| 
·       
  दहशतवादी
  हल्ला; तसेच
  बॉंबस्फोटांच्या
  घटनांच्या
  बातम्या देणाऱ्या
  प्रसिद्धिमाध्यमांसाठी
  पोलिसांनी
  मार्गदर्शक
  तत्त्वे
  तयार केली
  आहेत.  
·       
  दहशतवाद्यांचे
  मनोबल
  उंचावेल; तसेच
  नागरिकांचे
  मनोधैर्य
  खचेल, असे
  कोणतेही
  चित्रीकरण न
  दाखवण्याची
  काळजी घ्यावी,
  असे आवाहन
  पोलिसांनी
  केले आहे.  
·       
  मुंबईवरील
  २६/११ च्या
  दहशतवादी
  हल्ल्याच्या
  वेळी
  वृत्तवाहिन्यांनी
  केलेल्या
  लाइव्ह
  प्रसारणाचा
  गैरफायदा
  दहशतवादी
  संघटनांनी
  घेतला होता. त्यामुळे
  माध्यमांसाठी
  मार्गदर्शक
  तत्त्वे
  ठरवण्याची
  गरज व्यक्त
  करण्यात आली
  होती. या
  प्रकरणी
  अभ्यास करून
  पोलिसांनी
  ही तत्त्वे जाहीर
  केली आहेत. 
·       
  प्रसिद्धिमाध्यमांसाठी
  काय करू नये?  
·       
  प्रक्षोभक
  चित्रफीत
  किंवा
  ध्वनिफीत
  प्रसारित
  करू नये.  
·       
  यापूर्वीच्या
  घटनांची
  संग्रहित
  छायाचित्रे
  वारंवार
  दाखवू नयेत.  
·       
  अर्धवट,
  तथ्यहीन
  तसेच
  अतिशयोक्तीपूर्ण
  माहितीच्या
  आधारे
  बातम्या देऊ
  नयेत.  
·       
  मृतदेह
  तसेच
  पीडितांचे
  व्हिडिओ
  फुटेज दाखवणे
  टाळा.  
·       
  आक्षेपार्ह
  तसेच
  प्रक्षोभक
  दृश्यांचे
  प्रसारण
  थांबवा.  
·       
  पीडित,
  सुरक्षा
  यंत्रणा
  तसेच
  दहशतवाद्यांशी
  संबंधित
  कोणतेही थेट
  प्रक्षेपण
  दाखवू नये.  
·       
  तपास
  सुरू
  असलेल्या
  तसेच
  न्यायालयीन
  प्रक्रियेला
  बाधा
  आणणाऱ्या
  प्रकरणाचे
  प्रक्षेपण
  करू नये. | 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा