चालू घडामोडी - २२ मार्च २०१५
- ‘हरित भारत अभियान’ (GIM) ‘मनरेगा’त समाविष्ट करण्यात आले आहे.
- उद्देश : वनक्षेत्र १० मिलियन हेक्टरने वाढवणे.
- त्यामुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण घटेल.
- या कामांवर दूरसंवेदन (रिमोट सेन्सिंग) द्वारे लक्ष ठेवले जाईल.
- काळा पैसा विधेयकास कॅबिनेटची मंजुरी मिळाली आहे. या विधेयकानुसार काळा पैसा साठवणे हा गुन्हा मानला जाईल.
- अशा व्यक्तींना कर चोरीप्रकरणी ३००% कर भरावा लागेल. + १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा त्यांना होईल.
- गुन्हेगारांना समझोता आयोगात (Settlement Commission) सुद्धा जाता येणार नाही.
- या विधेयकाने परदेशात साठवलेल्या काळ्या मागोवा घेऊन ते काळे धन भारतात परत आणण्याचे हक्क कर अधिकाऱ्यांना दिलेले आहेत.
- चीन पुरस्कृत ‘आशियायी पायाभूत गुंतवणूक बँके’ (AIIB) मध्ये फ्रांस, जर्मनी, इटली सामील होणार आहेत. त्यांनी अमेरिकेचा दबाव झुगारून लावला आहे.
- यापूर्वी युनायटेड किंगडम या बँकेत सामील झाला होता. त्याच्या पावलावर पाऊल ठेऊन आता ही ३ युरोपियन युनियन मधील राष्ट्रे सामील होत आहेत.
- ‘आशियायी पायाभूत गुंतवणूक बँक’ (AIIB) ही चीनने पुढाकार घेतलेली आंतरराष्ट्रीय वित्त संस्था आहे.
- उद्देश – आशिया खंडातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना पैसा पुरवणे.
- ही बँक २०१५ च्या अखेरीस सुरु होण्याची शक्यता आहे.
- मुख्यालय - बीजिंग (चीन)
- अधिकृत भांडवल - $१०० बिलियन
- माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याने शेवटच्या कसोटी सामन्यासाठी परिधान केलेल्या जर्सीला लिलावाद्वारे सहा लाख रुपयांची किंमत मिळाली आहे.
- सर्वाधिक सुरक्षा असलेल्या संसद भवनाच्या आवारात आग लागल्यामुळे सुरक्षा यंत्रणांची तारांबळ उडाली.
- संसदेच्या मुख्य इमारतीपासून पन्नास मीटरपेक्षा अधिक अंतरावर असलेल्या एसी प्लान्टला लागलेली आग अतिशय भीषण होती.
- अग्निशामक दलाने काही वेळातच आग आटोक्यात आणली. अर्थसंकल्पी अधिवेशनाची सुटी आणि त्यातही रविवारचा दिवस असल्याने अत्यल्प नुकसान झाले.
- टाईम्स हायर एज्युकेशन तर्फे जगातील सर्वोत्कृष्ट १०० विद्यापीठांची ‘जागतिक प्रतिष्ठित क्रमवारी-२०१५’ प्रसिध्द केली जाते.
- या क्रमवारीत यावर्षीही अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठाने पहिला नंबर पटकावला आहे.
- १०० प्रतिष्ठीत विद्यापीठांत अमेरिकेची सर्वाधिक ४३, युनायटेड किंगडमची १२ तर जर्मनीची ६ विद्यापीठे आहेत.
- टॉप १० विद्यापीठात अमेरिकेची ८ आणि युनायटेड किंग्डमची २ विद्यापीठे आहेत.
- श्रीलंकेचे राष्ट्रगीत तमीळ भाषेतून गाण्यास परवानगी देण्याच्या अध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना यांच्या निर्णयामुळे वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, श्रीलंकन फ्रीडम या त्यांच्या पक्षातूनच सिरिसेना यांच्या या निर्णयाला थोडा विरोध होत आहे.
- श्रीलंकन राष्ट्रगीताचा इतिहास
- शांतिनिकेतनमधून शिक्षण घेतलेल्या आनंद समरकून यांनी सिंहली भाषेत लिहिलेल्या राष्ट्रगीताचा श्रीलंकेने १९५१ मध्ये स्वीकार केला होता.
- काही काळानंतर श्रीलंकेतील तमीळ कवी एम. नल्लाथंबी यांनी लिहिलेले तमीळ रुपांतरही स्वीकारण्यात आले होते. गेली अनेक दशके ही दोन्ही राष्ट्रगीते गायली जात आहेत.
- अर्थात, अधिकृत मान्यता फक्त सिंहली भाषेतील राष्ट्रगीतालाच आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा