चालू घडामोडी - २१ मार्च २०१५
- २१ मार्च : जागतिक वन दिन.
- २१ मार्च : रात्र व दिवस समान असणारा दिवस
- भारताचे ‘वॉटर मॅन’ म्हणून ओळखले जाणारे जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांना प्रतिष्ठेचा ‘स्टॉकहोम वॉटर प्राइज लॉरेट’ हा पुरस्कार मिळाला आहे. पाणी जतन करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांसाठी दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार आहे.
- पाणी वाचविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागांमध्ये सातत्याने झटून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान केल्याचे स्टॉकहोम वॉटर फाउंडेशनने म्हटले आहे.
- दीड लाख अमेरिकी डॉलरचा हा पुरस्कार स्वीडनच्या राजांच्या हस्ते लवकरच प्रदान करण्यात येणार आहे.
- डॉ. राजेंद्रसिंह यांचे कार्य प्रामुख्याने राजस्थानमध्ये आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांनी अनेक नद्यांचे पाणी उपयोगात आणून त्यांचे आयुष्य बदलविले.
- त्यांना २००१ साली रेमन मॅगसेसे पुरस्काराने (सामुदायिक नेतृत्व) गौरविण्यात आले आहे.
- अंडरवर्ल्ड डॉन विशाल गोस्वामीला उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये मथुरेनजीक अटक करण्यात गुजरात पोलिसांना यश आले.
- पाकिस्तानने सद्भावनेतून ५७ भारतीय मच्छीमार नौका भारताकडे सुपूर्त केल्या. पाकिस्तानमधील परराष्ट्र कार्यालयाने याबाबत माहिती दिली आहे. पाकिस्तानने या नौका सुस्थितीत जतन केल्या होत्या. किरकोळ दुरुस्ती केल्यानंतर त्या समुद्रामध्ये वापरता येतील.
- स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) पाच रुपयांची नवीन नाणी आणली आहेत.
- या नाण्यावर नेहरू यांची चित्रही असणार आहे. लवकरच हे नाणे चलनात उपलब्ध होणार आहे. भारतीय नाणे कायदा २०११ नुसार यापूर्वी चलनात असलेली पाच रुपयांच्या नाण्यासह हे नवीन नाणेही चलनात असणार आहे.
- या नाण्यावर एका बाजूला अशोकस्तंभाचे चित्र असेल. त्याखाली ‘सत्यमेव जयते’ हे शब्द असतील. तर नाण्याच्या डाव्याबाजूला देवनागरीमध्ये ‘भारत’ हे शब्द असतील. तर उजवीकडे इंग्रजीभाषेत ‘इंडिया’ असा शब्द असेल.
- तसेच ‘१२५’ हा आकडाही असेल. तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला मध्यभागी जवाहरलाल नेहरू यांचे चित्र असेल. त्याखाली ‘125th BIRTH ANNIVERSARY OF JAWAHARLAL NEHRU’ असे इंग्रजीमध्येच लिहिलेले असेल. सोबतच ‘१८८९-२०१४’ असेही लिहिलेले असेल.
- माजी केंद्रीय मंत्री व कॉंग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांच्याविरुद्ध उमेदवारी देण्याच्या बदल्यात १.१० कोटी रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरून तेलंगणमधील खम्मम जिल्ह्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- गेल्या पाच ते दहा वर्षांत कोणतीही निवडणूक न लढविणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा विचार सुरू असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. निवडणूक प्रकियेत काही पक्ष सहभागी होत नसल्याबद्दल आयोगाने चिंता व्यक्त केली आहे.
- राष्ट्रीय निवडणूक निरीक्षण परिषदेचे कोलकत्यात आयोजन करण्यात आले आहे.
- मुख्य निवडणूक आयुक्त - एच. एस. ब्रह्मा
- नोंदणीकृत राजकीयपक्ष - १६०० / निवडणूक प्रक्रियेत सहभागी पक्ष - २००
- नेटीझन्सना संवादाचे नवे माध्यम उपलब्ध करून देणाऱ्या ट्विटरला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत.
- ट्विटरचे संस्थापक जॅक दोर्सी यांनी बरोबर नऊ वर्षांपूर्वी म्हणजे २१ मार्च २००६ रोजी “जस्ट सेटिंग अप माय ट्विटर” असे ट्विट करून नव्या संवाद क्रांतीला जन्म दिला होता.
- ट्विटरवरील प्रतिक्रियेची शब्दमर्यादा केवळ १४० शब्दांची आहे.
- ‘हॅशटॅग’च्या वापरामुळे ट्विटरवरील संवादाला एक वेगळी खोली मिळाली.
- ट्विटरचा पसारा : २८८ दशलक्ष - दरमहा युजर्स / ५०० दशलक्ष - रोज होणारे ट्विट
- भाजपचे कवींद्र गुप्ता यांची १२व्या जम्मू काश्मीर विधानसभा सभापती पदी बिनविरोध एकमताने निवड झाली.
- भारताने स्वनिर्मित अस्त्र क्षेपणास्त्राची चाचणी चंडीपूर, ओदिशा येथून घेतली.
- जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्राची निर्मिती संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) ने केली आहे.
- या क्षेपणास्त्राचा वेग १.२ मॅक ते १.४ मॅक असून हे एक सुपरसोनिक क्षेपणास्त्र आहे.
- या क्षेपणास्त्राची १५ किलोची पारंपारिक स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे.
- हि चाचणी सुखोई-३० MKI या विमानावरून घेण्यात आली आहे.
- ‘गोदाम महामंडळ कायदा, १९६२’ मध्ये दुरुस्ती करून तयार केलेले ‘गोदाम महामंडळ (दुरुस्ती) विधेयक, २०१५’ लोकसभेत पास झाले आहे.
- ‘गोदाम महामंडळ (दुरुस्ती) विधेयक, २०१५’ मुळे ‘केंद्रीय गोदाम महामंडळा’ला मिनिरत्न हा दर्जा दिला जाणार आहे.
- त्यामुळे हे महामंडळ स्वायत्त बनेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा