चालू घडामोडी - ५ मार्च २०१५

·        दिल्लीमध्ये २०१२मध्ये झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी मुकेशसिंहची मुलाखत असलेल्या माहितीपटाचा (डॉक्‍युमेंटरी) व्हिडिओ यू-ट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे.

·        केंद्र सरकारने घातलेल्या बंदीनंतरही बीबीसीने इंग्लंडसह अन्य युरोपियन देशांमध्ये माहितीपटाचे प्रसारण केले आहे.

·        शिवाय, व्हिडिओसाठी प्रसिद्ध असलेल्या यू-ट्यूब या साइटवर अपलोड करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला पत्र लिहून या व्हिडिओवर तत्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे.

·        इंटरनेटवर व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात व्हायरल होण्याची शक्‍यता आहे, यामुळे तत्काळ यूट्यूबवरून काढून टाकावा, असे पोलिसांनी पत्रामध्ये म्हटले आहे.

·        भारतीय हवाई दलाच्या जग्वार या विमानाला हरिणामधील कुरुक्षेत्रजवळ असलेल्या शहाबाद या गावामध्ये तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला.

·        सुदैवाने वैमानिक सुरक्षितरीत्या बचावला आहे.

·        जगामध्ये चांगल्या प्रकारे जीवन जगण्यासाठी ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना तर भारतामध्ये हैदराबाद ही दोन्ही चांगली शहरे आहेत, असे मर्सर क्‍वालिटी ऑफ लिव्हिंग या संस्थेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या यादीत स्पष्ट झाले आहे.

·        यादीमध्ये क्रमवारीनुसार १) व्हिएन्ना (ऑस्ट्रिया), २) झ्युरिक (स्वित्झर्लंड), ३)  ऑकलंड (न्यूझीलंड), ४) म्युनिच (जर्मनी), ५) वैंकूवर (कॅनडा) या शहरांचा पहिल्या पाचमध्ये समावेश आहे.

·        हैदराबाद या शहराचा क्रमवारीनुसार १३८वा क्रमांक आहे.

·        भारतामध्ये हैदराबादनंतर पुण्याचा क्रमांक आहे. पुणे १४५व्या क्रमांकावर आहे. मुंबई १५२ व दिल्ली १५४व्या क्रमांकावर आहे.

·        आशिया खंडात सिंगापूर पहिल्या स्थानावर असून, यादीनुसार सिंगापूरचा २५वा क्रमांक आहे. कोलंबो (श्रीलंका) १३२व्या तर टोकियो (जपान) ४४व्या क्रमांकावर आहे.

·        दक्षिण कोरिया मधील अमेरिकेचे राजदूत मार्क लिपर्ट यांच्या चेहऱ्यावर एका व्यक्तीने सेऊल येथे ब्लेडने हल्ला केला.

·        चलनवाढ आटोक्‍यात आल्याने देशातील वस्तूंची मागणी वाढत असून, अर्थव्यवस्थेत पैसा समर्थपणे फिरणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

·        त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने पतधोरणाचा आढावा जाहीर करण्याआधीच रेपो दरात पाव टक्का कपात केली आहे.

·        नवीन रेपो दर : ७.५० टक्के

·        रिव्हर्स रेपो दर : ६.५० टक्के

·        बँक दर : ८.५० टक्के

·        सीआरआर : ४ टक्के

·        कोळसा खाणींच्या लिलावाच्या दुसऱ्या टप्प्यात अदानी पॉवर कंपनीला झारखंडमधील जितपूर कोळसा खाण मिळाली असून, उषा मार्टिनला याच राज्यातील ब्रिंदा आणि सिसाई कोळसा खाणी मिळाल्या आहेत.

·        बहुप्रतिक्षित स्पेक्‍ट्रम लिलावाला आज सुरवात झाली आहे. आतापर्यंतचा हा सर्वांत मोठा लिलाव असून, चार प्रकारांतील स्पेक्‍ट्रमच्या (ध्वनिलहरी) वापराचा परवाना मिळविण्यासाठी एकूण आठ कंपन्या मैदानात उतरल्या आहेत.

·        या लिलावाद्वारे २जी आणि ३जी स्पेक्‍ट्रमची विक्री करून सरकारला सुमारे ८२ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

·        देशातील २२ पैकी १७ दूरसंचार विभागांमधील स्पेक्‍ट्रमचा लिलाव करण्यात येणार आहे.

·        तीन बॅंडमधील ३८०.७५ मेगाहर्टझ क्षमतेचे स्पेक्‍ट्रम आणि २१०० मेगाहर्टझ बॅंडमधील ५ मेगाहर्टझ क्षमतेच्या स्पेक्‍ट्रमसाठी आठ कंपन्या लिलाव प्रक्रियेत सहभागी झाल्या आहेत.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा