| 
·       
  २८
  फेब्रुवारी :
  राष्ट्रीय
  विज्ञान दिन (डॉ.
  सी. व्ही. रमण यांनी
  त्यांचे
  विकिद्रणाबद्दलचे
  संशोधन (रमण
  परिणाम) या
  दिवशी जाहीर
  केले. पुढे
  त्यांना
  त्याबद्दल नोबेल
  पारितोषिक मिळाले.
  म्हणून हा
  दिवस ‘राष्ट्रीय
  विज्ञान दिन’ म्हणून
  पाळला जातो.) | 
| 
·       
  सागरी
  सुरक्षेसाठी
  चार
  नव्या
  तत्काळ
  सहायता बोटी मुख्यमंत्री
  देवेंद्र
  फडणवीस
  यांच्या उपस्थितीत
  भारतीय
  नौसेनेत
  दाखल झाल्या
  आहेत. टी-२६,
  टी-२७, टी-२८, टी-४७
  या
  चार बोटी
  सागरी
  सुरक्षेचे
  काम करणार
  आहेत. | 
| 
·       
  पीपल्स
  डेमोक्रॅटिक
  पक्ष (पीडीपी)
  आणि भाजप या
  दोन्ही
  पक्षांनी
  जम्मू-काश्मीरमध्ये
  सरकार
  स्थापण्याचा
  निर्णय घेतला
  असून, पीडीपीचे
  सर्वेसर्वा मुफ्ती
  मोहम्मद सईद २५
  सदस्यांच्या
  मंत्रिमंडळाचे
  नेतृत्व करतील.  
·       
  रविवारी
  जम्मूमध्ये
  होणाऱ्या
  त्यांच्या शपथविधी
  कार्यक्रमास
  पंतप्रधान
  नरेंद्र मोदीही
  उपस्थित
  राहणार आहेत. 
·       
  २५
  सदस्यांच्या
  मंत्रिमंडळाचे
  नेतृत्व सईद
  करतील.
  यामध्ये उपमुख्यमंत्रिपदासह
  भाजपचे १२
  मंत्री असतील. भाजप
  पहिल्यांदाच
  जम्मू-काश्मीरमधील
  सरकारमध्ये
  सहभागी होत आहे.  
·       
  सईद
  नऊ
  वर्षांच्या
  प्रदीर्घ
  कालखंडानंतर
  सत्तेत परतत
  आहेत.
  त्यांनी २००२ ते २००५
  या कालावधीत
  मुख्यमंत्रिपद
  सांभाळले
  होते. 
·       
  जम्मू-काश्मीर
  विधानसभा
  निवडणुकीत
  पीडीपीने २८, भाजपने
  २५, नॅशनल
  कॉन्फरन्सने
  १५ आणि
  कॉंग्रेसने १२
  जागा
  जिंकल्या
  होत्या. | 
| 
·       
  वेस्ट
  इंडीजविरुद्धच्या
सामन्यात एबी
  डिव्हिलर्सने
  एकदिवसीय
  क्रिकेटमध्ये
  सर्वांत
  वेगवान दीडशतकाचा
  (६४ चेंडूंत
  १५० धावा)
  विक्रम केला. 
·       
  डिव्हिलर्सने
  ६६ चेंडूंत
  नाबाद १६२
  धावा तडकावल्या.
  त्यामुळे
  दक्षिण
  आफ्रिकेने ४०८ ही विश्वकरंडक
  स्पर्धेतील
  दुसऱ्या
  क्रमांकाची
  सर्वाधिक
  धावसंख्या उभारली. | 
| 
·       
  इटलीमधून
  चोरीला
  गेलेली सुमारे
  चारशे
  वर्षांपूर्वीची
  अतिशय दुर्मिळ
  अशी दोन
  इटालियन
  पुस्तके सॅन
  फ्रॅन्सिस्कोमध्ये
  सापडली आहेत.  
·       
  “स्टर्पियम
  हिस्टोरिया” आणि “रारीअर्म
  प्लॅंटारम
  हिस्टोरिया
  ऍनो १६०१” अशी
  या दोन
  पुस्तकांची
  नावे आहेत.  
·       
  इटलीच्या
  “हिस्टॉरिकल
  नॅशनल लायब्ररी
  ऑफ
  ऍग्रिकल्चर”मधून
  चोरीला
  गेलेली ही
  पुस्तके
  इटलीच्या दुर्मिळ
  वस्तूंच्या
  विक्रेत्याला
  विकण्यात आली.
  तेथून ती सॅन
  फ्रॅन्सिस्को
  येथील किनारी
  भागात
  आणण्यात आली. | 
| 
·       
  अमेरिकेतील
  आणखी एका
  हिंदू
  मंदिराची
  तोडफोड करण्यात
  आली असून, त्याच्या
  भिंतीवर
  ‘फीअर’ असे
  शब्द
  रंगवण्यात
  आले आहेत.  
·       
  अमेरिकेच्या
  वॉशिंग्टन
  राज्यात
  चालू महिन्यात
  घडलेली अशा
  प्रकारची ही दुसरी घटना आहे. | 
| 
·       
  रशियन
  राष्ट्राध्यक्ष
  व्लादिमीर
  पुतीन यांचे
  कडवट
  टीकाकार व
  रशियाचे
  विरोधी
  पक्षनेते
  बोरिस
  नेमत्सोव
  यांची गोळ्या
  घालून हत्या करण्यात
  आली आहे.  
·       
  रशियाची
  राजधानी
  मॉस्को
  येथील एका
  रस्त्यावर
  शुक्रवारी
  रात्री ‘वॉक’ करत
  असताना
  अज्ञात
  हल्लेखोरांनी
  त्यांच्यावर
  हल्ला केला.
  त्यात
  त्यांचा
  जागीच
  मृत्यू झाला. | 
चालू घडामोडी - २८ फेब्रुवारी २०१५
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा