प्राप्तिकर विभागाची बेनामी संपत्तीविरोधात मोहीम
- बेनामी मालमत्तांविरोधात प्राप्तिकर विभागाने मोहीम हाती घेतली असून, आतापर्यंत ५४१ बेनामी मालमत्ता प्राप्तिकर विभागाकडून जप्त करण्यात आल्या आहेत.
- नोटाबंदीनंतर मोठ्या रकमा बँक खात्यांत जमा करणाऱ्यांच्या विरोधातही कारवाई करण्यात आली असून, सुमारे १८३३ कोटी रुपये जमा असलेली बँक खाती गोठविण्यात आली आहेत.
- नोटाबंदीच्या काळात मोठ्या रकमा जमा करूनही प्राप्तिकर विवरणपत्र न भरणाऱ्या लोकांची बँक खाती गोठविण्यात आली आहेत.
- गेल्यावर्षी सरकारने बेनामी मालमत्ता कायदा केला होता. बेनामी मालमत्ता बाळगल्यास मालमत्तेच्या बाजार मूल्याच्या २५ टक्के दंड आणि ७ वर्षांपर्यंत तुरुंगवास अशा कठोर शिक्षेची तरतूद या कायद्यात आहे.
- नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर प्राप्तिकर विभागाने ‘क्लीन मनी’ या नावाची मोहीम हाती घेतली होती.
- या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात १.७७ दशलक्ष संशयास्पद खातेधारकांना एसएमएस आणि ई-मेलद्वारे नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.
- पुढच्या टप्प्यातील ‘क्लीन मनी २.०’ या मोहिमेत काळ्या पैशासाठी एक पोर्टल उघडण्यात आले.
बेनामी संपत्ती म्हणजे काय?
- बेनामी या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. बेनामी म्हणजे नाव नसलेली संपत्ती. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या नावाऐवजी दुसऱ्याच्या नावावर संपत्ती खरेदी करते तेव्हा बेनामी संपत्तीची निर्मिती होत असते.
- ज्याच्या नावावर संपत्ती खरेदी केली गेली आहे त्या व्यक्तीस बेनामदार म्हटले जाते. बेनामदाराच्या नावावर संपत्ती खरेदी केली असली तरी खरा मालक त्यासाठी पैसे खर्च करणारा किंवा गुंतवणूूक करणाराच असतो.
- साधारणतः पत्नी किंवा मुलांच्या नावावर उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोताच्या आधाराने खरेदी केलेल्या संपत्तीला बेनामी संपत्ती म्हटले जाते.
- तसेच विश्वस्त म्हणूनही संपत्तीचा अधिकार आपल्याकडे ठेवला असेल तर तेही याच प्रकारात मोजले जाते. याचाच अर्थ तुम्ही आई-वडिलांच्या नावावरही संपत्ती खरेदी केली तरीही ते बेनामी ठरते.
- संसदेने बेनामी ट्रँझॅक्शन प्रोहिबिशन कायदा संमत केला यामध्ये योग्य पद्धतीने पारदर्शक कारभार करणाऱ्या धार्मिक ट्रस्टना सरकारने दिलासा दिला आहे.
- या कायद्यानुसार दोषी व्यक्तीला सात वर्षांचा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही एकदम अशी शिक्षा सुनावली जाऊ शकते.
- काळा पैसा वापरुन बेनामी संपत्ती निर्माण करणाऱ्या भ्रष्ट लोकांविरोधात हा कायदा एक मोठे पाऊल समजले जाते.
हवाई टॅक्सीसाठी उबरची नासाशी भागीदारी
- हवाई टॅक्सी (फ्लाइंग टॅक्सी) विकसित करण्याच्या प्रकल्पात उबरने अमेरिकी अंतराळ संस्था नासाशी भागीदारी केली आहे.
- उत्तम दर्जा आणि कमी किंमत हे निकष नजरेसमोर ठेवून ही टॅक्सी विकसित करण्यात येणार आहे.
- यासाठी हाती घेण्यात आलेल्या ‘उबरएअर’ प्रकल्पात लॉस एंजेलिस, टेक्सास प्रांतातील डलास फोर्थ-विथ आणि दुबईचा समावेश करण्यात आला आहे.
- अमेरिकेच्या निवडक शहरात २०२०पर्यंत हवाई टॅक्सी सेवेचे पहिले प्रात्यक्षिक करण्याचे लक्ष्य ‘उबरएअर’ने ठेवले आहे. २०२३पर्यंत ही सेवा व्यावसायिक पातळीवर सुरू होईल.
- सध्याच्या उबर कार टॅक्सी ज्याप्रमाणे अॅपच्या माध्यमातून बुक करण्यात येतात, तशाच हवाई टॅक्सीही बुक करता येतील.
- प्रस्तावित हवाई टॅक्सी इलेक्ट्रिक वाहन असेल. त्याचे उड्डाण (टेक-ऑफ) आणि जमिनीवरील अवतरण (लँडिंग) हेलिकॉप्टरसारखे व्हर्टिकल पद्धतीचे असेल. म्हणजेच त्याला विमानासारखे लांबवर धावण्याची गरज भासणार नाही. हे वाहन हेलिकॉप्टरपेक्षा मात्र पूर्णत: भिन्न असेल.
- ते अधिक सुरक्षित असेल, लवकर उंची पकडणारे आणि परवडणारेही असेल. सामान्य टॅक्सीच्या दरात ही सेवा देण्याची कंपनीची योजना आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा