प्रश्नसंच १४२ - विज्ञान तंत्रज्ञान

MT Quiz [प्र.१] रेडीओ तरंगाचा वेग हा .......... असतो?
१] प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त
२] प्रकाशाच्या वेगाएवढाच
३] प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी
४] प्रकाशाच्या वेगाच्या दोन पट


२] प्रकाशाच्या वेगाएवढाच
----------------
[प्र.२] ‘रमण परिणाम’ कशास म्हणतात?
१] फोटॉनच्या इलेक्ट्रॉनशी होणाऱ्या अप्रत्यास्थ संघातास
२] फोटॉनच्या इलेक्ट्रॉनशी होणाऱ्या प्रत्यास्थ संघातास
३] फोटॉनच्या रेणूशी होणाऱ्या अप्रत्यास्थ संघातास
४] फोटॉनच्या रेणूशी होणाऱ्या प्रत्यास्थ संघातास


३] फोटॉनच्या रेणूशी होणाऱ्या अप्रत्यास्थ संघातास
----------------
[प्र.३] ऑक्सिश्वसनाच्या शेवटी काय तयार होते?
१] कार्बन डायऑक्साइड व कार्बन मोनोऑक्साइड
२] कार्बन डायऑक्साइड व नायट्रोजन ऑक्साइड
३] कार्बन डायऑक्साइड व ऑक्सिजन
४] कार्बन डायऑक्साइड व पाणी


४] कार्बन डायऑक्साइड व पाणी
----------------
[प्र.४] खालीलपैकी कोणत्या पदार्थाच्या बाबतीत विद्युतधारा व विभवांतर यांचा आलेख काढला असता तो सरळरेषीय येत नाही व रोधाचे मूल्य स्थिर रहात नाही?
१] थर्मिस्टर
२] तांबे
३] चांदी
४] लोखंड


१] थर्मिस्टर
----------------
[प्र.५] एखाद्या ताऱ्याचा रंग काय सूचित करतो?
१] त्याचे सूर्यापासूनचे अंतर
२] त्याची प्रखरता
३] त्याचे तापमान
४] त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर


४] त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर
----------------
[प्र.६] खालीलपैकी कोणत्या सजीवांच्या प्रजाती जैवकीटकनाशके म्हणून वापरल्या जातात?
अ] जीवाणू
ब] बुरशी
क] विषाणू
ड] पुष्पीय वनस्पती

१] फक्त अ आणि ब
२] फक्त अ, ब आणि क
३] फक्त अ, ब आणि ड
४] वरील सर्व


३] फक्त अ, ब आणि ड
----------------
[प्र.७] व्होल्टच्या विद्युत घटामध्ये ...............
अ] तांब्याची पट्टी धन ध्रुव दर्शविते.
ब] जस्ताची पट्टी ऋण ध्रुव दर्शविते.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] दोन्ही योग्य
४] दोन्ही अयोग्य


४] दोन्ही अयोग्य
----------------
[प्र.८] कोणत्या इंद्रीयामध्ये पित्ताची निर्मिती केली जाते?
१] स्वादुपिंड
२] यकृत
३] जठर
४] लहान आतडे


२] यकृत
----------------
[प्र.९] जलवाहिनी उती या कोणत्या उपविभागांच्या मिळून बनलेल्या असतात?
अ] जलवाहिनी उती
ब] वाहनिका
क] वाहिनी
ड] जलवाहिनी तंतू

१] फक्त अ
२] फक्त अ आणि ब
३] फक्त अ, ब आणि क
४] वरील सर्व


४] वरील सर्व
----------------
[प्र.१०] क्षरण प्रतिबंधासाठी खालीलपैकी कोणकोणत्या पद्धती वापरतात?
अ] गॅल्व्हानायझेशन
ब] कथीलीकरण
क] विद्युत विलेपन
ड] धनाग्रीकरण

१] फक्त अ आणि ब
२] फक्त अ, ब आणि क
३] फक्त अ, ब आणि ड
४] वरील सर्व


४] वरील सर्व
----------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा