| 
·       
  २४
  मार्च : जागतिक
  क्षयरोग
  निर्मुलन
  दिन | 
  | 
·       
  इंडियन
  वेल्स ओपन
  महिला
  दुहेरीचे जेतेपद भारताची
  स्टार
  टेनिसपटू
  सानिया
  मिर्झा आणि
  तिची
  जोडीदार
  मार्टिना
  हिंगीस
  यांनी
  पटकावले आहे. 
·       
  रशियाच्या
  एलेना
  वेसनीना आणि
  एकातेरिना
  माकारोवा
  यांना
  सानिया आणि
  हिंगिस
  यांच्या जोडीने
  खेळण्यात
  आलेल्या
  सामन्यात ६-४, ६-४
  अशा सरळ
  सेटमध्ये
  पराभूत केले. 
·       
  हा
  किताब
  हिंगिसने
  दुसऱ्यांदा
  पटकावला असून
  याआधी तिने
  १६
  वर्षापूर्वी
  १९९९ मध्ये अॅना
  कुर्निकोवा सोबत
  खेळताना इंडियन
  वेल्स ओपनचे जेतेपद
  पटकावले
  होते.  
·       
  तर
  दुसरीकडे, सानिया
  मिर्झानेही
  हा किताब
  दुसऱ्यांदा
  पटकावला आहे. याआधी
  २०११ मध्ये सानिया-वेसनीना
  जोडीने
  जेतेपदावर
  आपले नाव कोरले
  होते. | 
  | 
·       
  पुण्यभूषण
  फाउंडेशनचा
  यंदाचा “पुण्यभूषण
  पुरस्कार” ‘सकाळ’
  वर्तमानपत्राचेचे अध्यक्ष
  प्रतापराव
  पवार यांना जाहीर
  झाला आहे.  
·       
  नांगराच्या
  फाळाने
  पुण्याची
  भूमी नांगरत
  असलेली
  बालशिवाजीची
  प्रतिकृती व
  एक लाख रुपये, असे
  या
  पुरस्काराचे
  स्वरूप आहे. लवकरच
  विशेष
  समारंभात या
  पुरस्काराचे
  वितरण होणार
  आहे.  
·       
  सामाजिक, पत्रकारिता; तसेच
  उद्योग
  क्षेत्रात
  गेल्या
  सुमारे चाळीस
  वर्षांपासून
  पवार
  कार्यरत
  आहेत. त्यांना
  गेल्या
  वर्षी
  "पद्मश्री‘ पुरस्काराने
  गौरविण्यात
  आले आहे.  
·       
  मराठा
  चेंबर ऑफ
  कॉमर्स
  इंडस्ट्रीज
  अँड ऍग्रिकल्चरचे
  अध्यक्ष
  म्हणून
  त्यांनी काम
  केले आहे. इंडियन
  न्यूज पेपर
  सोसायटीचे
  अध्यक्षपद; तसेच
  वर्ल्ड
  असोसिएशन ऑफ
  न्यूजपेपर्सचे
  उपाध्यक्षपद
  त्यांनी
  भूषविले आहे.  
·       
  प्रेस
  कौन्सिल ऑफ
  इंडियाचे
  सदस्य
  म्हणून त्यांची
  निवड झाली
  होती. भारत
  फोर्ज, फोर्स
  मोटार्स, किर्लोस्कर
  ऑइल इंजिन, फिनोलेक्स
  केबल या
  कंपन्यांच्या
  संचालक मंडळावर
  पवार काम
  करीत आहेत. | 
  | 
·       
  तब्बल
  सात
  वर्षांनंतर
  पाकिस्तानमध्ये
  राष्ट्रीय
  दिनानिमित्त
  संचलन झाले.
  तालिबानी
  दहशतवाद्यांच्या
  भीतीच्या छायेत
  वावरत
  असल्याने २००८ नंतर
  येथे एकदाही
  राष्ट्रीय
  दिनानिमित्त
  संचलन होऊ
  शकले नव्हते. 
·       
  पंतप्रधान
  नवाझ शरीफ
  आणि अध्यक्ष
  मामनून हुसेन
  हे दोघेही
  सोमवारी
  झालेल्या
  लष्करी संचलनास
  उपस्थित
  होते.
  पाकिस्तानी
  लष्कराच्या सर्व
  दलांनी
  संचलनात
  सहभाग घेतला
  होता. या वेळी
  क्षेपणास्त्रांचेही
  प्रदर्शन
  करण्यात आले. 
·       
  २३ मार्च
  १९४० ला
  मुस्लिम
  लीगने सादर
  केलेल्या
  प्रस्तावामध्ये
  पाकिस्तानच्या
  निर्मितीचा
  उल्लेख केला
  होता.
  त्यानिमित्त
  २३ मार्च
  हा
  पाकिस्तान
  दिन म्हणून
  साजरा केला जातो. | 
  | 
·       
  ऑनलाईन
  संकेतस्थळांवर
  व्यक्त
  केलेल्या मतांसंदर्भात
  अटक
  करण्यासाठी
  पोलिसांकडून
  आधार
  घेण्यात
  येणारे माहिती
  तंत्रज्ञान
  कायद्याचे ६६-अ
  हे कलम
  सर्वोच्च
  न्यायालयाने
  रद्दबातल ठरविले. 
·       
  शिवसेनाप्रमुख
  बाळासाहेब
  ठाकरे
  यांच्या निधनानंतर
  मुंबईमधील
  कामकाज
  पूर्णत: बंद
  पडल्यासंदर्भात
  टीका
  करणाऱ्या “पोस्ट्स” दोन
  तरुणींनी
  प्रसिद्ध
  केल्या
  होत्या. यावर पोलिसांनी
  या कलमाचा
  आधार घेत या
  तरुणींना अटक
  केली होती.
  तेव्हा २१
  वर्षे वय
  असलेल्या
  श्रेया
  सिंघलने
  याविरोधात
  सर्वोच्च
  न्यायालयामध्ये
  याचिका दाखल
  केली होती. | 
  | 
·       
  मिचेल
  प्लॅटिनी
  यांची युनियन
  ऑफ युरोपियन
  फुटबॉल
  असोसिएशनच्या
  (युईएफए)
  अध्यक्षपदी
  पुन्हा निवड झाली आहे.  
·       
  २४
  मार्च रोजी
  झालेल्या
  निवडणुकीत
  प्लॅटिनी
  यांनी
  तिसऱ्यांदा
  अध्यक्ष
  होण्याचा
  मान मिळवला.  
·       
  फ्रान्सचे
  माजी
  आंतरराष्ट्रीय
  फुटबॉलपटू प्लॅटिनी
  यांनी पहिल्यांदा
  २००७ मध्ये
  युईएफएच्या
  अध्यक्षपदाची
  सूत्रे स्वीकारली
  होती़   
·       
  निवडणुकीत
  ५४
  देशांच्या
  प्रतिनिधींनी
  त्यांची
  बिनविरोध
  निवड करून
  त्यांच्याकडे
  आणखी चार
  वर्षे
  सूत्रे दिली. | 
  | 
·       
  राष्ट्रपती
  प्रणव
  मुखर्जी
  यांनी २१
  मार्च रोजी
  सशस्त्र
  दलातील
  जवानांना १
  कीर्ती चक्र
  आणि ११ शौर्य
  चक्र देऊन
  सन्मानित केले. यात
  तिघांचा
  मरणोत्तर
  सन्मान
  करण्यात आला. 
·       
  राष्ट्रपती
  भवनात हा
  सोहळा
  आयोजित
  करण्यात आला
  होता.
  दहशतवाद आणि
  नक्षलविरोधी
  कारवायांमध्ये
  आपल्या
  प्राणांची
  बाजी लावून
  अद्भुत
  शौर्याचे
  दर्शन
  घडविणाऱ्या
  सशस्त्र
  दलांमधील
  जवानांना हे
  पुरस्कार
  प्रदान
  करण्यात आले. 
·       
  कीर्ती
  चक्र आणि
  शौर्य
  चक्रांसोबतच
  राष्ट्रपतींनी
  १४
  परमविशिष्ट
  सेवा पदक, तीन
  उत्तम युद्ध
  सेवा पदक आणि २६
  अतिविशिष्ट
  सेवा पदकही जवान व
  अधिकाऱ्यांना
  प्रदान केले.
  या सोहळ्यात
  उपराष्ट्रपती
  हमीद
  अन्सारी, पंतप्रधान
  नरेंद्र
  मोदी आणि
  संरक्षण
  मंत्री
  मनोहर
  पर्रिकर
  यांच्यासह अनेक
  मंत्री आणि
  विविध
  राजकीय
  पक्षांचे
  नेते
  उपस्थित
  होते. 
·       
  एकमेव
  कीर्ती चक्र
  पॅराशूट
  रेजिमेंटचे
  कॅप्टन
  जयदेव यांना प्रदान
  करण्यात आले.
  गेल्या
  वर्षी १९ जून
  रोजी
  जम्मू-काश्मीरच्या
  पुलवामा
  जिल्ह्यात
  दहशतवादी
  आणि
  राष्ट्रीय
  रायफल्सच्या
  जवानांमध्ये
  घमासान सुरू
  असताना छाती, चेहरा
  आणि पायावर
  गोळी
  लागल्यानंतरही
  दोन अतिरेक्यांचा
  खात्मा करीत, जयदेव
  यांनी मोहीम
  फत्ते
  होईपर्यंत
  वैद्यकीय
  उपचारालाही
  नकार दिला
  होता.  
·       
  तर, २८
  ऑक्टोबर
  २०१३ रोजी
  नियंत्रण
  रेषेवर घुसखोरीचा
  प्रयत्न
  हाणून
  पाडताना
  प्राणाची
  आहुती
  देणारे सुभेदार
  प्रकाश चांद
  यांना
  मरणोत्तर
  शौर्यचक्र प्रदान
  करण्यात आले. | 
  | 
·       
  गुटखा
  विक्री करणं
  हा आता
  अजामीनपात्र
  गुन्हा असेल अशी
  घोषणा
  महाराष्ट्र
  राज्य
  सरकारनं केली
  आहे.  
·       
  या
  नव्या
  निर्णयामुळे
  आरोपीवर भारतीय
  दंडविधानाच्या
  कलम ३२८
  नुसार विषप्रयोग
  करून गुन्हा
  करण्याचा
  इरादा असणे
  असा आरोप ठेवला
  जाणार आहे व
  त्याला १०
  वर्षाच्या
  शिक्षेची
  तरतूद केली
  जाणार आहे. 
·       
  अन्न
  आणि औषध
  प्रशासन मंत्री
  - गिरीश बापट | 
  | 
·       
  नोवाक
  जोकोविकने
  रॉजर
  फेडररचा
  बीएनपी पारिबास
  इंडियन
  वेल्स ओपन
  टेनिस
  स्पर्धेच्या
  अंतिम फेरीत
  पराभव करून
  जेतेपद
  पटकविले. 
·       
  जोकोविकने
  कारकिर्दितील
  ५०वा एटीपी
  किताब आपल्या
  नावावर केला
  आहे. या
  विजयासह
  इंडियन वेल्समध्ये
  सर्वाधिक
  चार किताब जिंकण्याच्या
  फेडररच्या
  विक्रमाची
  बरोबरी
  जोकोविकने
  केली आहे.
  यापूर्वी
  त्याने २००८, २०११
  आणि २०१४
  मध्ये या
  स्पर्धेचे
  जेतेपद पटकविले
  होते. | 
  | 
·       
  रोमानियाच्या
  सिमोन
  हालेपने
  सर्बियाच्या
  जेलेना
  जानकोविकचा
  बीएनपी
  पारिबास
  इंडियन वेल्स
  ओपन टेनिस
  स्पर्धेच्या
  अंतिम फेरीत पराभव
  करून महिला
  एकेरीचे
  जेतेपद
  पटकविले.  
·       
  जानकोविकला
  जागतिक
  क्रमवारीत
  तिसऱ्या स्थानी
  असलेल्या
  हालेपने २-६, ७-५, ६-४
  च्या फरकाने
  पराभूत केले. | 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा