराची प्रतिमा आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
१९९०च्या दशकातल्या फ्रान्समधल्या आयुष्यावर आधारीत हा चित्रपट समलैंगिकता आणि एड्स या विषयावर भाष्य करतो.
नहुएल पेरेझ बिस्कायार्ट यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात अरनॉड व्हॅलोयस आणि अॅडेले हेनेल यांच्याही भूमिका आहेत.
याच महोत्सवात चीनचे दिग्दर्शक व्हीव्हीयन क्यू यांना 'अँजल्स वेअर व्हाईट' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. रजत मयुर स्मृतिचिन्ह आणि १५ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
चीनमधल्या एका छोट्या गावात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारांची कहाणी सांगणारा हा एक सामाजिक चित्रपट आहे.
नहुएल पेरेझ बिस्कायार्ट यांना ‘वन ट्वेंटी बिट्स पर मिनिट’ या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
एड्सविरोधात लढणारा एक प्रेमळ साथीदार आणि आपल्या विचारांवर ठाम असलेल्या कार्यकर्त्याची भूमिका त्यांनी बजावली आहे.
महेश नारायणन् यांच्या ‘टेक ऑफ’ या मल्ल्याळी चित्रपटातल्या भूमिकेसाठी पार्वती टी के यांना उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
या चित्रपटात युद्धभूमीत बंडखोरांकडून ओलीस ठेवलेल्या पतीच्या सुटकेसाठी संघर्ष करणाऱ्या परिचारिकेची भूमिका त्यांनी साकारली आहे.
सर्वोत्कृष्ट अभिनयाच्या पुरस्कारासाठी रजत मयुर स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि १० लाख रुपये दिले जातात.
महेश नारायणन् यांना त्यांच्या ‘टेक ऑफ’ या पहिल्याच चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून विशेष ज्यूरी पुरस्कारही देण्यात आला.
विशेष ज्यूरी पुरस्कार म्हणून १५ लाख रुपये, रजत मयुर आणि सन्मानपत्र त्यांना प्रदान करण्यात आले.
सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मचा (कथापट) पुरस्कार बोलिवियाचे दिग्दर्शक किरो रुसो यांच्या 'डार्क स्कल' या चित्रपटाने मिळवला.
मनोज कदम यांच्या ‘क्षितिज’ या मराठी चित्रपटाने आयसीएफटी युनेस्को गांधी पदकाचा पुरस्कार मिळवला.
महात्मा गांधींचे शांतता आणि मानवी अधिकार, सांस्कृतिक अभिव्यक्तींमधे विविधता जपणे आणि वृद्धिंगत करणे, या युनेस्को तत्वांच्या आशयाचा अविष्कार करणाऱ्या चित्रपटांना हा पुरस्कार दिला जातो.
या महोत्सवात कॅनडाचे कला दिग्दर्शक ॲटम इगोयान यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. १० लाख रुपये, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे स्वरुप आहे.
यंदाच्या इफ्फीमध्ये ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना हिंदी सिनेसृष्टीत दिलेल्या एकूण योगदानाबद्दल ‘पर्सनलिटी ऑफ द इयर’ या पुरस्काराने गौरवण्यात आले.
गोव्यातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात ४८वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार सोहळा पार पडला.
नॅशनल अँटी-प्रॉफिटिरिंग ऑथॉरिटी
वस्तू व सेवा कराच्या कार्यवाहीमुळे केंद्राचे ८ व राज्यांचे ९ अप्रत्यक्ष कर रद्द होऊन त्यांऐवजी संपूर्ण देशभर ‘वस्तू व सेवा कर’ (जीएसटी) हा एकच अप्रत्यक्ष कर लागू झाला.
परिणामी ग्राहक तथा उपभोक्त्यांवरचा करभार अंदाजे ५० टक्के (पूर्वीच्या करभाराच्या तुलनेत) घटेल अशी अपेक्षा होती.
वस्तू व सेवाकराच्या मूळ कायद्यातही पुरवठादार किंवा विक्रेत्यांनी किमती त्या प्रमाणात कमी करण्यासाठी ‘नफेखोरी प्रतिबंध’ कलमाची तरतूद आहे.
दुर्दैवाने वस्तू व सेवा कर लागू झाल्यानंतर बहुसंख्य वस्तू व सेवांच्या किमती वाढल्या असाच अनुभव आहे.
अलीकडेच केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्वसामान्य उपभोगाच्या वस्तू व सेवा कराच्या दरामध्ये लक्षणीय घट केल्यानंतर ती करघट पुरवठादारांनी ग्राहकांना वस्तू व सेवा कराच्या किमती कमी करून द्यावी, नफेखोरी करू नये; असे अपेक्षित होते. पण असे फारसे झालेले दिसत नाही.
हा अनुभव लक्षात घेता, सरकारने आता मूळ कायद्याचा आधार घेऊन ‘नॅशनल अँटी-प्रॉफिटिरिंग ऑथॉरिटी’ (नफेखोरीविरोधी राष्ट्रीय प्राधिकरण) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
या नव्या प्राधिकरणाचे सदस्य व अध्यक्ष यांची निवड करण्यासाठी मंत्रिमंडळ सचिव पी के सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली ५ सदस्यांची निवड समिती नेमण्यात आली आहे.
डेमी नेल पीटर्स मिस युनिव्हर्स २०१७
लासवेगास येथे झालेल्या मिस युनिव्हर्स २०१७ स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेची डेमी नेल पीटर्स यंदाच्या मिस युनिव्हर्स किताबाची विजेती ठरली आहे.
मिस साऊथ आफ्रिका असलेल्या डेमी नेल पीटर्सला २०१६ची मिस युनिव्हर्स आयरिस मिट्टीनेएर (फ्रान्स) हिने मानाचा मुकुट प्रदान केला.
या स्पर्धेत मिस कोलंबिया लौरा गोन्जालेजने दुसरे स्थान तर मिस जमैका डेविना बॅनेटने तिसरे स्थान मिळवले.
मिस युनिव्हर्सचा किताब आपल्या नावे करायला जगभरातील ९२ सौंदर्यवतींनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
मिस युनिव्हर्सच्या स्पर्धेत श्रद्धा शशिधरने भारताचे नेतृत्व केले. पण श्रद्धाला टॉप १०पर्यंत मजल मारता आली नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा