सौंदर्याच्या जगतातील सर्वोच्च ‘मिस वर्ल्ड २०१७’ या स्पर्धेत भारताची मानुषी छिल्लर विजेती ठरली आहे. मानुषी ६७वी मिस वर्ल्ड ठरली.
चीनमधील सान्या येथे आयोजित मिस वर्ल्ड २०१७ स्पर्धेत जगभरातून आलेल्या ११८ सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता.
त्यापैकी भारत, इंग्लंड, आणि मेक्सिको या देशांच्या सौंदर्यवतींनी अंतिम तीनमध्ये स्थान पटकावले.
यानंतर मिस वर्ल्डच्या किताब मानुषी छिल्लरला मिळाल्याचे जाहीर करण्यात आले. मेक्सिकोची अँड्रीया मेझा सेकंड रनरअप तर इंग्लंडची स्टेफनी हिल फर्स्ट रनरअप ठरली.
प्रियंका चोप्रानंतर (२०००) १७ वर्षांनी भारताच्या सौंदर्यवतीला मिस वर्ल्डचा किताब मिळाला आहे.
७ मे १९९७ रोजी दिल्लीमध्ये जन्मलेली मानुषी छिल्लर ही मूळची हरयाणाची आहे. ती मेडिकलची विद्यार्थिनी असून तिला हृदय शल्य चिकित्सक व्हायचे आहे.
अंबानी कुटुंब आशियात सर्वात श्रीमंत
फोर्ब्ज नियतकालिकातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या श्रीमंत कुटुंबांच्या यादीत आशियातील सर्वात श्रीमंत कुटुंब म्हणून मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाची निवड झाली आहे.
या कुटुंबाची एकूण संपत्ती १९ अब्ज डॉलरवरून ४४.८ अब्ज अमेरिकी डॉलरवर गेली आहे.
यामुळे सॅमसंगच्या ली कुटुंबाला अंबानी कुटुंबाने मागे टाकले आहे. दुसऱ्या स्थानी ली कुटुंब तर तिसऱ्या क्रमांकावर हाँग काँगचे क्वोक कुटुंब आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा