·
राज्यपाल सी. विद्यासागर
राव हस्ते यशवंत पंचायतराज
अभियानांतर्गत
राज्यातील
उत्कृष्ट काम
करणाऱ्या पंचायतराज
संस्था, तसेच गुणवंत
अधिकारी, कर्मचाऱ्यांना
विविध पुरस्कारांनी
गौरविण्यात आले.
·
या प्रसंगी
जिल्हा
परिषद कोल्हापूर, नाशिक
आणि सिंधुदुर्ग
यांना अनुक्रमे
पहिल्या तीन क्रमांकाची
यशवंत पंचायतराज
अभियान राज्यस्तर
पारितोषिके राज्यपाल राव
यांच्या हस्ते
प्रदान करण्यात
आली. अनुक्रमे
२५ लाख, १५ लाख आणि १० लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह
आणि प्रमाणपत्र
असे या पुरस्काराचे
स्वरूप होते.
·
याशिवाय
पंचायत
समिती
रेणापूर (जि. लातूर), देवगड (जि.
सिंधुदुर्ग), कागल (जि.
कोल्हापूर)
यांनाही
यशवंत
पंचायतराज
अभियान
राज्यस्तर
पुरस्कार वितरित
करण्यात आले.
·
याशिवाय
मान्याचीवाडी
(ता. पाटण, जि. सातारा), लोणी
बुद्रुक (ता.
राहता, जि. नगर), परुळेबाजार
(ता.
वेंगुर्ला, जि.
सिंधुदुर्ग), चांदोरे (ता.
माणगाव, जि. रायगड)
आणि झरी (ता.
लोहा, जि.
नांदेड) या
गावांचाही
राज्यस्तरीय
पुरस्कार
देऊन गौरव
करण्यात आला.
|
·
ज्येष्ठ
गांधीवादी
नेते आणि
गांधी
तत्त्वज्ञानाचे
उपासक
नारायणभाई
देसाई (वय ९०) यांचे दीर्घ
आजाराने
सुरत येथील
एका खासगी
रुग्णालयात
निधन
झाले.
·
महात्मा
गांधी यांनी १९२० मध्ये
गुजरात
विद्यापीठाची
स्थापना केली होती.
या
विद्यापीठाचे
ते जुलै २००७ ते
मार्च २०१५ पर्यंत
कुलगुरू होते.
|
·
स्वयंचलित
दरवाजाची
सुविधा
असलेली लोकल १५ मार्च
रोजी पश्चिम
रेल्वे
मार्गावर
सुरू करण्यात
आली.
·
अशा
प्रकारची
सुविधा
असलेली
देशातील ही
पहिलीच लोकल आहे.
·
महिलांच्या
प्रथम
श्रेणी
डब्याच्या
एका कोचमध्ये
हे
स्वयंचलित
दरवाजे
बसवण्यात
आले आहेत.
·
चर्चगेट
स्थानकातून
बोरिवलीला
जाणाऱ्या दुपारी
१२:१२ च्या
लोकलमध्ये
ही सुविधा
पुरवण्यात
आली आहे
|
·
जम्मू-काश्मीरच्या
ऍडव्होकेट
जनरलपदी उच्च
न्यायालयातील
ज्येष्ठ
विधिज्ञ
रियाझ अहमद जान यांची
नियुक्ती
करण्यात आली.
|
·
आम
आदमी
पक्षाने
दिल्लीतील २१ आमदारांना
संसदीय
सचिवपद बहाल
करून राज्यमंत्रीपदाचा
दर्जा दिला आहे.
|
·
तेल
प्रकल्पांवर
काम
करणाऱ्या
अमेरिकेच्या
अधिकारी आणि
कर्मचाऱ्यांना
ठार
मारण्याची
धमकी
सातत्याने
मिळत
असल्याच्या
पार्श्वभूमीवर
अमेरिकेने
रियाध (सौदी
अरेबिया) येथील
त्यांचा
दूतावास
सुरक्षेच्या
कारणासाठी
दोन
दिवसांसाठी
बंद केला आहे.
|
·
अनेक
हिंदी आणि
मराठी
गीतांना
सुमधुर
आवाजाने
अजरामर
करणाऱ्या ज्येष्ठ
गायिका
कृष्णा
कल्ले (वय ७४)
यांचे दीर्घ
आजाराने निधन
झाले.
·
त्यांनी
२०० हिंदी
आणि १००
मराठी
चित्रपटगीते
गायली.
याखेरीज
अन्य
भाषांमध्येही
त्यांनी
गायन केले.
·
‘गोड
गोजिरी लाज
लाजरी’, ‘परिकथेतील
राजकुमारा’, ‘मैनाराणी
चतुर शहाणी...’ ही
कल्ले यांची
गाणी
चांगलीच
गाजली.
|
·
भूसंपादन
विधेयकाविरोधात
राष्ट्रीय
जनता दलाचे
(राजद)
अध्यक्ष लालूप्रसाद
यादव
यांच्या
नेतृत्वाखाली
पाटणातील
गांधी मैदान
ते राज
भवनादरम्यान
भव्य मोर्चा काढण्यात
आला.
|
·
बलात्कार
व
विनयभंगामध्ये
महाराष्ट्राचा
अव्वल
क्रमांक आहे, अशी
माहिती
महिला व
बालविकासमंत्री
मेनका गांधी
यांनी लोकसभेत
दिली.
·
सन २०१४
मध्ये
महाराष्ट्र (१३,८२७),
मध्य प्रदेश (१३,३२३)
व आंध्र
प्रदेश (१३,२६७)
या
राज्यांमध्ये
अनुक्रमे बलात्कार
व विनयभंगाच्या
सर्वाधिक
तक्रारी
दाखल झाली
आहेत.
|
·
फेब्रुवारीमध्ये
घाऊक महागाई
निर्देशांकात
(WPI) लक्षणीय घट
झाली आहे.
घाऊक किंमत
निर्देशांक
अपेक्षेपेक्षा
जास्त
चांगला
आल्याने, घाऊक
महागाई
निर्देशांक
पुन्हा
शून्याखाली
येत
फेब्रुवारीमध्ये
-२.०६
टक्क्यांवर पोहोचला
आहे.
|
·
केरळ
विधानसभेत
अर्थसंकल्पादरम्यान
विरोध पक्षाच्या
आमदारांनी
मोठ्या
प्रमाणात
गदारोळ केला.
शिवाय, विधानसभा
अध्यक्षांच्या
आसनालाही
धक्का दिला.
·
मुख्यमंत्री
ओमेन चंडी
यांनी पाच
विरोधी पक्षाच्या
आमदारांच्या
निलंबनाचा
प्रस्ताव मांडला.
·
पाचही
आमदारांना
विधानसभेचे
कामकाज
संपेपर्यंत
निलंबित करण्यात
आले आहे.
|
·
इराकमधील
तिक्रित
शहरात माजी
हुकूमशहा
सद्दाम
हुसेन यांची
दफनभूमी असलेले
स्मारक
इस्लामिक
स्टेटच्या (इसिस)
दहशतवाद्यांकडून
उद्ध्वस्त करण्यात
आले.
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा