प्रश्नसंच १४० - भूगोल

MT Quiz
[प्र.१] ‘अभोर’ व ‘अप्तानी’ या जमाती भारतातल्या कोणत्या भागात आढळतात?
१] नागालॅड
२] सिक्कीम
३] अरुणाचल प्रदेश
४] हरियाणा


२] सिक्कीम
----------------
[प्र.२] हिंदी महासागरावरील भारताचा प्रभाव कमी करण्यासाठी ‘Pearl of Ring’ हि योजना कोणत्या देशाने राबविली?
१] अमेरिका
२] रशिया
३] चीन
४] ऑस्ट्रेलिया


३] चीन
----------------
[प्र.३] महाराष्ट्रात अॅस्बेस्टॉसचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात?
१] पुणे व अहमदनगर
२] पुणे व सोलापूर
३] रत्नागिरी व नागपूर
४] कोल्हापूर व सांगली


१] पुणे व अहमदनगर
----------------
[प्र.४] दलहस्ती उर्जा निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे?
१] चिनाब
२] कृष्णा
३] पेन्नार
४] कावेरी


१] चिनाब
----------------
[प्र.५] लाटांपासून वीजनिर्मिती करण्याची क्षमता खालीलपैकी कोणत्या भागात सर्वाधिक आहे?
१] खंबातचे आखात
२] मन्नारचे आखात
३] पाल्कची सामुद्रधुनी
४] केरळ किनारपट्टी


१] खंबातचे आखात
----------------
[प्र.६] वाळूचे दांडे तयार झाल्यानंतर दांडा व किनारा यांच्या दरम्यान तयार झालेल्या सरोवरास काय म्हणतात?
१] भूशिर, पुळण
२] लगून
३] भूबद्धद्वीप
४] वक्रदंड


२] लगून
----------------
[प्र.७] खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात डोलामाईटचे साठे आढळत नाहीत?
१] यवतमाळ
२] भंडारा
३] नागपूर
४] रत्नागिरी


२] भंडारा
----------------
[प्र.८] येलदरी प्रकल्पाबाबत अयोग्य विधान ओळखा.
अ] हा प्रकल्प पूर्णा नदीवर उस्मानाबाद जिल्ह्यात बांधला आहे.
ब] या प्रकल्पातून ५ मेगावॅट विद्युतउर्जा निर्माण केली जाते.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] दोन्ही योग्य
४] दोन्ही अयोग्य


१] फक्त अ
[हा प्रकल्प पूर्णा नदीवर परभणी जिल्ह्यात बांधला आहे.]

----------------
[प्र.९] खालीलपैकी कोणत्या खडकांचा पठरामध्ये समावेश होतो?
अ] आर्कीयन खडक
ब] धारवाड खडक
क] कडप्पा खडक
ड] कॅमरीयन खडक
इ] गोंडवाना खडक
फ] विंध्य खडक

१] फक्त अ, क आणि फ
२] फक्त ब, ड आणि इ
३] फक्त क आणि फ
४] वरील सर्व


४] वरील सर्व
----------------
[प्र.१०] कडप्पा खडकांसंदर्भात खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.
अ] विंध्य आणि कडप्पा खडकाच्या निर्मितीचा काळ एकच असला तरी कडप्पा खडक विंध्यपेक्षा प्राचीन आहे.
ब] महाराष्ट्रात हा खडक दक्षिण आणि पूर्व भागात आढळतो.
क] या खडकाला कडालगी सीरीज असे म्हणतात.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] फक्त अ आणि क
४] वरील सर्व


४] वरील सर्व
----------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा