·
पंतप्रधान
मोदी यांनी मॉरिशसचे
पंतप्रधान
ऍनरुड
जुगनॉथ यांची भेट
घेऊन
त्यांच्याशी
विविध
मुद्यांवर
सविस्तर
चर्चा केली.
या
भेटीदरम्यान
मोदी यांनी
मॉरिशसमधील
प्रकल्पांसाठी
कमी व्याजदरात
पाच
हजार कोटी
डॉलरचे कर्ज देण्याची
तयारी
दर्शविली.
·
मॉरिशसबरोबरील
पाच करार
१.
बेटांचा
विकास
२.
सागरी
व्यापारात
वाढ, मॉरिशसच्या
बेटावरील
सागरी आणि
हवाई वाहतूक
यंत्रणेत
सुधारणा
३.
आंब्याची
आयात
४.
सांस्कृतिक
सहकार्य
करार
५.
परंपरागत
वैद्यकीय
चिकित्सा
सहकार्य
·
पंतप्रधान
नरेंद्र
मोदी यांनी
आपल्या मॉरिशस
दौऱ्यामध्ये
येथील
हिंदूंचे
सर्वांत पवित्र
स्थान समजले
जाणाऱ्या गंगा
तलावाला भेट देऊन तिथे
पूजा केली.
येथे
महादेवाचे
प्रसिद्ध
मंदिर आहे. हा
तलाव समुद्र
सपाटीपासून १८००
फूट उंचीवर
आहे.
|
·
साईना
नेहवालचे ऑल
इंग्लंड विजेतेपद
हुकले असले, तरी तिने जागतिक
क्रमवारीत
प्रगती करीत
दुसरा क्रमांक मिळविला
आहे. या
पूर्वीच्या
क्रमवारीत
साईना तिसरी
होती.
·
साईनाने
चीन सुपर
सीरिज
जिंकली, तसेच
इंडिया
ग्रांप्रीमध्येही
बाजी मारली. ऑलिंपिक
विजेती ली
झुएरुई ही
जागतिक
क्रमवारीत
अव्वल आहे.
·
या
क्रमवारीत पी. सिंधूने
देखील
नवव्या
स्थानापर्यंत
प्रगती केली आहे.
|
·
राष्ट्रवादीचे
नेते आर. आर.
पाटील
यांच्या निधनाने
रिक्त
झालेल्या सांगली
जिल्ह्यातल्या
तासगाव-कवठेमहांकाळ
विधानसभा
मतदारसंघाची
पोटनिवडणूक ११
एप्रिल २०१५ ला होत आहे.
·
आर.
आर. पाटील
यांच्या
जागेवर त्यांच्या
पत्नी
सुमनताईं
निवडणूक लढवणार आहेत.
|
·
देशांतर्गत
हिंसाचारामुळे
अर्थव्यवस्था
कोलमडण्याच्या
बेतात
असलेल्या युक्रेनला
१७.५ अब्ज
डॉलर्सचे
कर्ज
देण्याचा
निर्णय
आंतरराष्ट्रीय
नाणेनिधीने
(आयएमएफ)
घेतला आहे. हे अर्थसहाय्य
चार
वर्षांच्या
टप्प्यात दिले जाणार
आहे.
·
आयएमएफच्या
या
अर्थसहाय्याबरोबरच
अमेरिकाही
युक्रेनला ७.५
कोटी
डॉलर्सची
अतिरिक्त
मदत करणार आहे.
याशिवाय
रेडिओ, लष्करी
वाहने, रडार अशा
स्वरुपाच्या
साहित्याची
मदतही अमेरिका
युक्रेनला
करणार आहे.
|
·
अकाशवाणीवरून
‘मन की बात’ या
कार्यक्रमाच्या
माध्यमातून
देशवासियांशी
संवाद साधणारे
पंतप्रधान
नरेंद्र
मोदी यावेळी शेतकऱ्यांशी
संवाद
साधणार आहेत.
·
पंतप्रधान
मोदी २२ मार्चला
‘मन की बात’मधून
शेतकऱ्यांशी
बोलणार आहेत.
|
·
राष्ट्रीय
स्वयंसेवक
संघाचे
मुखपत्र असलेले
मासिक ‘ऑर्गनायझर’च्या
ताज्या
अंकात
भारताचा
चुकीचा
नकाशा प्रकाशित
करण्यात
आला आहे.
·
दक्षिण
आशियाचा
नकाशा
दाखविताना जम्मू-काश्मीरमधील
काही भाग
पाकिस्तानमध्ये
दाखविण्यात
आला आहे.
|
·
मध्य
प्रदेशमधील
एका
खाणीच्या
प्रकल्पाला लंडनमध्ये
विरोध
दर्शविण्यासाठी
निघालेल्या ग्रीनपीसच्या
कार्यकर्त्या
प्रिया
पिल्लई यांच्या
विदेश
दौऱ्यावर
सरकारने
बंदी आणली होती.
·
त्यावर
पिल्लई
यांनी
दिल्ली उच्च
न्यायालयात
दाखल
केलेल्या
याचिकेवर
निकाल
देताना न्यायालयाने
पिल्लई
यांच्या
विदेश
दौऱ्यावरील
बंदी मागे घेण्याबाबत
सरकारला
निर्देश
दिले आहेत.
|
·
घुमान
येथे
होणाऱ्या
अखिल भारतीय
मराठी साहित्य
संमेलनानिमित्ताने
शेतकरी
साहित्य
परिषद (इर्जिक)
आणि
महाराष्ट्र
साहित्य
परिषद
(मोडनिंब) यांच्या
वतीने
महाराष्ट्रातून
श्री संत
शिरोमणी
सावता
महाराज साहित्य-कृषी
दिंडी काढण्यात
येणार आहे.
·
सोलापूर
येथून २६ मार्च रोजी ही दिंडी
घुमानच्या
दिशेने
निघणार आहे.
|
·
सर्व
गावच एक खुले
प्रदर्शन
असलेल्या ओडिशातील
पुरी
तीर्थक्षेत्रापासून
जवळील रघुराजपूरचा
कायापालट
करण्याचे
केंद्र सरकारने
ठरविले असून, यासाठी
ओडिशा राज्याचीही
मदत होणार
आहे.
·
कायापालट
करताना
गावाचा
सर्वंकष
विकास करण्याबरोबरच
सुशोभीकरणही
करण्यात
येणार आहे.
|
·
कॉर्पोरेट
हेरगिरी
प्रकरणाचा
तपास करताना केंद्रीय
अन्वेषण
विभागाने (सीबीआय)
विविध
मंत्रालयांसह
काही खासगी
कंपन्यांच्या
दिल्लीतील
कार्यालयांवर
छापे घातले.
·
तसेच
येथील एका
चार्टर्ड
अकाउंटंटच्या
निवासस्थानी
घातलेल्या
छाप्यांत
साठ लाख रुपयांची
रोख रक्कमही
सीबीआयने
जप्त केली
आहे.
|
·
विमा
क्षेत्रातील
विदेशी
गुंतवणूक २६
टक्क्यावरून
४९ टक्के
करण्यासाठीचे
विधेयक भाजप
सरकारने
राज्यसभेत
मंजूर करून
घेतले आहे.
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा