‘आसियान’चे नेते प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे
- येत्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसियान शिखर परिषदेच्या नेत्यांना दिलेले आमंत्रण त्यांनी स्वीकारले आहे.
- त्यामुळे आसियान शिखर परिषदेचे नेते २०१८च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी म्हणून येणार आहेत.
- २०१५मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा तर २०१६मध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रांस्वा ओलांद हे प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी होते.
- २०१७मध्ये संयुक्त अरब अमिरातीचे युवराज शेख मोहम्मद बिन झायेद अल नह्यान प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी प्रमुख पाहुणे होते.
पश्चिम बंगालला रसगुल्ल्याचे जीआय मानांकन
- पश्चिम बंगालने ओडिशासोबत गेल्या दोन वर्षांपासून ‘रसगुल्ला’च्या जीआय मानांकनासाठी सुरु असलेली लढाई जिंकली आहे.
- दोन्ही राज्यांनी रसगुल्ला आपला असल्याचा दावा करत जीआय मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता.
- मात्र रसगुल्ला हा मूळचा आणि भौगोलिकदृष्ट्या पश्चिम बंगालचाच असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे.
- यामुळे आता अधिकृतपणे रसगुल्ला पश्चिम बंगालचा असल्याचे सिद्ध झाले असून, या राज्याला रसगुल्ल्याचे जीआय मानांकन मिळाले आहे.
- न्यायालयाच्या या निर्णयाचा फायदा पश्चिम बंगालमधील लाखो रसगुल्ला उत्पादकांना होणार आहे.
सौदी अरेबियामध्ये ‘योग’ खेळाचा दर्जा
- कट्टर इस्लामिक देश असलेल्या सौदी अरेबियाने जगभरात प्रसार पावलेल्या योग व्यायामप्रकाराला खेळाचा दर्जा दिला आहे.
- सौदी अरेबियाने क्रीडाप्रकार म्हणून योग शिकवण्याला अधिकृत परवानगी दिली आहे. त्यामुळे सौदीमध्ये अधिकृत परवाना घेऊन योग शिकवता येणार आहे.
- अरब योग फाऊंडेशनच्या संस्थापक असलेल्या नोफ मारवाई यांनी सौदीमध्ये योगला खेळाचा दर्जा मिळावा म्हणून दीर्घकाळापासून अभियान राबवले होते.
- सौदीमध्ये योगला खेळ म्हणून मान्यता मिळवून देण्याचे श्रेय नोफ यांनाच जाते. त्यांनाच सौदीमधील पहिली योग प्रशिक्षक म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
- २७ सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने योगला जागतिक मान्यता दिली होती. तसेच २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून घोषित केला होता.
मोरक्कोचा ‘आधार’ कार्यक्रम सुरू मानस
- आफ्रिकेतील दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आणि उत्तर आफ्रिकेतील भारताचा महत्वाचा सहकारी देश असलेल्या मोरक्कोलाही त्यांच्या देशात ‘आधार’ सारखा कार्यक्रम सुरू करायचा आहे.
- भारतात ज्या पद्धतीने आधार क्रमांक विविध योजनांशी लिंक करण्यात आले आहे, त्याचपद्धतीने त्यांच्या देशातही ही योजना राबवायची आहे.
- ही प्रक्रिया जाणून घेण्यासाठी मोरक्कोतून आलेल्या गृहमंत्री नुरूद्दीन बोतायब यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचा १० दिवसीय दौरा ६ नोव्हेंबरला संपला.
- या शिष्टमंडळात सामाजिक-आर्थिक घटकांशी जोडलेले आणि मोरक्को नॅशनल बँकेशी निगडीत प्रतिनिधी सहभागी झाले होते.
- त्यांनी आधारबाबत भारताचा अनुभव, गुन्हे आणि गुन्हेगार ट्रॅकिंग नेटवर्क आणि प्रणाली (सीसीटीएनएस), डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, गॅस सबसिडी आणि डिजिटल बँकिंग प्रणालीसारख्या फायद्यांचा अभ्यास केला.
- दहशतवादविरोधी अभियानात उत्तर आफ्रिकेत मोरक्को भारताचा एक महत्वाचा भागीदार म्हणून समोर येत आहे.
अमिताभ बच्चन यांना इफ्फीचा पर्सनॅलिटी ऑफ द ईयर पुरस्कार
- गोव्यात होणाऱ्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा (इफ्फी) पर्सनॅलिटी ऑफ द ईयर पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांना प्रदान केला जाणार आहे.
- बच्चन यांची चित्रपट कारकिर्द जवळपास अर्धशतकाची असून त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ४ वेळा राष्ट्रीय तर १५ वेळा फिल्मफेअर पुरस्कार दिला गेला आहे.
- २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान हा महोत्सव गोव्यात होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा